Sunday, June 3, 2012

आरक्षण

आरक्षण !!!

ज्याच्यात क्षमता आहे त्याला आरक्षण दिले अथवा नाही दिले काही फरक पडत नाही, आज ना उद्या तो आपले ध्येय गाठतोच. आणि आरक्षणाची शिडी घेवून वर चढलेले लोक त्याचे बुट चाटतात. 
समाजाच्या उन्नतीमध्ये आवश्यक असलेला घटन आ आर्थीक नसुन महत्वकांक्षेवर अवलंबून आहे .

आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचेच झाले तर सोप्या भाषेत .. काही लोक केवळ जातीयवादी राजकारण खेळ खेळत आहेत व भोळे मराठे त्याला बळी पडत आहेत. thats all. 

चार दोन रुपयाची पुस्तके


आज काही स्वयंघोषीत समाजसुधारक व स्वयंघोषीत इतिहास संशोधक खुप मातले आहेत, स्वत:ला बहुजन समाजाचे पुढारी म्हणवतात पण वास्तवीक नक्की किती टक्के बहुजन समाज यांच्या सोबत आहे हा संशोधनाचाच विशय आहे. हे स्वयंघोषीत इतिहासकार चार-दोन रुपयांची खालीलप्रकारे पुस्तके लिहितात, वास्तवीक ही पुस्तके आमचे दुकाणदार चणे बांधन्यासाठि आणि सकाळी आमच्या माता-भगिणी आपल्या लहाणग्याचे "पुसायला" वापरता... आणि तरीही काही लोक ही पुस्तके चविने वाचतात व स्वत:ला विद्वान समजतात. दुसर्‍याला दोष द्यायचा असेल तर खुप अभ्यास असावा लागतो असे नाही आणि हाच नेमका या लोकांचा प्लस पॉइंट आहे. केवळ अभ्यासहीन विरोध .. मग तो रामदासांन, बाबासाहेब पुरंदरें, संत ज्ञानेश्वर, सावरकर इत्यादी महापुरुशांना करतात. वास्तवीक या महापुरुशांच्या नखाचीही सर या मुर्खांना येनार नाही . यांचे साहित्य म्हणजे केवळ गटार आहे हे वेगळे सांगायला नको.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे .. अशी अनेक उदाहरणे देता येतील ....
आता तुलणा करा, यांचे हे गटार साहीत्य कुठे आणि संपुर्ण भारतात सर्वमान्य झालेले दासबोध आणि ज्ञानेश्वरी कोठे ? तुलनाच होऊ शकत नाही .

पण विरोधाभास बघा कसा आहे, काही लोकांना हे गटारच पसंद पडते. शेवटी त्यांचा ही काय दोष ? तुम्हाला त्या गोचीडाची गोष्ट माहीत असेलच, गोचीड हा किटक असा आहे की जो गाय़ीच्या दुधाच्या थानावरील जखमेवरील केवळ "पू" शोशत असतो, पण तो अमृततुल्य दुधाकडे ढुंकूणही पाहत नाही , त्याचप्रमाणे या गटाररुपी साहीत्यात लोळणार्‍या गोचीडांना हिंदु धार्मातील संमृद्ध ग्रंथांतील अमृत कधीच कळणार नाही.

शेवटी एकच प्रश्न पडतो .. तो म्हणजे हे लोक या चार-दोन रुपयांच्या पुस्तकात रटलेल्या गोष्टी वाचतात आणि मान्य करतात , त्या खर्‍या अथवा खोट्या असा शोध करत नाही .. म्हणजे स्वत:च्या डोक्याचा वापरच करायचा नाही असे ठरवले आहे का या लोकांनी ?
 

धोबीपछाड

गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.

तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्‍याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे “भिडेच” होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल “तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !” असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी “गरळ” ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर “अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?” असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर “लोकमान्य कसला भटमान्यच” असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर “ब्राह्मण” असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत.

आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. “गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!” अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे “द्रष्टे” झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच “आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!” असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?

विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर “लाच” हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की “माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!” अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.

