Showing posts with label मेकॉलेचे हस्तक. Show all posts
Showing posts with label मेकॉलेचे हस्तक. Show all posts

Friday, October 26, 2012

ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे


सध्या बाजारामध्ये अनेक संघटना, पक्ष, चळवळी केवळ एका आधारावर उभ्या आहेत तो म्हणजे ब्राम्हणद्वेष !  ब्राम्हणद्वेष पसरवायचा आणि  आपले वैयक्तीक, पाक्षीक किंवा सांघटनीक स्वार्थ साधुन घ्यायचा असा एक ट्रेड चालू आहे. देशासमोर आ वासुन उभे असलेल्या समस्यांना, प्रश्नांना , अडचणींना बदल देवुन कोणी एके काळी ब्राम्हण समाजाने आमुक आमुक या समाजावर काहीतरी तमुक तमुक अन्याय केले हे जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगायचे (ओरडायचे कारण म्हणजे तो मुद्दा देशाच्या इतर प्रश्नांपेक्षा महत्वाचा वाटायला हवा यासाठी) आणि समोर बसलेल्या ठरावीक एका सामाजीक वर्गाला ज्याच्याकडे इतरांच्या तुलनेत बौद्धीक विचारक्षमता कमी आहे त्यांच्यापुढे वाघ म्हणुन मांजराला पुढे करायचे , जेणेकरुन जो खरा वाघ आहे त्याच्याकडे लोकांचे दुर्लक्ष होईल. कसे का ? कारण म्हणजे या खर्‍या वाघाचे आणि जिवाच्या आकांताने ओरडणार्‍यांचे साटेलोटे आहे हे सांगण्यासाठी काही मोठ्या तत्वज्ञाची गरज नाही.
थोडक्यात ब्राम्हणद्वेशावर या लोकांचे पोटपाणी चालू आहे. या ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे खनुन काढल्याशिवाय या तथाकथित ब्राम्हणद्वेशी लोकांचा स्वार्थ आणि यांचे खरे जावाई आणि घरजावाई कोण हे लक्षात येणार नाही .
भारतावरील ७११ साली पहिले इस्लामी आक्रमण झाले, त्यानंतर तब्बल ३०० वर्ष हिंदु योध्यांनी ही आक्रमणे थोपवुन धरली , त्यानंतर मात्र हिंदु प्रतिकार शिथिल होवून इस्लामी आक्रमणे तिव्र होवू लागले त्यापासुन पुढे साधारण ६०० वर्षे हिंदुस्थानामध्ये इस्लामी टोळधाडी, आक्रमणे, लुटालूट, हिंसाचार यांची पराकाष्ठा झाली, यामध्ये हिंदुस्थानातील हिंदुंचा स्वधर्माप्रती असलेला स्वाभिमान इस्लामी आक्रमाकांनी रसातळाला नेला, त्याचबरोबर अनेक वैदीक ग्रंथ व पुस्तके , अनेक ऐतिहासीक साधने नष्ट केली. त्यानंतर शिवरायांचा जन्म झाला व हिंदुस्थान इस्लाममय होण्यापासुन  वाचला. त्यानंतर इंग्रज आले , त्यावेळी वैदीक ग्रंथ , पुस्तके , साहित्य आणि ऐतिहासीक दस्तैवज विखुरलेले होते इंग्रजांनी हिंदुंचे हे विखुरलेले वैदीक साहीत्याचे आधुनिक पद्धतीने एकत्रिकरण करण्याचे ठरवले. आणि ते ही असे की जसे इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी सोईस्कर ठरेल अशा पद्धतीने आणि याच वैदीक साहित्याचे आधुनिकिकरण करताना इंग्रजांनी त्यामध्ये स्वत:च्या सोईनुसार भेसळ केली ज्याचा उपयोग इंग्रजांना त्यांच्या फोडा-झोडा आणि राज्य करा अशाप्रकारच्या राजकारणाला पुरेपूर झाला. त्यानी या वैदीक साहित्यामध्ये अशाप्रकारे भेसळ केली की ज्याद्वारे हिंदुंच्या मनात शंका निर्माण होतील. वस्तुत: इतिहास हा असा विषय आहे की तो कोणत्याही देश किंवा समाजाच्या विविध परंपरा तसेच मान्यता तसेच