Tuesday, July 16, 2013

शिवजयंतीच्या उत्सवाला प्रत्यक्ष शिवरायांना आमंत्रीत केले, तर आजची परिस्थिती पाहून शिवाजी महाराज आपल्याला काय म्हणतील ?
काय ? आज तिनशे वर्षानंतर मला, शिवाजीला, तुम्ही मराठ्यांनी जे बोलाविलेत, माझा वाढदिवस साजरा करण्याकरिता म्हणून मोठ्या गाजावाजाने आमंतत्रिलेत ते काय माझी अशी संभावना करण्याकरिता ? युद्ध , लढाया, सेना, भगवे झेंडे, ताशे, ढोल, केवढा गाजावाजा आणि केवढा गोंधळ तुम्ही करीत होतात. ऐकुन मला वाटते की, तुम्ही मला जे बोलावता आहात ते अर्थात कोणता तरीमहान पराक्रम करुन दाखविण्यासाठीच होय. तिनशे वर्षांनी का होईना पण माझ्या मागे माझे घालविलेले राज्य परत जिंकून ते माझ्या चरणि अर्पण करण्याकरिताच तुम्ही मला आमंत्रिले असुन असाल, ह्या रणगर्जणा आणि कोलाहल चालविला असाल !

पण पाहतो तो काय ? नाट्यगृहात चाललेले एखादे नाटक यापेक्षा अधीक रंगते ! हे लोक सरड्यावर बसुन स्वार्‍या करीत आहेत. पिंडीवर पोट भरु पाहत आहेत, जिभेचे पट्टे फिरवीत त्या पटाईत धारकर्‍यास घाबरवू इच्छीत आहेत, युद्धाच्या भातुकली खेळत आहेत. स्वतंत्र्य, युद्ध, स्वारी, कूच या शब्दांचीच नव्हे तर या वाचाविरांनी माझ्या शिवाजी या नावाची देखिल इतकी विटंबना केली आहे की , त्याचा आता कोणास काडीचा देखील धाक वाटत नाहीसा झाला.

माझे नाव घेताच अगदी साठ पासष्ठ वर्षापुर्वी देखील माझे शत्रू चमकून उठत. त्यांना वाटे शिवाजीचे नाव म्हणजे रणदेवतेचा जाज्वल्य मंत्र आहे. जर का ते हिंदुस्थानात उच्चारू दिला, जर कोणास त्याच्या चित्रची मिरवणूक काढायला दिली  वा त्याचा जयजयकार करु दिला तर न जाणो, आपले गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी हिंदु तरूण तानाजी, बाजीसारखे शिर हातावर घेवून शत्रुवर तुटून पडेल ! म्हणुन ते नाव कोणत्याही काणाकोपर्‍यात ऐकताच माझे शत्रु चिडून जात, भिऊन उठत. त्या चाफेकराने माझ्यावर एक कविता रचुन म्हटली तर केवढी खळबळ उडाली , माझे उत्सव भयंकर अपराध ठरले. माझ्या नावास उच्चारण्याची बंदी झाली. पण हाय हाय !! माझ्या नावाअस तुमच्या करंट्या जिभेचा स्पर्श होताच त्यातिल ति खरी जादू आज निघुन गेलेली दिसत आहे. दगडावर ठिणगीचा जसा काही परिणाम होत नाही तसा आजकाल या मुर्दाड महाराष्ट्रावर माझ्या नावाचा काही परिणाम होईनासा झाला. पुर्वी शत्रुस वाटत होते की महाराष्ट्र हे दारुचे कोठार, त्यावर ही शिवाजिंच्या स्मृतीची ठिणगी पडणे नको, पण आता त्यांना कळून चुकले आहे की हे दारुचे कोठार राहिलेले नसुन नाल्याची घाणेरडी दलदल झाली आहे. शिवरायांच्या जळत्या नावाने ही दलदल पेटणे तर दुरच, पण उलट त्या नावातील जळती ठिणगी तिवर पडताच ती ठिणगीच विझण्याचा पक्का संभव. म्हणुन हे वाचावीरांनो तुम्हास आता माझ्या नावाचे जयजयकार वाटेल तितके करु देण्यात येतात. कारण माझ्या नावाने तुमच्या मुर्दांड मनात एक कर्तव्यशील चेतना उत्पन्न होणे अशक्य झाले आहे. त्या योगे  माझ्या नावाचा दरारा ही नाहीसा होऊन माझे शत्रु देखील माझ्या नावाशी विषारी दात काढून टाकलेल्या सापाशी, गंमतीने खेळावे तसे खेळत आहेत.

दगडांनो ! तुम्ही माझा, या शिवरायांचा देखिल एक दगड करुन टाकलात ! राखेत टाकलेली आहुती जशी निष्फळ  होते, प्रेताला बांधलेली तलवार जशी प्रेतासारखीच पडून राहते, तसा हा माझा ह्या पुण्यक्षयी, क्षयग्रस्त पुण्यास उभारलेला पुतळा दगडासारखा एक दगडच होऊन पडला आहे आणि एखाद्या साध्या दगडाची जितकी३भिती वटच्या चोरास वाटते, तितकी देखील त्या माझ्या पुतळ्याच्या दगडाची भिती त्यास वाटत नाही. कारण तुमचे हे लुळे हात, हे पंगु पाय , ही मुर्दाड मने ! ह्या माझ्या दगडी पुतळ्यांच्या दगडाइतका देखील उपयोग करुन घेत नाहीत. 
म तुम्ही मला बोलाविलेत तरी का ? केवळ माझी विटंबणा करण्यासाठी ? ज्या प्रतापगडावर मी अफजुलखानाचे शिर टांगले आणि शरुचा दहा हजार घोडा पाडाव करुन बांधुन टाकला- त्या प्रतापगडावर खानाची समाधी व्हावी ! थडगं व्हावं !  कुलस्वामिनिच्या मूर्तीस गदागदा हलवून सोडावे आणि त्या गडाच्या आजुबाजुस पसरलेल्या हजारो हिंदुंनी बांगड्या भरुन, लुगडी नेसुन पोलिसांच्या  पाया पडत फिरावे . आम्ची देवी लुटली ! थू: तुमच्या जिनगानिवर ! थू: तुमच्या जिनगानिवर !

माझ्या देशबंधुंनो, माझे तुमच्यावर अतिशय प्रेम आहे. ह्या माझ्या हिंदुस्थान देशासाठी आणि हिंदु जातीसाठी मी अनेकवार माझे प्राण धोक्यात घातले ,जन्मच्या जन्म कष्ट काढले, म्हणुनच मला तुमचे काही चुकत असेल तर ते कडवटपणे सांगण्याचा अधिकार आहे. यास्तव्मी स्पष्टपणे सांगतो की, तुम्ही माझ्यावर प्रिती करता याचा मला मुळीच संरोष वाटत नाही. तोवर केव्हाही वाटणार नाही की, जोवर तुम्ही या माझ्या मातृभुमीच्या उद्धारार्थ  आणि हिंदु जातीच्या गौरवार्थ काही मिळत नाही, त्याग आणि शत्रुला धाकविणारे धाडस दाखवीत नाही आणि नुसती माझी स्तुतिस्तोत्रे गात बसता.

अरे शिवकालीन इतिहास मला माहीत आहे; तुम्हाला माहीत आहे त्याहून शतपटीने मला माहीत आहे. तुम्ही तुमच्या काळी कोणता बंब वाजवला ते मला सांगा. मी पुर्वीचा विगत शिवाजीराजा त्यंना इतका आवडतो की, त्यांना दुसरा एखादा नवीन शिवाजी राजा उत्पन्न व्हावा ही इच्छा देखील असहाय्य होते. जो गुण आमच्या शिवकालीन कादंबर्‍यात साहस होतो, तोच प्रस्तुत कालातील एखाद्यात दिसताच तो माथेफिरू अत्याचार ठरतो.

देवा ! या माझ्या शिवकालीन स्तुतीपाहकांपासुन माझे रक्षण कर. मी मागचा शिवाजी शिवाजीराजा  त्यांना इतका आवडतो आहे की नविन शिवाजी महाराज उत्पन्न होण्याची इच्छा देखील यांना असहाय्य होते.


तुमी म्हणाल की एखाद्या ओसाड किल्ल्यावर दुडूदुडू धावुन येणे. लाडूच्या जेवणावळी झोडणे आणि माझ्या इतिहासांच्या संशोधनाचे भारुडाचा मला नैवेद्य अर्पिणे यापलिकडे या परिस्थितित अधीक काही  पराक्रम करुन दाखवणे तुम्हांस अशक्य होते. तर मी म्हणत जोवर मुर्दाडपणाचे प्रतिबिंब असणारी ही परिस्थिती आहे तोवर या पुढे तुम्ही नका बोलवण्याचा मुर्खपणा तरी करु नये. हा तुमचा कार्यक्रम ज्यांच्या उत्सवाला शोभेल  अशा दुसर्‍या कोनाचा तरी करा. पळपुट्या दुसर्‍या बाजिरावाचा उत्सव करित जा. त्याला किल्ल्यावर हल्ला करण्याची धमक नव्हती. त्याला तुमच्या या दुडूदुडू धावत जाण्यायेण्याचे देखील आश्चर्य वाटेल. परक्यांचे झेंडे आपल्या राजवाड्यावर उडत असताही लाडुंचा नैवेद्य तो खाईल. मी फक्त राज्यरोहणाच्या दिवशी तेवढा लाडूस शिवतो. तो दिवस येईल तेव्हा मला बोलवा ! सिंहाला आमंत्रण देवून पानात गवताच्या पेंढ्या सोडण्याचा मुर्खपणा तरी करु नका.

मिही रामायण ऐके. पण आजीबाईसारखे तांदुळ घेवून जन्मभर तेच नुसते ऐकत बसत नसे किंवा मेलेल्या रावणास प्रतिवर्षी नाटका पोवाड्यातुन मारत बसत नसे, तर मी त्या वेळच्या जिवंत रावणास , रामायण ऐकताच मारुन धावे !  मी अफजुल्ल्यास मारले, शाहिस्त्यास चिरले, पाच पातशाह्या धुळीस मिळविल्या ! रामायण ऐकताच रामासारखे पराक्रम केले. नुसत्या रावणाच्या दहा तोंडास विस मिशांस केस किती होते, आणि मारुतीच्य उड्डाणाच्या वेळी जी रेती वर उसळली तिच्यात कण किती उसळले ? त्याचे ऐतिहासीक संशोधन करत बसलो नाही. अवनतीच्या भयंकर गर्तेत समुद्रावरुन उडी घेतली आणि शत्रुई लंका जाळून भस्म केली.

तसे काही करा तर तुम्ही माझे नि मी तुमचा ! अरे माझे नाव गल्लोगल्ली  गाणार्‍या तुम्हा मुर्दाड महाराष्ट्रियांपेक्षा आज जे माझे उत्सव-बित्सव कधी फारसे करिन नाहीत तो गुजरात मला तुमच्याहुन फार जवळ वाटत आहे, कारण माझ्या हिंदु जातिच्या उद्धारार्थ माझ्या सैनिकाला शोभेल असे काही तरी साहस ते मधुन मधुन तरी करत आहेत. जो माझ्या या कुलाचा, वंशाचा उद्धार करण्यासाठी संकटावर  चाल करुन जाऊन त्याचा शिरच्छेद करतो तो माझा मुलगा. मग त्यास माझी नक्की जन्मतिथी कोणती ते जरी माहीत नसेल तरी चिंता नाही. पण जो माझ्या घराची इकडची काडी तिकडे करित नाही, तर चोर घरात वावरत असता तोंडावर बुरखा ओढून माझे बाबा, माझे बाबा ! माझे महाराज ! माझे महाराज ! म्हणुन नुसती माझीच माळ जपत बसतो तो माझा मुलगा नव्हे. तो पोटी आलेला जंतू होय !

मी विचारतो माझे राज्य कुठे आहे ! माझा मुकुट कोठे आहे ? ही आम्हा हिंदुंची भुमी, हा समुद्र यांच्यावर स्वमित्व कोणाचे आहे ? का आहे ? माझ्या अंगाची लाही लाही होत आहे ! विचारू तरी किती ? कसे ? या प्रश्नांची विचारलेल्यांची अणि न विचारलेल्यांची उत्तरे द्या. परिस्थिती बदलली असे.

तर माझ्या मशालीने नसेल तर विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाने नविन मार्ग काढा. नविन योजा. मी देखील साधने बदललीच. पण माझ्या काळचा रावण मारला ! तुम्ही साधने बदला. नविन वैध पवित्रे टाका . काय वाट्टेल ते करा- पण झुंजा जिंका. आणि जोपर्यंत तुम्हांस  जसे काही करता येत नाही, वरील प्रश्नांस उत्तर देववत नाही, तुम्ही एक वा अनेक शिवाजी उत्पन्न करत अही. तोवर महाराष्ट्रियनांनो तुम्हास माझी शिवाजी राजांची शपथ आहे की , माझे पोवाडे तुम्ही गाऊ अका, तुमच्या सारख्यांनी नव्हे तर माझ्यासारख्या शुरमर्दाचा पोवाडा , शुर-मर्दाने गावा !
अनुस्मरणाने नव्हे, तर यथाकाल अनुसरणाने गावा ॥
बहुत काय सांगणे ? तुम्ही सुज्ञ असा !!