दुसरा मुद्दा येतो समर्थ रामदासांचा. समर्थ रामदासांचे अध्यात्मिक कार्य प्रचंड आहे. ज्याकाळी दुष्काळ, कर्ज, रोगराई यांच्या बरोबरच सुलतानशाहिने जनता पिंजुन गेली होती तेव्हा जे संत जनतेला मानसिक आधार देऊन परमार्थाचा उपदेश करत होते त्यापैकिच एक रामदास स्वामी होते. पण सद्य कालात ते फक्त ब्राह्मण होते हा एक आणि एकच मुद्दा त्यांच्या कार्यावर पाणी फिरवण्यासाठी या संस्थांना पुरेसा आहे. रामदास आदिलशाचे हेर होते असे एकजण म्हणतो दुसरा तेच औरंगजेबाचे हेर होते असे म्हणतो. निदान आरोप करताना तरी एक काहितरी बोलावे?? पण मुळात आरोपच बिनबुडाचे असल्याने ह्यांची जीभ सैल सुटली आहे. इतकी कि समर्थांचे चारीत्र्य हनन करायला - आपल्या स्त्री शिष्यांबरोबर चाळे करणारा “रंडिबाज रामदास” असा गलिच्छ प्रचार हि मंडळी करीत आहेत. यांच्यातले काहि विकृत लोकं दुसरीकडे म्हणतात कि रामदास नपुंसक होते म्हणुनच त्यांनी लग्न केले नाहि आणि म्हणुनच ते मांडवातुन पळुन गेले होते. खरतर समर्थांचे कार्य किती मोठे आहे हे सर्वांनाच माहित आहे तरी त्याचे पुन: पुन: उच्चारण यासाठी करावे लागतेय कि आज गप्प बसलो तर यांच्या विकृत चाळ्यांना अजु चेव येईल. त्यामुळे हे झोपेचे सोंग घेतलेले जागे हॊणार नाहित हे माहिती असल्याने या बिनडोक लोकांकरीता नव्हे तर समाजाला यांचे ढोंगी बुरखे फाडुन दाखवण्यासाठी हा प्रपंच आहे. पुन्हा समर्थांबाबत सांगायचे झाले तर समर्थ जर शत्रुचे हेर असते अतवा भ्रष्ट चारीत्र्याचे असते तर सातार्‍यासारख्या अतिमहत्वाच्या टिकाणचा किल्ला महाराजांनी समर्थांना मठ बनवायला कशाला दिला असता? उलटपक्षी स्वराज्याच्या आसपासहि रामदासांना फिरकु दिले नसते. कींवा रामदास हिन चारीत्र्याचे असते तर महाराजांनी अश्या गुन्हेगारांचे हातपाय कलम करायचा कडक नियम बनवला होता. असे असताना राज्याभिषेका नंतर थोड्याच दिवसांनी समर्थ स्वत: प्रतापगडावर ठोसर घराण्याचा नवस फेडण्यासाठी येऊन गेल्याचा उल्लेख आहे. व त्यावेळी प्रतापगडाच्या किल्लेदारास समर्थांची योग्य ती काळजी घेतली जावी व त्यांना कसलहि कमी पडु देऊ नये अश्या आशयाचे पत्र महाराजांनी लिहिल्याचे समजते. तिच गोष्ट सज्जनगडाची. अजुन एक गंमतीचे गोष्ट “भिक्षा” हा रामदासींचा किंवा संन्याश्यांचा धर्म आहे. दासबोधात तर भिक्षेवर एक वेगळे प्रकरण रामदासांनी सांगितले आहे ते मुळातुन वाचण्यासारखे आहे. असो, तर “भिक्षा” या गोष्टिवरुन यांनी तुकाराम महाराज व रामदास यांना एकमेकांसमोर उभे केले आहे. पण याचा अर्थ यांची बुध्दी कमी तरी आहे किंवा हे मुद्दाम तसे करत आहेत. कारण रामदासंची भिक्षा व तुकारामांची भिक्षा यांत फरक आहे. तुकाराम भिक्षा हा शब्द “भिक” या अर्थाने वापरतात. तर समर्थ कोरड्या अन्नाची भिक्षा हा समाजाच्या प्रत्येक घरा पर्यंत जाण्याचा आणि देवकार्याचा प्रचार करण्याचे उत्तम साधन समजतात. बाकिचे जाऊदे ज्या बुध्दाचे हे लोक गोडवे गाताना ब्राह्मणांवर टिका करतात त्या बुध्दाने देखिल भिक्षा मागावी असेच सांगितले आहे. ह्या दोघांचे जर पटत नसते तर ते एकमेकांना भेटलेच नसते. तुकाराम महाराज व रामदास स्वामी एकमेकांना भेटल्याचा स्पष्ट उल्लेख आहे इतकेच नव्हे तर रामदासांनी तुकारामाची स्तुती करताना “धन्य धन्य तुका वाणी। धन्य धन्य तुझी वाणी।“ असे एक पद लिहिले आहे तर रामदासांनी जे अकरा मारुती थापन केले त्यापैकी एका मारुती साठी तुकारामांनी अभंग लिहिला आहे. या शिवाय शिवराय निधन पावल्यावर “शिवरायाचे आठवावे रुप। शिवरायाचा आठवावा प्रताप।“ हे पत्र त्यांनी शंभुराजांना लिहिलेच होते कि. खुद्द महाराजांना त्यांनी “श्रीमंत योगी” आणि “जाणता राजा” अशी योग्य पदवी देऊन एक दीर्घ पत्र लिहिले होते जे आज प्रत्येक मराठी माणसासाठी शिवरायांचे जिवंत शब्दचित्रच आहे.