महापुरुशांच्या गौरवगाथा आणि संघर्षाच्या सामुहिक आढावा होय, ज्याचा उद्द्देश त्या देश अथवा समाजाची भावि पिढी त्यापासुन प्रेरणा घेवु शकेल. परंतु भारताचा इतिहास आज ज्या स्थितित आहे आहे त्या दृष्टीकोणातुन विचार केला असता निराशाच आति पडते. असो. तर इंग्रजांनी विस्कळीत अशा वैदिक ग्रंथांचे एकत्रिकरण आणि आधुनिकिकरण करत असताना त्यामध्ये अशाप्रकारच्या विकृती आणि फेरबदल केले की ज्यातुन पुढे सामाजीक कलहच निर्माण होईल जो इंग्रजांना राज्य करण्यासाठी आवश्यक होता. आणि या विकृती आणि फेरबदलाचा सरात मोठा उद्देश हा होता की भारतियांना त्यांच्या संस्कृती, महापुरुष आणि विद्वानांबद्दल घृणाच निर्माण व्हावी. कंपनी सरकार ने आपल्या उद्देशाच्या प्राप्ती साठी अशाप्रकारे बहुमुखी योजना बनवली या योजनेच्या अंतर्गत पाश्चात्य विचारवंत आणि वैज्ञानिकांनी, इतिहासकारांनी आणि शिक्षण-शास्त्रज्ञांनी, लेखक आणि अनुवादकारांनी, इंग्रज प्रशासक आणि ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसारकांनी भारताची प्राचिनता, व्यापकता, अविच्छिन्नता आणि एकात्मतेलाच नाही तर समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले. आणि याच अभियानाच्या अंतर्गत  असा प्रचार करण्यात आला भारतीय सभ्यता ही प्राचीन सभ्यता नाही, रामायण - महाभारत वगैरे घटना केवळ कल्पित आहेत वगैरे वगैरे आणि सत्तेत असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा उचित लाभ मिळाला. आणि येथुनच सुरवात झाली ब्राम्हणद्वेशाची , त्या काळी ’इंग्रजांनी’ भारतीयांमध्ये वर सांगीतल्याप्रमाणे  समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले आजही विद्रोही तेच करत आहेत. या इंग्रजांच्या ब्राम्हणविरोधाबद्दल मोनियर विल्यम्स नावा्चा इंग्रज आपल्या "मॉडर्न इंडीया एण्ड दी इंडीयन्स" या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या पृष्ठ २६१ वर म्हणतो, "When the walls of the mighty fortrees of Brahmanism are encircled, undermined and finally stormed by the soldiers of the cross, the victory of christiannity must be signal and complete" म्हणजे "जेव्हा ब्राम्हणांची शक्तीशाली दुर्ग (मंदीरे) ख्रिस्ती सैनिकांद्वारे घेरली जातील, दुर्बल बनवली जातील आणि नष्ट केली जातील तेव्हाच ख्रिस्तिकरणाच्या पुर्ण विजयाचा संकेत मिळेल".
दुर्दैवाने इंग्रजांच्या नंतर तेच काम विद्रोह्यांच्या मार्फत अव्याहतपणे चालू आहे. आता या विद्रोह्यांना  कारण नसताना प्रतिसाद मिळणे कठीन आहे म्हणुन यांनी आता शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छ. संभाजी महाराज इत्यादी महापुरुषांच्या नावाने त्यांचे विरोधक असलेल्या आणि भारताला १५० वर्षे गुलाम करुन ठेवलेल्या इंग्रजांचे हेच मिशनरी काम पुढे चालवत आहेत. आणि याचेच सबळ उदाहरण म्हणजे आर्य-अनार्य वाद जो इंग्रजांनी स्वत:च्या सोईसाठी बनवला होता , आज याच बादाचा उपयोग हे विद्रोही जनतेची माथि भडकवायला आणि स्वत:चा स्वार्थ साधुन घ्यायला करत आहेत.

