Thursday, April 11, 2013

गोब्राम्हणप्रतिपालक : अर्थ व अनर्थ


                 जेव्हा एखाद्या अंतर्गत समाजाबद्दल मनामध्ये पुर्वग्रह ठासलेला असतो त्यावेळी तो पुर्वग्रह हा डोळ्यावर चढलेल्या झापळाप्रमाणे काम करतो. समोर असणारे ढळढळीत सत्य त्यामुळे पुर्णपणे दिसु शकत नाहि व असे दिसणारे अर्धसत्य हे असत्या पेक्षा घातक असते याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा येतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास, कारणमिमांसा  करायचा असेल आणि ती गोष्ट ऐतिहासीक असेल तर त्या गोष्टीबद्दल कारणमिमांसा करताना आजच्या काळात लागू होणारी परिणामे गतकाळाला लागु करुन जत कोणी कारणमिमांसा करत असेल तर तो व्यक्ती अशी कारणमिमांसा करण्यास अजुन लायक झाला नाही असे समजले जाते. कारण एखादी गोष्ट एखाद्या पर्टीक्युलर काळामध्ये वेगळ्या अर्थाने वापरली जाऊ शकते किंवा त्या गत काळामध्ये त्या गोष्टीची परिभाशा वेगळी होत असली पाहीजे असा दृष्टीकोण समोर ठेवून गतकाळाच्या सामाजीक, ऐतिहासी आणि माणसीक परिस्थिति लक्षात घेवुन त्या त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि यालाच "ऐतिहासिक अभ्यास" किंवा अशि योग्य परिमाने वापसुन इतिहासाचा अभ्यास करणार्‍यालाच "इतिहास अभ्यासक" असे म्हटले जाते. आणि अशा पद्धतीले केला जाणारा अभ्यासही चिरकाळ टिकतो आणि अभ्यास करणाराही. अब्यथा आज नव नविन असणारे नसणारे शोध लावून स्वत:ला इतिहास अभ्यासक अथवा इतिहास संशोधक म्हणवून घेणारे , झटपट प्रसिद्धीची हाव सुटलेले स्वयंघोषीत इतिहास अभ्यासक आपल्याला आज गल्लो-गल्ली भेटतील परंतु असा अभ्यास आणि अभ्यासक हा क्षणीक असतो हे ते लोक विसरतात.

                    वरिलप्रमाणे तत्कालीन परिस्थितिचा अभ्यास न करता , आजच्या परिस्थितिची परिमाने गतकाळाला लावून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी गतकाळातील अनेक गोष्टिंबद्दल आपण कोड्यात पडतो. उदा. "गो-ब्राम्हण-प्रतिपालक" हा शब्द ! आज आपल्याला या शब्दाचा अर्थ अनेक स्वयंघोषीत इतिहास अभ्यासक गाई आणि ब्राम्हणांचा प्रतिपाळ करणारा असा सांगीतला जातो. याच्या पुढे जाऊण ते लोक हा शब्द नाकारतात कारण त्यांचा प्रतिवाद आहे की शिवराय हे फक्त गाई आणि ब्राम्हणांचा प्रतिपाल करणारे होते का ? तसेच याच्या ही पुढे जाऊन हे लोक शिवरायांना "बहुजन प्रतिपालक" वगैरे बिरुदे लावतात . कारण त्यांना गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द "संकुचीत" व "जातिवादी" (एका जातीचा उदो उदो करणारा) असा वाटतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन परिस्थितिचा अभ्यास न करता किंवा एखाद्या पर्टीक्युलर जातीच्या द्वेशाची झापळे डोळ्यावर असता काय होते हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.   