आता आपण दादोजी कोंडदेवांबाबत बोलुया. यांचे म्हणणे आहे कि दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते. ठिक आहे ते गुरु नव्हते असे मानले तरी म्हणुन दादोजींचे शिवरायांच्या आयुष्यातले स्थान कमी होत नाहि. शिवरायांनी पंतांना खुप आदराने वागविल्याचे अनेक पत्रावरुन समजते. जेम्स लेनने जे विकृत लिखाण केले ते केवळ कचर्‍यात टकण्याच्या लायकिचे आहे हे १००% सत्य. पण जेम्स लेनने जो विकृतपणा केला त्याचे सगळे दोष ते दादोजी कोंडदेवांचे चरीत्र आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना देतात. मुळात अजुन एक गोष्ट समाजातील लाखो लोकांना माहित नाहि कि हे पुस्तक प्रकाशित होताच शिवराय-जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्यावर जे अतिविकृत लिखाण लेनने केले त्याविरुध्द बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, मेहेंदळे या आणि अश्या जेष्ठ इतिहासकारांनी ऑक्सफर्ड प्रेसला पत्र लिहुन त्याविरुध्द निषेध नोंदवला होता आणि त्याचाच परीणाम म्हणजे ऑक्सफर्ड प्रेसने “आम्हि त्या पुस्तकाचे सर्क्युलेशन ताबडतोब थांबवले आहे!” असा उलट लेखी निरोप यांना कळवला होता. हे सगळे घडत असताना या बेशिस्त संस्थेचे नेते काय विड्या फुंकत बसले होते का? यांना जाग आली तोवर बाबासाहेबांनी कारवाई करुन बघा मी केले मी केले असे अवडंबर माजवले नाहि. तरी यांनी काहिहि जाणुन न घेता किंवा माहित असुनहि मुद्दामच भांडारकर फोडले कारण यांना काहितरी खुसपट काढायचेच होते ते त्यांना मिळाले त्यातुन शिवराय-जिजाऊसाहेब हा तर प्रत्येक मराठी माणासाचा मानबिंदु ! मग काय विचारता? भांडारकरच्या निमित्ताने बाबासाहेबांवर - ब्राह्मणांवर गरळ ओकायला सुरुवात झाली. सुदैवाने समाजातील ९८% लोकांनी बाबासाहेब असे करुच शकत नाहित असा सार्थ विश्वास बाबासाहेबांवर दाखवला. त्यामुळे यांची गोची झाली. यांनाकोणे विचारीनासे झाले. करायचं काय आपली चुल तर जळत राहिली पाहिजे त्यात इंधन काय? बाबासाहेब किती दिवस पुरणार? हा प्रश्न यांना पडला मग मराठा आरक्षणासाठी हे गाड्या जाळत सुटले. कुणबी मराठा एक आहेत मराठा समाजाला अरक्ष्ण द्या म्हणुन आंदोलने करु लागले. कुणबी समाजाने त्याला विरोध केल्यावर तर अजुनच चेकाळले आहेत. शिवाय उलटपक्षी बर्‍याच मोट्या मराठा समाजाचे आणि विशेषत: आजच्या तरुण पिढीचे म्हणणे आहे “कशाला हवेय आरक्षण? आमच्या मनगटात ताकद आहे, स्वत:ची विचार शक्ती आहे!” त्याने ह्यांच्या समोरचे प्रश्न अजुनच कठिण होत आहेत. तरी साप-साप म्हणु भुई धोपटण्याचे काम हे इमाने-एतबारे करीत आहेत. हीच ताकद त्यांनी समाज एकत्र कसा येईल याकरीता लावली तर महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे भले होईल.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायच झालं तर त्यांच्याच नावाने हि ब्रिगेड सुरु आहे. आणि संभाजीराजांना बामनांनी त्रास दिला अशी हाकाटि देऊन समाजात गैर समज पसरवला जात आहे.
महाराजांना एकट्या ब्राह्मणांचाच त्रास झाला होता का? शंभुराजांना पकडुन देणारा गणोजी शिर्के कोण होता? आणि शंभुराजां बरोबर अखेरपर्यंत राहणारा कवी कलष कोण होता? हे बघा आधी. इथे कोणा एका जातीवर मला टिका करायची नाहिये पण एकट्या ब्राह्मणांनी हे केल नाहिये हे सांगताना काहि दाखले देण भाग आहे.