Tuesday, July 10, 2012

"विद्रोह" की विकृती ???

महराष्ट्राला "विद्रोह" काही नविन नाही . फार पुर्वीपासुन महाराष्ट्राने विद्रोह पचवला आहे. पण अजचे विद्रोही हे विद्रोहाच्या मार्गने जाता जाता विकृतीच्या दरात येवुन पोहोचले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही . खालिल या तथाकथीत विद्रोह्यांच्या पुस्तकातील अवतरणे पहा आणि ठरवा की हे विद्रोहाच्या कोणत्या कक्षेत बसते ? याच्या पुढे ही जाऊन असे म्हणता येईल की हे काही मोजके लोक विद्रोहाचेच नाव खराब करत आहेत


*आज शिवजी हे ईस्लाम धर्म व मुसलमान समाज यांच्याविरुद्ध होते आणि मुसलमानांचा द्वेष व तिरस्कार म्हणजे शिवाजीची शिकवण असा खोटा प्रचार काही सेना व संघटनांकडून सतत सुरू आहे. (शिवशाही पान नं ४५- मा.म.देशमुख)


*रक्ताने मुसलमानांपेक्षा खरे परकिय ब्राम्हण ठरतात .( आजच्या ब्राम्हणांचा काय दोष?-पुरुषोत्तम खेडेकर).


*विष्णू म्हणजे विषाचा अणू , विषारी समुह , विषाचा अणुबॉम्ब, शिवाचा कर्मठ विरोधक. मुळचा मराठा पण सत्ता, संपत्ती व सौंदर्य याला भुलून ब्राम्हणांच्य कळपात गेला तो विषारी माणूस म्हणजे ’विष्णू’.


*श्रीरामाचा वापर करुन आदिवासी बहूजन स्त्रिया राजकन्या शूर्पनखा, राजकन्या त्राटीका यांना अपमानीत केले जाते. महाबली रावणासारखा सर्वगुणसंपन्न शिवधर्मी राजाच्या विरोधात शिवधर्मी श्रीरामाचा वापर केला जातो. -पुरुषोत्तम खेडेकर


*महाराजांचा व कोणत्याही ब्राम्हणांचा अध्यात्मीक संबंध नव्हता . ब्राम्हणांमध्ये संत नसतात तर केवळ जंत असतात यावर महाराजांचा विश्वास होता त्यामुळे अलिकडच्या काळात ब्राम्हणांनी बहुजनात जन्मलेल्या अनाथ निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना ब्राम्हण म्हणुन टाकले....ब्राम्हणांनी त्यांना ब्राम्हण करुन संन्यासी बनवले .(शिवरायांची खंत -खेडेकर)


*रामदास हा औरंगजेबाच व आदिलशाहा हेर होता. या हेराच्या सल्ल्यवरुन संभाजी ह औरंगजेबास जऊन मिळाला. रामदह बायकोला पाहून पळाला आणि मग लंगोट कसुन तो रस्तोरस्ती फिरला तर त्यास कोणी मर्द म्हणेल काय ? असा माणुस आठ बायका करना-या मर्द शिवाजीचा गुरू असणे शक्य आहे काय ?असा नामर्द असताही हा रामदास विधवा शिष्यांबरोबर शाही पलंगावर शय्यासोबत करत असे . (शिवरायांची खंत -पान नं.४१-खेडेकर)


*रामदास हा उत्तर भारतातील त्यावेळी असलेल्या मुसलमानी राजवटीत फिरत असल्यामुळे त्याने हिरव्या रंगाचे फकिराचे कपडे घातले . सुंता करुन घेतली. दाढी वाढवली. हातात कमंडलू घेतले आणि आपण मुसलमान संतच असल्याचे ईतरांन भासवले. रामदासाच्या अंगावर मरेपर्यंत म्हणजे १६८२ पर्यंत हेच हिरवे कपडे होते (शिवरायांची खंत -पान न. ५०)