              तत्कालीन परिथिति काय सांगते ? : इ.स. ७११ पासुन हिंदुस्थानवर इस्लामची पहिली स्वारी झाल्यापासुन पुढे जवळ जवळ ९०० वर्षे भारतभर इस्लामी पाशवी अत्याचार कोणत्या पद्धतीने इथल्या हिंदुंवर अत्याचार, लुटालूट , मंदिर-विहारे-गुरुद्वारे यांचे विध्वंस , बाटवाबाटवी करत होते हे सांगत बसण्यात वेळ खर्च करत नाही. आणि हा विषय इथे घेण्याचे कारणही नाही. जणावरांमध्ये सर्वात दुबळा अथवा गरिब असा समजला जाणारा प्राणी व  हिंदुंना पवित्र असणारी गाय ! हिंदुंचा स्वाभिमान दुखवण्यासाठी मुसलमान गाईंची कत्तल करत , व पुढे गौमांस हे मुसलमानांचे आवडते अन्न झाले. त्याचप्रमाणे हिंदु धर्मामधे "धर्म" वाचवण्यासाठी आग्रेसर असलेला ब्राम्हणवर्ग असल्यामुळे या वर्गावर मुसलमान लोकांचा नेहमीच डोळा होता कारण धर्म टिकवून ठेवणार्‍या समाजाचे खच्चीकरण केले असता इतर लोकांचे खच्चिकरण व्हायला सोपे जाते हा माणसशास्त्राचा अगदी सुरवातीचा नियम आहे. थोडक्यात हिंदु धर्मियांचे माणसिक खच्चीकरण करण्यासाठीचे मुसलमानांकडून जे प्रयत्न होत होते त्यामद्ये मुसलमानांद्वारा गोमांसभक्षण व ब्राम्हण समाजाची बाटवाबाटवी त्याचप्रमाणे मंदीरांची लुटालूट , जाळपोळ व मंदिरे उध्वस्त करणे अशाप्रकारची निति होती. आक्रमक मुसलमानांच्या दृष्टीकोणातुन विचार करता त्यांना इस्लामचा प्रचार करायचा होता, इथल्या भारतियांपुढे दोनच मार्ग होते एक म्हणजे इस्लामचा स्विकार आणि दुसरे म्हणजे मरणला कवटाळणे मग आवश्यक नाही की तो हिंदुच असला पाहीजे  मुसलमानांच्या दृष्टीकोणातुन इतले बौद्ध , जैन, शिख, पारसी हे सर्व शत्रु म्हणजे काफीर होते.  या सर्व समाजातील धर्माचा धागा जिवंत ठेवणारा जो "पुरोहितवर्ग" तो त्या काळातील आक्रमक मुसलमानांच्या प्रमुख टार्गेट होता. 

            अशा परिस्थित ९०० वर्षानंतर उदयास येणारे एकमेव हिंदुंचे / भारतीयांचे सिंहासण निर्माण करणारे छत्रपती शिवराय असतील तर अशा शिवरायांना "गो-ब्राम्हण-प्रतिपालक" अशि उपाधी कोणी देत असेल तर ती अतिशय योग्यच आहे. ज्या पशुंना आणि ज्या सर्व समाजातील पुरोहीत वर्गाला आक्रमकांनी प्रामुख्याने टार्गेट केले आणि त्यामुळे तब्बल ९०० वर्षे ज्या हिंदु/ भारतीय समाजाचे खच्चिकरण होत होते त्याला शिवरायांच्या छत्राने आधार मिळाला. यासाठी अनेक तत्कालीन मान्यवरांनी शिवरायांना गोब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी लावली आहे आणि शिवरायांनीही ती सन्मानाने स्विकारलेली आहे. आता पुढे आपण तत्कालीन एक एक पुरावे पाहू जिथे हा शब्द वापरला गेला आहे , कोठे हा शिवरायांसंदर्भात आहे कुठे धर्मासंबंधी आहे. 

१) आज्ञापत्र  : शिवरायांच्या दरबारातील आमात्य श्री रामचंद्रपंत आमात्य. यांनी शिवाजी महाराज , संभाजी महाराज व राजाराम महाराय यांचा काळामध्ये निष्ठेने स्वराज्याची सेवा केली . असे आमात्य आपल्या "आज्ञापत्रा"मध्ये म्हणतात..
                
सिंहासना रुढ होऊन छत्र धरुन (शिवराय) छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करुन देव-ब्राम्हण संस्थानी स्थापून यजन यजनादि षट्कर्मे वर्णविभागे चालिविली तस्करादि आन्याई यांचे नाव राज्यांत नाहीसे केले. (आज्ञापत्र)

आमात्य म्हणतात शिवरायांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन धर्मोद्धात केला देव ब्राम्हण मंदीरे यांची संस्थाने स्थापून त्याठीकाणी योग्य कारभार चालावा यासाठीचे नियोजन केले.

२) सभासद बखर : आतपर्यंतच्या सर्व बखरिंमध्ये सर्वात विश्वासार्ह माणली जाणारी बखर म्हणजे सभासदांची बखर.  बखरिच्या सुरवातीलाच सभासद म्हणतात "रत्रौ श्री शंभुमहादेव (शहाजी राजांच्या) स्वप्नात येऊन प्रसन्न होऊन बोलीला जे "तुझ्या (शहाजी राजे) वंशात आपण अवतार घेवु, देव-ब्राम्हणांचे संरक्षण करुन म्लेंच्छांचा क्षय करतो" याच आर्थ असा की भगवान श्री शंकर शहाजी राजांच्या स्वप्नात येवुन दर्शन देताव व म्हणतात की आपण तुझ्या वंशात वतार घेवुन देव-ब्राम्हणांचे संरक्षण व म्लेंच्छांचा क्षय करतो. याठिकाणी दृष्टांत वगैरे अतिशयोक्तीचा भाग बाजूला ठेवुन तत्कालीन समाजस्थितिचा विचार केला असता सभासदांनी याठिकाणि "देव-ब्राम्हण" यांचे संरक्षण आणि म्लेंच्छ , म्हणजे मुसलमान यांचा क्षय करण्यासाठी शिवरायांचा जन्म होणार असल्याचे सांगतात. वर सांगीतल्याप्रमाणे तब्बल ९०० वर्षे देश आणि धर्म इस्लामी आक्रकमांकडून भरडला गेल्या नंतरची सामाजीक परिस्थिति काय असेल याचा विचार जर केला तर सभासर्दांनी याठिकाणि वापरलेले  हे दोन्ही शब्द किती बरोबर आहेत हे पटून जाते.

