Sunday, March 28, 2010

: येशू ख्रिस्त आणि भारत :

येशू ख्रिस्ताचा जन्म फिलीस्तीनमधील नाझरेथ या शहरात झाला. येशू ख्रिस्त हा अब्राहमच्या वंशातील असे बायबल सांगते. या काळात फिलीस्तीनवर रोमन स‌म्राट सीझरची सार्वभौम स‌त्ता होती आणि तेथे हेरोद राजा रोमन स‌म्राटाचा मांडलिक म्हणून राज्य करीत होता. येशू लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचा असल्याचे उल्लेख शुभवार्तेत येतात. जॉन द बाप्टिस्ट हा त्याचा मावसभाऊ. त्याच्याकडूनच येशूने पुढे दीक्षा घेतली. त्यानंतर येशू तडक पहाडात गेला. चाळीस दिवस तेथे त्याने तप केले. त्यातून तावून-सुलाखून निघून तो खाली उतरला आणि मग कौफरनाम या ग्यालीली प्रांतातील शहरात आला. तेथे त्याने आपले पहिले प्रवचन दिले. त्यावेळी तो 26-27 वर्षांचा होता. येशूचा जन्म कुमारी माता मेरीच्या पोटी देवाच्या कृपेने झाला. येशू हा देवाचा अंश आहे . अशी माहीती बायबलात येते.
यासाठी आपण प्रथम बायबल म्हणजे काय हे पहावे लागेल. बायबल या शब्दाचे मूळ ग्रीक बिब्लियन (biblion) असे आहे. त्याचा अर्थ ग्रंथ. बायबलचे दोन भाग आहेत. एक जुना टेस्टामेन्ट आणि दुसरा नवा टेस्टामेन्ट. टेस्टामेन्ट म्हणजे साक्षपुरावा. जुना टेस्टामेन्ट हा ज्यूंचा धर्मग्रंथ आहे. त्यात त्यांचे धर्मशास्त्र, प्रेषित आणि ग्रंथ यांची माहिती आहे. नव्या टेस्टामेन्टमध्ये येशूचे चरित्र आहे. त्याचे 27 भाग आहेत. पहिल्या चार भागांना इंग्रजीत गॉस्पेल (शुभवार्ता) म्हणतात. त्यात येशूचे जीवन सांगितले आहे. हे चार भाग असे - म्याथ्यूची शुभवार्ता, मार्कची शुभवार्ता, ल्यूकची शुभवार्ता आणि जॉनची शुभवार्ता. यातील म्याथ्यू हा येशूच्या प्रत्यक्ष संबंधात आला होता असे म्हणतात. मात्र इतिहासकारांच्या मते म्याथ्यूची शुभवार्ता ख्रिस्तानंतर 70च्या पुढे लिहिली गेली असावी, असे म्हणतात. एकंदर हे चारही शुभवार्ताकार भक्त-संत येशूच्या नंतर 60 ते 100 वर्षांच्या काळात झालेले आहेत. त्यांनी येशूचे शिष्य वा अनुशिष्य यांच्या तोंडून ऎकलेल्या कथा आपापल्या शुभवार्तेत सांगितल्या. हा स‌र्व भाग मुळात ग्रीकमध्ये आहे. आजचे इंग्रजी बायबल हे इंग्लंडच्या पहिल्या जेम्स राजाने इ. स. 1611 मध्ये करून घेतलेले भाषांतर आहे. तेच अधिकृत म्हणून प्रचलित आहे.
तर या शुभवार्तांमध्ये येशूचे बालपण ते मृत्यू व त्याचे पुन्हा जिवंत होणे वगैरे हकिकती येतात. असे असले, तरी रशियन संशोधक निकोलाय नातोविच यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत येशू कोठे होता याचा खुलासा काही होत नाही. एवढेच नव्हे तर मृत्युनंतर तिस-या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला. पण त्यानंतर काय? त्यानंतर त्याचे काय झाले? तो कोठे गेला? या प्रश्नांची उत्तरेही सापडत नाहीत. नातोविच यांनी इ. स. 1890मध्ये ’ द अननोन लाईफ ऑफ जीजस ख्राईस्ट’ हे पुस्तक लिहिले. निकोलाय नातोविच हे रशीयन ज्यु असुन त्यांचा जन्म क्रिमिया या शहरामध्ये सन १८५८ मध्ये झाला. नातोविज हे पत्रकार होते व नंतर त्यांनी लेखक म्हणुन आपले नाव कमवले. यांच्या ’द अननोन लाईफ ऑफ जीजस ख्राईस्ट हे पुस्तक प्रकाशीत होताच पोपने त्यावर तत्काळ बंदी घातली. तर या पुस्तकानुसार "तिस-या शतकापर्यंतच्या ऎतिहासिक नोंदींमध्ये येशूचा उल्लेखच येत नाही. येशूला सुळावर दिल्यानंतर सुमारे 80 वर्षांनंतर रोमन इतिहासकारांनी आपल्या बखरींत ख्रिश्चन सेक्टचा उल्लेख केलेला आहे. पण त्यात जीजस ख्राईस्ट या व्यक्तीचा नामोल्लेख नाही. इ. स. 98 मध्ये जोसेफ फ्लेव्हियस या ज्यू इतिहासकाराने 'ज्युईश अँटिक्विटीज' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात तत्कालिन ज्ञात इतिहास शक्य त्या विस्ताराने दिला आहे. नीरो या रोमन स‌म्राटाच्या कारकीर्दीचे वर्णन त्यात आहे. जॉन द बाप्टिस्ट, हेरोद (अँटिपस) आणि (रोमच्या बादशहाचा प्रतिनिधी पाँटिअस) पायलेट यांचे वर्णन आहे. तत्कालिन स‌माजजीवनाचेही वर्णन आहे. पण त्यात जीजस किंवा इसाचे नाव येत नाही.
बायबल व तत्सम तत्कालीन व उत्तरकालीन लेखांमध्ये येशूच्या जन्मपनापासून ते बारा वर्षापर्यंतच्या जिवनकार्याचा उल्लेख आहे. येशूने आपले प्रथम प्रवचन दिले तेव्हा तो २६-२७ वर्षाचा होता. मग येशू १२-१३ ते २५-२६ वर्षांमध्ये कोठे होता ? या वर्षात त्याने काय केले ? या वर्षांच उल्लेख बायबल अथवा तत्कालीन पुस्तकांमध्ये का येत नाही ? नातोविच विचारतात, या अनुल्लेखामागचे रहस्य काय? वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत इसा कोठे होता? या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ते 1867मध्ये काश्मीरमध्ये आले. तेथून ते लेहला गेले व हेमिस या बुद्धमठात असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्या हस्तलिखितांमध्ये काय लिहिलेले होते?
इस्त्रायलमध्ये जन्माला आलेला इसा हा यशोदा पुत्र कृष्ण या हिंदू अवतारमालिकेतील नवा अवतार असून, तो बुद्धानंतरचा युरोपातील अवलोकितेश्वर म्हणून ओळखला जाईल, अशी भाकिते त्या जुन्या पोथ्यांमध्ये होती!! नंतर 19व्या शतकात लेव्ही डाऊलिंग यांचे the Aqurion Gospal नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी नातोविच यांच्या 'संशोधना'स पुष्टीच दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बारा ते एकोणिस वर्षांपर्यंत येशू हिंदुस्थानात होता! या पुस्तकात डाऊलिंग यांनी म्हटले आहे, की "ओरिसाच्या एका राजपुत्राने एका देवळात बारा वर्षांच्या मुलास पाहिले. तो बुद्धिवान आहे असे दिसले व त्यास घरी आणून शिक्षण दिले. जगन्नाथाच्या भव्य देवालयात त्याला विद्यार्थी म्हणून स्वीकृत करण्यात आले. वेदांचा व मनूच्या धर्मशास्त्राचा प्राथमिक अभ्यास करण्याची संधी त्याला येथे मिळाली. येथे गुरुजनांशी वाद करताना त्याने बुद्धिवाद केल्यामुळे त्याला ब्राह्मणवर्गाचा रोषही पत्करावा लागला."
येशूचा हिंदु धर्माशी पर्यायाने भारताशी असलेला संबंध:
याठीकाणि एका पत्रातील संदर्भाचा उल्लेख करणे महत्वाचे आहे हे पत्र ख्रिस्ताचा समकालीन असलेला पब्लिअस सेंटुअल - जुडिया जो रोमन अधिकारी पंनियस पिलेट याच्यामागुन अधिकारपदावर असलेल्या मनुष्याने केले आहे . या पत्रामध्ये पब्लिअस येशूचे वर्णन करताना म्हणतो, ".......त्याची (येशूची) दाढी डोक्यांच्या केसाप्रमाणेच असुन थोडीशी लाल आणि विभागलेली आहे." (ख्रिस्ताची दाढी ठेवण्याची पद्धत हिंदूंप्रमाणे होती यवरुन कळते). यापुढे पब्लिअस म्हणतो की, "...याने (येशूने) कधी अध्ययन केल्याचे कोणास ठाऊक नाही, पण तो सर्व शास्त्रांत प्रविण आहे".
डॉ. नातोवाच यांनी पंचेचाळीस वर्षे संशोधन करुन ’ख्रिस्त हा ईशान पंथाचा साधू होता व भारत वर्षात सतत सतरा वर्षे निवस करुन अनेक तिर्थस्थाने पर्यटन करत विद्याध्यायन केले.’ असे ठरवले. येशू आपल्या बारा ते तीस वर्षापर्यम्त भारतात ज्ञानसंपादनासाठी आला असावा असा पुष्कळजनांचा समज होता. पण या गोष्टीला भक्कम पुरावा मिळत नाही आइ ती ऊणिव डॉ. नोतोविच यांनी पंचविस वर्षे परिष्रम करुन भरुन काढली. त्यांनी हिंदुस्थानचा प्रवास केला. या प्रवासात ते तिबेट मधील ’हिमस’ येथील बुद्धमंदीरात गेले. तेथील बौद्ध धर्मगुरुंनी पुस्तकांच्या पेटीतुन एक फार पुरातन कालीन पोथी काढून ती त्यांना दाखवली. नोतोवाचाम्नी त्या पोथीची छायाचीत्रे घेतली. आणि स्वदेशी परत आल्यावर त्या छायाचित्रांची nigative करुन तीन तीन छायाचित्रे छापली. अशाप्रकारे त्या दुर्मीळ ग्रंथाच्या तीन प्रती केल्या. त्या ग्रंथात ख्रिस्ताने हिंदुस्थानात सतरा वर्षे घालवली याचा वृत्तांत असुन त्यात त्याने रचलेल्या एका लहानशा पुस्तकाचाही उल्लेख आहे.
याचप्रमाणे आता येशूच्या वेशभुषेकडे थोडी नजर टाकू. जर्मन चित्रकार परंपरेतील लुईनी, बोलिनी, व्हेल्याक्यास आणि ईतर चित्रकारांनी खांबाशी उभे असताना नी सुळावर दिल्याचे वेळी जी ख्रिस्ताची चित्रे रेखाटली आहेत, ती सर्व-दक्षिण हिंदु ज्याप्रमाणे सकच्छ धोतर नेसतात, त्याप्रमाणे धोतर नेसलेली काढलेली आहेत. याचबरोबर फ्लारेन्स च्या उफिजी गॅलरी मध्ये एका पेरिगिनो नावाच्या चित्रकाराच्या परंपरेतील एका बाजुला चित्रकाराने एका चित्रात आणि मोंझाच्या कॅथेड्रल मधील अंपुलित काढलेल्या चित्रांत ख्रिस्ताने यज्ञोपवित धारण केल्याचे चितारले आहे. बाराव्या शतकात ईटालीयन खोदकाम करणार्‍या बेनेडेटो अन्टेलामी याने पार्मामध्ये काढलेल्या चित्रांमध्ये मेरीला साडीचा वेश आणि गळ्यांत हिंदु पद्धतीचा अलंकार असलेला काढलेला आहे.
