Tuesday, July 16, 2013

शिवजयंतीच्या उत्सवाला प्रत्यक्ष शिवरायांना आमंत्रीत केले, तर आजची परिस्थिती पाहून शिवाजी महाराज आपल्याला काय म्हणतील ?
काय ? आज तिनशे वर्षानंतर मला, शिवाजीला, तुम्ही मराठ्यांनी जे बोलाविलेत, माझा वाढदिवस साजरा करण्याकरिता म्हणून मोठ्या गाजावाजाने आमंतत्रिलेत ते काय माझी अशी संभावना करण्याकरिता ? युद्ध , लढाया, सेना, भगवे झेंडे, ताशे, ढोल, केवढा गाजावाजा आणि केवढा गोंधळ तुम्ही करीत होतात. ऐकुन मला वाटते की, तुम्ही मला जे बोलावता आहात ते अर्थात कोणता तरीमहान पराक्रम करुन दाखविण्यासाठीच होय. तिनशे वर्षांनी का होईना पण माझ्या मागे माझे घालविलेले राज्य परत जिंकून ते माझ्या चरणि अर्पण करण्याकरिताच तुम्ही मला आमंत्रिले असुन असाल, ह्या रणगर्जणा आणि कोलाहल चालविला असाल !

पण पाहतो तो काय ? नाट्यगृहात चाललेले एखादे नाटक यापेक्षा अधीक रंगते ! हे लोक सरड्यावर बसुन स्वार्‍या करीत आहेत. पिंडीवर पोट भरु पाहत आहेत, जिभेचे पट्टे फिरवीत त्या पटाईत धारकर्‍यास घाबरवू इच्छीत आहेत, युद्धाच्या भातुकली खेळत आहेत. स्वतंत्र्य, युद्ध, स्वारी, कूच या शब्दांचीच नव्हे तर या वाचाविरांनी माझ्या शिवाजी या नावाची देखिल इतकी विटंबना केली आहे की , त्याचा आता कोणास काडीचा देखील धाक वाटत नाहीसा झाला.

माझे नाव घेताच अगदी साठ पासष्ठ वर्षापुर्वी देखील माझे शत्रू चमकून उठत. त्यांना वाटे शिवाजीचे नाव म्हणजे रणदेवतेचा जाज्वल्य मंत्र आहे. जर का ते हिंदुस्थानात उच्चारू दिला, जर कोणास त्याच्या चित्रची मिरवणूक काढायला दिली  वा त्याचा जयजयकार करु दिला तर न जाणो, आपले गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी हिंदु तरूण तानाजी, बाजीसारखे शिर हातावर घेवून शत्रुवर तुटून पडेल ! म्हणुन ते नाव कोणत्याही काणाकोपर्‍यात ऐकताच माझे शत्रु चिडून जात, भिऊन उठत. त्या चाफेकराने माझ्यावर एक कविता रचुन म्हटली तर केवढी खळबळ उडाली , माझे उत्सव भयंकर अपराध ठरले. माझ्या नावास उच्चारण्याची बंदी झाली. पण हाय हाय !! माझ्या नावाअस तुमच्या करंट्या जिभेचा स्पर्श होताच त्यातिल ति खरी जादू आज निघुन गेलेली दिसत आहे. दगडावर ठिणगीचा जसा काही परिणाम होत नाही तसा आजकाल या मुर्दाड महाराष्ट्रावर माझ्या नावाचा काही परिणाम होईनासा झाला. पुर्वी शत्रुस वाटत होते की महाराष्ट्र हे दारुचे कोठार, त्यावर ही शिवाजिंच्या स्मृतीची ठिणगी पडणे नको, पण आता त्यांना कळून चुकले आहे की हे दारुचे कोठार राहिलेले नसुन नाल्याची घाणेरडी दलदल झाली आहे. शिवरायांच्या जळत्या नावाने ही दलदल पेटणे तर दुरच, पण उलट त्या नावातील जळती ठिणगी तिवर पडताच ती ठिणगीच विझण्याचा पक्का संभव. म्हणुन हे वाचावीरांनो तुम्हास आता माझ्या नावाचे जयजयकार वाटेल तितके करु देण्यात येतात. कारण माझ्या नावाने तुमच्या मुर्दांड मनात एक कर्तव्यशील चेतना उत्पन्न होणे अशक्य झाले आहे. त्या योगे  माझ्या नावाचा दरारा ही नाहीसा होऊन माझे शत्रु देखील माझ्या नावाशी विषारी दात काढून टाकलेल्या सापाशी, गंमतीने खेळावे तसे खेळत आहेत.