*होळीच्या दुस-या दिवशी धुळवडीच्या गडबडित रामेश्वर भट्ट, मंबाजी भट्ट, सालोमालो भट्ट या रामदासी ब्राम्हणांनी देहू गावातच तुकोबांची निर्घृन हत्या केली व प्रेताचे तुकडे तुकडे करुन इंद्रयणी नदीत बुडवले व फेकून दिले. (शिवशाही पाब नं. ५४).


*प्रथम संत तुकाराम व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांचे नेतृत्व क्रूर कपटी, कर्मठ, कार्यतत्पर देशस्थ ब्राम्हण नारायण सुर्याजी ठोसर ऊर्फ रामदास स्वामी या ब्राम्हणाकडे आले. त्याने प्रथम आपल्या शिष्यांचा पसारा वाढविला. याच शिष्यांचा गैरवपर करून तुकाराम महाराज मार्च १६५० व शिवाजी महाराज एप्रिल १६८० मध्ये त्यांच्या शिष्यांकडुन हत्या घडवुन आनल्य . (योद्धा संत तुकाराम - खेडेकर).


*जगद्गुरू संत तुकाराम महारजांनाही वारकरी धर्मापासुन अलग करण्यासाठी कर्मठ रामदासी ब्राम्हणांनी अत्यंत सुंदर व तरूण ब्राम्हण वेश्या पाठवली ओती . (साहित्यीक युवराज संभाजी राजे - खेडेकर).


*ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी ? त्या सन्याशाच्या मेंदूला परमा रोग झाला होता . (रामद आणि पेशवाई - पान ३७- मा.म.देशमुख).


*औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान हे महारजांचे कट्टर राजकीय शत्रू होते . इत:पर त्यांनी महारजांचा आदर केला . (शिवचरित्र -पान ३१-खेडेकर)


*औरंगजेबाने शिवाजीला राजा ही पदवी सन्मानपूर्वक दिली. ( विश्ववंद्य शिवाजी -पान ६५- खेडेकर ).


*ब्राम्हण पंडित औरंगजेबास दुष्ट, कपटी वगैरे रंगवतात. तरिही त्यांनी शाहू व त्याच्या कुटुंबियातील स्त्री पुरुषांचा इस्लामी-सुलतानी छळ केला नाही. उलट शाहू व त्याच्या परिवारास जेवढ्या सन्मानाने व उदारपणे औरंगजेबासारख्या मुस्लिम शासकाने वागवले तेवढं स्त्री दाक्षीण्य ब्राम्हण पेशवा नारायणराव याने दाखवले नाही.. (शिवशाही -पान ६२-मा.म.देशमुख).


*शिवाजीराजे तत्कालिन मुस्लिम राजे यांचा राजकिय लढा होता,धार्मीक लढा नव्हता. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६५- कोकाटे).


*शिवरायांना हिंदुधर्मरक्षक, हिंदवि स्वराज्य संस्थापक म्हटले जाते, ही शिवरायांची क्रूर चेष्टा आहे. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ७७- कोकाटे).


*शिवरायांचा हिंदु, हिंदवी, हिंदुत्व याचेशी अजिबात संबंध नाही, शिवचरित्रात कोठेही हिंदु, हिंदवी आणि हिंदुत्व याचा उल्लेख नाही.(विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ७७- कोकाटे).


*शिवरायांशी आदिलशहा, इंग्रज पोर्तुगिज यांनी शांततेचे धोरण स्विकारले (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६६- कोकाटे).


* आदिलशहाकडिल ७०० पठाणांची फौज १६५८ पासुन राजांच्या पदरी आली . ते शेवटपर्यंत राजाशी प्रामाणीक होते. १६७२ पासून मोगलांच्या घोडदळातील चार पथके शिवरायांकडे आली. त्यांनि मरेपर्यंत स्वराज्याची चाकरी केली. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६५- कोकाटे).