क्रांतिरत्न श्री बाबाराव सावरकर यांनी आपल्या ’ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’ या पुस्तकात येशू ख्रिस्त हा हिंदुच होता या विचाराचे जोरदार समर्थन केले आहे.
आता थोडे येशूचा म्रुत्यु व पुनरागमनाविषयी अभ्यास करु. एकंदर येशू हा देवपुत्र असल्याने मृत्युनंतर तो पुन्हा जिवंत झाला व त्याने आपल्या काही अनुयायांना दर्शन सुद्धा दिले. काहिंशी तो बोलला. येहूच्या मृत्यु बद्दल तसेच त्याच्या पुनरुत्थानाबद्दल बायबल मध्ये साधारण पुढीलप्रमाणे उल्लेख येतो. ’ येशूला सुळावर देण्यात आले . त्यानंतर संध्यालाळच्या सुमारास योसेफ नावाचा मनुष्याने येशूचे शरीर मागीतले. योसेफ ते शरिर घेवून तागाच्या स्वच्छ वस्त्राने लपेटले. ते त्यांनी खडकांमध्ये खोदलेल्या नव्या कबरेमध्ये ठेवले. एक मोठी धोंड घेवून ती कबरेच्या दाराला लावली. काही दिवसानंतर मेरि ही कबर पहावयाला आली. तेव्हा मोठा धरनिकंप झाला. कारण प्रभुच्या दुताने स्वर्गातुन उतरुन येवून ती धोंड एकिकडे लोटली. आणि त्यावर तो बसला. तो मेरिला म्हणाला "वधस्थंभावर खिळलेला येशू याचा शोध तुम्ही करिता हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ते स्थळ पहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यांतून उठला आहे. तो तुमच्यापुर्वी गलिलात जात आहे. तेथे तुम्ही त्याला पहाल." साधारण अशाप्रकारचे वर्णन बायबल मध्ये येते पुढे येशू स्वर्गात जातो असे बायबल सांगले. मेरीला अशाप्रकारे देवदुताचा दृष्टांत झाल्यानंतर मेरी येशूच्या सर्व शिष्यांना येशू हा मेलेल्यातून उठला आहे असे सांगते. व ही बातमी वार्‍यासारकी आजुबाजुच्या परिसरात पसरते , येशू हा देवदूत असल्यामुळे तो मृत असुनसुद्धा पुन्हा जिवंत झाला. असे सर्वांना वाटू लागले. प्रस्तुत बायबल मधील शुभवर्तमाने ही येशुच्या मृत्युनंतर ६० ते ७० वर्षानंतर लिहिलि गेली असल्यामुळे येशूच्या पुनरुत्थानाविषयी अधीक संशोधन न करता शुभवर्तमानकारांनी येशूच्या श्रद्धेपोटी लिहिलेली आहेत. त्यामुळॆ येशूचे पुनरागमन व स्वर्गारोहन याविषयी अतिशयोक्ती असण्याची शक्यता अशु शकते.
येशूच्या मृत्युनंतर तो पुन्हा उठला व शिष्यांपुढे पुन्हा प्रगट झाला, आपल्या मृत्युपश्चात त्याने प्रदर्शन केले, आणि पुन्हा अंतर्हीत झाला असे ख्रिस्ती लोक माणतात. त्याला सुळी दिल्यानंतर त्याविषयीच्या अनेक प्रकारच्या विलक्षण आणि चमत्कारीक वावड्या उठल्या होत्या. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये राहणार्‍या मित्राला अलेक्झांड्रियामधिल मित्राने पत्र लिहून ख्रिस्ताच्या पुनर्प्रकटनाविषयी पसरलेल्या बातम्यांसंबंधी लिहून खरोखर वस्तुस्थिती कशी होती हे विचारले आणि अलेक्झांड्रियामधिल मित्राला पॅलेस्टाईनमधील मित्राने स्वत: पाहीलेली आणि ठाऊक असलेली विश्वसनिय माहीती लिहून धाडली. ती फार महत्वाची आहे. ते पत्र बरेच दिवस पडून होते. पण ते फार महत्वाचे असल्यामुळे अलेक्झांड्रियाचे पुस्तकालयांत जपुन ठेवण्यात आले होते. पुढे ते पत्र अबिसिनियाचे व्यापारी कंपनितील प्राचिण इतिहासाची विषेश गोडी असलेल्या एका फ्रेंच वांमयसेवकाच्या हाती गेले. नी तेथे त्याने त्या पत्राचे इंग्लिश भाषांतर करुन १९७३ साली अमेरिकेत पहिल्यांदा प्रकाशीत केले. या पुस्तकाची प्रसिद्धी होताच ख्रिस्ती जगांत फार मोठी खळबळ उडाली. प्रचलित ख्रिस्तियन स्वरुपाला फार मोठा धक्का बसण्यासारखा असल्यामुळे त्या पुस्तकाच्या प्रति जप्त केल्या आणि त्या पुस्तकाचा बिमोड करण्याचे श्रेय मिळवण्याचा प्रयन्त झाला. पण एक प्रत यातुन श्री मेसनच्या सभासदाने वाचली, ती पुन्हा छापवली गेली. पुन्हा त्या प्रती जप्त करण्यात आल्या आतुनही काही प्रती वाचल्या आणि तिसर्‍यांदा याची प्रसिद्धी झाली. आता ती प्रत वाचकांच्या हाती पडण्याचे संदर्भात ख्रिस्ती मागिलप्रमाणे सतत कसंगती करु शकले नाहीत . त्यातील विषेश महत्वाचा आणि आपल्या विषयांशी संबंध असलेला भाग पुढे आलेला आहे, तो भाग काय आहे हे आता पाहू.
हे जे पत्र लिहिले आहे ते ख्रिस्ताच्या प्रतिस्पर्ध्याचे अथवा त्याच्या विशयी सहानुभुती नसलेल्याचे असले तर त्या पत्राचे महत्व बरेच कमी झाले असते. पण ज्यांनी ख्रिस्ताच्या पुन्ह:प्रकटीकरणावीशयी यथातथ्य माहीती पाठवली तो गृहस्त ख्रिस्ताचा एकाप्रकारे सहभागी सहवासी होता. आणि म्हणुन ती माहीती विशेष विश्वसनिय व ती सिद्ध झालेल्या ख्रिस्ताच्या चरित्राशी हुबेहूब जुळणारी असल्यामुळॆ ती सरळ वस्तुस्थिती सिद्ध करणारी ठरते. हे पत्र लिहिणारा मनुष्य हा त्यावेळी ईजिप्त, अरबस्थान, ग्रीस नी त्याच्या आसपासच्या प्रदेशांत प्रभावी ठरलेला, शांतताप्रिय, सात्विक वृत्तसंपन्न, सदाचारी नी अध्यात्मनिष्ठ जो एक संघ आहे त्या संघातील एक घटक होता. या पंथाचे नाव ’ईशान’ होय. आपल्या या पत्रामध्ये तो म्हणतो , "..ख्रिस्ताला सुळी दिल्यानंतर त्याचे प्रेत मागायला जोसेफ एका तिकोडेमस नावाच्या वैद्याबरोबर गेला. ख्रिस्त हा खरोखरिच मेला आहे काय हे बघण्यासाठी ख्रिस्ताच्या त्या लटकत्या देहाला तेथील शिपायाने भाला मारुन पहीला. त्या घावांतुन थोडे पाणि आणि रक्त बाहेर आहे. . भाल्याचा घाव होताच जिवंत मणुष्याच्या देहाकडून त्या घावामुळे होणारा थरकाप व त्वचासंकोचन अदिक रुपाने जी प्रतिक्रिया होते ती न झाल्यामुळे ख्रिस्त मेला आहे असे समजुन ते प्रेत त्या अधिकार्‍याने त्या दोघांच्या स्वाधीन केले. तिकोडेमस या वैद्याला या वैद्याला ख्रिस्ताच्या अंगातुन रक्त येते हे पाहून त्याच्या अंगात अद्याप जीव आहे याची निश्चीती पटली. त्याने ख्रिस्त ज्या एका पंथाचा सदस्य होता त्या पंथाच्या मुख्याकडे ही गोष्ट कळवली. ईशान पंथात योगाचा अभ्यास करणार्‍या नि तत्संबंधी क्रियाप्रतिक्रिया करणार्‍या अनेक व्यक्ती होत्या. त्यांच्यातील महंतांनी लागलिच परमपुज्य विभूतिंचा जिव वाचवण्याची उत्कृष्ट संधी आपणास मिळत आहे ही गोष्ट लक्षात घेवून त्याला वाचवण्याची सिद्धता चालवली. त्यांना अनेक वनस्पतिंची माहीती होती. ख्रिस्ताच्या या असन्मरण स्थितीत अवश्य लागणार्‍या वणास्पती आणून प्रेतसंस्कार करण्याचा बाह्य विधिविधनांचा बाह्य देखावा करीत त्या वनस्पतीचे लेप त्याचे अंगाला आणि घाव झालेल्या भागाला लावले. ख्रिस्ताला समाधी देण्यासाठी म्हणुन जी समाधी बांधायची त्याखाली मोठी विवराची जागा निर्माण केली, त्या समाधीत ते प्रेत श्वासोश्वासाला वायु मिळेल अशी व्यवस्था करुन नेऊन ठेवले. ही समाधी जोसेफने आपल्या बागेत पूर्वीच खणून ठेवून त्याचा संबंध एका चोर वाटेने बाहेर दूर नेऊन ठेवला होता. ख्रिस्ताचे प्रेत आत ठेवल्यावर त्याला सावध करण्याचा प्रयत्न चालू झाला. नी नंतर ते विवर बाहेरुन बंद करुन ठेवून ते निघून गेले. पुष्कळ प्रयत्न नी वेळानंतर ख्रिस्ताचा श्वासोश्वास चालू झाला. हळूहळू तो सावध झाला. आणि एका रात्री तो जिवनदात ईशानपंथी साधू आणि ख्रिस्ट हे दोघे लपत-छपत सुरक्षीत स्थळी निघुन गेले. पुढे ख्रिस्ताने आपल्या काही प्रमुख शिष्यांना दर्शन दिले. समाधी महुन ख्रिस्त निघुन गेला आणि त्याने आपल्या शिष्यगणांना दर्शन दिले अशा वंदतां उठल्या होत्या त्यामुळे अधिकारीवर्गानी त्याला शोधून काढण्याचे प्रयत्न चालवले. " साधारण अशाप्रकारचा वृत्तांत या पत्रामध्ये येतो. यापुढे हा पत्रलेखक आपल्या पत्रात म्हणतो, "...ख्रिस्तच्या सुळानंतर त्याच्या आम्ही शिष्यांनी सात वेळा त्यच्यासाठी प्रसाद ग्रहण केला. आमची त्याच्यावर फार भक्ती होती. त्याच्यात परमेश्वरी वैभव प्रकट झालेले होते. तथापि जेजे घडले ते मी डोळ्यांनी पाहीले आहे. नी आता ख्रिस्ट पुर्णपणे संकटांच्या क्लेशांतून सुटल्यामुळे इतके दिवस अश्यक्य असलेले गौप्य तुला लिहिणे शक्य झाले आहे. मी जे लिहितो आहे तसेच माझ्या बुद्धीला पटलेले असुन ते पुर्णपणे सत्य असल्याचे माझे अंत:करणात पूर्णता: ठसलेले आहे. "