अजुन एक मुद्दा शिवराय काय किंवा शंभु राजे काय यांच्या विरुध्द अफझलखानाच्या अथवा औरंग्याच्या मागे कंबरेला शोभेच्या तलवारी लावुन, आणि अपल्या षंढ मिश्यांना पिळ भरत स्वराज्या विरुध्द उभे राहणारे कोण होते याची यादि बघा आधी. मग ठरवा कि बामणाने चुक केलीये कि या ब्रिगेडच्या पुर्वजांनी? एक मुरारजगदेव काय सापडला शहाजीराजां विरुध्द मोहिम लढणारा, हे भोसल्यांशी सात जन्माचे वैर सांगणार्‍या घोरपडे-सावंतांना विसरले? शहाजी राजांची अफझलने कॊणाच्या मदतीने धिंड काढली होती? हे सांगतात जसवंतसिंहाला स्वत: ब्राह्मणांनी सहस्त्रचंडि करायला मदत केली होती जेणे करुन शिवाजी राजाचे तळपट होईल आणि परत बामनांची सत्ता येईल म्हणुन, पण असे होम-हवन करुन कोणी जिंकत असतं तर महाराजांनी राजगड-रायगडावर राजसुर्य आणि अश्वमेधच करायला हवे होते ना? ब्राह्मण तिथेहि आले असते. हेच म्हणतात दक्षिणेच्या पैशावर हि फुकटि लोकं वाढतात म्हणुन. गागाभट्टाने घेतली होती १ कोट रुपये दक्षीणा वगैरे वगैरे.. मुळात आपण काय बोलत आहोत हेच यांना समजत नाहि. ब्राह्मणांनी जे चांगलं केलय त्या बद्दल हे हरामखोर लोक एक चकार शब्द काढत नाहित उलट झालच तर त्याचे अति विकृत लिखाण करतात.
ह्या लोकांना एकतर स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. मागे आपण काय बोललो होतो काय लिहिलं होत हे साफ विसरतात. एकदा म्हणातात अफझलखानाच्या नावाचा वापर करुन संघ-विहिंप हि लोकं मराठा(हिंदु पण नाहि बर का!) आणि मुस्लिम समाजातील दरी वाढवत आहेत, आणि नंतर मानसिक संतुलन बिघडल्यागत बरळतात कि अफझलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर या बामनाने महाराजांवर तलवार चालवली होती, आता समाजाला कृष्णाजी भास्कराच्या त्या क्रुष्णकृत्याचा विसर पडावा म्हणुन हे प्रतापगडावरील अफझलाच्या कबरीला विरोध करीत आहेत आणि अफझलखानाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत वगैरे वगैरे. आता शेंबडे पोर तरी यावर विश्वास ठेवेल का? आधी सिद्दी जौहराला कोण मदत करत होतं त्यांची नावे बघा. फाजलखानाला जावळीच्या जंगलातुन वाट शोधायला कोणी मदत केली ते बघा. विशाळगडाला मोर्चे लावुन शिवरायांना अडवणारे कोण होते त्यांची नावे बघा दिसतोय एक तरी बामन?


