Sunday, December 27, 2009

मराठा आरक्षण

सध्या रोज पेपर मध्ये मराठा आराक्षणाच्या मुद्द्यावरून बरेच लिखाण वाचायला मिलत आहे. काही मराठावादी संघटना मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी अक्षरश: राण ऊठवल्याचे भासवत अहेत. असे वाटायला लागले आहे की येणार्‍या दिवसात जर मराठ्यांना आरक्षन मिळाले नाहीच तर जणू काही या देशावर महान आपत्ती येवून ठेपणार आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी म्हणा अथवा सध्या कोणताही ज्वलंत असा मुद्दा जवळ नसल्यामुळे म्हणा या मराठावादी संघटनांनी आता ’मराठा आरक्षणा’च्या मुद्द्याचे भांडवल केलेले आहे. तसे पाहीले तर यांना मराठ्यांना खरेच आरक्षण द्यावयाचे असते तर आतापर्यंत मिळालेही असते कारण यांच्याशी संबंधीत नेते व या संघटनांवर वरदहस्त असणारे नेतेच सध्या देश चालवत आहेत, त्यामुळे खरेच हा जर मुद्दा अतिशय गंभिर अशा स्वरूपाचा असता तर आतापर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकालात निघाला सुद्धा असता ...आणि नेमके हेच या मराठा संघटनांना नको आहे कारण ज्या मुद्द्याचे आजपर्यंत भांडवल करुन आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो मुद्दाच या लोकांना निकालात काढून चालणार नाव्हता आनि म्हणुनच अजुनही या मुद्द्याच्या आधारे मराठा तरुणांची माथी भडकवून हा मुद्दा धगधगत ठेवला जात आहे.. यामुळे संबंधीत संघटनेचे अस्तित्व दिसुन येते व दुसरी गोष्ट म्हणजे संघटनांच्या कार्यकर्त्यांना फुकटची प्रसिद्धी मिळून जाते.
सध्या गाजत असलेला इस्लामी दहशतवाद, भ्रष्टाचार, बांग्लादेशी घुसखोरी इत्यादी महत्वाचे प्रश्न या मराठा म्हणवून घेणार्‍या संघटनांनी अगदी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेले आहेत कारण १) दहशतवादाचा व बांग्लादेशी घुसखोरीचा मुद्दा घेतला तर सहाजिकच मुसलमानांच्या विरोधात सूर जातो आणि हे या मराठा संघटनांना परवडणारे नसते कारण यामुळे संघटनेची मुस्लिम विरोधी अशी प्रतिमा समाजात निर्माण होते आणि त्यामूळे धर्मांध, गुंड आणि ना जाणॊ आणखी किती विषेशणे लावली जातात आणि हे या संघटनांना नको आहे... याच्याही पुढे जावून असे म्हणता येईल की काही मराठावादी संघटनांचे मुसलमानांशी हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे सदर दोन मुद्द्याला हात घालण्याचे धाडस या संघटना करणार नाहीत हे स्पष्टच होते. तिसरा मुद्दा म्हणजे ’भ्रष्टाचार’ या मुद्द्यावर बोलायचे म्हणजे या संघटणांना घरच्याच म्हतारीचा काळ वाटतो , कारण बहुतेक मराठा संघटनांच्या डोक्यावर कोना ना कोणा ’बड्या’ नेत्याचा वरदहस्त आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे म्हणजे नेतेमंडळी यांच्या विरोधात बोलणे आलेच, हे या संघटनांना परवडनार नाहीच. ! आणि शेवटी आपली संघटना जिवंत ठेवण्यासाठी कोणत्या न कोणत्या तरी मुद्द्याचे भांडवल करणे आवश्यक होते म्हणुन एक अतिशय सोईचा मुद्दा या संघटनांनी शोधून काढला ... आणि तो म्हणजे ’मराठा आरक्षण’! यामुळे आपल्या संघटनेचा जिवंतपणा सुद्धा राखला जाईल व ’मराठा संघटना’ या विषेशनाला शोभणारा असा मुद्दा असल्याने या मुद्द्यावर आज राण उठवले जात आहे ! वास्तविक यांच्य हेतू मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा नसून आपले अस्तित्व व आपल्या संघटनेचा जिवंतपणा टिकवण्याचा आहे.. आणि या दिखावेबाज उद्देशातूनच संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करतो, याच उद्देशातून शिवणेरीवर धुदगूस घातला जातो. आणि आपली संघटना मराठ्यांना आरक्षन मिळवून देण्यासाठी किती आक्रमक आहे हे दाखवून देण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो.
शेवटी एकच प्रश्न पडतो की असे काय झाले की एके काळी अटकेपार भगवा फडकवणार्‍या मराठ्यांवर आरक्षनाची भिक मागण्याची वेळ यावी ??

No comments:

Post a Comment