ख्रिस्ताला सुळी दिल्यानंतर भूकंप वगैरे सॄष्टी कोप झाला असे म्हणतात प्रस्तु पत्रलेखक ही या गोष्टीला दुजोरा देतो. पत्रलेखक म्हणतो ",..... आणि या धरणी कंपाच्या आपत्तीच्या भयाने बहुतेक लोक तेथून निघुन गेले. ही संशी साधून ख्रिस्ताचा स्नेही जोसेफ नी तिकोडेमस हे त्या सुळाकडे गेले. ख्रिस्ताची मान खाली पडली होती. तरी ईतक्या थोड्या अवधीत ख्रिस्ताचा प्राण गेला असेल से त्यांना वाटेना. म्हणुन त्वरेने ते दोघेजन अगदी सुळापाशी गेले. तो तेथे जान उपस्थीत आहे असे त्यांना दिसले. ईतर कोणी नाही हे पाहून त्यांनी ख्रिस्ताच्या देहाची तपासणी केली. तिकोडेमस आनंदाने जोसेफ ला म्हणाला, " माझ्या जिवनमरणाच्या स्थितीचे ज्ञानानुसारे आपण अद्याप आपल्या प्रिय ख्रिस्ताला वाचवू शकू." जोसेफ ला याचा अर्थ कळाला नाही. म्हणुन त्याने अद्याप जोसेफ ला गप्प रहण्यास बजावले. ख्रिस्ट अद्याप जिवंत आहे ही गोष्ट बाहेर फुटू नये म्हणुन त्याने असे केले. ’कसे ही करुन याची हडे मोडण्यापुर्वी याचा देह अद्याप आपण हस्तगत केला पाहीजे’. असे तो म्हणाला. नी जोसेफ ला पिलेकडे जाउन त्याचा मृतदेह त्याच्या अंतविधिसंस्कारार्थ आम्हाला मिळावा म्हणुन विनंती करण्यास सांगीतले. जान नी तो पत्रलेखक (या सर्व गोष्टी होत असताना तो पत्रलेखक तेथेच होता.) हे दोघे त्या देहाची हाडे त्या शिपायांकडुन मोडली जाऊ नये म्हणुन तेथेच थांबले. सुळी दिलेल्याचे अंगांत शस्त्र उपसुन तो जिवंत आहे का ? हे बघावयाचे आणि मेला असे वाटल्यास त्याची हाडे काही स्थळी मोडून मग त्याचे ते भग्न प्रेत अंत्यसंस्कारार्थ द्यावयाचे अशी प्रथा तेथे होती. असे प्राण गेलेले प्रेत खांबाव्र तसेच लटकत ठेवले जात नसे. अर्थात ख्रिस्ताचे प्रेत तत्काल खाली ओढले जाणार होतेच. ख्रिस्ताची हाडे शिपायाकडून मोडली जाऊन मग ते भग्न प्रेत अंत्यसंस्कारार्थदिले जावे म्हणुन पिलेजवळ मागणि केली होती. जोसेफ आणि तिकोडेमस आपापल्या कामगिरिवर गेले नाहीत तोच तेथे असलेल्या अधिकार्‍याकडे पिलेटकडून ते प्रेत खांबावरुन काढून अंतसंस्कारार्थ देण्याची आज्ञा येवून पोहोचली होती. ही आज्ञा येताच मी (पत्रलेखक) गोंधळलो, यास्थितित त्याचा देह फार काळजीपूर्वक आणि नी हळूवार हताने सुळावरुन काढला नाही तर त्याला वाचवणे कठीण जाईल आणि तेही हडांना काहीही आघात न होऊ देता काढावयाचे काम साधले पाहीजे. या विचाराने मला काळजी वाटू लागली. तो आज्ञावहक पिलेतकडून येताच मी (पत्रलेखक) त्याचेजवळ गेलो. तो पिलेटची आज्ञा घेवून निघण्यावेळीच जोसेफ तिथे जाऊन तेथे पोचला असे वाटून त्याला विचारले, "पिलेटने तुला पाठवले काय ?" , "नव्हे; त्याच्या कार्यवाहकाकडून आलो आहे. कारण असल्या साध्या कामांत पिलेट लक्ष घालत नाही. ही साधी कामे कार्यवाहकाकडून होतात." असे तो म्हणाला. तेथे असलेल्या अधिकार्‍यांनी मी चिंतायुक्त आहे असे पाहून माझ्याकडे पाहीले नी मी या गोष्टीचा लाभ घेवून त्याला मित्रत्वाच्या शब्दात म्हणालो, "हे पहा, ही सुळी गेलेली व्यक्ती असामान्य पुरुष आहे हे तुम्ही पाहीलेच आहे (धरणीकंपाचा संदर्भ देवून), तेव्हा त्याच्या देहाचे हाल करु नका, कारण पिलेटकडे एक श्रिमंत मणुष्य द्रव्याचे विनिमयांत प्रेत अभंग रहावे व त्याचा अंत्यसंस्कार योग्यप्रकारे व्हावे म्हणुन गेला आहे." ख्रिस्ताच्या मृत्युनंतर झालेल्या धरणिकंपामुळे ख्रिस्त निरपराधी असला पाहीजे असे त्या अधिकार्‍याला वाटूं लागले. नि म्हणुन त्याने माझे म्हणने शांतपणे ऐकून घेतले. शिवाय ख्रिस्ताची हाडे मोडावयास गेले तेव्हा हा अधीकारी ख्रिस्ताच्या देहाकडे येताच शिपायांना म्हणाल, "याची हाडे तोडू नका हा निश्चितच मेला आहे", . ख्रिस्त खरोखरीच मेला आहे हे पाहण्यासाठी एका शिपायाने आपला भाला ख्रिस्ताच्या शरिरांत खुपसला. देहाची हलचाल झालेली दिसुन आली नाही. पण ख्रिस्ताच्या घावांतून रक्त आणि पाणि बाहेर आले हे पाहून जनाला आश्चर्य वाटले आणि माझी आशा दुनावली. मृतदेहाच्या घावातुन रक्त बहेर येत नाही. गोठलेले रक्त गोळे वा बुंद बाहेर दिसण्यावाचुंन दुसरे काही दिसत नाही. हे जनाला माहीत होते. जोसेफ नी तिकोडेमस लवकर येवून पोहोचावेत म्हणुन मी फार उत्सुक झालो. एवढ्यात ते दोघे तेथे आले. तिकोडेमसने ख्रिस्ताच्या शरिरातुन पाणि आणि रक्त वाहत आहे हे पाहून आशा वाटू लागली. त्याने जोसेफ ला एका बाजूला घेतले नी तो म्हणाला "मित्रांनो ! आनंदाची गोष्ट आहे. ख्रिस्ट मृत झालेला नाही, त्याचा शक्तीपात झाला असल्यामुळे तो प्रेतासरका झाला आहे. चला कामाला लागुया !" जोसेफ पिलेट कडे गेला आणि त्याचवेळी मी आपल्या आश्रमात जाऊन काही वणस्पती आणल्या. आम्ही सुळाकडे गेलो. जिवणीकरणशास्त्रांच्या नियमानुसार ज्या दोराने ते प्रेत बांधले होते, ते दोर हळूवारपणे सोडले, हातात ठोकलेले खिळे काढले, आणि ख्रिस्ताच्या देहाला फार जपून भूमिवर निजवला. एका विषेशप्रकारच्या कपड्यावर निरनिराळी औशधे व दाहशामक वनस्पतिंचा वाटलेला ओला लेप आमच्या पंथातील विशेष माहीतीप्रमाणे लावला. नंतर हे लेप लावलेले कापड ख्रिस्ताच्या अंगाला लपेटले. अंत्यसंस्काराची सर्व विधिविधाने होईपावेतो प्रेतांत बिघाड होऊ नये म्हणुन हे सर्व आहे हे सर्वांना भासविले. मृतवत नि:संज्ञाता आलेल्या प्रेतासमान देहांत पुन्हा संज्ञा नी जाणिव ऊत्पन्न व्हावी म्हणून करावयाचे हे ऊपचार आमच्या य पंथाच्या वैद्यकीय पद्धतीत ठाऊक होते. तिकोडेमस नी जोसेफ हे त्याच्या देहाकडे झुकून त्याच्या डॊळ्यांतून अश्रुपात होत असलेल्या स्थितित ख्रिस्ताच्या नाकपुड्यांत आपला श्वास तोंडाने जोराने सोडीत, व कानसुले हळूहळू पण दाब देत चोळीत. जोसेफला फारशी आशा वाटेना पण तिकोडेमसने प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास संगीतले. दाहशामक व आराम देणारी अभ्यंजने खिळ्याचे घाव झालेल्या त्याच्या हाताला तिकोडेमसने लावली. त्याच्या कुशीत जो भाल्याचा घाव झाला होता तो मात्र त्याने बंद केला नाही. कारण त्यामुळे रक्तप्रवाह चालुं होऊन श्वासोच्छ्वासाला आरंभ आरंभ होण्यास त्या प्रवाहामुळे साह्य मिळेल असे त्याला वाटले. ईतके प्राथमीक ऊपचार झाल्यावर ख्रिस्तासाठी असलेल्या समाधीमध्ये ते ख्रिस्ताचे मृतमान झालेले शरीर नेवून ठेवले. त्या समाधीत २-३ जणांना सहज समावेष होईल अशाप्रकारे ती सिद्ध केली होती. काही शक्तीदायी वणस्पती आणि ईतर पदार्थ यांचा धूर तेथे त्यांनी केला. आंतील धूर बाहेर न जाता समाधीभर कोंडला जाऊन त्या स्थळी उष्ण वातावरण उत्पन्न व्हावे म्हणुन त्यांनी समाधीद्वारावर गदड ठेवला. मध्यंतरीच्या काळामध्ये पिलेटवरील अधीकर्‍याला संशय आला. आणि ख्रिस्तचे खरे प्रगट साह्यकर्ते कोण आहेत आणि यच्या मागचे रहस्य काय आहे हे जाणन्याकरीता वरिष्ठ अधिकारी साईयाकसने काही हेर तिकडे सुळाकडे आणि जोसेफ च्या घराकडे पाठवले. या काळात समाधीवर पहारा ठेवण्यासाठी एका ईशानपंथी अनुयायी प्रहारी नेमलेला होता. एके वेळी ख्रिस्ताच्या समाधीत जाण्यासाठी ईशान पंथाच्या चौथ्या श्रेणीतील एका प्रमुखाने जवलच्या पर्वतशिखरावरुन खाली उतरावयास प्रारंभ केला. पायघोळ असे पांढरी कफनी घातलेती ती मध्यमुर्ती त्या अंधूक प्रकाशातून सावकाशपणे खाली ऊतरत होती. हे पहताच त्या अधिकार्‍यांनी पाठवलेले शस्त्रधारी हेर गर्भगळीत झाले. हा देवपुरुष खाली आला. ख्रिस्ताचे समाधीचे तोंडावर बसवलेला दगडावर इशानपंथी जॊ प्रहारी बसला होता तो महापुरुष येताच दूर झाला. नी समाधीच्या विवरावरील तो दगड त्या महापुरुषाच्या आज्ञेने दुर करण्यात आले. हे पाहताच त्या हेराच्या पोटात पाय शिरले. त्याने तेथून पळ काढला. आणि एका देवपुरुषाने आम्हाला तेथून हुसकावून लावले असे तो लोकांना सांगू लागला.
