Tuesday, April 30, 2013

शिवरायांच्या शत्रुंचे उदात्तीकरण



पुरुशोत्तम खेडेकरांनी "शिवचरित्र" नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणतात "औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखाण हे महाराजांचे कट्टर राजकीय शत्रू होते, इत:पर त्यांनी महाराजांचा आदर केला " (पान ३१. शिवचरित्र) श्रिमंत कोकाटे लिहितात, "औरंगजेबाने श्जिवाजीला राजा ही पदवी सन्मानपुर्वक दिली." (विश्वंद्य शिवाजी पान ६५) खेडेअक्र खेडेकर औरंगजेबाचे गोडवे गाताना पुढे लिहितात, "अओरंगजेब हा क्रूर रंगवला जातो. बादशहा होण्यासाठी स्वत:च्या भावाची व त्याच्या मुलाची हत्या केल्याचे रंगवले जाते... अशी अतिरंजीत मांडणी करुन औरंगजेबाने महाराजांना किती त्रास दिला असेल ही मांडणी केली जाते ते चूक आहे. प्रत्यक्ष औरंगजेबाने शंभूराजांना आग्रा येथे नजरकैदेत असतानाही मानानेच वागवले. तो जर ब्राम्हण सांगतात तसा कृर असता तर कुणाचीही तमा न बाळगता त्या दोघांना ठार करणे अशक्य नव्हते. शंभुराजांना अटक केल्यानंतर रायगड मोगलांकडे आला. तेथे शंभु महाराजांची महाराणी येसूबाई व मुलगा शिवाजी (शाहू) यांना अटक करण्यात आली . औरंगजेबाने या दोघांना छावणीत प्रशस्त तंबू देवून सर्व सुखसोई दिल्या. सुरक्षीततेच्या दृष्टीने त्यांचा तंबू नेहमी आपल्या जवळ ठेवला... यावरून मराठ्यांनी औरंगजेबाचे मुल्यमापण करावे. "
श्रिमंत कोकाटे आपल्या "विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज" या पुस्तकात लिहितात, "शिवरायांचा हिंदू, हिंदवी, हिंदुत्व यांच्याशी अजिबात संबंध नाही. शिवचरित्रात कोठेही हिंदू, हिंदुत्व, हिंदवी यांचा उल्लेख नाही...शिवरायांना हिंदु धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटले जाते ही शिवरायांचू कृर चेष्टा आहे".
अशाप्रकारे कोकाटे व खेडेकर औरंगजेब व त्यांचे धर्मांध सरदार यांच्यासंबंधी लिखाण करत आहेत. हा एकप्रकारे शिवरायांच्या कार्याचा अपमाण आहे.  इतिहासाचे विकृतीकरण करणारे पुरुषोत्तम खेडेकर औरंगजेबाचे इतके चाहते झाले आहेत की अस्लम बेग यांनी लिहिलेल्या "हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक : औरंगजेब" या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते. मुस्लील लिग चे प्रेस्टीडंट खा. बनातवाला यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी मिर्झा अस्लम बेग यांनी उद्गार काढले "पुस्तकाच्या निर्मितीत मराठा सेवा संघाची मदत झाली आहे" जेथे उरंगजेबाचा संबंध तेथे खेडेकर असेच या प्रकाशन समारंभाचे स्वरुप असल्याने आपली औरंगजेबभक्ती प्रकट करण्यासाठी खेडेकर तेथे पोहोचले. "हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक औरंगजेब" या पुस्तकाचे लेखक मिर्झा अस्लम बेग यांची हिंदु-मुस्लीम दंग्याच्या संदर्भात अनेक वेळा पोलीस चौकशी झाली आहे. त्यांचे सिमीसोबतचे संबंधही जगजाहीर आहेत.

द्वेशाची किणार : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करुन वध करणारा औरंगजेब नाही, तर संभाजीचा खून ब्राम्हणांनी केला, असा शोध खेडेकरांनी "बहुजनांचा सांस्कृती इतिहास" या पुस्तकात औरंगजेबाच्या प्रेमापोटी लावला आहे. मा.म. देशमुख आपल्या "शिवशाही" या पुस्तकात (पान ६२)
 वर औरंगजेबाचे स्त्री दाक्षीण्य मांडतात, ते लिहितात "ब्राम्हण पंडीत औरंगजेबास दुष्ट, कपटी वगैरे रंगवातात. तरीही त्यांनी शाहु व त्यांच्या कुटुंबीयांतील स्त्री-पुरुषांचा इस्लामी-सुलतानी छळ केला नाही. याउलट शाहू व त्यांच्या परिवारास जेवढ्या सन्मानाने व उदारपणाने औरंगजेबासारख्या मुस्लीम शासकाने वागवले तेवढं स्त्री दाक्षीण्य ब्राम्हण पेशवा नारायणराव याने दाखवले नाही. "
अशा अनेक उदाहरणांतून खेडेकर, कोकाटे , मा. म. देशमुख शिवाजी महाराजांच्या शत्रुंचे उदात्तिकरण करत आहेत. या इतिहासाचे वाचन केल्यावर समाज संभ्रमित होऊ शकतो आणि संभ्रमात असलेला समाज कधीही एकसंघ राहत नाही. आपापसात भांडतो याचा फायदा परधर्मी घेतात. परिस्थिती संपवायची असेल तर या मंडळींनी मांडलेल्या विधानांनी सत्यता तपासुन घेतली पाहीजे. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची तुलना करुयात.
वरील तुलनेतून औरंगजेब कसा होता आणि शिवाजी महाराज कसे होते हे लक्षात येते. आपण सामान्य माणसे आहोत म्हणुन ते समजु शकतो, परंतु खेडेकर, कोकाटे, देशमुख यांच्याबाबत असे म्हणता येणार नाही. त्यांना औरंगजेब प्रेमाचा पुतळा वाटतो. त्याने शाहूंचा प्रेमाने प्रतिपाळ केला असे खेडेकरांचे म्हणने आहे, तर शिवाजी महाराजांना औरंगजेबाने "राजा" ही पदवी सन्मानाने बहाल केली असे कोकाटे म्हणतात. खेडेकर, कोकाटे औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवरायांचे अवमुल्यन तर करत नाहीत ना, याचा आपण विचार केला पाहीजे.

