Tuesday, April 30, 2013

मराठ्यांची वैचारीक फसवणूक


खेडेकर कोकाटे हे मराठा जातीची वैचारीक फसवणूक करत आहेत. त्यामागे त्यांचे काही गुप्त हेतू नक्कीच असले पाहीजेत. त्यांचे हेतू त्यांनी पुरे करुन घ्यावेत, पण त्यासाठी संपुर्ण मराठा जातीला बदनाम करु नये. खेडेकर-कोकाटे यांचा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड म्हणजे संपुर्ण मराठा जात नाही. पण समाजात खेडेकर-कोकाट्यांच्या वर्तनामुळे सार्‍या मराठा जातीची नाचक्की होत आहे . खेडेकर त्यांच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडून सांगत आहेत. आणि मराठा जातीचा बुद्धीभेद करत आहेत. यासाठी एकच उदाह्रण पाहीले तर खेडेकरांचा कावा आपल्या लक्षात येईल. "बहुजनांचा सांस्कृतीक इतिहास" या आपल्या पुस्तकात खेडेकर लिहितात- "शंभुराजांची हत्या बामनांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी आमलात आणल्या त्यामुळे शंभुराजांची घोर विटंबणा बामनाअंनी केली, वेदाभ्यास व संस्कृत पंडीत होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभुराजे स्वत: जगातील अत्यंत हुशार थोर संस्कॄत पंडीत होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभुराजे संस्कृतपंडीत होऊन बामनांचाही पराभव करतात. त्यामुळे शंभुराजे बामनांच्या हाती पडतात बामनांनी शंभुराजांचे डोळे फोडले, कानात तेल ओतले, जिभ कापली, शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभुराजांचे शिर म्हणजे डोके उंच बांबूवर लटकवून तूळापूर, वडू आपटी परिसरात मिरवले" (पान.नं. २४)
खेडेकर म्हणतात की ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला, पण औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात तर खोटेपणा नसेल ना ? इश्वरदास नावाच्या गुजरातमधील माणसाने "आरमगीर विजय" नावाचा ग्रंथ लिहिला आहे. तो नेहमी औरंगजेबाच्या छावणीत राहत असे. त्याने आपल्या आंखो देखा इतिहास धर्मविर संभाजी महाराजांच्या वधाचा इतिहास असा लिहिला आहे. मूळ फारशी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ सेतू माधवराव पगडी यांनी मराठीत अनुवादीत केला आहे. त्यातील संभाजी वधाचा उतारा असा --
बहदुरखान आणि इखलासखान हे आपले सैन्य तयार करुन युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करुन फरुन चहुंकडून संभाजीला घेरले व त्यावेळी उभय पक्षांत मारामारी झाली. संभाजीच्या बरोबर असलेले चारशे सैनीक मारले गेले. मोंगलांचे जवळजवळ आडीचशे सैनिक मॄत्युमुखी पडले. संभाजीनेही पळून जाण्याचा बेत केला, पण त्याचा बेत सिद्धीस गेला नाही. तो मोंगलांच्या हाती कैद झाला. वाईट कर्माची फळे वाईटच होतात. कविकलश यास त्याच्या कृत्याची फळे मिळाली. संभाजी बरोबर तो पण कैद होऊन मोगलांच्या तावडीत सापडला.
संभाजीला कैद केल्याची बातमी बादशहाला शहाजादा आजम याच्या पत्रावरुन समजली. इखलासखानाचा हरकारा खंडूजी याने बादशहापाशी येऊन सगळी हकिकत सांगीतली. त्यानंतर ही बातमी सगळीकडे जाहीर झाली. यानिमित्त लष्करात आनंदनिदर्शक अशी वाद्ये वाजविण्यात यावीत अशी बादशहाने आज्ञा केली.  बादहशाबरोबर असलेल्या मोठमोठ्या अमिररावांनी बादशहाला नजराणा देऊन या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. खंडूजी हाराकारा यास खूप बक्षीस देण्यात आले..
इखलासखान आणि बहादुरखान यांस सन्मानाची बढती, बहुमानाचे पोषाखम जवाहाराचे खंजीर, हत्ती-घोडे इत्यादी देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संभाजीला तरतुदीने आणि बंदोबस्ताने दरबारात घेवून यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली.
बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलासखाण आणि बहादूरखाण हे संभाजी , कविकलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेवून बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशहाने आज्ञा केल्यावरुन इखलासखान आणि हमिदुद्दुनखान यांनी संभाजी, कविकलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरुन धिंड काढली.  त्यांची हजारप्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना चावणीत आणन्यात आले . दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयाजवळ उभे करण्यात आले. बादशहाने संभाजी कडे पाहीले. त्याची दुर्दशा पाहून बादशहाच्या मनावर परिणाम झाला. त्यानंतर बादशहा सिंहासनावरुन उतरला आणि त्याने प्रार्थना करुन परमेश्वराचे आभार मानले.
पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणुन यत्किंचीतही मान लवविली नाही. इखलासखान आणि हमिदुद्दिनखान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशहाने आज्ञा केली की सिकंदरखानच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे, कविकलश आणि त्याचे साथिदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या. 
यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रहुल्लाखान यास खालीलप्रमाणे आज्ञा केली, "तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजीने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुटेह आहे ? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबंध ठेवीत होते. "
पण माणसाची जिवीताची आशा सुटली कीति मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहासंबंधी घाणेरडे शब्द उच्चरले आणि त्यांची निंदा-नालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते जसेच्या तसे रहुल्लाखानने बादशहाला सांगीतले नाही, पण ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा त्याने बादशहास इशारा दिला. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजी च्या डोळ्यात सळई फिरवून (त्याला आंधळा करुन) त्याना नविन दृष्टी द्यावी (वठणीला आणावे).
य्त्याप्रमाणे करण्यात आले, पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासुन जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेकर्‍यांनी त्याला अन्नसेवन करण्यास पुष्कळ सांगीतले , पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले, शेवटी ही बातमी राजाच्या काणावर गेली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेने त्याला वधस्थंबाकडे नेण्यात आले. तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके अओरंगाबादेहून बुर्‍हाणपुरापर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लिला नेण्यात येवून शहराच्या स्वारावर लटकवण्यात आले. (मोगल-मराठा संघर्ष , पान नं . ३०-३१)
खेडेकरांचा इतिहास आणि इश्वरदासचा प्रत्यक्षदर्शी इतिहास आपण समजुन घेतला पाहीजे. खेडेकरांना मराठा समाजाची फसवणूक करायची आहे. ब्राम्हणांविरुद्ध उभे करुन सामाजिक असंतोष निर्माण करायचा आहे आणि त्याच अट्टाहासापोटी हे मराठ्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाला निर्दोष सोडवण्याचे धाडस करतात. प्रसंगी त्याचे उदात्तिकरण करण्यातही मागेपुढे पाहत नाही. ज्या धर्मांध औरंगजेबाने संभाजी राजांचा क्रूरपणे वध केला, आपल्या जन्मदात्या आई वडीलांना कैदेत टाकले, भावांची हत्या केली. संभाजी राजांची पत्नी महाराणी येसूबाई व पुत्र शाहू राजे यांना १७ वर्षे कैदेत डांबून त्यांचा अतोनात छळ केला./ त्याच औरंगजेबाला खेडेकर कोकाटे, देशमुख धर्माने वागणारा स्त्री दाक्षीण्यवादी असलेला औरंगजेब म्हणतात हा मराठ्यांचा घोर अपमाण आहे. हे मराठ्यांनी समजुन घेतले पाहीजे.

- रविंद्र गोळे
 ( शिवरायांचा देशधर्म पुरुशोत्तमांचा द्वेशधर्म या पुस्तकातुन साभार )

2 comments:

  1. तद्दन फालतू लिखाण आहे. बुद्धिभेद करण्याचा अजून एक केविलवाणा प्रयत्न. मूळ फारशी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ सेतू माधवराव पगडी यांनी मराठीत अनुवादीत केला आहे. आणि तसे करताना त्या भोटाने आपल्या मनाच्या अनेक गोष्टी घुसडल्या आहेत हे मात्र सांगायचे विसरलास का रे? हाट थूत !

    ReplyDelete
  2. औरंगजेबाने धर्मासाठी हत्या केली का?वरील लिखाणातून काय सिद्ध होणार?

    ReplyDelete