ती समाधी परकीयांच्या भयाने मुक्त झाली. तो महापुरुष अद्याप आत शिरला नव्हता. पुन्हा एक भूकंपाचा धक्का बसला नी समाधीमधील दिवा मालवला जाऊन बाहेर झालेल्या प्रभातीच्या प्रकाशाचा प्रवेश त्या समाधीत झाला. औषधविलेपण झालेला तो ख्रिस्तदेह त्या समाधित ठेवून वर दगड बसवित समाधीद्वार बंद केल्यास आतापावेतो तीस तास होऊन गेले होते. त्या समाधीत काही थोडासा शब्द झालासे वाटून काय झाला हे पाहण्यासाठी तो तरूण महापुरुष त्या समाधीत उतरला. भूमितून ज्वाला निघण्यापुर्वी म्हणजे ज्वालामुखीचा स्फोट होण्यापुर्वी जसा वास सुटतो तसा वास आला. समाधीत जाऊन बघतो तर त्याला अत्यानंद व्हावा असे दृष्य त्याने पाहीले. त्या नि:सज्ञ व निर्जिव ख्रिस्ताचे ओठ हालत असुन श्वासोस्वास मंदगतीने होत आहे. तरुण धावत जाऊन ख्रिस्ताला साह्य करण्यास तत्परतेने सिद्ध झाला. ख्रिस्ताच्या कंठातून मंद गतीने ध्वनी निघत आहे.तोंडावरची प्रेतकळा जाऊन जिवनज्योती शरिरात आल्याचे तिज त्याचे मुद्रेवर खेळू लागले आहे.
मी (पत्रलेखक) आणि जोसेफ आता कसे नी काय करावे विचारण्यासाठी श्रेष्टींच्या आश्रमात आलो होतो त्याचवेळी वरील घटना समाधीस्थळी घडली. जोसेफने ख्रिस्ताला आलिंगण दिले . आणि त्याच्या मृतवत मुर्च्छेमुळे मृत्यु आला असे अधिकार्‍यांना कसे वातले, त्यामुळे त्याचे जिवन वाचवने कसे शक्य झाले, त्याला वाचवण्यासाठी काय काय उपाय योजावे लागले इत्यादी सारे वृतांत सांगीतले. ख्रिस्टाला आश्चर्य वाटले. काही काळ गेल्यानंतर जोसेफ म्हणाला यापुढे आपल्याला येथे राहणे सुरक्षीत नाही, कदाचीत शत्रूला सुगावा लागला असेल, व सर्व काही बिघडेल. तेव्हा त्याला लागलीच जवळच ईशानपंथियाच्या एका घरात आणन्यात आले. परमेश्वराने मला जिवदान दिले आहे व मी जे काही लोकांना उपदेशले त्याला मी पात्र असल्याचे सिद्ध व्हावे असा परमेश्वराचा हेतू असावा से ख्रिस्टाला वाटत होते. या दरम्यान समाधी स्वच्छ करावयास दोघेजण गेले होते ते परत येताच त्यांनी समाधीजवळ काय काय झाले ते सर्व सांगीतले ते थोडक्यात पुढीलप्रमाणॆ - पुश्कळ लोक समाधीस्थानाच्या उपवनाभोवती गोळा झालेले आहेत, त्यात एक स्त्री येरुशलेम हून आली होती, समाधीवरील दगड गदबडून बाहेर दूर जाऊन पडलेला तीने पाहीला तशि ती घाबरली, काही स्त्रीया समाधीजवळ गेल्या समाधी उघडी आहे असे वाटून त्या आंत शिरल्या. तेथे प्रेत न दिसता एक व्यक्ती उभी आहे असे एकीला दिसले नि तिने ईतरांना ते दृष्य दाखवले. तेव्हा त्या ईशानपंथीय व्हक्तीसह दुसराही मणुष्य त्यांना दिसला. (हे दोघे समाधी साफ करायला गेलेले ईशानपंथी होते.) तेव्हा सर्वांना ते देवदूत वाटले सर्वांनी त्यांना साष्टांग दंदवत घातले. त्या ईशानपंथियांनी जमलेल्यांना "ख्रिस्त हा पुन्हा अवतरीत झाला आहे, तो तुम्हाला येथे दिसणार नाही, तुम्ही गॅलिलिकडे चला" असा उपदेश केला. हे सर्व जोसेफने जुळवले होते. ईकडे आपल्या अप्तांना आपण जिवंत आहोत हे कळवण्यासाठी ख्रिस्ट अगदी उताविळ झाला होता. काही दिवसांतच तो वेशांतर करुन बाहेर पडला. ईकडे समाधीत काम करण्यास गेलेल दोघेजण आपले अपुरे काम टाकलेले पुरे करण्यासाठी समाधीकडे गेले. तेथे त्यांना ती पहीली स्त्री दिसली. याचवेळी अचानकपणे वेशांतर केलेला ख्रिस्त तिच्यापुढे येवून उभा राहीला. ती स्त्री मेरी होती.मेरी आणि ख्रिस्त यांच्यामध्ये संभाश्ण चालू असताना मेरी ख्रिस्ताच्या जवळ येताच ख्रिस्ट तीला म्हणाला,"मला स्पर्ष करु नको, मी जिवंत आहे तरी पण लवकरच स्वर्गिच्या परमेश्वरी इच्छेप्रमाणे नि देह अत्यंत नि:सत्व नि शक्तिहिन असल्यामुळे मला मरनाला कवटाळावे लागेल."
ईकडे नगरांत त्या रात्री त्या पाळलेल्या प्रहारी व हेरांनी आपला भित्रेपणा झाकण्यासाठी खुपच भयंकर गोष्टी पसरवल्या, देवदूत आलेहोते, भयंकर दृष्ये दिसली, देवदुतांनी त्यांना हुसकावुन दिले, ईत्यादी गोष्टी तिखटमिठ लावून त्यांनी सांगीतल्या. " अशाप्रकारे सदर पत्रलेखकाने येशूच्या मृत्यु व त्याचे पुनरागमनाविषयी सविस्तर वास्तवाचे वर्नन केले आहे.
हे झाले पुनरागमनाविषयी. आता येशूच्या भारतात पुनरागमनाविषयी थोडा दृष्टीक्षेप टाकू. येशू आपल्या पुनरागमानंतर हिमालयामध्ये पर्यायाने भारतात आला असा काही विद्वानांचे मत आहे. नामनाथावली नामक एक पारंपारीक ग्रंथ आहे. त्यामध्ये येशूख्रिस्ताला सुलावर दिल्यामुळे मरणांकीत वेदना होत तो मृत्युसंकटात सापडल्याचे जाणून हिमालयावर योगमग्न असलेल्या चेयननाथांनि पॅलेस्टाईनकडे प्रयाण केले. असा त्यामध्ये संक्षेपाणे उल्लेख आहे. त्यामध्ये समाधीमध्ये त्यांच्या त्याचे देहावर उपचार करुन ख्रिस्ताला शुद्धीवर आअणल्याचे सांगुन त्याला ते पुढे ईकडे (भारतामध्ये) घेवून आले एवढेच सांगितले आहे. डॉ. महम्मद अली आपल्या कुराणातील कविता क्र, ६४५ मरिल टिपेत "ख्रिस्त हा सुळावर मारला गेला नाही, तो जिवंत रहीला." तसेच पुढे कुराणाच्या १७२३ वरील टिपेमध्ये अनेक प्रमाणे देवून ख्रिस्त हा कश्मिरमध्येच शेवटी आला नी तेथेच त्याला मृत्यु आला असे प्रतिपादन केले आहे. त्यांनी दिलेले पुरावे पुढीलप्रमाणे.- १) समुद्रसपाटीपासुन खूप उंच असलेल्या , सुपिक स्थलोस्थली जलाशय असलेल्या प्रदेशी ख्रिस्त गेला आहे असे वर्णन आहे, वास्तविक हे वर्णन कश्मिरचे आहे. २) पॅलेस्टाईनमधुन नाहीशा झालेल्या दहा जातींचा ठावटीकाना कश्मिरात लागतो.
आता आपण वळणार आहोत भविष्यपुराणाकडे, येशू आपल्या मुनरागमानानंतर भारतामध्ये हिमलयात आला याची पुष्टी भविष्यपुराणामध्ये सुद्धा आहे. भविष्यपुराण, प्रतिससर्ग (तृतिय खंड) राजा शालिवाहन आणि ईशपुत्र अर्थात येशू ख्रिस्ट यांची भेट वर्णिली आहे ती पुढीलप्रमाणे - "एकावेळिची गोष्ट आहे, तो शकाधीश शालिवाहन हिमशिखरावर गेला होता, त्याने हून देशातिल मध्य स्थित एका पर्वतावर एका सुंदर पुरुषाला पाहीले.त्याचे शरीर गोरे होते. व त्याने श्वेत वस्त्रे धारण केलेली होती. त्या व्यक्तीला पाहून राजा शालीवाहन म्हणाला, ’आपण कोण आहात ? ’ यावर तो पुरुष म्हणाला , ’मी ईशपुत्र आहे आणि मी एका कुमारीच्या पोटी जन्मलो आहे मी म्लेंच्छ धर्माचा प्रचारक आहे’. राजाने विचारले , ’ आपला धर्म कोनता आहे ?’ तेव्हा ईशपुत्राने उत्तर दिले , ’ महाराज ! सयाचा विणाश झाल्यानंतर म्लेंच्छ प्रदेशामध्ये मी एक मसीहा बनुन आलो होतो आणि इशामसिच्या आधारे मी त्या लोकांमध्ये मसिहत्व मिळवले. मी म्लेंच्छंमध्ये ज्या धर्माची स्थापणा केलेली आहे ती ऐका- सर्वात आधी माणसिक आणि दैहीक मळाला बाहेर काढून पुर्णत: निर्मल करावे लागेल. त्यानंतर ईष्ट देवतेचा जप करणे , न्यायाने चालणे, आणि मणाला एकाग्र करुन सुर्यमंडलामध्ये स्थीत अशा परमेश्वराची पूजा केली पाहीजे. कारण इश्वर हा सुर्यासमान आहे. परमात्मा हा अविचल आणि सुर्य हा सुद्धा अविचल आहे. हे भूपाला ! असे करण्याने ते देवत्वामध्ये विलिन होतील. पण माझ्य हृदयामध्ये नित्य विषुद्ध कल्यानकारी ईश-मुर्ती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणुनच माझे नाव ईशामसीह प्रतिष्ठीत झाले आहे. येवढे ऐकल्यानंतर राजा शाक्लीवाहनने त्या म्लेंच्छ पूजकाला प्रणाम केला आणि निघून आला.’"
येशू हा कश्मीरमाध्ये आला होता याचा आणखि एक ह्महत्वाचा पुरावा म्हणजे त्याची समाधी. श्रीनगर मधील खातयार नामक मार्गामध्ये एक समाधी आहे. तिला नबिसाहेबांची (पैगंबर म्हणजेच ईश्वर प्रेशीत) समाधी असे म्हणतात. , ईसासाहेबांची समाधी, युसफनबी (पैगंबर) ची समाधी असे म्हणतात. मुसलमान महंमदानंतर कोणीच पैगंबर झाला नाही असे मुसलमान माणतात. महमदापुर्वी निकटचा असा ख्रिस्टच पैगंबर होता. तेव्हा नबीची समाधी म्हणजे ख्रिस्ताची समाधी असली पाहीजे. याव्यतिरिक्त तीला ईसाची समाधी असे म्हणतात. या समाधीसंबंधि आपल्याला Tomb of jesus.com या संकेतस्थळावर अधीक माहीती मिळेल. या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले ख्रिस्ताच्या समाधीचे फोटो येथे देत आहोत.