- सोर्स . हिंदुराष्ट्र सेना

Tuesday, April 30, 2013

मराठ्यांची वैचारीक फसवणूक


खेडेकर कोकाटे हे मराठा जातीची वैचारीक फसवणूक करत आहेत. त्यामागे त्यांचे काही गुप्त हेतू नक्कीच असले पाहीजेत. त्यांचे हेतू त्यांनी पुरे करुन घ्यावेत, पण त्यासाठी संपुर्ण मराठा जातीला बदनाम करु नये. खेडेकर-कोकाटे यांचा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड म्हणजे संपुर्ण मराठा जात नाही. पण समाजात खेडेकर-कोकाट्यांच्या वर्तनामुळे सार्‍या मराठा जातीची नाचक्की होत आहे . खेडेकर त्यांच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडून सांगत आहेत. आणि मराठा जातीचा बुद्धीभेद करत आहेत. यासाठी एकच उदाह्रण पाहीले तर खेडेकरांचा कावा आपल्या लक्षात येईल. "बहुजनांचा सांस्कृतीक इतिहास" या आपल्या पुस्तकात खेडेकर लिहितात- "शंभुराजांची हत्या बामनांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी आमलात आणल्या त्यामुळे शंभुराजांची घोर विटंबणा बामनाअंनी केली, वेदाभ्यास व संस्कृत पंडीत होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभुराजे स्वत: जगातील अत्यंत हुशार थोर संस्कॄत पंडीत होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभुराजे संस्कृतपंडीत होऊन बामनांचाही पराभव करतात. त्यामुळे शंभुराजे बामनांच्या हाती पडतात बामनांनी शंभुराजांचे डोळे फोडले, कानात तेल ओतले, जिभ कापली, शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभुराजांचे शिर म्हणजे डोके उंच बांबूवर लटकवून तूळापूर, वडू आपटी परिसरात मिरवले" (पान.नं. २४)
खेडेकर म्हणतात की ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला, पण औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात तर खोटेपणा नसेल ना ? इश्वरदास नावाच्या गुजरातमधील माणसाने "आरमगीर विजय" नावाचा ग्रंथ लिहिला आहे. तो नेहमी औरंगजेबाच्या छावणीत राहत असे. त्याने आपल्या आंखो देखा इतिहास धर्मविर संभाजी महाराजांच्या वधाचा इतिहास असा लिहिला आहे. मूळ फारशी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ सेतू माधवराव पगडी यांनी मराठीत अनुवादीत केला आहे. त्यातील संभाजी वधाचा उतारा असा --
बहदुरखान आणि इखलासखान हे आपले सैन्य तयार करुन युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करुन फरुन चहुंकडून संभाजीला घेरले व त्यावेळी उभय पक्षांत मारामारी झाली. संभाजीच्या बरोबर असलेले चारशे सैनीक मारले गेले. मोंगलांचे जवळजवळ आडीचशे सैनिक मॄत्युमुखी पडले. संभाजीनेही पळून जाण्याचा बेत केला, पण त्याचा बेत सिद्धीस गेला नाही. तो मोंगलांच्या हाती कैद झाला. वाईट कर्माची फळे वाईटच होतात. कविकलश यास त्याच्या कृत्याची फळे मिळाली. संभाजी बरोबर तो पण कैद होऊन मोगलांच्या तावडीत सापडला.
संभाजीला कैद केल्याची बातमी बादशहाला शहाजादा आजम याच्या पत्रावरुन समजली. इखलासखानाचा हरकारा खंडूजी याने बादशहापाशी येऊन सगळी हकिकत सांगीतली. त्यानंतर ही बातमी सगळीकडे जाहीर झाली. यानिमित्त लष्करात आनंदनिदर्शक अशी वाद्ये वाजविण्यात यावीत अशी बादशहाने आज्ञा केली.  बादहशाबरोबर असलेल्या मोठमोठ्या अमिररावांनी बादशहाला नजराणा देऊन या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. खंडूजी हाराकारा यास खूप बक्षीस देण्यात आले..
इखलासखान आणि बहादुरखान यांस सन्मानाची बढती, बहुमानाचे पोषाखम जवाहाराचे खंजीर, हत्ती-घोडे इत्यादी देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संभाजीला तरतुदीने आणि बंदोबस्ताने दरबारात घेवून यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली.
बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलासखाण आणि बहादूरखाण हे संभाजी , कविकलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेवून बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशहाने आज्ञा केल्यावरुन इखलासखान आणि हमिदुद्दुनखान यांनी संभाजी, कविकलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरुन धिंड काढली.  त्यांची हजारप्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना चावणीत आणन्यात आले . दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयाजवळ उभे करण्यात आले. बादशहाने संभाजी कडे पाहीले. त्याची दुर्दशा पाहून बादशहाच्या मनावर परिणाम झाला. त्यानंतर बादशहा सिंहासनावरुन उतरला आणि त्याने प्रार्थना करुन परमेश्वराचे आभार मानले.
पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणुन यत्किंचीतही मान लवविली नाही. इखलासखान आणि हमिदुद्दिनखान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशहाने आज्ञा केली की सिकंदरखानच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे, कविकलश आणि त्याचे साथिदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या. 
यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रहुल्लाखान यास खालीलप्रमाणे आज्ञा केली, "तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजीने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुटेह आहे ? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबंध ठेवीत होते. "
पण माणसाची जिवीताची आशा सुटली कीति मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहासंबंधी घाणेरडे शब्द उच्चरले आणि त्यांची निंदा-नालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते जसेच्या तसे रहुल्लाखानने बादशहाला सांगीतले नाही, पण ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा त्याने बादशहास इशारा दिला. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजी च्या डोळ्यात सळई फिरवून (त्याला आंधळा करुन) त्याना नविन दृष्टी द्यावी (वठणीला आणावे).
य्त्याप्रमाणे करण्यात आले, पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासुन जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेकर्‍यांनी त्याला अन्नसेवन करण्यास पुष्कळ सांगीतले , पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले, शेवटी ही बातमी राजाच्या काणावर गेली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेने त्याला वधस्थंबाकडे नेण्यात आले. तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके अओरंगाबादेहून बुर्‍हाणपुरापर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लिला नेण्यात येवून शहराच्या स्वारावर लटकवण्यात आले. (मोगल-मराठा संघर्ष , पान नं . ३०-३१)
खेडेकरांचा इतिहास आणि इश्वरदासचा प्रत्यक्षदर्शी इतिहास आपण समजुन घेतला पाहीजे. खेडेकरांना मराठा समाजाची फसवणूक करायची आहे. ब्राम्हणांविरुद्ध उभे करुन सामाजिक असंतोष निर्माण करायचा आहे आणि त्याच अट्टाहासापोटी हे मराठ्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाला निर्दोष सोडवण्याचे धाडस करतात. प्रसंगी त्याचे उदात्तिकरण करण्यातही मागेपुढे पाहत नाही. ज्या धर्मांध औरंगजेबाने संभाजी राजांचा क्रूरपणे वध केला, आपल्या जन्मदात्या आई वडीलांना कैदेत टाकले, भावांची हत्या केली. संभाजी राजांची पत्नी महाराणी येसूबाई व पुत्र शाहू राजे यांना १७ वर्षे कैदेत डांबून त्यांचा अतोनात छळ केला./ त्याच औरंगजेबाला खेडेकर कोकाटे, देशमुख धर्माने वागणारा स्त्री दाक्षीण्यवादी असलेला औरंगजेब म्हणतात हा मराठ्यांचा घोर अपमाण आहे. हे मराठ्यांनी समजुन घेतले पाहीजे.

- रविंद्र गोळे
 ( शिवरायांचा देशधर्म पुरुशोत्तमांचा द्वेशधर्म या पुस्तकातुन साभार )

शिवरायांच्या शत्रुंचे उदात्तीकरणपुरुशोत्तम खेडेकरांनी "शिवचरित्र" नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणतात "औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखाण हे महाराजांचे कट्टर राजकीय शत्रू होते, इत:पर त्यांनी महाराजांचा आदर केला " (पान ३१. शिवचरित्र) श्रिमंत कोकाटे लिहितात, "औरंगजेबाने श्जिवाजीला राजा ही पदवी सन्मानपुर्वक दिली." (विश्वंद्य शिवाजी पान ६५) खेडेअक्र खेडेकर औरंगजेबाचे गोडवे गाताना पुढे लिहितात, "अओरंगजेब हा क्रूर रंगवला जातो. बादशहा होण्यासाठी स्वत:च्या भावाची व त्याच्या मुलाची हत्या केल्याचे रंगवले जाते... अशी अतिरंजीत मांडणी करुन औरंगजेबाने महाराजांना किती त्रास दिला असेल ही मांडणी केली जाते ते चूक आहे. प्रत्यक्ष औरंगजेबाने शंभूराजांना आग्रा येथे नजरकैदेत असतानाही मानानेच वागवले. तो जर ब्राम्हण सांगतात तसा कृर असता तर कुणाचीही तमा न बाळगता त्या दोघांना ठार करणे अशक्य नव्हते. शंभुराजांना अटक केल्यानंतर रायगड मोगलांकडे आला. तेथे शंभु महाराजांची महाराणी येसूबाई व मुलगा शिवाजी (शाहू) यांना अटक करण्यात आली . औरंगजेबाने या दोघांना छावणीत प्रशस्त तंबू देवून सर्व सुखसोई दिल्या. सुरक्षीततेच्या दृष्टीने त्यांचा तंबू नेहमी आपल्या जवळ ठेवला... यावरून मराठ्यांनी औरंगजेबाचे मुल्यमापण करावे. "
श्रिमंत कोकाटे आपल्या "विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज" या पुस्तकात लिहितात, "शिवरायांचा हिंदू, हिंदवी, हिंदुत्व यांच्याशी अजिबात संबंध नाही. शिवचरित्रात कोठेही हिंदू, हिंदुत्व, हिंदवी यांचा उल्लेख नाही...शिवरायांना हिंदु धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटले जाते ही शिवरायांचू कृर चेष्टा आहे".
अशाप्रकारे कोकाटे व खेडेकर औरंगजेब व त्यांचे धर्मांध सरदार यांच्यासंबंधी लिखाण करत आहेत. हा एकप्रकारे शिवरायांच्या कार्याचा अपमाण आहे.  इतिहासाचे विकृतीकरण करणारे पुरुषोत्तम खेडेकर औरंगजेबाचे इतके चाहते झाले आहेत की अस्लम बेग यांनी लिहिलेल्या "हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक : औरंगजेब" या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते. मुस्लील लिग चे प्रेस्टीडंट खा. बनातवाला यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी मिर्झा अस्लम बेग यांनी उद्गार काढले "पुस्तकाच्या निर्मितीत मराठा सेवा संघाची मदत झाली आहे" जेथे उरंगजेबाचा संबंध तेथे खेडेकर असेच या प्रकाशन समारंभाचे स्वरुप असल्याने आपली औरंगजेबभक्ती प्रकट करण्यासाठी खेडेकर तेथे पोहोचले. "हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक औरंगजेब" या पुस्तकाचे लेखक मिर्झा अस्लम बेग यांची हिंदु-मुस्लीम दंग्याच्या संदर्भात अनेक वेळा पोलीस चौकशी झाली आहे. त्यांचे सिमीसोबतचे संबंधही जगजाहीर आहेत.

द्वेशाची किणार : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करुन वध करणारा औरंगजेब नाही, तर संभाजीचा खून ब्राम्हणांनी केला, असा शोध खेडेकरांनी "बहुजनांचा सांस्कृती इतिहास" या पुस्तकात औरंगजेबाच्या प्रेमापोटी लावला आहे. मा.म. देशमुख आपल्या "शिवशाही" या पुस्तकात (पान ६२)
 वर औरंगजेबाचे स्त्री दाक्षीण्य मांडतात, ते लिहितात "ब्राम्हण पंडीत औरंगजेबास दुष्ट, कपटी वगैरे रंगवातात. तरीही त्यांनी शाहु व त्यांच्या कुटुंबीयांतील स्त्री-पुरुषांचा इस्लामी-सुलतानी छळ केला नाही. याउलट शाहू व त्यांच्या परिवारास जेवढ्या सन्मानाने व उदारपणाने औरंगजेबासारख्या मुस्लीम शासकाने वागवले तेवढं स्त्री दाक्षीण्य ब्राम्हण पेशवा नारायणराव याने दाखवले नाही. "
अशा अनेक उदाहरणांतून खेडेकर, कोकाटे , मा. म. देशमुख शिवाजी महाराजांच्या शत्रुंचे उदात्तिकरण करत आहेत. या इतिहासाचे वाचन केल्यावर समाज संभ्रमित होऊ शकतो आणि संभ्रमात असलेला समाज कधीही एकसंघ राहत नाही. आपापसात भांडतो याचा फायदा परधर्मी घेतात. परिस्थिती संपवायची असेल तर या मंडळींनी मांडलेल्या विधानांनी सत्यता तपासुन घेतली पाहीजे. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची तुलना करुयात.
वरील तुलनेतून औरंगजेब कसा होता आणि शिवाजी महाराज कसे होते हे लक्षात येते. आपण सामान्य माणसे आहोत म्हणुन ते समजु शकतो, परंतु खेडेकर, कोकाटे, देशमुख यांच्याबाबत असे म्हणता येणार नाही. त्यांना औरंगजेब प्रेमाचा पुतळा वाटतो. त्याने शाहूंचा प्रेमाने प्रतिपाळ केला असे खेडेकरांचे म्हणने आहे, तर शिवाजी महाराजांना औरंगजेबाने "राजा" ही पदवी सन्मानाने बहाल केली असे कोकाटे म्हणतात. खेडेकर, कोकाटे औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवरायांचे अवमुल्यन तर करत नाहीत ना, याचा आपण विचार केला पाहीजे.

आदर कशासाठी ? : 
औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान हे शिवरायांच आदर करत असे खेडेअक्र म्हनतात. पण इतिहास काय आहे ? अफजलखान विजापुर हून निघाला "शिवाजीला मी चालत्या घोड्यनिशी जिवंत वा मृत पकडून आणतो" अशी प्रतिज्ञा करुन तो वाईला येईपर्यंत मठ-मंदीरे लुटतच आला. रयत नागवली. स्त्रियांची आबृ लूटली. शाहिस्तेखान तीन वर्षे पुने परिसरात तळ ठोकून बसला होता. सारा परिसर धुऊन काढला. अन्याय-अत्याचार केले. लुटालूट केली, ती काय शिवाजी महाराजांवर असणार्‍या आदरापोटी ?. खेडेअक्र-कोकाटेंना नक्की काय सांगायचे आहे ? कोणता इतिहास लोकांसमोर मांडायचा आहे ?
शिवाजी महाराज व तत्कलीन मुस्लीम राजे यांच्यातील लढा हा धार्मीक नसुन केवळ राजकीय होता असे विधान करणे म्हणजे शिवरायांच्या कार्याचे अवमुल्यन करणे होय. ज्या शिवाजी महाराजांनी इथे प्रस्थापीत असणार्‍या अन्यायी-अत्याचारी मुघल, आदिलशाही व अन्य मुसलमानी राजवटीत खितपत पडलेल्या शतखंडीत असलेल्या हिंदु समाजाला जाग्रुत करुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. रयतेचे महान राज्य. महाराजांनी निर्माण केले. त्यासाठी सर्व सुखांचा त्याग केला, मानवतेचे कल्यानकारी राज्य निर्माण केले म्हणुनच ते विश्वंद्य ठरले. यांचा लढा अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध, असत्याविरुद्ध होता. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर मात्र शिवाजीचा लढा हा केवळ राजकीय होता असे म्हणुन छत्रपतिंच्या महान कार्यालाच काळीमा फासत आहेत. छत्रपतिंच्या उदात्त ध्येयाचे अवमुल्यन करुन त्यांना स्वत:च्या सुखासाठी राज्य निर्माण करणारा एक स्वार्थी ठरवू पाहत आहेत काय ??
खेडेकर, कोकाटे, देशमुख यांच्या लेखनातून अशाप्रकारे मुस्लीम सत्ता आणि शिवरायांचे शत्रू यांचे उदात्तिकरण चालू आहे. याचा समाजावर काय परिणाम होतो ? तरुण पिढीला कोणता आदर्श मिळेल याचा विचार खेडेकर करणार आहेत का ?
एका बाजूला औरंगजेब , शाहिस्तेखान, अफजलखान हे शिवरायांचे खरे शत्रू नव्हते असे समाजाला सांगायचे आणि दुसर्‍या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू म्हणुन ब्राम्हणांना लक्ष करायचे अशी दुहेरी निती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून राबवली जात आहे. या मागची कारणे मराठा तरुणांनी डोळे उघडून शोधली पाहीजे.
मराठा सेवा संघ पुरस्कृत या साहित्यातील मानसिकता आणि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही समाजात विद्वेश पसरवणारी आहे. या मानसिकतेने आपल्या मराठा समाजाचे कधीही भले होणार नाही आणि विकासाकडे वाटचालही होणार नाही . मराठा समाजाला जर स्वत:चा विकास करुन घ्यायचा असेल तर खेडेकर-कोकाटेंच्य विखारी प्रचारापासून दूर जाऊन  वास्तवाचा विचार केला पाहीजे.
मराठा जातीच्या अस्मिता जागवताना खेडेकर-कोकाटे समाजात जातिद्वेश पसरवत आहेत. त्यांच्यापासुन वेळीच दूर होणे आणि त्यांची जागा दाखवुन देणे ही काळाची गरज आहे. नाहीतर छत्रपतिंच्या गौरवशाली पराक्रमाचा वारसा सांगणारा मराठा समाज खेडेकरांच्या मागे लागून औरंगजेबाचे गोडवे गाऊ लागे.


