Sunday, December 27, 2009

सागरी सुरक्षेसाठी नौदल सतर्क : राष्ट्रपती

एका कार्यक्रमात असताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढलेले हे बदलात्मक उद्गार... पुन्हा एकादा एखादा कसाब..ईस्माईल आणखी एका ताज वर चलून येवू नये व पुन्हा आम्हाला आमचे काही करकरे, कामटे व साळसकर गमवावे लागू नयेत म्हणुन आता राष्ट्रपतिंनी आपले सागरी सुरक्षा सतर्क केलेली आहे.. चांगली गोष्ट आहे.. पण एक विचार मनात येतो की हा शहाणपणा आपल्याल्या कसाब ताजमध्ये घुसण्याच्या आधी का बरे सुचला नसेल ? एकदा एक कसाब समुद्रमार्गे ताज वर हल्ला करण्यासाठी आला म्हणुन पाकिस्तानात बसलेले सर्वच कसाब याच समुद्रमार्गे भारतात येतील असा गैरसमज आमच्या राष्ट्रपतिंना झालेला आहे की काय ? पाकीस्तानी भारता येण्यासाठीची अशी अनेक ठीकाणे आहेत. बांग्लादेशी ज्या पद्धतिने भारतात प्रवेश करतात ते पाहून पाटील बाईंचे भाषण किती पोकळ व निरर्थक आहे हे समजायला वेळ लागणार नाहि....आता होनार असे की.. बांग्लादेश मार्गे एखादा कसाब अथवा अफजल भारतात घुसून आपला नंगा नाच चालवनार पुन्हा आमचे करकरे, कामटे आणि साळसकर बलिच्या वेदी वर चढनार आणि त्या नंतर आमच्या प्रतिभा पाटील बाइंना शहाणपण सुचणार .... मग पुन्हा एकदा एखाद्या समारोहात पाटील बाई गरजनार ..."सिमेवरील सुरक्षेसाठी पायदळ सतर्क".
दुसरी गोष्ट म्हणजे कालचीच गोष्ट... पाक सैनिकांनी या आठवड्यात पाचव्यांदा शस्त्रसंधी तोडून भारतीय सिमेवर गोळीबार केला .... त्यात पुन्हा आमचा एक कामटे हुतात्मा झाला. याबद्दल आमच्या राष्ट्रपतींना काहीच का बोलवे असे वाटले नाही ?? जर या चकमकी मध्ये पाक सैन्याने भारतीय सैन्यावर मात करुन भारतात प्रवेश केला असता व पुन्ह एकादी ’कसाबलीला’ आपल्याला पहालया मीळाली असती ..तेव्हा झोपेतून जागे झाल्यासारखे आमच्या प्रतिभाबाई म्हनाल्या असत्या ...." सिमेवरील सुरक्षेसाठी पायदळ सतर्क करनार......" आपण फक्त करतो ईतकेच की अजपर्यंत पाक ने किती किती वेळा आणि कधि-कधी शत्रसंधी तोडूण भारतात घुसखोरी केली किती महिण्यात किति वेळा आणि किती वर्षात किती वेळा आपल्यावर आक्रमण केले... याचे गणित करत बसतो...! तेवढेच काम बाकी राहीलेले आहे आता आपल्याला. ! आपणही आता शस्त्रसंधी तोडावी व पाक हद्दीत घूसून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यावी असे देशप्रेमाचे गोदवे गाणार्‍या एकाही नेत्याला वा राजकारण्याला व आमच्या एकाही सैनिक अधिकार्‍याला वाटत नाही हे विषेश !

No comments:

Post a Comment