1)

Sunday, March 21, 2010

बुद्धावतार

-----------
भगवान विष्णूंचे प्रमुख दहा आणि एकूण चोविस अवतार आहेत असे माणले जाते. या अवतारांमध्ये भगवान बुद्ध यांना थोडे बाजुला केले तर गोष्टीमध्ये साम्य आढळते आणि ती म्हणजे प्रत्येक अवतार भगवाण विष्णूनी धर्माच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाशासाठी घेतलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत: अभ्युतानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ! आणि यापुढे भगवान विष्णूंचा होणारा कल्की अवतारही धर्माच्या रक्षणासाठीच असणार आहे.
भगवान बुद्धांना विष्णूंचे अवतार माणले जाते. पण विष्णूचा एक ’अवतार’ म्हणुन भगवान बुद्धांचा जन्म काही पटत नाही कारण विष्णुच्या ईतर अवतारांप्रमाणे बुद्धांनी ना वैदीक धर्माचे रक्षण केले आहे , ना दुर्जनांचा विणाश केला आहे उलट भगवान बुद्धांनी वैदीक धर्म, वैदीक चालीरिती, वेद व पुराण यांच्यावर टिका केली आहे, भगवान बुद्धांना वैदिक धर्म पटत नाही म्हणून त्यांनी वैदिक धर्माशी फरकत घेतली, पण तरी सुद्धा भगवान बुद्धांना आज आपण भगवान विष्णूंचा एक अवतार माणतो . हिन्दु पुराणां नुसार भगवान बुद्ध हे विष्णूचे आवतार होते, किवा भगवान विष्णू पुढे बुद्धदेवांच्या रुपात प्रगट होइल. आसे वर्णन जवळ पास सर्वच पुराणात आलेले आहे. काही वेळ मान्य केले की भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार अहेत तर मग जर बुद्ध हे विष्णूंचेच अवतार आहेत तर मग विष्णूच्या या अवताराचे अवतारकार्य असे विरोधी कसे , विष्णूंच्या अवतारांची कार्ये ही लोकांना वेदमार्ग दाखवणे, धर्माचरण करण्याच प्रवृत्त करणे, धर्मावर आलेली संकटे दूर करणे व अधर्मी व पाखंडी लोकांचा विनाश करणे साधारण अशा प्रकारची राहीलेली आहेत मग बुद्धावतारात हा विरोधाभास का ? भगवान विष्णू आपल्या बुद्धावतारामध्ये का लोकांना वेदमर्गापासून दूर व्हा असे सांगतात ? यज्ञ व अहुती यांसरख्या वैदीक क्रियांना बुद्ध का पशुहिंसा मानतात व आपल्या अनुयायांना या पशुहिंसेपासुन दूर रहा व अहिंसेचे पालन करा असा उपदेश देतात ? एकंदरी शेवटी शेवटी आपल्याला असे वाटायला लागते ज्याअर्थी बुद्धदेवांचे आचरण विरोधी आहे त्या अर्थी की भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार असुच शकत नाहीत ! पण थोडे थांबा ! या प्रश्नांची उत्तरे आहेत !
भगवान बुद्धदेवांचे एक अवतार म्हणुन आचरण ईतके विरोधी कसे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर आपल्याला शेवटी आज ’टाकावू’ उपाधी प्राप्त पुराणांकाडेच जावे लागते. विष्णूपुराण !
विष्णूपुराण च्या तृतीय अंशामधील सतराव्या अध्यायामध्ये एक कथा येते ती त्यामध्ये देव व असुर यांच्यातील एका युद्धाचा उल्लेख येतो तो असा .
देवासुरंभूद्युध्दं दिव्यमब्दशतं पुरा !
तस्मिन्पराजीता देवा दैत्यैर्हादपुरोगमै !!
अर्थात पुर्वकाळामध्ये देव आणि दैत्य यांच्यात एक घणघोर असे युद्ध झाले त्यामध्ये ’ह्याद’ प्रभुतीवाल्या दैत्याद्वारा देव पराजीत झाले. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूची अर्चना केली. याठीकाणी असे ही म्हटले आहे की या युद्धामध्ये दैत्य विजयी झाले कारण त्यांनी ब्रम्हदेवांची आज्ञा उल्लंघून त्रिलोकातील देवांच्या अशीकारातील यज्ञभागांचे अपहरण केले आणि अशाप्रकरच्या यज्ञादी कर्मकांडामुळे दैत्य अधीक शक्तीशाली झाले . या युद्धामध्ये दैत्यांचे रक्षण त्यांच्या साधनेने केले होते स्वधर्मरूपी कवच त्यांच्या भोवती तयार झालेले होते आणि आता सुद्धा ते यज्ञभाग त्यांच्याच ताब्यात होते. या यज्ञाभागांचा उपयोग करुन दैत्य दिवसेंदिवस अधीक शक्तीशाली होतील अशी भिती देवांना वाटू लागली .
त्रैलोक्ययज्ञभागश्च दैत्यर्हादपुरोगमै !
ह्रता नो ब्रम्हणोsप्यज्ञामुल्लंय परमेश्वर ॥
यद्यप्यशेषभूतस्य वयं ते च तवांशजा: ।
तथाप्यविद्याभेदेन भिन्नं पश्यामहे जगत ॥
याच्या पुढे ही देवता श्री विष्णूला विनवताना म्हणतात , हे परमेश्वर ! ह्याद प्रभूतीवाल्या दैत्यांनी ब्रम्हदेवांची आज्ञा मोडून आमचे व त्रिलोकांच्या यज्ञभागांचे अपहरण केले आहे. जसे की आमी आणि दैत्य सर्वस्वी आपलेच वंशज आहोत, अविद्यावश आम्ही सर्वांना एकमेकांना भिन्नभिन्न मानतो. आमचे शत्रू दैत्यगण वर्णधर्माचे पालन करनारे वेदमार्गावलंबी आणि तपोनिष्ठ बनले आहेत. अशा परिस्थित आम्ही त्यांचा नि:पात नाही करु शकत. आता हे परमेश्वर ! ज्यामध्ये आम्ही त्या दानवांचा नि:पात करु शकू असा कोनतातरी उपाय सांगा ! आम्ही आपल्याला शरण आहोत !
स्ववर्णधर्माभिरता वेदमार्गनुसारिण: ।
न शक्यास्तेरयो हन्तुमस्माभिस्तपसाव्रुता: ॥
या देवतांच्या याचनेनंतर झाले असे की ..
इत्युक्तो भगवांस्तेभ्यो मायामोहं शरीरत: ।
समुत्पाद्य ददौ विष्णु: प्राह चेदं सुरोत्तमान ॥
मायामोहोयमखिलांदैत्यांस्तान्मोहयिष्य़ति ।
ततो वध्या भविष्यन्ति वेदमार्गबहिष्कृता : ॥
स्थितौ स्थितस्य मे वध्या यावंत: परिपंथिन: ।
ब्रम्हणो ह्याधिकारस्य देवदैत्यादिका: सुरा : ॥
तदूच्छत: न भी: कार्या मायामोहोयमग्न्त: ।
गच्छन्नद्योपकाराय भवतां भविता सुरा : ॥
अर्थात भगवाण विष्णूनी देवतांचे म्हणने शांतपने ऐकून घेतले व नंतर आपाल्या शरीरामधून "मायामोह" नावाच्या अंशाला उत्पन्न केले आणि भगवान पुढे देवतांना म्हणाले , "हे मायामोह त्या संपूर्ण दैत्यांना मोहीत करेल, व त्यांना वेदमार्गापासून प्रवृत्त करेल तेव्हा त्यांच्याकडून वेदमार्गाचे उल्लंघण झाल्याने त्यांचा नि:पात करणे तुम्हाला जड जाणार नाही. ! हे देवगण हो , जो कोणी देवता अथवा दैत्य ब्रम्हाजींच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतो तो तो सृष्टीच्या रक्षणामध्ये माझा ’वध्य’ असतो. आता हे देवगणहो तुम्ही निश्चिंत व्हा हे मायामोह यापुढे तुमचा हित करतील. " पुढे भगवान विष्णूच्या अंशापासुन उत्पन्न झालेले भगवान मायामोह आसुरांकडे गेले.
सारे आसुर नर्मदेच्या तटावर तपोअस्येमध्ये तल्लिन होते. तेव्हा त्या ’मयुरपिच्छधारी’ ,’दिगंबर’ आणि ’मुंडितकेश’ अशा मायामोह अतिशय मधूर वाणीमध्ये आसुरांना म्हणाले,
हे दैत्यपतयो ब्रुत यदर्थ तपस्ये तप: ।
ऐहिकं वाथ पारत्र्यं तपस: फलमिच्छथ ॥
अर्थात : हे दैत्यगणहो ! तुम्ही कोणत्या उद्देशाने हे तप करत आहात ? आपल्याला कोणत्या लौकीक फळाची इच्छा आहे की पारलौकिक ?
यावर दैत्यगण म्हणाले हे महामते ! आम्ही पारलौकीक फळासाठी हे तप करत आहोत. तुमचे यासंबंधी काय मत आहे ?
मायामोह म्हणाले.
कुरुध्वं मम वाक्यानि यदी मुक्तिमभीप्सथ ।
अहर्ध्वमेनं धर्म च मुक्तिद्वारमसंवृतम ॥
धर्मो विमुक्तेरर्होयं नैतस्मादपरो वर: ।
अत्रैव संस्थिता: स्वर्ग विमुक्तिं वा गमिष्यथ : ॥
अहर्वध्वं धर्ममेतं च सर्वे यूयां महाबला: ॥
अर्थात : जर तुम्हाला मुक्तीची इच्छा असेल तर मी जे सांगतो ते करा . तुम्ही लोक मुक्तिसाठी खुल्या दरवाज्यास्वरुप या धर्माचे आचरण करा . याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. याचे अनुष्ठान केल्याने तुम्हालोकांना स्वर्गाची प्राप्ती होईल अथवा मुक्ती मिळू शकेल. तुम्ही लोक महाबलवान आहात , तुम्ही या (मी सांगत असलेल्या) धर्माचा आदर करा . ’ अशाप्रकारे नाना प्रकारे युक्त्या वापरुन्ब भगवान मायामोह यांनी दैत्यांना वैदिक मार्गापासुन भ्रष्ट केले, "हे धर्मयुक्त आहे व हे धर्मविरुद्ध आहे, हे मुक्तिकारक आहे व हे हे मुक्ती देवू शकत नाही, हे अत्यांतीक परमार्थीक आहे व हे पारमार्थीक नाही . हे हे कर्तव्य आहे व हे हे अ कर्तव्य आहे. या दिगंबरांचा धर्म आहे आणि हा सांबरांचा धर्म आहे ईत्यादी’ ! अशाप्रकारे अनेक प्रकारच्या युक्त्या लढवून भगवान मायामोह यांनी वेदमार्गाचे अनाधीकारी असलेले आसुरांना वेदमार्गापासून दूर नेले. मायामोह दैत्यांना म्हणाले की या माझ्या महाधर्माला ’अहर्त’ अर्थात याचा आदर करा. व यायोगे या धर्माचा अवलंब केल्याने तुम्ही ’आहर्त’ हनवाल !