दगडांनो ! तुम्ही माझा, या शिवरायांचा देखिल एक दगड करुन टाकलात ! राखेत टाकलेली आहुती जशी निष्फळ  होते, प्रेताला बांधलेली तलवार जशी प्रेतासारखीच पडून राहते, तसा हा माझा ह्या पुण्यक्षयी, क्षयग्रस्त पुण्यास उभारलेला पुतळा दगडासारखा एक दगडच होऊन पडला आहे आणि एखाद्या साध्या दगडाची जितकी३भिती वटच्या चोरास वाटते, तितकी देखील त्या माझ्या पुतळ्याच्या दगडाची भिती त्यास वाटत नाही. कारण तुमचे हे लुळे हात, हे पंगु पाय , ही मुर्दाड मने ! ह्या माझ्या दगडी पुतळ्यांच्या दगडाइतका देखील उपयोग करुन घेत नाहीत. 
म तुम्ही मला बोलाविलेत तरी का ? केवळ माझी विटंबणा करण्यासाठी ? ज्या प्रतापगडावर मी अफजुलखानाचे शिर टांगले आणि शरुचा दहा हजार घोडा पाडाव करुन बांधुन टाकला- त्या प्रतापगडावर खानाची समाधी व्हावी ! थडगं व्हावं !  कुलस्वामिनिच्या मूर्तीस गदागदा हलवून सोडावे आणि त्या गडाच्या आजुबाजुस पसरलेल्या हजारो हिंदुंनी बांगड्या भरुन, लुगडी नेसुन पोलिसांच्या  पाया पडत फिरावे . आम्ची देवी लुटली ! थू: तुमच्या जिनगानिवर ! थू: तुमच्या जिनगानिवर !

माझ्या देशबंधुंनो, माझे तुमच्यावर अतिशय प्रेम आहे. ह्या माझ्या हिंदुस्थान देशासाठी आणि हिंदु जातीसाठी मी अनेकवार माझे प्राण धोक्यात घातले ,जन्मच्या जन्म कष्ट काढले, म्हणुनच मला तुमचे काही चुकत असेल तर ते कडवटपणे सांगण्याचा अधिकार आहे. यास्तव्मी स्पष्टपणे सांगतो की, तुम्ही माझ्यावर प्रिती करता याचा मला मुळीच संरोष वाटत नाही. तोवर केव्हाही वाटणार नाही की, जोवर तुम्ही या माझ्या मातृभुमीच्या उद्धारार्थ  आणि हिंदु जातीच्या गौरवार्थ काही मिळत नाही, त्याग आणि शत्रुला धाकविणारे धाडस दाखवीत नाही आणि नुसती माझी स्तुतिस्तोत्रे गात बसता.

अरे शिवकालीन इतिहास मला माहीत आहे; तुम्हाला माहीत आहे त्याहून शतपटीने मला माहीत आहे. तुम्ही तुमच्या काळी कोणता बंब वाजवला ते मला सांगा. मी पुर्वीचा विगत शिवाजीराजा त्यंना इतका आवडतो की, त्यांना दुसरा एखादा नवीन शिवाजी राजा उत्पन्न व्हावा ही इच्छा देखील असहाय्य होते. जो गुण आमच्या शिवकालीन कादंबर्‍यात साहस होतो, तोच प्रस्तुत कालातील एखाद्यात दिसताच तो माथेफिरू अत्याचार ठरतो.

देवा ! या माझ्या शिवकालीन स्तुतीपाहकांपासुन माझे रक्षण कर. मी मागचा शिवाजी शिवाजीराजा  त्यांना इतका आवडतो आहे की नविन शिवाजी महाराज उत्पन्न होण्याची इच्छा देखील यांना असहाय्य होते.


तुमी म्हणाल की एखाद्या ओसाड किल्ल्यावर दुडूदुडू धावुन येणे. लाडूच्या जेवणावळी झोडणे आणि माझ्या इतिहासांच्या संशोधनाचे भारुडाचा मला नैवेद्य अर्पिणे यापलिकडे या परिस्थितित अधीक काही  पराक्रम करुन दाखवणे तुम्हांस अशक्य होते. तर मी म्हणत जोवर मुर्दाडपणाचे प्रतिबिंब असणारी ही परिस्थिती आहे तोवर या पुढे तुम्ही नका बोलवण्याचा मुर्खपणा तरी करु नये. हा तुमचा कार्यक्रम ज्यांच्या उत्सवाला शोभेल  अशा दुसर्‍या कोनाचा तरी करा. पळपुट्या दुसर्‍या बाजिरावाचा उत्सव करित जा. त्याला किल्ल्यावर हल्ला करण्याची धमक नव्हती. त्याला तुमच्या या दुडूदुडू धावत जाण्यायेण्याचे देखील आश्चर्य वाटेल. परक्यांचे झेंडे आपल्या राजवाड्यावर उडत असताही लाडुंचा नैवेद्य तो खाईल. मी फक्त राज्यरोहणाच्या दिवशी तेवढा लाडूस शिवतो. तो दिवस येईल तेव्हा मला बोलवा ! सिंहाला आमंत्रण देवून पानात गवताच्या पेंढ्या सोडण्याचा मुर्खपणा तरी करु नका.