- धर्मेंद्र खंडारे
 ( शिवरायांचा देशधर्म पुरुशोत्तमांचा द्वेशधर्म या पुस्तकातुन साभार )

Friday, April 19, 2013

आर्यन इनव्हेजन थेअरी , मुळनिवासी संकल्पना भाग - १


इंग्रजांनी भारतामध्ये राज्य करताना नेहमीच फोडा-झोडा आणि राज्य करा या नितिचा वापर केला आहे. मग ती तोडफोड सवर्ण-विवर्ण अशी जातीय असो, हिंदु-मुस्लिम अशी धार्मीक स्वरुपातील असो किंवा आर्य- अनार्य अशा पद्धतीची वांशीक स्वरुपात असो. आजही आपण आपल्या समाजामध्ये अशा जातीय, धार्मीक आणि वांशीक तेढींना सामोरे जातो त्या अर्थी इंग्रजांनी ही निती किती पद्धतशीरपणे भारतीयांच्या नसा नसात भिनवली याची कल्पना येते. आजही आपला समाज इंग्रजांनी लावून दिलेल्या भांडनावरच जगतो आहे व आजचे तथाकथीत पुढारी व देशाचे नेते मंडळी याच सामाजीक भांडणांच्या आधारावर आपली पोळी भाजुन घेत आहेत, याच माणसिकतेतून धार्मीक दंगलिंना, जातीय चळवळींना व साहित्याला, व वांशीक विभाजनवादाला प्रोत्साहन मिळते आहे. व हे वाद कधीही नष्ट होऊ नये याची खबरदारीही घेतली जाते. जरी एखादा वाद अभ्यासा अंती निरर्थक ठरवला तरी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आणी जरी एखादी संस्था किंवा संघटना असे वाद नष्ट करण्यासाठी कार्यरत असेल तर ती संघटना किंवा तो समुह समाजाच्या दृष्टीकोणातून कसा बाद ठरेल याची खबरदारी घेतली जात आहे. यांपैकीच एक जो वांशीक वाद आहे, जो आर-अनार्य अशाप्रकारच्या वादाची सुरवात करतो या वादाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. भारतामध्ये इंग्रजांची पाळेमुळे पक्की करण्यासाठी मॅक्स्मुलर नावाच्या जर्मन विद्वानाने आर्यांद्वारा भारतावर परकीय आक्रमणाची प्रथम संकल्पना मांडली. जिथपर्यंत इंग्रजांचे भारतावर राज्य होते व त्यांना अशाप्रकारच्या वादाची भारतावर राज करण्यासाठी गरज होती हे आपण समजु शकतो, पण इंग्रजांनी घालून दिलेले तेच गैरसमज (गैरसमज अशासाठी त्या सिद्धांताना कोणताही आधार नाही) आजही भारतातील नेते, पुढारी, इतिहासकार व विद्वान जसेच्या तसे स्विकारतात. याच्याही पलीकडे जाऊन त्याच गैरसमजांच्या आधारावर अनेक संघटना निघतात व त्या संघटना आज देशामध्ये जाती-जातिंमध्ये भांडने लावुन जातिवादास खतपाणि घालतात, तेच गैरसमज आजही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जसेच्या तसे शिकवले जातात. व हे शिकलेले विद्यार्थी पुढे जाऊन हे म्हणतात कि भारतामधील जेजे चांगले आहे ते परकीय आहे, भारतामध्ये त्यांचे असे मुळ काहीही नाही , जे काही चांगले म्हणुन असेल ते परकियांनीच या देशात आनले .  हा सिद्धांत पुढे करून महात्मा फुल्यांनी आर्य हे बाहेरचे उपरे असुन त्यांनी आधीच्या अधीक प्रगत अशा मुलनिवासी द्रविड लोकांना पराभुत केले या मताचा हिरिरिने पुरस्स्कार केला. तामिळनाडू मध्ये हा सिद्धांत पुढे करुन द्रविडीपणा चेतवण्याचा प्रयत्न केला जातो.  तामिळनाडूमध्ये हा सिद्धांत वापरून सो-कॉल्ड द्रविडपणाला चेतविण्याचा प्रयत्न केला गेला. आजदेखील काही तथाकथित आणि पोकळ बहुजनसमाजवादी लिखाणात या सिद्धांताची मढी उकरून हवी तशी सजविली जातात.अर्थात आर्यन इन्व्हेजन थेअरी हा आर्य संकल्पनेचा एक भाग आहे. हीच संकल्पना वापरुन हिटकरने जो दंगा केला तो सर्वसृत आहे.


विकृतीची सुरवात का व कोणी केली : आजकाल आपलेच लोक आपल्याच देशामध्ये स्वत:ला परकीय म्हणवुन घेण्यात धन्यता माणत आहेत हे चित्र बर्‍यापैकी सर्वत्र पहायला मिळते , ही पराभुत माणसिकता निर्माण होण्याचे कारण म्हणजे साधारण दिडशे वर्षापुर्वी भारतामध्ये आपल्याला राज्य करण्यास सुरळीतपणा यावा या हेतूने जाणिवपुर्वक पसरवला गेलेला आर्यन इन्व्हेंजन थेअरीचा सिद्धांत होय. इन्व्हेंजन थेअरीचा चा सिद्धांत साधारण १५० वर्षांपुर्वी जर्मन तत्ववेत्ता मॅक्समुल्लर याने भाषेच्या आधारावर मांडला.
मुळात हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत असे सांगतो , की सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले, आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला . आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता , त्यांची भाषा देखील वेगळी होती .

संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीण भाषा आहे याबद्दल आता वाद राहीलेला नाही. संस्कृत, ग्रीक आणि लॅटीन भाषांमध्ये पाश्चिमात्य विद्वानांना काहि शाब्दीक व भाषीक समानता सापडल्या. यावरुन या तिन्ही भाषा कोणत्या तरी एका भाषेवरुन निर्माण झाल्या असाव्या असा ’तर्” (केवळ तर्क) मांडला. या भाषांना इंडो-युरोपियन असे सांगुन या तिन्ही भाषांची एक मातृ-भाषा असली पाहीजे असा तर्क मांडून या भाषेस त्यांनी आद्य-भारोपिय (प्रोटो इंडो-युरोपियन) असे नाव दीले, ज्यामधुन युरोपीय, इराणी आणि भारतीय आर्यभाषांचा क्रमश: जन्म झाला त्यांची एक शाखा युरोपामध्ये व दुसरी इरान-भारतामध्ये विकसीत झाली असा एक ’तर्क’ (इथेही केवळ तर्क) सर्वप्रथम विल्यम जोन्स ने मांडला. मी या परिच्छेदामध्ये तर्क या शब्दाला अधोरेखी अशासाठी केले आहे कारण तर्क हा केवळ तर्क असतो, तो एखाद्या गोष्टीचा पुरावा नसतो. तो चुकिचाही असु शकतो म्हणुनच याला तर्क म्हणतात. 

आता जर मानलेच आहे की या तिन्हि भाषांमध्ये काही समानता असल्यामुळे या तिन्हिंचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहेच, तर याच्याही पुढे काही विद्वानांनी जाऊन पुन्हा एक नविन वांशीक ’तर्क’ मांडला (एका तर्काच्या आधारावर दुसरा तर्क) तो असा की ज्या अर्थी वरील तिन्ही भाषांचे उग्मस्थान आद्य-भारोपिय भाषा ही मानल्यास ही भाषा बोलणार्‍यांचा वंश हा एकच असायला पाहीजे हे पर्यायाने आलेच या वंशाला आर्य असे नाव देण्यात आले आणि यातुनच आर्यन इन्हेंजन थेअरीचा जन्म झाला. पुढे इ.स.पू १५०० - १२०० च्या दरम्यान कधीतरी मूळ द्रविडी लोकांच्या राणटी अवस्थेतील भारतीयांवर सुसंकृत अशा आर्यांचे आक्रमण झाले, आर्यांनी येथील द्रविडिंना दक्षिनेकडे ढकलले. एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की जर संस्कृत, ग्रिक व लॅटीन या भाषांमध्ये जर काही भाशिक समानता आढळत असेल तर आर्य पश्चिमी देशांतुन भारतात आले असा जर तर्क केला जात असेल तर आर्य हे पुर्वेकडून पश्चीमेकडे म्हणजे मुळ भारतातुन पश्चिमी देशांमध्ये गेले असा तर्क का करु नये ? पण याचा विचार त्या काळी अजिबात झाला नाही, कारण भारतासारख्या मागास देशातुन एखादी सभ्य आनि सु-संस्कृत सभ्यता युरोपात गेली असा विचारही करणे त्या काळी अपराध होता. त्याचप्रमाणे असाही तर्क केला जाऊ शकत होता की या भारोपीय भाशांची जननी मुळ भारतातच आहे, पण या विकल्पावर त्या काळी एकाही विद्वानाने विचारही केला नाही. त्या काळी अजुन हडप्पा व मोहन जो दारो या शहरांचा शोध लागला नव्हता हे पक्के लक्षात ठेवले पाहीजे. या आर्यन इन्व्हेंजन थेअरीचे पुढे पुराव्यानिशी कसे धिंदवडे निघाले हे पुढे पाहणार आहोच.

आता ऋग्वेद, इतर-वेद अशाप्रकारचे महान वैदीक वांड्मय निर्माण करणारे कोणि आर्य हे मुळ भारतातील नव्हते हे एकदा पक्के झाल्यावर आर्यांच्या मुळस्थानावरुन जी त्या काळी रस्सीखेच झाली ती आजपर्यंत चालू आहे. कित्तेक विद्वान आर्य हे आमुक आमुक या ठिकाणचे किंवा तमुक तमुक या या ठिकाणचे अशाप्रकारचे दाखले आजही देत आहेत. परंतु आजपर्यंतच्या इतक्या विद्वानांना आर्य बाहेरुन आले याचा एकही पुरावा मिळालेला नाही गी गोष्ट सोईस्करित्या विसरली जाते. आता या रस्सिखेचाचे काही नमुणे पाहु ...
गॉर्डन चाइल्ड्स :- हा एक मार्क्सवादी विचारवंत असल्याने मार्क्सवादी विचाराच्या पुर्वग्रहातुन सुरवातीस आर्य हे मुळ रशियातुन भारतात आले असावेत असा त्याचा ग्रह होता परंतु नम्तर त्याने आर्य यांचे मुळ वसतिस्थान हे मध्य आशीयात असावे असे प्रतिपादन केले.

या आधी "आर्य" हा शब्द भारतीय साहीत्यामध्ये आदरपुर्वक संबोधन होते, पण आरय इन्व्हेजन थेअरीच्या तर्कानंतर "आर्य" या शब्दाला वेगळेच वळन प्राप्त झाले. पुढे इंग्रजी शिक्षा घेतलेल्या सवर्ण हिंदुं लोकांचा मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा गर्व व इंग्रजांप्रती जवळीक निर्माण होण्याचा प्रयत्न झाला की तत्कालीन सवर्ण हिंदुं लोकांमध्ये इंग्रजांप्रती आत्मियता निर्माण व्हावी कारण इंग्रज व सवर्ण हिंदु हे एकाच वर्णाचे होते. भारतीयांना इंग्रजांप्रती आत्मियता वाटावी ही त्याकाळची इंग्रजांची गरज होती. 

मॅक्समुल्लर : ज्या मॅक्समुलर ने भाशिक आधारावर आर्यन इन्वेजन चा सिद्धांत मांडला या सिद्धांताकडे जाण्याआधी याच्या कर्त्याच्या योग्यतेचा थोडा आढावा घेवू. मॅक्समुलर ना संस्कृत बोलू शकत होता , ना लिहु शकत होता, तो केवळ संस्कृत वाचू आणि समजु शकत होता. या संदर्भात हिंदी लेखक निराद चौधरी लिहिताह "१८५६ मध्ये निलखंठ गोरह नामक एक भारतीय ऑक्सफोर्ड मध्ये मॅक्समुलर ला भेटण्यास आला आणि त्याने संस्कृत मध्ये काही प्रश्न विचारले जे मॅक्समुलर समजु शकला नाही आणि त्याने निलकंठ गोरहांस इंग्रजी मध्ये विचारले की तु कोणत्या भाषेत बोलत आहेस ? यावर गोरह म्हणाले ’काय तुम्ही संस्कृत समजु शकत नाही ?’ तर मुलर ने उत्तर दिले, ’नाही’मी आजपर्यंत कोणालाही संस्कृत बोलत असलेले ऐकले नाही ’  " (संदर्भ :  केवल पढ़ते हैं।'' (वही, पृ. २९२) ) त्यानंतर ४४ वर्षानंतर मुलर संस्कृत बोलण्या आणि लिहिण्या योग्य झाला. दुसरा एक प्रसंग असा की १८९८  साली नेपाळ चे संस्कृत विद्वान छवीलाल यांनी मुलर ला काही संस्कृत नाटके, चरित्र असे सहीत्य वाचावयाद दिले यावर मुलर ने त्यांना २८ सप्टें १८९८ ला पत्र लिहिले आहे , त्यात तो म्हणतो की "अम्ही युरोपिय संस्कृत विषयामध्ये तुमच्याशी कधीच बरोबरी करु शकत नाही". ही उदाहरणे देण्याचे कारण येवढेच की भाषायी आधारावर आद्य भाषा व आद्य भाषांची जाती एक व ती जाती अभारतीय अशा प्रचाराचा जो एक प्रमुख असलेल्या मॅक्समुलर ची योग्यता काय होती याची साधारण कल्पना वाचकांना येईल. अशा एका संस्कृत विद्वानाचे (?) हे तर्क किती सिरिअस घ्यायचे यावा विचार बाकीच्या विद्वानांनी केला नाही वर आर्य हे मुळ भारतीय नसुन भारताबाहेरुन कोठून तरी आले आहे हे एकच वाक्य पकडून आर्यांचे श्रेय लाटण्याची जी रस्सीखेच आजपर्यंत चालू आहे. तिचे हसू होत आहे.

आतापर्यंत आपण इंग्रजांनी कशाप्रकारे भारतीयांमध्ये फुट पाडण्यासाठी आर्यन इन्वेजन थेअरी जन्माला घातली व त्याला तत्कालीन राजकीय अधिष्ठान असल्याने तिचा मोठ्याप्रमाणावर प्रसारही करण्यात आला. हा सिद्धांत १८ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये तर्काच्या आधारावर (पुराव्याच्या आधारावर नाही) मंडण्यात आला होता , म्हणजे हा सिद्धांत मांडून जवळ जवळ शंभर ते सव्वा शे वर्षे लोटली आहेत. मग प्रश्न निर्माण होतो कि या सिद्धांच्या बाबतीत पुढे काही संशोधन झाले की नाही, या सिद्धांताला पुष्ट करणारे काही पुरावे सापडले किंवा नाही ? वास्तवीक १८ व्या शतकापासुन ते आता पर्यंत भुगर्भशास्त्र, इतिहास , भुगोल यांची समिकरणे वाढत्या औद्योगिककरणामुळे व तंत्रज्ञानाच्या बदलामुळे बदलू लागली होती, त्याचप्रमाणे आर्यन इनव्हेजन थेअरीच्या बाबतीतही असेच झाले. हा सिद्धांत मांडल्यापासुन पुढे झालेल्या संशोधनामध्ये आर्य बाहेरुन आले याला आजपर्यंत काहिही पुरावा मिळालेला नाही, ना भौगोलिक, ना ऐतिहासी, ना वांशीक, ना भाषीक ! उलट आर्य नावाची कोणति प्रजातीच अस्तित्वात नव्हती त्याचप्रमाणे मॅक्समुल्लर ने सांगीतल्याप्रमाणे सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक किंवा आणखीन कोणी लोक बाहेरून आले व त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले या मतामधील ही फोलपणा हळू हळू पुढे येवू लागला. पुढे आपण एक एक मुद्दे क्रमाक्रमाने तपासु.