मायामोहांनी आसुरांना वेदधर्मापासून विमुख केले व ते आसुर मोहग्रस्त झाले. अशाचप्रकारे मायामोहांचे नव्या धर्माचे तत्वज्ञान आसुरांमध्ये फैलावत गेले एका आसुरा्कडून दुसर्‍या आसुराकडे दुसर्‍याने तिसर्‍याला तिसर्‍याने चौथ्याला अशाप्रकारे थोड्याच दिवसात दैत्यगणांनी वेदधर्माच्या त्याग केला.
यानंतर मायामोह यांनी रक्तवस्त्र (भगवी वस्त्रे) धारण करुन अन्यान्य आसुरांकडे जाऊन आपल्य मृदू, अल्प आणि मधूर शब्दांमध्ये समजावले, ’ हे असुर हो ! उम्हाला जर मुक्ती अथवा स्वर्गाची इच्छा आहे तर तुम्ही अशाप्रकारे पशुहिंसा (यज्ञ) कशासाठी करता ? पशुहिंसा ईत्यादी दुष्टकर्मांचा त्याग प्राप्त करुन बोध प्राप्त करा, (तदलं पशुघातादिदुष्टधमैनिर्बोधत ॥) हे सारे जग विज्ञानमय आहे असे समजा , माझ्या वाक्यांवर विश्वास ठेवा. या विषयी बुद्धीवाद्यांचे असे मत आहे की हे सारे जग अनाधार आहे, भ्रमजन्य पदार्थांच्या प्रितिवर स्थिर आहे. तसेच रोगादी दोषांने दुशीत आहे (थोडक्यात जग हे दु:खमय आहे). या संसारसंकटामध्ये जीव भटकतो ! अशाप्रकारे "बुध्यात (जाणा), बुध्यध्वं (समजून घ्या), बुध्यात (आणि पुन्हा जाणा)" ( एवं बुध्यात बुध्यध्वं बुध्तैवमितिरयन ) ईत्यादी शब्दातून बुद्धधर्माचा निर्देश करुन मायामोह यांनी दैत्यांचा स्वधर्म दूर केला. मायामोह यांनी असे अनेक प्रकारे बुद्धीवाद केला आणि वेदाचे अनाधिकारी असलेल्या असुरांना निजधर्मापासून दूर नेले. आणि मायामोह यांनी केलेला बुद्धीवाद एकाकडून दुसर्‍याकडे व दुसर्‍या कडून तिसर्‍याकडे अशाप्रकारे पसरत राहीला. अशाप्रकारे आता आसुर वेदमार्गापासुन दुर तर गेले तसे ते वेदमार्गाची निंदा सुद्धा करु लागले. ते म्हणू लागले , "नैतद्युक्तिसहं वाक्यं हिंसा धर्माय चेष्यते" म्हणजे हिंसेमध्ये(यज्ञादी कर्मकांड) पण का धर्म असतो ? अहिंसा हाच खरा धर्म ! अग्निमध्ये हवन टाकल्याने पन का कधी फलप्राप्ती होते का ? जर यज्ञामध्ये बळी दिले गेलेले पशू स्वर्गात जात असतील तर यजमान आपल्या पित्याला का नाही यज्ञात बळी देत ? जर दुसर्‍या एखाद्या पुरुषने भोजन करण्याने एकाद्या मृत व्यक्तीची तृप्ती होत असेल तर प्रवासा वेळी काद्यपदार्थ सोबत घेवून जाण्याची काय गरज आहे ? घरतील व्यक्ती परस्पर यात्रेला गेलेल्या व्यक्तींचे श्राध्य घातले तर नाही का चालणार ? अशाप्रकारे श्राद्धादी कर्मे ही निव्वळ अंधश्रद्धा असुन त्यांची निंदाच केली पाहीजे , " जनश्रध्येयमित्येतद्वगम्य ततोत्र व: । उपेक्षा श्रेयसे वाक्यां रोचते यन्मयेरितम ॥".
अशाप्रकारे मायामोह यांनी दैत्यांना वेदमार्गापासुन विचलीत केले . आता त्यांना या वेदमार्गामध्ये अजिबात रस राहीला नाही. आता देवतांनी दैत्यांना परास्त्र करण्याची कूप तयारी केली. आणि थोड्याच कालावधीनंतर देव व दानवांत पुन्हा युद्ध सुरु झाले. आणि या युद्धामध्ये देवता विजयी होऊन दैत्य परास्त्र झाले. कारण यावेळी दैत्यांकडे पूर्विप्रामाणे स्वधर्मरुपी कवच नव्हता. (स्वधर्मकवचं तेषामभूद्यत्प्रथमं द्विज । तेन रक्षाभवत्पूर्व नेशुनर्ष्टे च तत्र ते ॥)
अशाप्रकारे भगवान मायमोह यांची कथा विष्णूपूराण मध्ये आलेली आहे. आणि हे भगवान मायामोह हेच भगवान बुद्ध आहेत हे कळायला आता आपल्याला वेळ लागणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की दैत्यांना वेदयज्ञपठनाचा अधिकार नव्हता तर दैत्य वेदयज्ञपठनातून मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग चुकिचा करत होते . याच अध्यायात पुढे म्हटले आहे की
नित्यानां कर्मणां विप्र तस्य हानिरहर्निशम ।
अकुर्वन्विहितं कर्म शक्त: पतति तद्दिने ॥
अर्थात सामर्थ्य असुनसुद्धा जो चांगले कर्म करत नाही तो त्या दिवसापासुनच पतित ठरतो.
आत याठीकाणी उभाराहनार प्रश्न म्हणजे भगवान मायामोह हेच भगवान बुद्ध कशावरुन ? तर भगवान मायामोह व भगवान बुद्धांच्या शिकवणूकीमध्ये एकवाक्यता आहे . जग हे दु:खमय आहे असा दोघांच्याही शिकवणुकीचा सार आहे . शिवाय या अध्यायात उल्लेख आलेला आहेच की , "एवं बुध्यात बुध्यध्वं बुध्तैवमितिरयन " ! अर्थात जाणा समजून घ्या आणि पुन्हा जाणा असा बुद्ध धर्म होय . तसेच भगवान मायामोह यांनी आपल्या अनुयायांना केलेला उपदेस व वैदीक धर्माच्या विरोधत केलेला बुद्धीवाद आजसुद्धा वैदिक हिंदु धर्माच्या विरोधात पावरण्यात येत आहे. याच्याहीपुढे याच अवताराचा उल्लेख श्रिमद्भागवत्महापुरामामध्ये आलेला आहे. श्रिमद्भागवत्महापुराण प्रथम स्कंद तिसर्‍या अध्यायामध्ये भगवान विष्णूच्या अवतारांचे वर्णन आले आहे यामध्ये बुद्धावताराविषयी आलेला उल्लीख असा, "...याच्यानंतर कलियुग आल्यानंतर मगधदेश(बिहार) मध्ये देवतांचे द्वेशी दैत्यांना मोहीत करण्यासाठी अजनच्या पुत्ररुपामध्ये आपला (भगवान विष्णूंचा) अवतार होईल." तसेच श्रिमद्भागवत मध्ये बुद्धावताराचा उल्लेख एकादश संदामध्ये चौथ्या अध्यायामध्ये आले आहे ते असे , "पुढे कलियुगात भगवान विष्णू बुध्दाच्या रुपात अवतरित होतील व यज्ञाच्या अनाधिकार्‍यांना यज्ञ करताना पाहुन अनेक प्रकारे तर्क-वितर्क लढवून त्यांना मोहीत करतील" , आणि काहीसा असाच उल्लेख गरुड पुराण मध्ये अलेला आहे तो असा, "..एकविसाव्या अवताअरामध्ये कलियुगाच्य संधीकाळाच्या शेवटी देवद्रोह्यांना मोहित करण्यासठी किकट देशामध्ये जिनपुत्र ’बुद्ध’ या नावाने अवतरीत होतील." आता दुसरा प्रश्न उपस्थित होतो की जर मायामोह यांची कथा मानायची झाल्यास सर्व बौद्ध म्हणजे मायामोहांचे अनुयायी हे कथेत सांगीतल्याप्रमाणे असुर, दैत्य व वेदअनाधीकारी ठरतात . पण याठीकाणि आसुर ही कथा जशास तशी घेण्याचे कारण नाही असुर याचा अर्थ अनाधीकारी व दुष्ट प्रवृत्तीचे लोक असाही आहे व श्रिमद्भागवत महापुराणांतील संदर्भामधुन सुद्धा असेच स्पष्ट होते, याठीकाणी विष्णूपुराण व श्रिमद्भाग्वत महापुराणांमध्ये भगवान मायामोह तथा भगवान बुद्धांनी "वेद-यज्ञाचे अनाधीकारी " असणार्‍यांना वेद-यज्ञापासुन दुर नेले आहे ना की कोणत्या एका विषीष्ठ जात अथवा जमातीला. त्यामुळे जे कोणी दुष्ट प्रवृत्तीवाले लोक होते त्यांना भगाअन मायामोह यांनी मोहीत करुन वैदीक धर्मापासुन दुर नेले आता याचा अर्थ असा नव्हे की जरी पुढे या दुष्ट प्रव्रुत्तीच्या लोकांमध्ये एखादा सत्पुरुष जन्माला आला तर त्याला वेदाध्ययनाचा अधिकार मिलनार नाही. भगवान मायमोहांनी दैत्यांना वेदाध्यनापासुन दुर नेले याचे कारण म्हणजे ते या अध्ययनातुन मिळनार्‍या सामर्थ्याचा वापर सत्कार्यासाठी न करता वाईट कामासाठी करत होते म्हणून . पुढे जरी या लोकांच्या पोटी एखादा सत्पुरुष जन्मास आला तरी त्याला वेदाध्ययनाचा अधिकार असणारच आहे. प्रल्हाद हा एका असुराचा मुलगा असुनही भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यामुळे बौद्ध हे असुर आहेत असे समजण्याचे कारण नाही. आणि आज काही त्यावेळची परिस्थिती राहीलेली नाही . परंतु दुर्दैवाने आजसुद्धा बौद्ध लोक वैदीक धर्मावर टीकाच करत आहेत. वैदिक हिंदु धर्मावर टीका करणे हेच ते आपले जिवितकार्य समजतात. परंतू त्यांनी आज वास्तव समजून घेण्याची गरज आहे. आणि वैदिक हिंदू धर्मातील हिंदुंनी सुद्धा . भगवान बुद्ध सुद्धा ईतर अवतारांप्रमाणेच एक अवतार होते त्यांनी फक्त आपल्या धर्मातील त्या वेळच्या अनाधीकारी लोकांना दूर केले एवढेच आणि याचा अर्थ असा नव्हे की आजच्या बौद्ध लोकांनी सुद्धा दुरच रहावे. भगवान मायामोह पर्यायाने भगवान बुद्ध याच धर्मातील एका महान देवतेचे अंश आहेत. ज्या धर्मात भगवान बुद्धांना अवतार मानले जाते. आणि ईतर देवतांप्रमाणे बुद्धांना मानाचे स्थान आहे.