मिही रामायण ऐके. पण आजीबाईसारखे तांदुळ घेवून जन्मभर तेच नुसते ऐकत बसत नसे किंवा मेलेल्या रावणास प्रतिवर्षी नाटका पोवाड्यातुन मारत बसत नसे, तर मी त्या वेळच्या जिवंत रावणास , रामायण ऐकताच मारुन धावे !  मी अफजुल्ल्यास मारले, शाहिस्त्यास चिरले, पाच पातशाह्या धुळीस मिळविल्या ! रामायण ऐकताच रामासारखे पराक्रम केले. नुसत्या रावणाच्या दहा तोंडास विस मिशांस केस किती होते, आणि मारुतीच्य उड्डाणाच्या वेळी जी रेती वर उसळली तिच्यात कण किती उसळले ? त्याचे ऐतिहासीक संशोधन करत बसलो नाही. अवनतीच्या भयंकर गर्तेत समुद्रावरुन उडी घेतली आणि शत्रुई लंका जाळून भस्म केली.

तसे काही करा तर तुम्ही माझे नि मी तुमचा ! अरे माझे नाव गल्लोगल्ली  गाणार्‍या तुम्हा मुर्दाड महाराष्ट्रियांपेक्षा आज जे माझे उत्सव-बित्सव कधी फारसे करिन नाहीत तो गुजरात मला तुमच्याहुन फार जवळ वाटत आहे, कारण माझ्या हिंदु जातिच्या उद्धारार्थ माझ्या सैनिकाला शोभेल असे काही तरी साहस ते मधुन मधुन तरी करत आहेत. जो माझ्या या कुलाचा, वंशाचा उद्धार करण्यासाठी संकटावर  चाल करुन जाऊन त्याचा शिरच्छेद करतो तो माझा मुलगा. मग त्यास माझी नक्की जन्मतिथी कोणती ते जरी माहीत नसेल तरी चिंता नाही. पण जो माझ्या घराची इकडची काडी तिकडे करित नाही, तर चोर घरात वावरत असता तोंडावर बुरखा ओढून माझे बाबा, माझे बाबा ! माझे महाराज ! माझे महाराज ! म्हणुन नुसती माझीच माळ जपत बसतो तो माझा मुलगा नव्हे. तो पोटी आलेला जंतू होय !

मी विचारतो माझे राज्य कुठे आहे ! माझा मुकुट कोठे आहे ? ही आम्हा हिंदुंची भुमी, हा समुद्र यांच्यावर स्वमित्व कोणाचे आहे ? का आहे ? माझ्या अंगाची लाही लाही होत आहे ! विचारू तरी किती ? कसे ? या प्रश्नांची विचारलेल्यांची अणि न विचारलेल्यांची उत्तरे द्या. परिस्थिती बदलली असे.

तर माझ्या मशालीने नसेल तर विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाने नविन मार्ग काढा. नविन योजा. मी देखील साधने बदललीच. पण माझ्या काळचा रावण मारला ! तुम्ही साधने बदला. नविन वैध पवित्रे टाका . काय वाट्टेल ते करा- पण झुंजा जिंका. आणि जोपर्यंत तुम्हांस  जसे काही करता येत नाही, वरील प्रश्नांस उत्तर देववत नाही, तुम्ही एक वा अनेक शिवाजी उत्पन्न करत अही. तोवर महाराष्ट्रियनांनो तुम्हास माझी शिवाजी राजांची शपथ आहे की , माझे पोवाडे तुम्ही गाऊ अका, तुमच्या सारख्यांनी नव्हे तर माझ्यासारख्या शुरमर्दाचा पोवाडा , शुर-मर्दाने गावा !
अनुस्मरणाने नव्हे, तर यथाकाल अनुसरणाने गावा ॥
बहुत काय सांगणे ? तुम्ही सुज्ञ असा !!

- सोर्स . हिंदुराष्ट्र सेना

1 comment:

  1. Sanket shelar

    राजे छत्रपती समुद्र

    ReplyDelete