आर्य म्हणजे नेमके कोण ? द्रविडी कोण ?
आर्य नावाचा कोणताही "वंश" भुतलावर अस्तित्वात नाही. आर्य हा शब्द ऋग्वेदामध्ये ३४ ऋचांमध्ये ३६ वेळा आलेला आहे व यामध्ये एकाही ठिकाणी आर्य हा शब्द वंशवाचक वापरलेला नाही. ऋग्वेदाला वैदिकांचा मुळग्रंथ मानला गेला आहे. वास्तवीक "आर्य" हा कोणा जातीचा किंवा वंशाच्या संदर्भात आहे हे म्हणने मुर्खपणाचे आहे आर्य या शब्दाचा अर्थ "सभ्य" असा आहे. "कृणवंतोविश्वमार्य" म्हणजे आम्ही सर्व विश्वाला आर्य बनवुन सोडू.... ! वेदांमध्ये किंवा कोणत्याही वैदीक साहीत्यामध्ये आर्य हा शब्द वंशवाचक वापरलेला आढळत नाही . या संबंधी एक तर्क याठिकाणी मांडता येईल... ! ज्यावेळी परकीय एखाद्या नव्या ठिकाणी येवुन तेथिल मुळ लोकांना पराजीत करुन त्यांना दास बनवतात व आपले वर्चस्व त्या ठिकाणि प्रस्थापीत करतात , अशावेळी अशी इतकी मोठी गौरवाची गोष्ट जेते लोक मोठ्या अभिमानाने मिरवतील व येणार्‍या अनेक पिढ्यांना आपल्या पराक्रमाचे गोडवे सांगण्याची तरतूद करुन ठेवतील. पण आर्य आक्रमणाचे मिथक जर मान्य केले आणि जर ते बाहेरुन आले आणि येथील मुळ द्रविडांना पराजीत करुन दास बनवले असेल तर ,  इतके मोठे वैदीक साहीत्य निर्माण करण्यार्‍या आर्यांनी आपल्या विस्तृत अशा साहीत्यामध्ये आपल्या पराक्रमाचा साधा उल्लेखही करु नये ? हो हे खरे आहे की वेदांमध्येच किंवा इतर कोणत्याही वैदीक ग्रंथामध्ये आर्य नावाचे कोणीतरी बाहेरुन या देशात आले असा आशय असलेला साधा उल्लेखही आढळत नाही. उलट वैदीकांचा मुळग्रंथ जो ऋग्वेदाच्या ऋच्या तत्कालीन महान ऋषी आणि मुनिंनी सिंधु, सरस्वती नद्यांच्या तटावर लिहिल्या आहेत. यामध्ये त्यांनी सिंधु , सरस्वती, गंगा , यमुना नद्यांना देवस्थानी माणले आहे. असे हे महान ऋग्वेदकर्ते मुळ याच भारत भुमितील हे वेगळे सांगायची गरज आहे असे वाटत नाही. 

“आर्य" या शब्दा बाबत आणखीन थोडे खोलात जाऊ. वेदात , कोणत्याही स्म्रुतित , गीतेत आर्य हा शब्द वंश किव्वा जन्म वाचक नहीं . वान्नर जातीचे लोक सुद्धा आर्य या नावाने कशे बोलावले गेले असते मग ? हनुमान सुग्रीव यांना सुद्धा आर्यच म्हणले गेले आहे . वशिष्ठ याचे उत्तम मार्गदर्शन करतात .. ज्याने इन्द्रियान्ना अणि मनाला जिंकले आहे , जो थोर पुरुषानी धिक्कार्लेले पाप कर्म करीत नहीं तो आर्य आहे .. यात जन्माशी काही सम्बन्द आहे का ?  मग हा आर्य जन्म आधारित झालाच कसा ? याला मुळ सत्य कारण म्हणजे पर्शियन लोक . यांचा आणि भारतीय लोक्कंच वैर जगजाहिर आहे . भारतीय देवाची पूजा करतात म्हणून हे राकक्षांची . भारतीयांचा इन्द्र चांगला तर यांचा इन्द्र वाईट , आता स्वताला चांगल म्हणण्यासाठी असाच आर्या शब्द चोरला आणि तो जन्म-आधारित केला कारण यांना बाकी गुण-कर्म कळलेच नाहीत . यात परत ब्रिटीश आणि हिटलर आलेच . ब्रिटीश यांनी हा वंशवाद का चोरला हे पण स्पष्ट आहे आणि हिटलरन त्याच्या राजकीय स्वार्थासाठी. हे जे आर्य आर्य करतात ते आर्यन पर्सिअन लोकांच याचा आणि वैदिक आर्य याचा काही संबंध नाही . 

 भारतीय स्त्रिया जसे आई सीता श्री राम्माना आर्य-पुत्र म्हणायच्या .. म्हणजे वडील समजत असलेल्या राजा दशरथाचा सम्मान होता तो . त्यात देखील वडील पुरुषांना जसे जटायूला त्या आर्यच म्हणाल्या होत्या .


 आता द्रविड शब्दावर वळू...द्रविड फक्त तमिळ लोक्कांचा शब्द होता . त्याचा आणि केरळ , कर्नाटक , आंध्र देशाचा काय संबंध? आंध्र लोक सदा फक्त आंध्र लोक म्हणूनच ओळखले गेले होते . महाभारतात पश्चिमेकडील लोकांचा  उल्लेख फक्त आंध्र लोक म्हणूनच येतो . पूर्ण इतिहासात आंध्र-द्रविड युद्ध भरलेली आहेत .  कर्नाटकी लोक्काना सुद्धा कधीच द्राविडी म्हणले गेले नाही . ही मुद्दाम रचलेली कारस्थान आहेत उत्तर आणि दक्षिण भारत तोडण्यासाठी . केरळी आणि आंध्र देव आहे आयप्पा हा सुद्धा स्थानिक भाषित शब्द आहे आर्य+आप्पा शब्द जोडून बनवलेला . मग सर्वच्या सर्व दक्षिण भारतीयांना द्राविडी करण्याचे काय कारण ?
वास्तविक द्रविड  हा शब्दच मुळ संस्कृत शब्द आहे,  आसे कित्तेक विद्वानांचे मत आहे . द्रव म्हणजे पाणी या शब्द पासून बनवला आहे तो . द्रविड साहित्य स्वत म्हणते कि द्राविडी लोक त्यांचे कुमारी-कंदम बेट बुडल्यावर बोटी वापरून भारतात आले आणि इतल्या लोक्कावर आक्रमण करून ते येथे राहू लागले . कितीतरी  तमिळ विद्वान सुद्धा याला मान्यता देतात .. आता दुसर्या तमिळ संगम साहित्यात ब्राह्मण कश्याला मनाच्या गोष्ठी घालत बसलेत ? (आर्याज थंडर्स्ट्रोम)

ऋग्वेद आणि त्याचा काळ व सरस्वति नदीचा संदर्भ

ऋग्वेद हा वैदीकांचा मुळग्रंथ आणि संपुर्ण जगातील सर्वात प्राचिणतम रचना !. जर ऋग्वेद ही जगातील सर्वात प्राचीणतम रचना असेल तर संस्कृत ही जगातील तर्वात प्राचीण भाषा संस्कृत आहे व या संस्कृत भाषेचे जन्मस्थानही संस्कृत भाषेच्या धरतीचेच म्हणजे भारतभुमीच असला पाहीजे हे अप्रत्यक्षपणे मान्य करावेच लागते. युरोपीय विद्वान जेव्हा तथाकथीत भारोपीय (इंडो-युरोपीय)  भाशांमध्ये ईतर भारोपीय भाषांचे उगमस्थान शोधतात त्यावेळी त्यांना लहान-लहान  भाषीक समुहांवर वेळ मासुन न्यावी लागते परंतु त्यांची नजर भारतखंडासारख्या विशाल भुक्षेत्राला मांधुन ठेवणारी व ऋग्वेदा सारखी उत्कृष्ठ ग्रंथरचना करण्यार्‍या संस्कृत भाषेकडे जात नाही. ऋग्वेद  या ग्रंथाचा काळ इश्चीत करताना इनव्हेजन थेअरी समर्थकांनी गडबड केली आहे, यांनी ऋग्वेदाचा कालखंड इ.स.पू १५०० ते १२००० च्या दरम्यान निश्चीत केला आहे. परंतु तो किती चुकिचा आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. वास्तवीक हा काळ प्रथम मॅस्कमुलर ने नेहमिप्रमाणे तर्काच्या आधारावर निश्चीत केला होता. परंतु पुढे झालेला प्राचिण अशा वैदीक सरस्वति नदीच्या संशोधनाने हा मुद्दा आता निकालात निघाला आहे. 

सध्या "सिंधु सभ्यता" या नावाने प्रचलीत असलेली सभ्यता ही केवळ सिंधु सभ्यता नसुन सिंधु-सरस्वती सभ्यता आहे असे आता विद्वान मानु लागले आहेत. कारण साधारण तिन हजार वर्षांपुर्वी सरस्वती नदी आपल्या संपुर्ण प्रवाहाने वाहत होती हे आता सिद्ध झाले आहे. म्हणजेच वैदीक ग्रंथांमध्ये जा नदीला सर्वप्रथम देविस्थानी माणले आहे अशी नदी केवळ काल्पनीन पात्र नसुन ते एक वास्तव आहे हे स्पष्ट झाले आहे. ऋग्वेदामध्ये सरस्वती नदी आपल्या पुर्ण प्रवाहानिशी वाहत असल्याचा उल्लेख आहे , विषेशत; 

"एकाचे  सरस्वती नदिनां शिचिर्यती गिरिभ्य: आसमुद्रात ॥ ( ऋ. ७.१५.२ )"

यामध्ये अरस्वती नदी अप्रतिहतपणे हिमालयापासुन समुद्रात वाहत असल्याचा उल्लेख आहे. पुढे कालांतराने भुगर्भिय हलचालीमुळे इ.स.पू २००० च्या सुमारास सरस्वती नदीचे प्रवाह बदलले व सरस्वति नदीचे पात्र हळू हळू ओसरू लागले व कालांतराने ने नष्ट झाले. याठिकाणी इ.स.पू २००० च्या सुमारास हा शब्द अधोरेखीत करन्याचे कारण म्हणजे ऋग्वेद हा ग्रंथ सरस्वती नदीच्या समकालीन आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. त्या अर्थी  साधारण सवाशे वर्षापुर्वी मॅस्कमुलर ने मांडलेला ऋग्वेदाच्या काळासंबंधीचा तर्क नविन संशोधनामुळे बाद ठरलेला असुनही हे संशोधन लक्षात न घेता बरेच विद्वान आजही ऋग्वेदाचा काळच्या विषयासंदर्भात मॅक्समुलरचीच री ओढतात. सारांश ऋग्वेदाचा काळ हा साधारण इ.स.पू २००० च्या नंतरचा मुळीच नाही  व त्याच्या आधी वैदीक समाज सरस्वती काठी अस्तित्वात होता हे स्पष्ट होते , पण तो कधीपासुन होता व ऋग्वेदाच्या रचनेची सुरवात नेमकी कधीपासुन झाली याचे कोडे अजुनही अखिल माणवजातीला पडलेले कोडे आहे. ऋग्वेद काळ बरेचजण ई.स.पू ४००० ते १०००० इतका मागे नेतात. [ काही जन भुगर्फशास्त्राचे प्रमाण देवून ऋग्वेदाचे काही श्लोक हे २५०००० वर्षापुर्वीचे असावेत असे मत मांडतात हे इथे प्राकर्शाने मांडावे वाटते ]  परंतु तो इथे चर्चेचा विषय नाही.

काय आर्यांनी भारतातील मूळ निवासितांना युद्धात पराजीत करुन दास अथवा दस्यु बनवले ?

इंग्रजांद्वारा आपल्या राजैतिक उद्देशांची पूर्तीसाठी ’फोडा आणि राज्य करा’ या नितीनुसार पसरवलेल्या अनेक वावड्यांमध्ये ही सुधा एक आहे. सर्वप्रथम हा विचार कॅंब्रिज हिस्टरी ऑफ इंडीया’ मध्ये प्रतिपादन करण्यात आला की आर्य लोक विदेशातून येवून भारतावर आक्रमण करुन येथील मूळ निवासी द्रविड, कोळ, भील्ल, संथाळ इत्यादी ना आपल्या शक्तिच्या जोरावर पराजीत करुन त्यांना आपले दास बनवले.
आर्यांकडून बाहेरुन येवून स्थानीक जातिंना जिंकून घेण्याचा प्रश्न भारतातील प्रसिद्ध विधिवेत्ता डॉ. अंबेडकर यांनी , ऋग्वेद मध्ये ’दास’ आणि दस्यु ना आर्यांचे शत्रू सांगीतलेले आहे आणि त्यांना नष्ट करण्याची प्रार्थना सुद्धा केलेली आहे. परंतु यातून भारतामध्ये आर्यांच्या आक्रमणाच्या संदर्भात निर्णय घेतला जावु शकत नाही. त्यांनी ऋग्वेदाच्या आधारावर पुढील तीन तर्क केले आहेत.

१) ऋग्वेदामध्ये आर्य आणि दास अथवा दस्यु यांच्यातील युद्धाचा संदर्भ मिळत नाही. ऋग्वेदामध्ये ३३ स्थानांवर ’युद्ध’ हा शब्द आलेला आहे. ज्यामध्ये केवळ आठ मध्ये त्याचा प्रयोग ’दस्यु’ च्य विरोधी अर्थामध्ये अलेला आहे व ते सुद्धा दोघांमध्ये एखाद्या मोठ्या युद्धाला नाही, तर लहान-सहान लढाया दर्शवतो. ज्यांच्य आधारावर अर्यांचा विजय प्रमणीत केला जाऊ शकत नाही.

२) दास आणि आर्यांमध्ये किरकोळ संघर्ष होता, व तो सुद्धा दोघांच्या सहमतीने शांतिपूर्ण रित्या निश्चित केलेला होता. ऋग्वेद (६.३३.३, ७.८३.१, ८.५१.९, १०.१०२.३) मधुन हे सुद्धा स्पष्ट होते की दास व आर्य्यांचा एकच शत्रू होता आणि दोघांनी मिळून आपल्या शत्रूविरुद्ध युद्धात सहभाग घेतला.

३) संघर्षाचे कारण जातीय नव्हता...तर उपासना भेद होता. स्वत: ऋग्वेद मधुनच हे स्पष्ट होते की हा संघर्ष उपासनाभेद असल्याने उत्पन्न झाला, जाति च्या भेदाचे कारण नाही कारण, ऋग्वेद (१.५१.८, १.३२.४, ४.४१.२, ६.१४.३) यावरुन कळते की आर्य आणि दस्यु यांच्यातील उपासना संदर्भातील आचारविचार भिन्न होते.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मताच्या पुष्टीसाठी ऋग्वेद (१०.२२.८) या विषेश महत्व दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे.- "अम्ही दस्यु लोकाअंमध्ह्येच राहतो. ते ना यज्ञ करतात ना कशावर विश्वास ठेवत, त्यांचे रितिरिवाज व परंपरा वेगळ्या आहेत, ते माणुस म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत. ते शत्रू आहेत. त्यांचा नाश केला पाहीजे." आंबेडकरांचे असे म्हणने आहे की अश मंत्रांसमोर दासांना आर्यांद्वारा विभाजित करणार्‍या सिद्धांतला कोणत्याही प्रकारे मानला जाऊ शकत नाही. आपल्या मताच्या पृष्ठी साठी बबासहेबांनी पी.टी. अयंगर यांच्या लेखाचे उदाहरण दिले आहे.