वरिल विवेचनावरुन समजते की भगवान बुद्ध हे भगवान विष्णूंचे अंशावतार आहेत. तसेच जातक कथां मधे स्वतः तथागत बुद्ध स्वथः चे २४ पुनर्जन्म झाले आसे मान्य करतात आणि त्या जन्मांमधे प्रत्येक जन्मातुन त्यांने काय चंगले घेतले ते सांगितलेले आहे. पण याठीकाणी उपस्थित राहनारा एक प्रश्न म्हणजे जर हिंदु लोक भगवान बुद्धांना आपलादेव मानत आहेत तर त्याची पूजा अर्चावगैरे का करत नाहीत ? तसे पाहीले तर ब्रम्हा हा एक हिंदु देवता असा आहे की ज्याची पूजा वगैरे होत नाही तसेच त्याचे मंदिरही केवळ एकाच ठीकाणी आहे. याचा अर्थ आसा घ्यायचा का की ब्रम्हा हा हिंदुंचा देवच नव्हे. वैदिक धर्ममध्ये भगवान बुद्धाची पुजा होत नाही हे म्हणने चुकिचे आहे . वराह पुराण मध्ये सत्तेचाळीसाव्या अध्यायामध्ये "बुद्ध-द्वादशी"चे वर्णन आले आहे. भगवान बुद्धरुपी श्रीहरीचे चरण, कटीभाग, उदर, छाती, हात, कंठ, शिर अशाप्रकरे क्रमश: अर्चना सांगितलेली आहे, याचबरोबर कलशस्थापना वगैरे अर्चना सांगितलेली आहे.

Friday, January 15, 2010

विद्रोही संघटना व वास्तव

सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. "आरोप" हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन ’संडासविर’ आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचाच विषय आहे.
या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी संघटनांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही ’बड्या’ नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे ’बडे’ नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या ’बड्या’ नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.
हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखि प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी पतिकूल परिस्थितित सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात ’बामसेफ’ हीम संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला ’मराठा महासंघ’ या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या ’शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म’ या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. "अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्‍या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्‍या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी ’आदिवासी हिंदु नाहीत’ अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने ’मराठा जोडो’ यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले."
या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या ’हिंदुजागृती’ या पुस्तकात म्हणतात , ".....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा ’समाजाचे संघटन’ या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्‍यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय."
याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्‍या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, "ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते." तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, "शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ "

आर्यांनी भारतातील मूळ निवासितांना युद्धात पराजीत करुन दास अथवा दस्यु बनवले

इंग्रजांद्वारा आपल्या राजैतिक उद्देशांची पूर्तीसाठी ’फोडा आणि राज्य करा’ या नितीनुसार पसरवलेल्या अनेक वावड्यांमध्ये ही सुधा एक आहे. सर्वप्रथम हा विचार कॅंब्रिज हिस्टरी ऑफ इंडीया’ मध्ये प्रतिपादन करण्यात आला की आर्य लोक विदेशातून येवून भारतावर आक्रमण करुन येथील मूळ निवासी द्रविड, कोळ, भील्ल, संथाळ इत्यादी ना आपल्या शक्तिच्या जोरावर पराजीत करुन त्यांना आपले दास बनवले.
आर्यांकडून बाहेरुन येवून स्थानीक जातिंना जिंकून घेण्याचा प्रश्न भारतातील प्रसिद्ध विधिवेत्ता डॉ. अंबेडकर यांनी , ऋग्वेद मध्ये ’दास’ आणि दस्यु ना आर्यांचे शत्रू सांगीतलेले आहे आणि त्यांना नष्ट करण्याची प्रार्थना सुद्धा केलेली आहे. परंतु यातून भारतामध्ये आर्यांच्या आक्रमणाच्या संदर्भात निर्णय घेतला जावु शकत नाही. त्यांनी ऋग्वेदाच्या आधारावर पुढील तीन तर्क केले आहेत.
१) ऋग्वेदामध्ये आर्य आणि दास अथवा दस्यु यांच्यातील युद्धाचा संदर्भ मिळत नाही. ऋग्वेदामध्ये ३३ स्थानांवर ’युद्ध’ हा शब्द आलेला आहे. ज्यामध्ये केवळ आठ मध्ये त्याचा प्रयोग ’दस्यु’ च्य विरोधी अर्थामध्ये अलेला आहे व ते सुद्धा दोघांमध्ये एखाद्या मोठ्या युद्धाला नाही, तर लहान-सहान लढाया दर्शवतो. ज्यांच्य आधारावर अर्यांचा विजय प्रमणीत केला जाऊ शकत नाही.
२) दास आणि आर्यांमध्ये किरकोळ संघर्ष होता, व तो सुद्धा दोघांच्या सहमतीने शांतिपूर्ण रित्या निश्चित केलेला होता. ऋग्वेद (६.३३.३, ७.८३.१, ८.५१.९, १०.१०२.३) मधुन हे सुद्धा स्पष्ट होते की दास व आर्य्यांचा एकच शत्रू होता आणि दोघांनी मिळून आपल्या शत्रूविरुद्ध युद्धात सहभाग घेतला.
३) संघर्षाचे कारण जातीय नव्हता...तर उपासना भेद होता. स्वत: ऋग्वेद मधुनच हे स्पष्ट होते की हा संघर्ष उपासनाभेद असल्याने उत्पन्न झाला, जाति च्या भेदाचे कारण नाही कारण, ऋग्वेद (१.५१.८, १.३२.४, ४.४१.२, ६.१४.३) यावरुन कळते की आर्य आणि दस्यु यांच्यातील उपासना संदर्भातील आचारविचार भिन्न होते.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मताच्या पुष्टीसाठी ऋग्वेद (१०.२२.८) या विषेश महत्व दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे.- "अम्ही दस्यु लोकाअंमध्ह्येच राहतो. ते ना यज्ञ करतात ना कशावर विश्वास ठेवत, त्यांचे रितिरिवाज व परंपरा वेगळ्या आहेत, ते माणुस म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत. ते शत्रू आहेत. त्यांचा नाश केला पाहीजे."
आंबेडकरांचे असे म्हणने आहे की अश मंत्रांसमोर दासांना आर्यांद्वारा विभाजित करणार्‍या सिद्धांतला कोणत्याही प्रकारे मानला जाऊ शकत नाही. आपल्या मताच्या पृष्ठी साठी बबासहेबांनी पी.टी. अयंगर यांच्या लेखाचे उदाहरण दिले आहे.
"मंत्रांच्या परिक्षणातून हे जाणवते की त्यामध्ये जे आर्य, दास अथवा दस्यु हे शब्द आलेले आहेत, ते जातिसूचक नाहीत. तथापी त्यामध्ये अस्था व उपासनेचा बोध होतो. हे शब्द मुख्यता ऋग्वेद-संहितेमध्ये आलेले आहेत.... यांद्वारा असे कधीही प्रमाणित होऊ शकत नाही की ज्या जाती आपल्याला आर्य म्हणवून घेतात ते आक्रमक होते व त्यांनी या देशाला पराजीत करून येथील लोकांचा नाश केला..."
दास अथवा दस्यु कोण होते ? या संदर्भात कुल्लूक नावाचे एक विद्वान आपल्या मनुस्मृती च्या टीके मध्ये लिहिले आहे,- "ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या जातिंमध्ये, जो क्रियाहिनतेमुळे जातिच्चुत झाले आहेत, ते भलेही म्लेंच्छभाषी असोत अथवा आर्यभाषी.. सर्व ’दस्यु’ म्हनवले जातात."
ऋग्वेदातील एक मंत्र म्हणतो..
अकर्मादस्यु: अमिनो अमन्तु अन्यव्रति अमानुष: ।
त्वं तस्य अभिन्न हन वधोदासस्य दम्भये ॥
कर्महीण, मनहीन, विरुद्धव्रती अणि मणुष्यताहीन व्यक्ती ला ’दस्यु’ सांगितले आहे व त्याचा वध करण्याची आज्ञा दिलेली आहे आणि ’दास’ वा ’दस्यु’ ला अभिन्नार्थी सांगितले आहे. जर ’दस्यु’चा अर्थ आजच्या सारखा दास अथवा सेवक असा घेतला गेला असता तर अशी आज्ञा दिली गेली नसती !
ऎतरेय ब्राम्हण मध्ये एकेठीकाणी म्हटले आहे,- "तुमचे वंश नष्ट होवोत. ही (भ्रष्ट अथवा संस्कार विरहीत) आंध्र, पुंड्र, शवर इत्यादी उत्तर दिक वासींच्या जाती अहेत." दुसर्‍या शब्दात सभ्यता आणि संस्कार विरहीत लोकांचू वंश-परंपरा चालली आणि स्वत: वेग-वेगळ्या जाती बनुन गेल्या. यांना कोणी बनवले अथवा उत्पन्न केलेले नाही. श्री रामदास गौड यांच्या ’हिंदुत्व’ वर पान ७७२ दिलेल्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की दस्यु अथवा दास कसे निर्माण झाले. आता आर्यांद्वारा भारतातील मूळ निवासियांना पराभूत करुन त्यांना दास बनवल्याच्या वावड्यात अधीक दम राहीलेला नाही.

भारताचे मुळ निवासी द्रविड
इंग्रज भारतात येण्यापूर्वी कोण मानत नव्हतेकी आर्य व द्रविड दोन वेगवेगळ्या जाती आहेत. हि गोष्ट इंग्रज भारतात आल्यावरच पुढे ठेवण्यात आली. इंग्रजांना सुद्धा हि गोष्ट यासाठी सांगावी लागली की त्यांनी आर्यांना भारतामध्ये आक्रमक बनवून आनले होते. म्हणजे इंग्रजांनी आक्रमक म्हणुन आर्यांना पुधे केले .. आता आक्रमण कोणावर केले यासाठी सुद्धा कोणीतरी हवे यासाठी व याच उद्देशाने ’द्रविड’ ही संकल्पणा उदयास आली. नाहीतर भारतामधील कोणत्याही साहित्यीक, धार्मिक अथवा अन्य प्रकारच्या ग्रंथांमध्ये या गोष्टीचा उल्लेख सापडत नाही की द्रविड वा आर्य कोणा बाहेरच्या देशातून आले होते. आता जरी असे मानुन चालले की अर्यांनी बाहेरून येवून या देशावर आक्रमण केले व मूल निवासितांना युद्धात पराजित केले.. तर हे सुद्धा सांगता आले पाहीजे की त्या मूळ निवासितांच्या काळात या देशाचे नाव काय होते ? कारण जी व्यक्ति जेथे राहते, तई त्या ठीकानाचे नाव ठेवतेच. तर कोणत्याही प्राचिन भारतिय ग्रंथ अथवा तथाकथीत मूळ निवासिंची एखादी परंपरा अथवा मान्यतेमध्ये अशा कोणत्याही नावाचा उल्लेख सापडत नाही.
’संस्कृती के चार अध्ययन’ या ग्रंथात पान क्र. २५ वर श्री. रामधारी सिंह ’दिनकर’ यांचे म्हणने आहे की ’जाति’ अथवा रेस(Race) चा सिद्धांत भारतात इंग्रज आल्यावर प्रचलित झाला, याच्या पूर्वी या गोष्टीला कोणताही आधार नाही की आर्य व द्रविड जातिचे लोक एकमेकाला विजातिय मानत होते.