टिळकांवर चिखलफेक करताना “फक्त भटमान्यच” असे विशेषण लावले जाते, बहुदा “लाल-बाल-पाल” ह्या त्रयीने काय घडविले होते हे यांना ठाऊक नसावे. बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव टिळकांनीच सुरु केला होता. टिळकांना इंग्रजस सरकारने हवापालटासाठी मंडालेयात पाठवले नव्हते हे देखिल यांना माहित नसावे. टिळकांना ६ वर्षांची शिक्षा झाली तेव्हा लाखो गिरणी कामगारांनी मुंबईत ६ दिवसांचा संप केला होता जो भारतात इंग्रजां विरुध्द कामगारांनी केलेला “पहिला संप” होता. ते भटमान्य असते तर हे झाले असते का? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सर्व भारताचे “तिलक महाराज” झाले बंगालचे “बडेदादा” झाले ते कसे? काहितरी आचरटागत लिहायच कि झालं??? यांनी भांडारकर फोडल्यावर जेव्हा यांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते तेव्हा एखाद्या दुकानदाराने दुकानाचे अर्धे शटर तरी खाली केले होते काय? आपण कोण आहोत? गल्लीच्या पलीकडे आपल्याला कोणी ओळखतो का? आपला पगार किती आपण बोलतो कीती? याचा विचार न करता फक्त बरळत रहायचं इतकच यांना येतं. हे शिवश्री खेडेकर सर, नरके सर अश्या थाटात लिहितात कि हे कोणा गुरुदेव रविंद्रनाथांबद्दल, लिओ टॉल्स्टॉय बद्दलक किंवा मार्क्स बद्दल सांगत असावेत.

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबद् दल लिहिताना तर यांनी किळसवाणे लिहिले आहे. “संडासवीर सा(डि)वरकर” हि यांची भाषा आहे. सावरकरांनी जे जात्योच्छेदनाचे काम केलेय त्या बद्दल यांना काहिहि घेणे देणे नाहिये कारण ते फक्त ब्राह्मण होते. इतके तर हे कृतघ्न आहेत.

अजुन एक जहरी अपप्रचार यांच्याकडुन केला जातो कि शिवाजी महाराजांचे खरे शत्रु म्हणाजे ब्राह्मणच. शिवाय त्यांच्या वेबसाईटवर महाराज एका ब्राह्मणावर तलवार चालवुन त्याचे शीर उडवत आहेत असे दाखवण्यात येते. पण या मुर्खांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहि या चित्राचा परीणाम म्हणजे ब्राह्मण महाराजांचे नव्हे तर महाराजच ब्राह्मणांचे शत्रु होते असा अत्यंत चुकिचा संदेश समाजात अपोआप पसरवला जातोय. महाराजांचे शत्रु जण ब्राह्मण असते तर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ६ ब्राह्मण कसे? अग्र्याहुन सुटका करुन घेताना नऊ वर्षाच्या आपल्या पोटच्या पोराला एका ब्राह्मण कुटुंबातच का ठेवले? आग्र्याहुन सुटका झाली तेव्हा पाठीमागे जे दोन ब्राह्मण फुलादखानाला मिळाले त्यांचे केवळ अमानुष हाल केल्यावरहि महाराज कसे निसटले या बाबत त्यांनी अवक्षरहि काढले नाहि. पुढे ते सुटुन आल्यावर महाराजांनी त्यांचा फार आपुलकिने सत्कार केला होता. संभाजीराजां बरोबर शेवटपर्यंत कोण होता? कवी कलशच ना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातली “थोरली मसलत” म्हणजेच दिल्लीवरचा हक्क बाजीरावानेच प्रस्थापित केला ना?

इतकी विकृत विचारसरणी वापरताना ते दुसर्‍या बाजुला आपले म्हणणे मांडण्यासाठी शिवराय, संभाजीराजे, आंबेडकरांचे नाव घेतात हे अजुन क्लेषदायक आहे.