"मंत्रांच्या परिक्षणातून हे जाणवते की त्यामध्ये जे आर्य, दास अथवा दस्यु हे शब्द आलेले आहेत, ते जातिसूचक नाहीत. तथापी त्यामध्ये अस्था व उपासनेचा बोध होतो. हे शब्द मुख्यता ऋग्वेद-संहितेमध्ये आलेले आहेत.... यांद्वारा असे कधीही प्रमाणित होऊ शकत नाही की ज्या जाती आपल्याला आर्य म्हणवून घेतात ते आक्रमक होते व त्यांनी या देशाला पराजीत करून येथील लोकांचा नाश केला..." दास अथवा दस्यु कोण होते ? या संदर्भात कुल्लूक नावाचे एक विद्वान आपल्या मनुस्मृती च्या टीके मध्ये लिहिले आहे,- "ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या जातिंमध्ये, जो क्रियाहिनतेमुळे जातिच्चुत झाले आहेत, ते भलेही म्लेंच्छभाषी असोत अथवा आर्यभाषी.. सर्व ’दस्यु’ म्हनवले जातात." ऋग्वेदातील एक मंत्र म्हणतो..

अकर्मादस्यु: अमिनो अमन्तु अन्यव्रति अमानुष: । 
त्वं तस्य अभिन्न हन वधोदासस्य दम्भये ॥

कर्महीण, मनहीन, विरुद्धव्रती अणि मणुष्यताहीन व्यक्ती ला ’दस्यु’ सांगितले आहे व त्याचा वध करण्याची आज्ञा दिलेली आहे आणि ’दास’ वा ’दस्यु’ ला अभिन्नार्थी सांगितले आहे. जर ’दस्यु’चा अर्थ आजच्या सारखा दास अथवा सेवक असा घेतला गेला असता तर अशी आज्ञा दिली गेली नसती ! ऎतरेय ब्राम्हण मध्ये एकेठीकाणी म्हटले आहे,- "तुमचे वंश नष्ट होवोत. ही (भ्रष्ट अथवा संस्कार विरहीत) आंध्र, पुंड्र, शवर इत्यादी उत्तर दिक वासींच्या जाती अहेत." दुसर्‍या शब्दात सभ्यता आणि संस्कार विरहीत लोकांचू वंश-परंपरा चालली आणि स्वत: वेग-वेगळ्या जाती बनुन गेल्या. यांना कोणी बनवले अथवा उत्पन्न केलेले नाही. श्री रामदास गौड यांच्या ’हिंदुत्व’ वर पान ७७२ दिलेल्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की दस्यु अथवा दास कसे निर्माण झाले. आता आर्यांद्वारा भारतातील मूळ निवासियांना पराभूत करुन त्यांना दास बनवल्याच्या वावड्यात अधीक दम राहीलेला नाही.

भारताचे मुळ निवासी द्रविड : इंग्रज भारतात येण्यापूर्वी कोण मानत नव्हतेकी आर्य व द्रविड दोन वेगवेगळ्या जाती आहेत. हि गोष्ट इंग्रज भारतात आल्यावरच पुढे ठेवण्यात आली. इंग्रजांना सुद्धा हि गोष्ट यासाठी सांगावी लागली की त्यांनी आर्यांना भारतामध्ये आक्रमक बनवून आनले होते. म्हणजे इंग्रजांनी आक्रमक म्हणुन आर्यांना पुढे केले .. आता आक्रमण कोणावर केले यासाठी सुद्धा कोणीतरी हवे यासाठी व याच उद्देशाने ’द्रविड’ ही संकल्पणा उदयास आली. नाहीतर भारतामधील कोणत्याही साहित्यीक, धार्मिक अथवा अन्य प्रकारच्या ग्रंथांमध्ये या गोष्टीचा उल्लेख सापडत नाही की द्रविड वा आर्य कोणा बाहेरच्या देशातून आले होते. आता जरी असे मानुन चालले की अर्यांनी बाहेरून येवून या देशावर आक्रमण केले व मूल निवासितांना युद्धात पराजित केले.. तर हे सुद्धा सांगता आले पाहीजे की त्या मूळ निवासितांच्या काळात या देशाचे नाव काय होते ? कारण जी व्यक्ति जेथे राहते, ती त्या ठीकानाचे नाव ठेवतेच. तर कोणत्याही प्राचिन भारतिय ग्रंथ अथवा तथाकथीत मूळ निवासिंची एखादी परंपरा अथवा मान्यतेमध्ये अशा कोणत्याही नावाचा उल्लेख सापडत नाही.

’संस्कृती के चार अध्ययन’ या ग्रंथात पान क्र. २५ वर श्री. रामधारी सिंह ’दिनकर’ यांचे म्हणने आहे की ’जाति’ अथवा रेस(Race) चा सिद्धांत भारतात इंग्रज आल्यावर प्रचलित झाला, याच्या पूर्वी या गोष्टीला कोणताही आधार नाही की आर्य व द्रविड जातिचे लोक एकमेकाला विजातिय मानत होते. वस्तुत: द्रविड आर्यांचेच वंशज आहेत. मैथिल, गौड, कान्यकुंबज इत्यादिंप्रमाणे द्रविड हा शब्द सुद्धा भौगोलिक अर्थ सांगणारा आहे. आणि विषेश गोष्ट म्हणजे आर्यांना बाहेरून येणारे असे संबोधनार्‍यांमध्ये मि.म्यूर... जे आग्रभागी होते, त्यांना सुद्धा शेवटी स्विकारावे लागले की, "कोणत्याही प्राचिन पुस्तक अथवा प्राचिन गाथा इत्यादिंतून ही गोष्ट सिद्ध केली जावू शकत नही की आर्य एखाद्या दुसर्‍या देशातून भारतात आले" (म्यूर संस्कृती टेक्स्ट बुक, भाग-२, पृष्ठ ५२३)
याच संदर्भात थॉमस ब्युरो नावाचा पुराणतत्ववेत्ताचे ’ क्लरानडन प्रेस, ऑक्सफोर्ड द्वारा प्रकाशीत व ए.एल. भाषम द्वारा संपादीत ’कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशीत ’दि अर्ली आअर्यन्स’ मध्ये म्हटले आहे,--" आर्यांच्या भारतावरील आक्रमणाचा उल्लेख ना इतिहासामध्ये मिळतो, ना त्याला पुरातात्विक आधारांवर सिद्ध केले जावू शकते." (आर्योंका आदी देश और उनकी सभ्यता, पान-१२६).

याच संदर्भात रोमिला थापर यांचे कथन सुद्धा उल्लेखनिय आहे, " आर्यांच्या संदर्भात आमचे विचार भलेही अनेक असोत, पुरातात्विक साक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरील कोनत्याही अशाप्रकारच्या कोनत्याही संकेत मिळत नाही....गंगेची उपत्यका चे पुरातात्विक साक्षांमधून हे प्रकट होत नाही की येथे मुळ निवासितांना पळून जावे लागले अथवा पराजित व्हावे लागले.".(आर्योंका आदी देश और उनकी सभ्यता, पान-११३).

इंग्रजांनी या गोष्टीला बराच जोर देवून पसरवले की ’आक्रमक आर्यांनी’ द्रविड पूर्वजांवर अत्याचार केले होते. पाश्चात्य विद्वानांनी द्रविडीयनांची सभ्यता आर्यांच्या सभ्यतेपेक्षा वेगळी आहे हे दाखावण्यासाठी ’हडप्पा कालीन सभ्यता’ हे एक सशक्त हत्यार मिळाले. प्रथम तर यांनी हडप्पाकालीन सभ्यतेला द्रविडी सभ्यता म्हणुन सांगण्यास सुरवात केली परंतु जेव्हा वेगवेगळ्या विद्वानांच्या नवनवीन शोधांमुळे त्यांचे हे कथन असत्य ठरू लागले तेव्हा हे म्हणु लागले की हडप्पा लोक वर्तमान द्रविड नव्हते तर ते भूमध्य सागरीय द्रविड होते, (थोडक्यात को कोणीही होते परंतू आर्य नव्हते). याप्रकारच्या वावड्या मुद्दाम उठवल्या गेल्या. खरे तर सत्य हे आहे की हडप्पा सभ्यता सुद्धा आर्य सभ्यतेचाच एक अंश होती व आर्य सभ्यता वस्तुत: हडप्पा सभ्यतेपेक्षा हजारो वर्ष जुणी आहे.
यातुन हेच सिद्ध होते की आर्य व द्रविद वेगवेगळे नव्हते . जर वेगळे नव्हतेच तर हे म्हणने चूकीचे ठरते की, "भारतातील मुळ निवासी आर्य नव्हे तर द्रविड होते" . आता वेळ आलेली आहे की आर्यांचे आक्रमण व आर्य-द्रविड भिन्नता माणनार्‍या या विचारप्रवाहाला नव्या पुरातत्विक शोधांच्या आधारावर मात्र राजनितिक ’मिथक’ माणुन नष्ट केले जावे.

दास अथवा दस्युंना आर्यांनी अनार्य बनवून शूद्र वर्गात ढकलले ?
सभारतीय समाजाला जाति, मत, क्षेत्र, भाषा ईत्यादींच्या आधारावर वाटून त्याची एकात्मता नष्ट करण्यासाठी इंग्रजी सत्तेने या वावड्या पसरवल्या की आर्यांनी बाहेरून येवून येथे पुर्वीपासून स्थित जातिंना युद्धात पराजीत करुन आपले दास अथवा दस्यु बनवले व नंतर आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचा समावेष करून घेवून त्यांना शुद्र श्रेणी मध्ये ढकलले. या संदर्भात अनेक प्रश्न उठतात, काय दास अथवा दस्यु खरेच आर्येत्तर जाती होत्या ? जर नाही तर त्यांना आर्येतर घोषीत करण्यामागे उद्देश काय असावा ? आणि या शुद्र श्रेणी भारतीय समाजामध्ये त्या वेळी घृणित अथवा अस्पृष्य माणली जात होती ? या प्रश्नांवर क्रमा-क्रमाणे प्रकाश टाकू...!

काय दास अथवा दस्यु आर्येतर जाती होत्या ? 
 दास अथवा दस्यु आर्येत्तर जाती होत्या अथवा नाही, हे ठरवण्यासाठी प्रथम अपल्याला हे पाहीले पाहीजे की आर्य वांड्मयामध्ये सर्वात प्राचिन ग्रंथ ऋग्वेद चे मंत्र संख्या १.५.१९ ताचप्रमाणॆ ९.४१.२ मध्ये दास अथवा दस्यु शब्दांचा प्रयोग ’अयाज्ञिक’ व ’अव्रते’ यांसाठी आहे व १.५१.८ मध्ये याचा प्रयोग चोर, डाकू अथवा धार्मिक क्रियांचा नाश करणारे असा केला गेला आहे. मनुस्मृति च्या १०.४ मध्ये बंबोज इत्यादी जातिंना पतित होणार्‍या लोकांना दास/दस्यु म्हटले गेले आहे. महाभारताच्या भिष्म पर्वा मध्ये निष्क्रिय व्यक्तिंना दास म्हटले आहे. आता स्पष्टच आहे की या शब्दचा प्रयोग प्रत्येक ठीकाणि एकाद्या विषिष्ठ प्रकारच्या लोकांसाठी वापरलेला आहे ना की एखाद्या जातीसाठी.
यांना अनार्य बनवन्यामागे काय उद्देश्य होता ? : आर्य साहित्यामध्ये ठीक-ठिकाणी अनार्य शब्दाचा प्रयोग मिळतो, वाल्मिकी रामायण मध्ये २.१८.३१. मध्ये दशरथाची पत्नी कैकेई साठी ’अनार्या’ शब्दाचा प्रयोग केलेला आहे. श्रीभग्वद्गिता मध्ये "अनार्याजुष्टमस्वग्यर्मकीर्तिकरमर्जुन" च्या माध्यमातून ’अकिर्तिकर’ कार्यांसाठी ’अनार्युजष्ट’ सारख्या शब्दांचा वापर पहायला मिलतो. ऋग्वेद चे मंत्र ७.६.३ नुसार अव्रतिय, दांभिक, अपूज्य आणि दुषीत भाषेचा प्रयोग करनारे लोक यांसाठी ’मृघ्रवाच’ शब्दाचा वापर मिळतो. अर्थात कोणत्याही आर्य ग्रंथामध्ये ’अनार्य’ शब्द जातीवाचक स्वरूपात प्रयुक्त केला गेलेला नाही. हे स्पष्ट आहे की ऋग्वेद इतादी मध्ये ठिक-ठिकाणी अनार्य, दस्यु, कृष्णगर्भा, मृघवाच इत्यादी शब्द आर्यांपासून वेगळ्या जातिंसाठी योजलेला नसुन आर्य कामांपासुन (सभ्य कामांपासुन) वेगळे अशा लोकांसाठी योजलेला आहे त्याचप्रमाणे ’अनार्य’ हा शब्द ईतर शब्दांप्रमाणे जातिवाचक स्वरुपात योजला गेलेला नाही.

काय शुद्रजाती भारतीय समाजाय त्या काळी घृणित अथवा अस्पृश्य मानली जात होती ?:
प्राचिन काळी भारतीय समाजात चार वर्ण होते,- ब्रम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र परस्पर सहयोगी होते, एक वर्ण दुसर्‍या वर्णामध्ये जाऊ शकत होता.त्या वेळी वर्ण नव्हे तर त्याची उपयोगीता कर्माच्या प्रामुख्यतेनुसार होते. भारताच्या कोणत्याही प्राचिन ग्रंथामध्ये कोठेही अशा उल्लेख मिळत नाही की जेथे असे सांगितले गेले आहे की शूद्र घृणित अथवा अस्पृष्य आहे अथवा ईतर वर्णांपेक्षा लहाण आहे !
चार वर्णांना समाजरूपी शरीराचे चार प्रमुख भाग मानले आहे. जसे ब्रम्हण - शिर, क्षत्रीय- बाहु, वैश्य-उदर आणि शुद्र-चरण. चारी वर्णांना समान पद्धतीने आपली-आपली उपयोगितेच्या पद्धतीने शुद्रांची उपयोगीता समाजासाठी सर्वाधीक राहीलेली आहे. समाजरुपी शरीराला चालवण्यासाठी, त्याला गतिमान करण्यासाठी आणि सर्व व्यवहार संपन्न करण्याचा भार वाहण्याचे काम पायांचे असते. भारतीय समाजात शूद्रांबरोबर स्पर्षास्पर्ष अथवा भेदभावाचा व्यवहार जसा आज केला जातो , प्राचिन काळात होत नव्हता. वैदिक सहित्यामध्ये हे सुद्धा प्रमाणित केलेले आहे की ’शुद्र’ मंत्रद्रष्टा ऋषि देखिल बनू शकतो. ’कवष ऐलुषु’ दासिपुत्र अर्थात शूद्र होते परंतू त्यांच्या विद्वत्तेला परखुन ऋषींनी त्यांना आपल्यात सामाऊन घेतले. ते ऋग्वेदाच्या अनेक ऋचांचे द्रष्टे होते. सत्यकाम जाबाली शूद्र असुन सुद्धा यजुर्वेदाच्या एका शाखेचे प्रवर्तक होते. (छान्दोगय ४.४) यातून हे स्पष्ट होते की, "शुद्रांना वेद वाचण्याचा अधिकार नव्हता"म असे म्हणने चूकिचे ठरते. सामाजिकदृष्ट्या हा भेदभाव मुसलमान व इंग्रजांनी आपल्या-आपल्या राज्यकालांमध्ये या देशाला तोडण्याच्या उद्देशाने उत्पन्न केला आहे.