आदर कशासाठी ? : 
औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान हे शिवरायांच आदर करत असे खेडेअक्र म्हनतात. पण इतिहास काय आहे ? अफजलखान विजापुर हून निघाला "शिवाजीला मी चालत्या घोड्यनिशी जिवंत वा मृत पकडून आणतो" अशी प्रतिज्ञा करुन तो वाईला येईपर्यंत मठ-मंदीरे लुटतच आला. रयत नागवली. स्त्रियांची आबृ लूटली. शाहिस्तेखान तीन वर्षे पुने परिसरात तळ ठोकून बसला होता. सारा परिसर धुऊन काढला. अन्याय-अत्याचार केले. लुटालूट केली, ती काय शिवाजी महाराजांवर असणार्‍या आदरापोटी ?. खेडेअक्र-कोकाटेंना नक्की काय सांगायचे आहे ? कोणता इतिहास लोकांसमोर मांडायचा आहे ?
शिवाजी महाराज व तत्कलीन मुस्लीम राजे यांच्यातील लढा हा धार्मीक नसुन केवळ राजकीय होता असे विधान करणे म्हणजे शिवरायांच्या कार्याचे अवमुल्यन करणे होय. ज्या शिवाजी महाराजांनी इथे प्रस्थापीत असणार्‍या अन्यायी-अत्याचारी मुघल, आदिलशाही व अन्य मुसलमानी राजवटीत खितपत पडलेल्या शतखंडीत असलेल्या हिंदु समाजाला जाग्रुत करुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. रयतेचे महान राज्य. महाराजांनी निर्माण केले. त्यासाठी सर्व सुखांचा त्याग केला, मानवतेचे कल्यानकारी राज्य निर्माण केले म्हणुनच ते विश्वंद्य ठरले. यांचा लढा अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध, असत्याविरुद्ध होता. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर मात्र शिवाजीचा लढा हा केवळ राजकीय होता असे म्हणुन छत्रपतिंच्या महान कार्यालाच काळीमा फासत आहेत. छत्रपतिंच्या उदात्त ध्येयाचे अवमुल्यन करुन त्यांना स्वत:च्या सुखासाठी राज्य निर्माण करणारा एक स्वार्थी ठरवू पाहत आहेत काय ??
खेडेकर, कोकाटे, देशमुख यांच्या लेखनातून अशाप्रकारे मुस्लीम सत्ता आणि शिवरायांचे शत्रू यांचे उदात्तिकरण चालू आहे. याचा समाजावर काय परिणाम होतो ? तरुण पिढीला कोणता आदर्श मिळेल याचा विचार खेडेकर करणार आहेत का ?
एका बाजूला औरंगजेब , शाहिस्तेखान, अफजलखान हे शिवरायांचे खरे शत्रू नव्हते असे समाजाला सांगायचे आणि दुसर्‍या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू म्हणुन ब्राम्हणांना लक्ष करायचे अशी दुहेरी निती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून राबवली जात आहे. या मागची कारणे मराठा तरुणांनी डोळे उघडून शोधली पाहीजे.
मराठा सेवा संघ पुरस्कृत या साहित्यातील मानसिकता आणि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही समाजात विद्वेश पसरवणारी आहे. या मानसिकतेने आपल्या मराठा समाजाचे कधीही भले होणार नाही आणि विकासाकडे वाटचालही होणार नाही . मराठा समाजाला जर स्वत:चा विकास करुन घ्यायचा असेल तर खेडेकर-कोकाटेंच्य विखारी प्रचारापासून दूर जाऊन  वास्तवाचा विचार केला पाहीजे.
मराठा जातीच्या अस्मिता जागवताना खेडेकर-कोकाटे समाजात जातिद्वेश पसरवत आहेत. त्यांच्यापासुन वेळीच दूर होणे आणि त्यांची जागा दाखवुन देणे ही काळाची गरज आहे. नाहीतर छत्रपतिंच्या गौरवशाली पराक्रमाचा वारसा सांगणारा मराठा समाज खेडेकरांच्या मागे लागून औरंगजेबाचे गोडवे गाऊ लागे.


- धर्मेंद्र खंडारे
 ( शिवरायांचा देशधर्म पुरुशोत्तमांचा द्वेशधर्म या पुस्तकातुन साभार )

No comments:

Post a Comment