* (मा. म. देशमुख यांनी आपल्या साहित्यीकाची जबाबदारी या पुस्तकात-पान क्र.३९ वर-० शिवाजी महाराजांना) आठ बायका करनारा मर्द शिवाजी !(असे विशेषने लावून त्यांना स्त्रीलंपट दाखवण्याचा विकृत प्रयत्न केला आहे .)


* पहीला बाजीराव धनाजी जाधवाचा. (साहित्यिकाची जबाबदारी -पान३९- मा.मदेशमुख).


* पेशव्यांच्या (स्त्रीयांच्या) अंतपुरातील पुढचे दार मराठ्यांना नेहमीच मोकळे असे. त्यांच्या उदारपणाला उतराई होण्यासठी मराठे शक्य तितका देह झिजऊन त्यांना संतुष्ट ठेवीत असत......क्सदार पेशवे जन्माला येत असत. (साहित्यिकाची जबाबदारी -पान३९- मा.मदेशमुख).


* .... पंढरिचा विठोबा ? त्या देवस्थानाच्या स्थापनेपासुन लोकांच्या जीवांची, द्रव्याची अ उद्योगाची किती हानी होत आहे . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).


*विठोबाचे हे देऊळ बौद्ध लोकांनी बांधलेले आहे. त्यात बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली होती, जेव्हा बौद्ध धर्मानुयायांचा मोड झाला, तेव्हा आर्य धर्मसंस्थापकांनी हे देऊळ बळकावून त्या मुर्तीला विठोबा नाव दिले . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).


* त्या दैवतांची यात्रेच्या व अनेक रुपाने आमच्या लोकांच्या मागे लावली . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).


* देवळे आता पापाची दूकाने झाली आहेत. त्या देवळांत कोणी जाऊ नये. (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).


*हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व ला जाळा ! (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).


* ढेरपोट्या, देवांची पोटे फोडा त्यांच्या पाठीवर हंटर झाडा. देवाला मारा एक एक जोडा . (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).


*मुंबई ’पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणारे किंवा क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकले तर ’फताके फोडणारे’ , ’पेढे वाटणारे’ प्रत्यक्षात मुसलमान नसतात तर मुसलमानांचा वेष घेवून ते मनुवादी अवलाद राष्ट्रद्रोही कृत्ये करित असतात. वैदीक हिंदु धर्मापेक्षा मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आहेत, ऐदिक हिंदु धर्मात इस्लाम सारकी समानता नाही. इस्लाम स्विकारणा-याला सर्वत्र समानतेचे हक्क मिळतात. इस्लाम राजटीत हजारो भारतीयांना इस्लाम धर्म स्विकारुन भट- ब्राम्हणांच्या धार्मिक व सामजिक जुलूमातून आपली सुटका करुन घेतली. (साहित्यीकांची जबाबदारी -पान४८- मा.म.देशमुख)


* (महाराष्ट्रातील परभणी येथे एका कार्यक्रमात बोलताना मराठा सेवा संघाचे संस्थापक खेडेकर म्हणतात ..) "मी आव्हान करतो की, हुणीही येथे व्यासपिठावर गणपतीचे छायाचीत्र अगर मुर्ती अणून ठेवा. मी ते लाथेने फेकून देतो, पाहूया तुमचा गणपती काय करतो ते ?." (संदर्भ दै.सनातन प्रभात शुक्र. ३० जाने. २००४).


* शिवजयंती, गणपती उतव, रामजन्मोत्सव या सारखे उत्सव तर मुसलमान आणि बौद्ध यांच्या विरुद्ध दंगली घडवून आणण्यासाठी ते आयोजीत करतात . (बहुजन आणि परिवर्तन -पान२२-)


* देवालयापेक्षा शौचालय महत्वाचे . (बहुजन आणि परिवर्तन -पान३३-)


* टिळक, सावरकर, हेडगेवार ही देशद्रोही पिलावळे. (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान६४- कोकाटे).