वस्तुत: द्रविड आर्यांचेच वंशज आहेत. मैथिल, गौड, कान्यकुंबज इत्यादिंप्रमाणे द्रविड हा शब्द सुद्धा भौगोलिक अर्थ सांगणारा आहे. आणि विषेश गोष्ट म्हणजे आर्यांना बाहेरून येणारे असे संबोधनार्‍यांमध्ये मि.म्यूर... जे आग्रभागी होते, त्यांना सुद्धा शेवटी स्विकारावे लागले की, "कोणत्याही प्राचिन पुस्तक अथवा प्राचिन गाथा इत्यादिंतून ही गोष्ट सिद्ध केली जावू शकत नही की आर्य एखाद्या दुसर्‍या देशातून भारतात आले" (म्यूर संस्कृती टेक्स्ट बुक, भाग-२, पृष्ठ ५२३)
याच संदर्भात थॉमस ब्युरो नावाचा पुराणतत्ववेत्ताचे ’ क्लरानडन प्रेस, ऑक्सफोर्ड द्वारा प्रकाशीत व ए.एल. भाषम द्वारा संपादीत ’कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशीत ’दि अर्ली आअर्यन्स’ मध्ये म्हटले आहे,--" आर्यांच्या भारतावरील आक्रमणाचा उल्लेख ना इतिहासामध्ये मिळतो, ना त्याला पुरातात्विक आधारांवर सिद्ध केले जावू शकते." (आर्योंका आदी देश और उनकी सभ्यता, पान-१२६).
याच संदर्भात रोमिला थापर यांचे कथन सुद्धा उल्लेखनिय आहे, " आर्यांच्या संदर्भात आमचे विचार भलेही अनेक असोत, पुरातात्विक साक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरील कोनत्याही अशाप्रकारच्या कोनत्याही संकेत मिळत नाही....गंगेची उपत्यका चे पुरातात्विक साक्षांमधून हे प्रकट होत नाही की येथे मुळ निवासितांना पळून जावे लागले अथवा पराजित व्हावे लागले.".(आर्योंका आदी देश और उनकी सभ्यता, पान-११३).
इंग्रजांनी या गोष्टीला बराच जोर देवून पसरवले की ’आक्रमक आर्यांनी’ द्रविड पूर्वजांवर अत्याचार केले होते. पाश्चात्य विद्वानांनी द्रविडीयनांची सभ्यता आर्यांच्या सभ्यतेपेक्षा वेगळी आहे हे दाखावण्यासाठी ’हडप्पा कालीन सभ्यता’ हे एक सशक्त हत्यार मिळाले. प्रथम तर यांनी हडप्पाकालीन सभ्यतेला द्रविडी सभ्यता म्हणुन सांगण्यास सुरवात केली परंतु जेव्हा वेगवेगळ्या विद्वानांच्या नवनवीन शोधांमुळे त्यांचे हे कथन असत्य ठरू लागले तेव्हा हे म्हणु लागले की हडप्पा लोक वर्तमान द्रविड नव्हते तर ते भूमध्य सागरीय द्रविड होते, (थोडक्यात को कोणीही होते परंतू आर्य नव्हते). याप्रकारच्या वावड्या मुद्दाम उठवल्या गेल्या. खरे तर सत्य हे आहे की हडप्पा सभ्यता सुद्धा आर्य सभ्यतेचाच एक अंश होती व आर्य सभ्यता वस्तुत: हडप्पा सभ्यतेपेक्षा हजारो वर्ष जुणी आहे.
यातुन हेच सिद्ध होते की आर्य व द्रविद वेगवेगळे नव्हते . जर वेगळे नव्हतेच तर हे म्हणने चूकीचे ठरते की, "भारतातील मुळ निवासी आर्य नव्हे तर द्रविड होते" . आता वेळ आलेली आहे की आर्यांचे आक्रमण व आर्य-द्रविड भिन्नता माणनार्‍या या विचारप्रवाहाला नव्या पुरातत्विक शोधांच्या आधारावर मात्र राजनितिक ’मिथक’ माणुन नष्ट केले जावे.

:दास अथवा दस्युंना आर्यांनी अनार्य बनवून शूद्र वर्गात ढकलले :
सभारतीय समाजाला जाति, मत, क्षेत्र, भाषा ईत्यादींच्या आधारावर वाटून त्याची एकात्मता नष्ट करण्यासाठी इंग्रजी सत्तेने या वावड्या पसरवल्या की आर्यांनी बाहेरून येवून येथे पुर्वीपासून स्थित जातिंना युद्धात पराजीत करुन आपले दास अथवा दस्यु बनवले व नंतर आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचा समावेष करून घेवून त्यांना शुद्र श्रेणी मध्ये ढकलले. या संदर्भात अनेक प्रश्न उठतात, काय दास अथवा दस्यु खरेच आर्येत्तर जाती होत्या ? जर नाही तर त्यांना आर्येतर घोषीत करण्यामागे उद्देश काय असावा ? आणि या शुद्र श्रेणी भारतीय समाजामध्ये त्या वेळी घृणित अथवा अस्पृष्य माणली जात होती ? या प्रश्नांवर क्रमा-क्रमाणे प्रकाश टाकू...!
काय दास अथवा दस्यु आर्येतर जाती होत्या ? : दास अथवा दस्यु आर्येत्तर जाती होत्या अथवा नाही, हे ठरवण्यासाठी प्रथम अपल्याला हे पाहीले पाहीजे की आर्य वांड्मयामध्ये सर्वात प्राचिन ग्रंथ ऋग्वेद चे मंत्र संख्या १.५.१९ ताचप्रमाणॆ ९.४१.२ मध्ये दास अथवा दस्यु शब्दांचा प्रयोग ’अयाज्ञिक’ व ’अव्रते’ यांसाठी आहे व १.५१.८ मध्ये याचा प्रयोग चोर, डाकू अथवा धार्मिक क्रियांचा नाश करणारे असा केला गेला आहे. मनुस्मृति च्या १०.४ मध्ये बंबोज इत्यादी जातिंना पतित होणार्‍या लोकांना दास/दस्यु म्हटले गेले आहे. महाभारताच्या भिष्म पर्वा मध्ये निष्क्रिय व्यक्तिंना दास म्हटले आहे. आता स्पष्टच आहे की या शब्दचा प्रयोग प्रत्येक ठीकाणि एकाद्या विषिष्ठ प्रकारच्या लोकांसाठी वापरलेला आहे ना की एखाद्या जातीसाठी.
यांना अनार्य बनवन्यामागे काय उद्देश्य होता ? : आर्य साहित्यामध्ये ठीक-ठिकाणी अनार्य शब्दाचा प्रयोग मिळतो, वाल्मिकी रामायण मध्ये २.१८.३१. मध्ये दशरथाची पत्नी कैकेई साठी ’अनार्या’ शब्दाचा प्रयोग केलेला आहे. श्रीभग्वद्गिता मध्ये "अनार्याजुष्टमस्वग्यर्मकीर्तिकरमर्जुन" च्या माध्यमातून ’अकिर्तिकर’ कार्यांसाठी ’अनार्युजष्ट’ सारख्या शब्दांचा वापर पहायला मिलतो. ऋग्वेद चे मंत्र ७.६.३ नुसार अव्रतिय, दांभिक, अपूज्य आणि दुषीत भाषेचा प्रयोग करनारे लोक यांसाठी ’मृघ्रवाच’ शब्दाचा वापर मिळतो. अर्थात कोणत्याही आर्य ग्रंथामध्ये ’अनार्य’ शब्द जातीवाचक स्वरूपात प्रयुक्त केला गेलेला नाही. हे स्पष्ट आहे की ऋग्वेद इतादी मध्ये ठिक-ठिकाणी अनार्य, दस्यु, कृष्णगर्भा, मृघवाच इत्यादी शब्द आर्यांपासून वेगळ्या जातिंसाठी योजलेला नसुन आर्य कामांपासुन (सभ्य कामांपासुन) वेगळे अशा लोकांसाठी योजलेला आहे त्याचप्रमाणे ’अनार्य’ हा शब्द ईतर शब्दांप्रमाणे जातिवाचक स्वरुपात योजला गेलेला नाही.

:काय शुद्रजाती भारतीय समाजाय त्या काळी घृणित अथवा अस्पृश्य मानली जात होती ?:
प्राचिन काळी भारतीय समाजात चार वर्ण होते,- ब्रम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र परस्पर सहयोगी होते, एक वर्ण दुसर्‍या वर्णामध्ये जाऊ शकत होता.त्या वेळी वर्ण नव्हे तर त्याची उपयोगीता कर्माच्या प्रामुख्यतेनुसार होते. भारताच्या कोणत्याही प्राचिन ग्रंथामध्ये कोठेही अशा उल्लेख मिळत नाही की जेथे असे सांगितले गेले आहे की शूद्र घृणित अथवा अस्पृष्य आहे अथवा ईतर वर्णांपेक्षा लहाण आहे !
चार वर्णांना समाजरूपी शरीराचे चार प्रमुख भाग मानले आहे. जसे ब्रम्हण - शिर, क्षत्रीय- बाहु, वैश्य-उदर आणि शुद्र-चरण. चारी वर्णांना समान पद्धतीने आपली-आपली उपयोगितेच्या पद्धतीने शुद्रांची उपयोगीता समाजासाठी सर्वाधीक राहीलेली आहे. समाजरुपी शरीराला चालवण्यासाठी, त्याला गतिमान करण्यासाठी आणि सर्व व्यवहार संपन्न करण्याचा भार वाहण्याचे काम पायांचे असते. भारतीय समाजात शूद्रांबरोबर स्पर्षास्पर्ष अथवा भेदभावाचा व्यवहार जसा आज केला जातो , प्राचिन काळात होत नव्हता. वैदिक सहित्यामध्ये हे सुद्धा प्रमाणित केलेले आहे की ’शुद्र’ मंत्रद्रष्टा ऋषि देखिल बनू शकतो. ’कवष ऐलुषु’ दासिपुत्र अर्थात शूद्र होते परंतू त्यांच्या विद्वत्तेला परखुन ऋषींनी त्यांना आपल्यात सामाऊन घेतले. ते ऋग्वेदाच्या अनेक ऋचांचे द्रष्टे होते. सत्यकाम जाबाली शूद्र असुन सुद्धा यजुर्वेदाच्या एका शाखेचे प्रवर्तक होते. (छान्दोगय ४.४) यातून हे स्पष्ट होते की, "शुद्रांना वेद वाचण्याचा अधिकार नव्हता"म असे म्हणने चूकिचे ठरते. सामाजिकदृष्ट्या हा भेदभाव मुसलमान व इंग्रजांनी आपल्या-आपल्या राज्यकालांमध्ये या देशाला तोडण्याच्या उद्देशाने उत्पन्न केला आहे.
वस्तुत: वर्णव्यवस्था समाजात अनुशासन आणन्यासाठी , समाजाची उन्नती साठी आर्थीक विकासासठी बनवलेली होती.
डॉ. अपल्या ’शूद्र कॊण होते’ मध्ये प्रबळ प्रमाणांच्या आधारावर सिद्ध केले आहे की शूद्र वर्ण समाजातून भिन्न नव्हे तर क्षत्रियांचाच एक भेद आहे. संस्कृत साहित्यामध्ये सदाचरण वा असदाचरण यांच्या आधारावरच ’आर्य’, ’अनार्य’, ’दस्यु’,’दास’ इत्यादी संज्ञांचा प्रयोग केला गेलेला आहे. वास्तव मध्ये ’आर्य’ शब्दाला सुसंस्कारांनी सम्मानीत व धर्माचरण करनारा व्यक्ती साठी वापरलेला आहे.
आता निश्चित स्वरुपात संगितले जावू शकते की हे सुद्धा इंग्रजांद्वारा भारतीय समाज तोडण्याच्या उद्देशाने पसरवलेली भ्रांति व्यतरिक्त काहीही नाही.