वस्तुत: वर्णव्यवस्था समाजात अनुशासन आणन्यासाठी , समाजाची उन्नती साठी आर्थीक विकासासठी बनवलेली होती. डॉ. अपल्या ’शूद्र कॊण होते’ मध्ये प्रबळ प्रमाणांच्या आधारावर सिद्ध केले आहे की शूद्र वर्ण समाजातून भिन्न नव्हे तर क्षत्रियांचाच एक भेद आहे. संस्कृत साहित्यामध्ये सदाचरण वा असदाचरण यांच्या आधारावरच ’आर्य’, ’अनार्य’, ’दस्यु’,’दास’ इत्यादी संज्ञांचा प्रयोग केला गेलेला आहे. वास्तव मध्ये ’आर्य’ शब्दाला सुसंस्कारांनी सम्मानीत व धर्माचरण करनारा व्यक्ती साठी वापरलेला आहे. आता निश्चित स्वरुपात संगितले जावू शकते की हे सुद्धा इंग्रजांद्वारा भारतीय समाज तोडण्याच्या उद्देशाने पसरवलेली भ्रांति व्यतरिक्त काहीही नाही.

हडप्पा (सिंधु-सरस्वती) सभ्यता व वैदिक काळ

आर्यांचे भारतामध्ये आक्रमण होण्या आधी इथे द्रविडी लोकांची संमृद्ध सभ्यता नांदत होती या मुळनिवासी अनार्यांच्या संमृद्ध संस्कृती पैकी हडप्पा ही एक होय. कारण हडप्पा सभ्यता आणि वैदीक सभ्यता/ मान्यता/ परंपरा/ वांड्मय यांमध्ये तफावत आढळते. हा एक मुळनिवासी लोकांचा आवडता प्रतिवाद होय. आता थोडे याच्याकडे  पाहू, या प्रतीवादामध्ये कितीपत तथ्य आहे.
पहीला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की, हडप्पा सभ्यता ही अनार्यांची व आर्यांनी आक्रमण करुन ही सभ्यता नष्ट केली व तेथे वैदीक सभ्यता प्रस्थापित केली असे म्हटले जाते , परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हडपा सभ्यता ही कोणत्याही युद्धामुळे किंवा आक्रमणामुळे नष्ट झालेली नसुन पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे झालेली आहे हे आता सिद्धच झाले नाही तर या विषयावर अभ्यास करणारे सर्व विद्वानांना माण्यही आहे, हडप्पा सभ्यतेवर आर्यांनी बाहेरून येवून आक्रमण केले व हडप्पा सभ्यता नष्ट केली असा प्रतिवाद साधारण साठ ते सत्तर वर्षापुर्वी केला गेला होता व आताच्या नविन संशोधनामुळे हा मुद्दा निकालात निघाला असुनसुद्धा कमी अभ्यासामुळे आजही काही लोक तोच तोच मुद्दा उपस्थित करत आहेत, अशांनी पुन्हा एकदा अभ्यास करायला पाहीजे. 

प्रत्येक वेळी नवे संशोधन होत असते व या नव्या संशोधनाच्या आधारावर जुने सिद्धांत मोडीत निघत असतात याच न्यायाप्रमाणे सर्वप्रथम सिंधु/ किंवा हडप्पा सभ्यता ही केवळ सिंधु नदी च्या घाटावर उदयास आलेली संस्कृती असे माणले जात होते परंतु आताच्या नविन संशोधनानुसार सिंधु / हडप्पा सभ्यता भरभराटीस येण्याच्या पाठीमागे सध्या लुप्त अवस्थेत असलेली तत्कालीन सरस्वती नदी ही सिंधु नदि इतकिच किंवा त्यापेक्षाही काही जास्त प्रमाणात कारणीभुत आहे. विषेशत: उपग्रहावरुन घेतलेल्या छायाचित्र व अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार ऋग्वेदामध्ये वर्णन असलेली सरस्वती नदी ही केवळ मिथक नसुन त्या काळी ही नदी वास्तवात अस्तित्वात होती , व त्या काळी पुर्ण प्रवाहाने वाहत होती व साधारण ई,स.पू २००० ते १६००० मध्ये पर्यावरणामध्ये प्रतिकुल बदल होऊन सिंधु-सरस्वती घाटीची सभ्यता नष्ट झाली  हे आता सर्वमान्य झाले आहे. वैदीक वांड्मयामध्ये सरस्वती आणि सिंधु या दोन्ही नद्यांना देवता स्थानी माणले आहे. 

साधारणपणे सिंधु-सरस्वती किंवा हडप्पा काळ हा इ.स.पू ३२०० ते  १६००० पर्यंत सांगीतला जातो , त्याचप्रमाणे आपण या आधी पाहीले की ऋग्वेदाची रचना ही त्याच सरस्वती नदीच्या काठी झालेली असुन ऋग्वेदाचा काळ हा इ.स.पू २००० पुर्वीचा, म्हणजे जवळ जवळ हडप्पा काळाच्या समकालीन आहे. व याला बळकटी ऋग्वेदच देते कारण ऋग्वेदामधे हडप्पा या शहराचा उल्लेख हरुपिया असा येतो.  वरील सर्व विवेचनावरुन ऋग्वेद काळ व हडप्पा काळ्समकालीन असावा असे माणन्यास काही अडचण आहे असे मला वाटत नाही. आता पुढचा मुद्दा पाहू. 

ऋग्वेदकालीन वैदीक सभ्यता हीच हडप्पा सभ्यता असे मानायचे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर होय असेच द्यावे लागते. कसे ते पुढे पाहू...

१) अलिकडे पश्चिम आशियातील कोरीव लेखात काही व्यक्तीनामे आढळून आली आहेत त्यांपैकी दोन नाव्रे "सोमसेन" व दुसरे "अरीसेन".  ही नावे ज्या लेखात सापडली त्याचा काळ आहे ई.पू. २३०० , त्यावेळी सिंधू संस्कृती पुर्णपणे सुबत्तेच्या शिखरावर पोहोचली होती. ही दोन्ही नावे इंडॊ-आर्यन (वैदीक) असुन पुर्णपणे भारतीय आहेत. याबद्दल विद्वानांत दुमत नाही. म्हणजे हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती, तसेच सिंधु संस्कृती जर अनार्य द्रविडींची असे मानले, तर हे इंडॊ-आर्यन शब्द इ.स.पू २३०० मध्ये भारतातुन येणे कसे शक्य आहे ? 

२) हडप्पा कालीन उत्खननांमध्ये पशुपतिनाथाची आकृती सलेले शिल्प सापडलेले आहे... ज्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये (ऋ. ४-५८.३) मध्ये स्पष्टपणे येतो.  

३) सात असरा/ किंवा सात देवता / सप्तमातृका :-


सप्तमातृकांच्या प्राचिण मुर्ती सार्‍या भारतभर आढळतात. त्यात सात आसरा (अप्सरा) म्हणुन आजही महाराष्ट्रामध्ये त्यांची पूजा होते. सिंधु उत्खननामध्ये सापडलेल्या अशाच एका मुद्रेमध्ये  वरच्या बाजुस डावीकडे एका झाडात एक पुरुष उभा दाखवलेला आहे. त्याच्या पायाशी एक पुरुष वाकुन त्याची आराधना करताना दाखवला आहे. त्याच्या मागे एक मेंढा उभा आहे. मुद्रेच्या खालच्या बाजूस सात स्त्रिया उभ्या दिसतात. या मुद्रेवरील दृष्य अतिशय महत्वाचे आहे यात सहंका नाही. ऋग्वेदामधे सोम तयार करण्याच्या समारंभाचे ते वर्णन आहे. दिवसातुन सोम तयार करीत असत. प्रत्येक वेळी एक देवता तो तयार करीत असे आणि दुसरी देवता त्याच्यावर लक्ष ठेवत असे. संध्याकाळच्या कार्यक्रमात सोम तयार करण्याचे काम अग्निकडे असे आणि सप्तमातृका त्यावर देखरेख करीत असत, असे ऋग्वेदामध्ये वर्णन आहे, हे वर्णन वर उल्लेखिलेल्या मुद्रेला तंतोतंत लागू पडते. 

४) अग्निपुजा : अग्निपुजा हे सिंधु धर्माचे एक अत्यंत महत्वाचे अंग होते, याचा पुरावा कालिबंगन आणि लोथल येथिल उत्खननामध्ये उपलब्ध झाला. कालिबंगण येथील बालेकिल्ल्यामध्ये काही अग्निकुंडे सापडलि आहेत. ऋग्वेद किंवा वैदीक काळामध्ये अशाप्रकारे अग्निपुजा किंवा यज्ञपरंपरा होती हे वेगळे सांगायला नको.५) सुर्यमंदीर :- बनावली उत्खननामध्ये तर एक अग्निमंदीर सापडले आहे. 

६) मोराच्या आकृत्या : नुकतेच पश्चिम आशियामध्ये झालेल्या काही उत्खननामध्ये काही ठिकाणी मातिच्या भाड्यांवर मोराची रंगीत चित्रे सापडली आहेत. ही भांडी साधारणपणे इ.पू. १८००-१६०० या काळातील आहेत आणि त्याहुनही महत्वाची गोष्ट म्हणजे ती ’इंडो-आर्यन’ भाषा बोलणार्‍यांशी संबंधीत आहेत. मोर हा प्राणी  केवळ भारतातच आढळतो, पश्चीम आशीयात तो नाही. सिंधु संस्कृतीच्या भांड्यांवर तो रंगवलेला आहे. मोराची अत्युत्कृष्ट चित्रे उत्तर सिंधुकालीन हडप्पा येथील एका स्मशानभुमितील भांड्यांवर पहायला मिळतात, परंतु एकदा ऋग्वेदाचा काळ इ.पू १२००-१००० ठरवल्यानंतर इ.पू. १८००-१६०० या काळात इंडो आर्यन- (वैदीक) भारतात होते हे कसे मान्य करावेच लागते .

७) स्वस्तिकाचे चिन्ह : 

वरिलप्रमाणे अधिक संशोधन करुन हडप्पा व ऋग्वेदकालीन वैदीक सभ्यतेशि साम्य असणारे कित्तेक पुरावे देता येतील.

आता याठीकाणी हडप्पा सभ्यता आणि वैदीक संभ्याता एक नाही या दोन्ही वेगवेगळ्या संस्कृती आहेत असे म्हणन्यासाठी केवळ एक मुद्दा शिल्लक राहतो, आणि तो म्हणजे घोडा हा प्राणी.
 घोडा हा वैदीकांचा अतिषय लाडका प्राणी जवळ जवळ सर्वच वैदीक वांड्मयामध्ये घोड्याचा उल्लेख आहे. परंतु घोडा या प्राण्याचा आविश्कार सिंधु कलेमध्ये किठेही पहायला मिळत नाही. घोड्याचा वापर भारतामध्ये इ.पू. २००० पासुन केला जाऊ लागला असे मानले जाते. व यावरुन हडप्पा ही वैदीक सभ्यता नाही असा प्रतिवाद केला जातो. परंतु हा प्रतिवादही आता नविन संशोधनानुसार बाद झाला आहे. मध्यप्रदेश मध्ये भिमबेटका या शहरामध्ये अश्मयुगिन मानवाने कोरलेल्या गुहांमधीच चित्रांमध्ये घोडा आपणास पहायला मिळतो, अगदी महाराष्ट्रार सुद्धा याचे पुरावे सापडले आहे , तेव्हा घोडा या प्राण्याचा परीचय भारतीयांना इ.पू.२००० च्या सुमारास झाला असे मानन्यास जागा उरत नाही. आता राहीला प्रश्न हडप्पा कालीन कलाविश्कारामध्ये घोड्याला का स्थान नाही याचा , तर उत्तर असेच आहे की हडप्पा संस्कृती ही स्थिर, नागरी व कृशिप्रधान संस्कृती होती, व घोड्याचा वापर एखाद्या कृषीप्रधान संस्कृतीने केल्याचे पाहवत नाही, पर्यायाने कृषीप्रधान संस्कृतीला घोड्या सारख्या गतिवान प्राण्याची गरज भासली असेल असे वाटत नाही.

आर्यन इहव्हेजन थेअरीचा सिद्धांत निकालात लागुन सुद्धा आज काही स्वार्थी लोकांनी महाराष्ट्रातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेउन परत एकदा  भारताची विभागणी आर्य - अनार्य अशाप्रकारे करुन भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, यांचा उद्देश तोच आहे जो मॅक्समुलर चा होता .. वांशीक वाद पेटवुन देश परकियांच्या घशात घालणे. आजही पश्चिमेकडे याच वांशीक वादाचा फायदा घेवुन तेथिल तरुणाची माथी फिरवली जात आहेत. याच वंशवादाचा आधार घेवुन हिटलर ने केलेल ज्युं लोकांचे शिरकाण केले. आणी दुर्दैवाने याच वंशवादाचा पुरस्कार करुन महाराष्ट्रातील काही मंडळी स्वत:ला मुळनिवासी म्हणवुन घेत आहेत, इतकेच नाही तर यांच्या सभांना उभारल्या जाणार्‍या फ्लेक्स मध्ये हडप्पा कालीन मानचिन्हे दाखवुन हडप्पा सभ्यता ही मुळनिवास्यांची हे दाखवण्याचा प्रयत्न करुन वंशवादाला खतपाणी घातले जात आहे ते ही कोणताही विचार किंवा अभ्यास न करता.  

- सुरज महाजन (९६ ६५ ३५० ३३०)
संदर्भ : 
आर्यांच्या शोधात, कोणी एके काळी सिंधु संस्कृती, इतिहास दर्शन :- रामविलास शर्मा, ऋग्वेद (गिता प्रेस), ऋग्वेद - हडप्पा सभ्यता और सांस्कृतीक निरंतरता, भारतिय इतिहास का विकृतिकरण - श्री रघुनाथप्रसाद शर्मा 
संजय सोनावनी व आर्याच थंडर्स्ट्रोम यांचे लेख, हिंदु राईटर्स फोरम यांचे अंतर्जालिय लेख.