* रामदास हा औरंगजेबाचा हेर होता . (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान४०- कोकाटे).


* रामदास हा रंगेल व्याभिचारी आणि रंडिबाज होता . (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान४१- कोकाटे).


* महानुभव व नामदेवाचा वारकरी हे दोन पंथ उत्तरोत्तर वाढतच होते. हे ज्ञानेश्वराला पाहावले नाही......बहुजन प्रिय वारकरी पंथात शिरण्यासाठी ज्ञानेश्वर पंधरपूर येथे नामदेव महारजांच्या भेटीस गेले. (साहित्यीकांची जबाबदारी -पान४०- मा.म.देशमुख)


* ज्ञानदेव - तुकाराम - याऐवजी नामदेव असा जयघोष बहुजनांनी केला पाहीजे . (साहित्यीकांची जबाबदारी -पान४०- मा.म.देशमुख)

Sunday, June 3, 2012

चार दोन रुपयाची पुस्तके


आज काही स्वयंघोषीत समाजसुधारक व स्वयंघोषीत इतिहास संशोधक खुप मातले आहेत, स्वत:ला बहुजन समाजाचे पुढारी म्हणवतात पण वास्तवीक नक्की किती टक्के बहुजन समाज यांच्या सोबत आहे हा संशोधनाचाच विशय आहे. हे स्वयंघोषीत इतिहासकार चार-दोन रुपयांची खालीलप्रकारे पुस्तके लिहितात, वास्तवीक ही पुस्तके आमचे दुकाणदार चणे बांधन्यासाठि आणि सकाळी आमच्या माता-भगिणी आपल्या लहाणग्याचे "पुसायला" वापरता... आणि तरीही काही लोक ही पुस्तके चविने वाचतात व स्वत:ला विद्वान समजतात. दुसर्‍याला दोष द्यायचा असेल तर खुप अभ्यास असावा लागतो असे नाही आणि हाच नेमका या लोकांचा प्लस पॉइंट आहे. केवळ अभ्यासहीन विरोध .. मग तो रामदासांन, बाबासाहेब पुरंदरें, संत ज्ञानेश्वर, सावरकर इत्यादी महापुरुशांना करतात. वास्तवीक या महापुरुशांच्या नखाचीही सर या मुर्खांना येनार नाही . यांचे साहित्य म्हणजे केवळ गटार आहे हे वेगळे सांगायला नको.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे .. अशी अनेक उदाहरणे देता येतील ....
आता तुलणा करा, यांचे हे गटार साहीत्य कुठे आणि संपुर्ण भारतात सर्वमान्य झालेले दासबोध आणि ज्ञानेश्वरी कोठे ? तुलनाच होऊ शकत नाही .

पण विरोधाभास बघा कसा आहे, काही लोकांना हे गटारच पसंद पडते. शेवटी त्यांचा ही काय दोष ? तुम्हाला त्या गोचीडाची गोष्ट माहीत असेलच, गोचीड हा किटक असा आहे की जो गाय़ीच्या दुधाच्या थानावरील जखमेवरील केवळ "पू" शोशत असतो, पण तो अमृततुल्य दुधाकडे ढुंकूणही पाहत नाही , त्याचप्रमाणे या गटाररुपी साहीत्यात लोळणार्‍या गोचीडांना हिंदु धार्मातील संमृद्ध ग्रंथांतील अमृत कधीच कळणार नाही.

शेवटी एकच प्रश्न पडतो .. तो म्हणजे हे लोक या चार-दोन रुपयांच्या पुस्तकात रटलेल्या गोष्टी वाचतात आणि मान्य करतात , त्या खर्‍या अथवा खोट्या असा शोध करत नाही .. म्हणजे स्वत:च्या डोक्याचा वापरच करायचा नाही असे ठरवले आहे का या लोकांनी ?