Thursday, April 11, 2013

गोब्राम्हणप्रतिपालक : अर्थ व अनर्थ


                 जेव्हा एखाद्या अंतर्गत समाजाबद्दल मनामध्ये पुर्वग्रह ठासलेला असतो त्यावेळी तो पुर्वग्रह हा डोळ्यावर चढलेल्या झापळाप्रमाणे काम करतो. समोर असणारे ढळढळीत सत्य त्यामुळे पुर्णपणे दिसु शकत नाहि व असे दिसणारे अर्धसत्य हे असत्या पेक्षा घातक असते याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा येतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास, कारणमिमांसा  करायचा असेल आणि ती गोष्ट ऐतिहासीक असेल तर त्या गोष्टीबद्दल कारणमिमांसा करताना आजच्या काळात लागू होणारी परिणामे गतकाळाला लागु करुन जत कोणी कारणमिमांसा करत असेल तर तो व्यक्ती अशी कारणमिमांसा करण्यास अजुन लायक झाला नाही असे समजले जाते. कारण एखादी गोष्ट एखाद्या पर्टीक्युलर काळामध्ये वेगळ्या अर्थाने वापरली जाऊ शकते किंवा त्या गत काळामध्ये त्या गोष्टीची परिभाशा वेगळी होत असली पाहीजे असा दृष्टीकोण समोर ठेवून गतकाळाच्या सामाजीक, ऐतिहासी आणि माणसीक परिस्थिति लक्षात घेवुन त्या त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि यालाच "ऐतिहासिक अभ्यास" किंवा अशि योग्य परिमाने वापसुन इतिहासाचा अभ्यास करणार्‍यालाच "इतिहास अभ्यासक" असे म्हटले जाते. आणि अशा पद्धतीले केला जाणारा अभ्यासही चिरकाळ टिकतो आणि अभ्यास करणाराही. अब्यथा आज नव नविन असणारे नसणारे शोध लावून स्वत:ला इतिहास अभ्यासक अथवा इतिहास संशोधक म्हणवून घेणारे , झटपट प्रसिद्धीची हाव सुटलेले स्वयंघोषीत इतिहास अभ्यासक आपल्याला आज गल्लो-गल्ली भेटतील परंतु असा अभ्यास आणि अभ्यासक हा क्षणीक असतो हे ते लोक विसरतात.

                    वरिलप्रमाणे तत्कालीन परिस्थितिचा अभ्यास न करता , आजच्या परिस्थितिची परिमाने गतकाळाला लावून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी गतकाळातील अनेक गोष्टिंबद्दल आपण कोड्यात पडतो. उदा. "गो-ब्राम्हण-प्रतिपालक" हा शब्द ! आज आपल्याला या शब्दाचा अर्थ अनेक स्वयंघोषीत इतिहास अभ्यासक गाई आणि ब्राम्हणांचा प्रतिपाळ करणारा असा सांगीतला जातो. याच्या पुढे जाऊण ते लोक हा शब्द नाकारतात कारण त्यांचा प्रतिवाद आहे की शिवराय हे फक्त गाई आणि ब्राम्हणांचा प्रतिपाल करणारे होते का ? तसेच याच्या ही पुढे जाऊन हे लोक शिवरायांना "बहुजन प्रतिपालक" वगैरे बिरुदे लावतात . कारण त्यांना गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द "संकुचीत" व "जातिवादी" (एका जातीचा उदो उदो करणारा) असा वाटतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन परिस्थितिचा अभ्यास न करता किंवा एखाद्या पर्टीक्युलर जातीच्या द्वेशाची झापळे डोळ्यावर असता काय होते हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.   

              तत्कालीन परिथिति काय सांगते ? : इ.स. ७११ पासुन हिंदुस्थानवर इस्लामची पहिली स्वारी झाल्यापासुन पुढे जवळ जवळ ९०० वर्षे भारतभर इस्लामी पाशवी अत्याचार कोणत्या पद्धतीने इथल्या हिंदुंवर अत्याचार, लुटालूट , मंदिर-विहारे-गुरुद्वारे यांचे विध्वंस , बाटवाबाटवी करत होते हे सांगत बसण्यात वेळ खर्च करत नाही. आणि हा विषय इथे घेण्याचे कारणही नाही. जणावरांमध्ये सर्वात दुबळा अथवा गरिब असा समजला जाणारा प्राणी व  हिंदुंना पवित्र असणारी गाय ! हिंदुंचा स्वाभिमान दुखवण्यासाठी मुसलमान गाईंची कत्तल करत , व पुढे गौमांस हे मुसलमानांचे आवडते अन्न झाले. त्याचप्रमाणे हिंदु धर्मामधे "धर्म" वाचवण्यासाठी आग्रेसर असलेला ब्राम्हणवर्ग असल्यामुळे या वर्गावर मुसलमान लोकांचा नेहमीच डोळा होता कारण धर्म टिकवून ठेवणार्‍या समाजाचे खच्चीकरण केले असता इतर लोकांचे खच्चिकरण व्हायला सोपे जाते हा माणसशास्त्राचा अगदी सुरवातीचा नियम आहे. थोडक्यात हिंदु धर्मियांचे माणसिक खच्चीकरण करण्यासाठीचे मुसलमानांकडून जे प्रयत्न होत होते त्यामद्ये मुसलमानांद्वारा गोमांसभक्षण व ब्राम्हण समाजाची बाटवाबाटवी त्याचप्रमाणे मंदीरांची लुटालूट , जाळपोळ व मंदिरे उध्वस्त करणे अशाप्रकारची निति होती. आक्रमक मुसलमानांच्या दृष्टीकोणातुन विचार करता त्यांना इस्लामचा प्रचार करायचा होता, इथल्या भारतियांपुढे दोनच मार्ग होते एक म्हणजे इस्लामचा स्विकार आणि दुसरे म्हणजे मरणला कवटाळणे मग आवश्यक नाही की तो हिंदुच असला पाहीजे  मुसलमानांच्या दृष्टीकोणातुन इतले बौद्ध , जैन, शिख, पारसी हे सर्व शत्रु म्हणजे काफीर होते.  या सर्व समाजातील धर्माचा धागा जिवंत ठेवणारा जो "पुरोहितवर्ग" तो त्या काळातील आक्रमक मुसलमानांच्या प्रमुख टार्गेट होता. 

            अशा परिस्थित ९०० वर्षानंतर उदयास येणारे एकमेव हिंदुंचे / भारतीयांचे सिंहासण निर्माण करणारे छत्रपती शिवराय असतील तर अशा शिवरायांना "गो-ब्राम्हण-प्रतिपालक" अशि उपाधी कोणी देत असेल तर ती अतिशय योग्यच आहे. ज्या पशुंना आणि ज्या सर्व समाजातील पुरोहीत वर्गाला आक्रमकांनी प्रामुख्याने टार्गेट केले आणि त्यामुळे तब्बल ९०० वर्षे ज्या हिंदु/ भारतीय समाजाचे खच्चिकरण होत होते त्याला शिवरायांच्या छत्राने आधार मिळाला. यासाठी अनेक तत्कालीन मान्यवरांनी शिवरायांना गोब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी लावली आहे आणि शिवरायांनीही ती सन्मानाने स्विकारलेली आहे. आता पुढे आपण तत्कालीन एक एक पुरावे पाहू जिथे हा शब्द वापरला गेला आहे , कोठे हा शिवरायांसंदर्भात आहे कुठे धर्मासंबंधी आहे. 

१) आज्ञापत्र  : शिवरायांच्या दरबारातील आमात्य श्री रामचंद्रपंत आमात्य. यांनी शिवाजी महाराज , संभाजी महाराज व राजाराम महाराय यांचा काळामध्ये निष्ठेने स्वराज्याची सेवा केली . असे आमात्य आपल्या "आज्ञापत्रा"मध्ये म्हणतात..
                
सिंहासना रुढ होऊन छत्र धरुन (शिवराय) छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करुन देव-ब्राम्हण संस्थानी स्थापून यजन यजनादि षट्कर्मे वर्णविभागे चालिविली तस्करादि आन्याई यांचे नाव राज्यांत नाहीसे केले. (आज्ञापत्र)

आमात्य म्हणतात शिवरायांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन धर्मोद्धात केला देव ब्राम्हण मंदीरे यांची संस्थाने स्थापून त्याठीकाणी योग्य कारभार चालावा यासाठीचे नियोजन केले.

२) सभासद बखर : आतपर्यंतच्या सर्व बखरिंमध्ये सर्वात विश्वासार्ह माणली जाणारी बखर म्हणजे सभासदांची बखर.  बखरिच्या सुरवातीलाच सभासद म्हणतात "रत्रौ श्री शंभुमहादेव (शहाजी राजांच्या) स्वप्नात येऊन प्रसन्न होऊन बोलीला जे "तुझ्या (शहाजी राजे) वंशात आपण अवतार घेवु, देव-ब्राम्हणांचे संरक्षण करुन म्लेंच्छांचा क्षय करतो" याच आर्थ असा की भगवान श्री शंकर शहाजी राजांच्या स्वप्नात येवुन दर्शन देताव व म्हणतात की आपण तुझ्या वंशात वतार घेवुन देव-ब्राम्हणांचे संरक्षण व म्लेंच्छांचा क्षय करतो. याठिकाणी दृष्टांत वगैरे अतिशयोक्तीचा भाग बाजूला ठेवुन तत्कालीन समाजस्थितिचा विचार केला असता सभासदांनी याठिकाणि "देव-ब्राम्हण" यांचे संरक्षण आणि म्लेंच्छ , म्हणजे मुसलमान यांचा क्षय करण्यासाठी शिवरायांचा जन्म होणार असल्याचे सांगतात. वर सांगीतल्याप्रमाणे तब्बल ९०० वर्षे देश आणि धर्म इस्लामी आक्रकमांकडून भरडला गेल्या नंतरची सामाजीक परिस्थिति काय असेल याचा विचार जर केला तर सभासर्दांनी याठिकाणि वापरलेले  हे दोन्ही शब्द किती बरोबर आहेत हे पटून जाते.

३) शिवबावनी : कविराज भुषणाच्या  शिवबावनी नावाच्या अत्युत्कृष्ट काव्यामध्ये भुषण एके ठीकाणी म्हणतात..

        राखी हिंदुवानी हिंदुवान कोतिलक राख्यो ।
स्मृती पुरान राखे वेद विधी सुनि मे ।
राखी रजपूती राजधानी राखी राजन की,
धरा मे धरम राख्यो , राख्यो गुन गुनी मे ॥

म्हणजे महाराज शिवराय, मुगल दल संहारक अशी आपली तलवार धन्य आहे, खरोखरच या भगवतीच्या कृपेमुळेच शिवरायांच्या रुपात हिंदुंचे हिंदुपण व त्यांच्य धर्मशास्त्राचे रक्षण झाले आहे . 
त्याच्याच पुढच्या पदात कविंद्र पुढे म्हणतात..

वेद राखे विदित पुरान राखे सारयुत,
राम नाम राख्यो श्रुती रसना सुधर मे ।
हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहीन की,...
...
देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर मे.

म्हणजे , शिवरायांनी वेद-पुराण यांचे रक्षण केले. हिंदुंची शेंडी वाचवली, 


४) शिवराजभुषण : कविराज भुशनांचाच हा ग्रंथ . कविराज भुषण औरंगजेबाच्या तोंडावर "शिवबावनी" सांगुन तडक महाराष्टार शिवरायांकडे आहे व शिवरांच्याच आज्ञेने त्यांनी शिवभारत नावाचा उत्कृष्ट असा काव्यमय ग्रंथ लिहिला या ग्रंथात कवि  भुषण काय म्हणतात पाहू...

छत्रनिकी यह वृत बनाई । सया तेरा की खाई कमाई ॥
गाई वेद विप्रन प्रतिपाल्र । घाऊ एक धारिन पै घाले

म्हणजे, क्षत्रियाची ही वृत्तीच बनलेली आहे की सदैव तरवारीने कमावून खावे. गाई , वे, विद्यांचा प्रतिपाळ करावा, आणभाक घेवुन शत्रुंना जखमा कराव्यात.

५) आता पुढील, म्हणजे पाचवा आणि सर्वात महत्वाचा पुरावा पाहू, तो म्हणजे शिवभारत कविंद्र परमामंदांनी लिहिलेले संस्कृत मधील हे कव्य शिवरायांनी स्वत: ऐकुन शिवभारतासारखे काव्याची निर्मिती केल्याबद्दल योग्य बक्षीसही दिले आहे, थोडक्यात या ग्रंथाचे प्रूफ रिडिंग शिवरायांनी केले आहे आणि ते शिवरायांना आवडले असे म्हणायला काहीच हरकत नाही. अशा या शिवभारतामध्ये कविंद्र काय म्हणतात पाहू,,.

* कविंद्र परमानंद शिवभारतामध्ये श्लोक अध्याय १ , श्लोक क्र. १५ मध्ये शिवरायांना गौरवताना "देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तक:" म्हणजे देव ब्राम्हन व गाई यांचा त्राता  व दुर्दम्य यवनांचा कर्दनकाळ असे म्हनतात.

* त्याचप्रमाणे ...
देवानां ब्राम्हणांनां च गवां च महिमाधिकम ।
पवित्राणि विचित्राणि चरित्राणे च भुभूजाम ॥ (अ.१. श्लोक. ३९)
अर्थ :- देव ब्राम्ह आणि गाई यांचा महिमा आणि राजांची  पवित्रव अद्भुत चरित्रे ज्यात वर्णिलि आहेत (असे शिवरायांचे चरित्र)...

* मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन सामाजीक परिस्थितिचे आवलोकन झाल्याशिवाय इतिहासाचा अभ्यास पंगु असतो अशा अभ्यासामुळे इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण होऊन इतिहास विकृतीच्या मार्गावर जायला  लागतो. कवि परमानंदानी तत्कालीन परिस्थितीचे वर्णत शिवभारतामध्ये अतिशय थोड्या शब्दात आणि परिपुर्ण असे केले आहे ते पुढीलप्रमाणे (याठिकाणी संस्कृत श्लोक न देता सरळ त्यांचा अर्थ देत आहे) " देवांचे कोणी आवाहन करे नासे झाले आए, अग्नित कोणी हवन करत नाही (यज्ञ होत नाहीत) , वेदांचेही अध्ययन सुटले आहे, ब्राम्हणांचा आदरसत्कार बंद झाला आहे. सत्रे आणि यज्ञक्रिया यांना फाटा मिळाला आहे, दाने आणि व्रते संपुष्टात आली आहेत.  सज्जनांस दु:ख होत आहे; धर्मनिर्बंध मोडले आहेत. म्लेंच्छ धर्म वृद्धी पावत आहे. गाईंची हत्या घडत आहे.साधुंचा नाश होत आहे. क्षत्रीय लयास चालले आहेत. अशाप्रकारे यवनांपासुन  मोठे भय निर्माण  झाले आहे " (अ.५ श्लोक  ४० ते ४३ ) कविंद्रनि आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये वरील गार्‍हाने पृथ्वि विष्णूकडे मांडते आहे अशाप्रकारे मांडले आहे, या पृथ्विच्या गार्‍हाण्यावर भगवान विष्णूचे उत्तर  रंगवताना कविंद्र म्हणतात..

"मी पृथ्विवर धर्माची शाश्वत मर्यादा स्थापण , यवनांचा उच्छेद, देवांचे रक्षण करिन , यज्ञादी क्रिया पुन्हा सुरु करीन , गाई व ब्राम्हण यांचे पालन करिन ."  (अ.५ श्लोक  ५५ ते ५७ )  
आणि याठिकाणि परत एकदा आठवण करुन देतो शिवभारत हा एक असा ग्रंथ आहे की ज्याचे प्रूफ रिडिंग स्वत: शिवरायांनी केले आहे. 
अशाप्रकारे शिवभारतामध्ये ठिकठिकाणी आपल्याला शिवरायांना "गोब्राम्हण प्रतिपाल", गाई ब्राम्हण यांचा प्रतिपाळ करणारा , म्लेंच्छांचा नायनाट करणारा अशा उपाध्या लावल्या आहेत. वरिल दोन तिन श्लोक केवळ  उदाहरणादाखल आहेत म द्यायचेच झाले तर संपुर्ण शिवभारत एक पुरावा म्हणुन देता येईल.

६) आता आपण शिवरायांचे पुत्र संभाजी महाराजांकडे वळू.. संभाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्शी "बुधभुषण" नावाचा संस्कृत ग्रंथ रचला, यामध्ये संभाजी महाराजांना गोब्राम्हणप्रतिपालक या उपाधिविषयी काय वाटते हे श्लोक क्र. ५५४ स्पष्ट होते ते पुढीलप्रमाणे
सुराणां भुसुराणां च सुरभीणां च पालनाम ।
युगे युगे च ये धर्मास्तेषु धर्मेषु ये द्विजा ॥ (बुधभुषण ४७३)
अर्थ :- देवांना, सर्व विद्वानांना तसेच श्रमण ब्राम्हणांना व गाईंना अभय द्यावे, पालन करावे, युगायुगामध्ये जे धर्म झालेले आहेत त्यामध्ये (त्या धर्मामध्ये ) हे द्विज होते.  

पुढे गाय आणि ब्राम्हण यांचे महत्व सांगताना स्वत: संभाजी महाराज बुधभुषण ५१७ मध्ये म्हणतात...

संभाव्यं गोषु संपन्नं संभाव्यं ब्राम्हणे तप: ।
अर्थ :- गाइंच्या मुळे संपन्नता लाभू शकते, ब्राम्हणांच्यामुळे तपसाधना होऊ शकते.


याच्याही पुढे कोणता क्षत्रीय श्रेष्ठ हे सांगताना बुधभुषण ५५४ मध्ये म्हणतात...
अधीत्व वेदान्परिसंस्तीर्य चाग्निनिष्ट्रा यज्ञै: पालयित्वा प्रजाश्च ।
गोब्राम्हणार्थे शस्त्रपूतान्तरात्मा हत: संग्रामे क्षत्रीय: स्वर्गएति ॥
अर्थ :  वेदांना वाचून, अग्निदेवतेस यज्ञ करुन इच्छा धरुन प्रजेचे गोब्राम्हणासह निट पालनपोषण करुन , अंतरात्मा शस्त्राने पालन करुन, संग्रामामध्ये मारला गेलेला क्षत्रीय स्वर्गात जातो.सध्या जाणिवपुर्वक पसरवला जाणारा समज की "गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द जातवाचक आहे " या आक्षेपाचे उत्तर त्या स्शब्दातच आहे असे म्हणता येईल.  "गोब्राम्हण" मध्ये ब्राम्हणाच्याही आधी गाय आहे , आणि गाय हा पशु आहे तो कधी ब्राम्हण अशु शकत नाही. वरील सर्व पुराव्यामध्ये गोब्राम्हण हा शब्द कोठे ही जातवाचक किंवा केवळ एका जातीला उद्देशुन म्हटले गेलेले नाही आणि तसे होऊही शकत नाही . अनेकांनी शिवरायांना गोब्राम्हणप्रतिपालक अशी उपाधी लावून शिवरायांचा गौरव केला आहे. आणि या उपाधीला शिवरायांचीही हरकत नव्हती हे आपल्याला शिवभारताच्या उदाहरणावरुन लक्षात येते, मग जी उपाधी शिवरायांना अमान्य नव्हती ती उपाधी शिवरायांपासुन बाजुला करणारे तुम्ही आम्ही अर्धवट पुस्तके वाचलेले पुपटसुंभ कोण ? आपल्याल काय अधीकार ?
  शिवरायांच्या गोब्राम्हणप्रतिपालक या उपाधीचा तिरस्कार शिवरायांचेच नाव घेणारे करत आहे, जो शब्द संभाजी महाराजांना मान्य होता , त्याच संभाजी महाराजांच्या नावाने ब्रिगेड काढणार्‍यांनी तो नाकारला . का ? कारण "त्यांना" हा शब्द / हि उपाधी जातिवाजक वाटते , पण ही उपाधी नाकारणारे आपण कोण ? हा प्रश्न त्यांना पडला नसेल का ? सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे गोब्राम्हणप्रतिपालक हे बिरुद जर कोणाला जातिवाच वाटत असेल तर तो त्या व्यक्तीचा प्रॉब्लम आहे, अशांनी स्वत:चा अभ्यास   वाढवण्याची गरज आहे , कमी अभ्यासामुळे व भडकाऊ विस रुपयांच्या पुस्तकामुळे आपण शिवरायांचे कर्तुत्वच एकप्रकारे नाकारत आहोत हे यांच्या लक्षात येत नाही. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हे बिरुद नाकारणारे लोक "क्षत्रियकुलावतंस" या बिरुदाचा मात्र स्विकार करतान दिसतात परंतु क्षत्रियकुलावतंस हे बिरुद त्यांना वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे आहे असे वाटत नाही याचे नवल वाटते कारण क्षत्रियकुलावतंस याचा अर्थ क्षत्रीय कुळास शोभेसे वर्तन करणारा असा होतो. आता गोब्राम्हणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवरायच अशा लोकांना बुद्धी देवोत .
जय गोब्राम्हणप्रतिपालक आर्यसम्राट शिवराय.

- सुरज महाजन 
संदर्भ . आज्ञापत्र,  शिवभारत, शिवराजभुषण, शिवबावनी, सभासद बखर, बुधभुषण

[टिप: सदर आर्टीकल "साप्ताहीक भगवा बाणा " मध्ये प्रकाशीत झालेला आहे ]

Thursday, January 10, 2013

सुरनळीतील भेकड तथाकथीत साहीत्यीकांचा धिक्कार

महाराष्ट्रातील काही गावगुंड-टोळक्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरुन चिपळून गावातील तथाकथीत सुवर-संमेलनाच्या व्यवस्थापकांनी शेपूट घातल्याची घटना नुकतीच घडली. त्यावरुन या सुवर संमेलनाची जागा आता पॉलिटिकल संमेलनाने घेतली गेली आहे. सुरवातीला जाणुनबुजुन परशुरामाचे संबोधन, चित्र पत्रिकेवर छापले, त्यानंतर त्या ब्राम्हण परशुरामाचा विरोध ब्राम्हण-विरोधी टोळक्यांनी केला. सुरवातीला या सुवर लोकांनी या विरोधाला भिक घातली नाही ही गोष्ट धर्माभिमान्यांनी मोठ्या उत्साहाने स्विकारली, आणि का स्विकारु नये परशुराम केवळ ब्राम्हण होते म्हणुन काही जातिवादी लोकांनी त्याला विरोध केला व परशुरामाविषयी चुकिचा समज समाजात पसरवला, पण तो समज कसा चुकीचा आहे हे आपल्यातील अभ्यासु लोकांनी सिद्धही करुन दाखवले. परंतु नंतर.... या पोकळ धमक्यांना घाबरुन म्हणा.... किंवा पैशाला भुलुन म्हणा किंवा आणखी कशाने ही म्हणा, या नतद्रष्ट लोकांनी त्यांचा सर्व समर्थकांच्या पृष्ठभागावर लाथ मारुन, स्वत:च्या देवशी तडजोड करुन.....परशुरामाला मानचिन्हांतुन हटवले, स्वत:च्या देवाशी तडजोड केली. जातिवाद्यांना साथ दिली. आता आमच्यातलेच लोक अशाप्रकारे आमच्या पाठीमागे अशाप्रकारे सुरी खुपसु लागले तर आपल्यातील नव-अभ्यासकांनी कोणाकडे पहायचे ? आज यांनी परशुरामाशी तडजोड केली, उद्या हे हरामखोर या जातीवाद्यांच्या सांगण्यावरुन आपल्या आई-बापाच्या नावाशी तडजोड करणार नाहीत कशावरुन ?? जातिच्या आधारावर महाराष्ट्राची वाटणी करण्यार्‍या हरामखोर गावगुंडांचा निषेध आहेच, त्यापेक्षाही शंभर पटीने सुरवातीला विरोध करुन नंतर शेपुट घालणार्‍या तथाकथीत सुवरांचाही निषेध !!!! परशुरामाचे छायाचित्र जर हटवायचेच होते तर मग सुरवातीला जाणुनबुजुन परशुरामाचा वापर का करन्य़ात आला ? आणि परशुरामाचा वापर केला तो केला , पण मुर्खानो कोण कुठला गायग्कवाड ? याला कोण विचारते ? याची साहित्य क्षेत्रामध्ये लायकी काय ? याचा नाही तर नाही तरी निदान याचा तरी विचार करायचा ना कि १२ तारखेला या मुर्खांचे सिंदखेडराजाला काहीतरी कार्यक्रम होता... तो सोडून तुमचे साहित्य संमेलन उधळायला कोण येणार ??? येवढा साधा विचार करण्याची अक्कलही देवाने तुम्हाला दिली नाही का ?? का ति ही या जातीवाद्यांच्या बाथरुम मध्ये गहाण ठेवली ? साहीत्य क्षेत्रामध्ये स्वत:चे पोट भरण्यासाठी पुस्तकांची गठ्ठी च्या गठ्ठी रचणार्‍यांच्या डोक्यामध्ये येवढाही प्रकाश पडू नये ? या शेपुट घालणार्‍या सुवरांपेक्षा ते जातीवादी गावगुंड कितितरी पटीने परवडले, निदन ते आपल्या विधानाशी तरी इमान राखतात. पण हे सुवर ??? शेवटी सुवरच ते खाणार तिथेच आणि हा_णारही तिथेच. यात त्यांचाही काय दोष म्हणा... यंदाचे साहित्य संमेलनाचे ठीकाणही तेच आहे........ चिपळून !!
 —Monday, December 3, 2012

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे
=======================================
"On one hand we have the vast Vedic literature without any Archaeological evidence to support it, while on the other hand we have almost 2500 Archaeological sites associated with the Indus-Saraswati civilization without any literature associated with it. "
- Professor David Frawley

* साधारण
पणे सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० पर्यंत सांगीतला जातो, व साधारण ई,स.पू २००० ते १६०० मध्ये पर्यावरणामध्ये प्रतिकुल बदल होत होत सिंधु-सरस्वती घाटीची सभ्यता नष्ट झाली असे मानले जाते.

* सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० असा मानला तर ऋग्वेदाचा काळ १६०० च्या पुढे निश्च्ति केला जातो, कारण ना ऋग्वेदा मध्ये सिंधु परिस्थितिचा संदर्भ येतो आणि ना सिंधु काळामध्ये काही वैदीका प्रमाण मिळतात.

* ऋग्वेदाची रचना सरस्वती नदी अस्तित्वात असताना झाली आहे हे स्पष्टच आहे , आणि सरस्वती नदीच्या खालच्या भागातील पाणी इ.स.पू २००० पासुन आटू लागले याचाच अर्थ ऋग्वेदाची रचना ई.स.पू २००० पुर्व झाली असली पाहीजे हे स्पष्ट होते.

* पण काही विद्वान ऋग्वेदाचा काळ इ.स.पू १६०० च्या पुढे असावा असे मानत नाहीत , ऋग्वेद काळ बरेचजण ई.स.पू ४००० ते १०००० इतका मागे नेतात. [ काही जन भुगर्भशास्त्राचे प्रमाण देवून ऋग्वेदाचे काही श्लोक हे २५०००० वर्षापुर्वीचे असावेत असे मत मांडतात हे इथे प्राकर्शाने मांडावे वाटते ]

* ऋग्वेदाचा काळ हा सिंधु / हडप्पा संस्कृती नंतरचा असे मानन्यात अडचण ही आहे की जेथे वातावरणातील आणि पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे हडपा संस्कृतीतील सिंधु-सरस्वती वासीयांना स्थलांतरीत होण्यात भाग पाडले ( काळ साधारन ई.स.पू १७०० - १६०० ) त्याच काळानंतर म्हणजे पर्यावरण प्रतिकुल असतानाच त्याच ठिकाणी ( सिंधु-सरस्वतीचे खोरे ) वैदीकांनी आपले वस्थिस्थान वसवले हे पटत नाही व त्यानंतर रामायण महाभारतादी घडले असे जर मान्य केले तर पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत, पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .

* आणि असे जर असेल तर रामायण महाभारतादी काव्हे ही फक्त मिथक आहेत असे मानावेल लागेल , परंतु त्यातही एक अडचण आहे ती अशी की वैदीक ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* अलिकडे पश्चिम आशियातील कोरीव लेखात काही व्यक्तीनामे आढळून आली आहेत त्यांपैकी दोन नाव्रे "सोमसेन" व दुसरे "अरीसेन". ही नावे ज्या लेखात सापडली त्याचा काळ आहे ई.पू. २३०० , त्यावेळी सिंधू संस्कृती पुर्णपणे सुबत्तेच्या शिखरावर पोहोचली होती. ही दोन्ही नावे इंडॊ-आर्यन असुन पुर्णपणे भारतीय आहेत. याबद्दल विद्वानांत दुमत नाही. म्हणजे हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती, तसेच सिंधु संस्कृती जर अनार्य द्रविडींची असे मानले, तर हे इंडॊ-आर्यन शब्द इ.स.पू २३०० मध्ये भारतातुन येणे कसे शक्य आहे ?

* आणि जर हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती असे जर मानले तर हडप्पा कालीन संस्कृतीच्या उत्खननांमधुन वैदीक संस्कृती शी साम्य असलेले काहीच प्रमाण मिळालेले नाही . म्हणजे जरी दोन्ही संस्कृती समकालीन आहे असे मान्य केले तर कोणत्याही उत्खननामध्ये वैदीक कालीन पुरावे आजपर्यंत का सापडलेले नाहीत ?

* आर्यांनी आपला इतिहास खुप मोठ्या प्रमाणावर लिहुन ठेवला आहे रामायण , महाभारता सारखी महाकाव्ये ही केवळ काव्ये नसुन सत्य इतिहास असावा हे जवळ जवळ सर्वमान्य आहे . महाभारताचा काळ काढला असता तो ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० इतका मागे जातो. हे केवळ रामायण - महाभारताचे , त्याचप्रमाणे वैदीक साहित्यानुसार असे कित्तेक राजे आणि महाराचे होऊन गेले , परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की अनेक पुरातत्विय उत्खननामध्ये अवशेश म्हणुन असे काही सापडलेले नाही पण ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* इ.स.पू. १५,००० ते १०,००० च्या मध्ये भयंकर प्रलय आला होता , व त्यात भारताचा बराच भाग समुद्राखाली गेला असे संशोधक मानतात. भागवत पुराणामध्ये अयोध्या नगरी समुद्राने नष्ट केल्याचे वर्णन आहे व त्यानंतर कलियुगाची सुरवात झाली असे सांगीतले आहे. याचा अर्थ द्वापारयुगाचा शेवट इ.स.पू. १०,००० च्या आसपास झाला असे मानायचे का , आणि या अति अति प्राचीन काळामुळेच त्यांचे अवशेष आज आपल्याला सापडत नाही आणि त्या आधीही भारतामध्ये प्रगत अशी संस्कृती नांदत होती असे म्हणु शकतो असे असु शकेल ? आणि असेच जर मानायचे ठरवले तर दोन मोठ्या अडचणी आहेत , एक म्हणजे इ.स.पू. १०,००० च्या आधी महाभारत घडले हे मानावे लागते पण बरेच विद्वान महाभारताचा काळ ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० च्या मध्ये मानतात व दुसरी अडचण अशी की ई पू १०००० च्या आधी एक संस्कृती नांदत होती , १०००० च्या आसपास महाप्रलय आला त्यामध्ये बर्‍यापैकी सगळे नष्ट झाले त्यानंतर तब्बल सात ते आठ हजार वर्षानंतर सिंधु/ हडपा संस्कृती भारतात उदयास आली जिचे अवषेश आज मिळतात. या मधल्या सात आठ हजाराच्या कालखंडामध्ये काही अर्य वैदीकांनी आपली संस्कृती सांभाळली असे मानायचे का ? आणि असे जर मानले तर ते लोक सिंधु काळात कुठे होते ?