३) शिवबावनी : कविराज भुषणाच्या  शिवबावनी नावाच्या अत्युत्कृष्ट काव्यामध्ये भुषण एके ठीकाणी म्हणतात..

        राखी हिंदुवानी हिंदुवान कोतिलक राख्यो ।
स्मृती पुरान राखे वेद विधी सुनि मे ।
राखी रजपूती राजधानी राखी राजन की,
धरा मे धरम राख्यो , राख्यो गुन गुनी मे ॥

म्हणजे महाराज शिवराय, मुगल दल संहारक अशी आपली तलवार धन्य आहे, खरोखरच या भगवतीच्या कृपेमुळेच शिवरायांच्या रुपात हिंदुंचे हिंदुपण व त्यांच्य धर्मशास्त्राचे रक्षण झाले आहे . 
त्याच्याच पुढच्या पदात कविंद्र पुढे म्हणतात..

वेद राखे विदित पुरान राखे सारयुत,
राम नाम राख्यो श्रुती रसना सुधर मे ।
हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहीन की,...
...
देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर मे.

म्हणजे , शिवरायांनी वेद-पुराण यांचे रक्षण केले. हिंदुंची शेंडी वाचवली, 


४) शिवराजभुषण : कविराज भुशनांचाच हा ग्रंथ . कविराज भुषण औरंगजेबाच्या तोंडावर "शिवबावनी" सांगुन तडक महाराष्टार शिवरायांकडे आहे व शिवरांच्याच आज्ञेने त्यांनी शिवभारत नावाचा उत्कृष्ट असा काव्यमय ग्रंथ लिहिला या ग्रंथात कवि  भुषण काय म्हणतात पाहू...

छत्रनिकी यह वृत बनाई । सया तेरा की खाई कमाई ॥
गाई वेद विप्रन प्रतिपाल्र । घाऊ एक धारिन पै घाले

म्हणजे, क्षत्रियाची ही वृत्तीच बनलेली आहे की सदैव तरवारीने कमावून खावे. गाई , वे, विद्यांचा प्रतिपाळ करावा, आणभाक घेवुन शत्रुंना जखमा कराव्यात.

५) आता पुढील, म्हणजे पाचवा आणि सर्वात महत्वाचा पुरावा पाहू, तो म्हणजे शिवभारत कविंद्र परमामंदांनी लिहिलेले संस्कृत मधील हे कव्य शिवरायांनी स्वत: ऐकुन शिवभारतासारखे काव्याची निर्मिती केल्याबद्दल योग्य बक्षीसही दिले आहे, थोडक्यात या ग्रंथाचे प्रूफ रिडिंग शिवरायांनी केले आहे आणि ते शिवरायांना आवडले असे म्हणायला काहीच हरकत नाही. अशा या शिवभारतामध्ये कविंद्र काय म्हणतात पाहू,,.

* कविंद्र परमानंद शिवभारतामध्ये श्लोक अध्याय १ , श्लोक क्र. १५ मध्ये शिवरायांना गौरवताना "देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तक:" म्हणजे देव ब्राम्हन व गाई यांचा त्राता  व दुर्दम्य यवनांचा कर्दनकाळ असे म्हनतात.

* त्याचप्रमाणे ...
देवानां ब्राम्हणांनां च गवां च महिमाधिकम ।
पवित्राणि विचित्राणि चरित्राणे च भुभूजाम ॥ (अ.१. श्लोक. ३९)
अर्थ :- देव ब्राम्ह आणि गाई यांचा महिमा आणि राजांची  पवित्रव अद्भुत चरित्रे ज्यात वर्णिलि आहेत (असे शिवरायांचे चरित्र)...

* मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन सामाजीक परिस्थितिचे आवलोकन झाल्याशिवाय इतिहासाचा अभ्यास पंगु असतो अशा अभ्यासामुळे इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण होऊन इतिहास विकृतीच्या मार्गावर जायला  लागतो. कवि परमानंदानी तत्कालीन परिस्थितीचे वर्णत शिवभारतामध्ये अतिशय थोड्या शब्दात आणि परिपुर्ण असे केले आहे ते पुढीलप्रमाणे (याठिकाणी संस्कृत श्लोक न देता सरळ त्यांचा अर्थ देत आहे) " देवांचे कोणी आवाहन करे नासे झाले आए, अग्नित कोणी हवन करत नाही (यज्ञ होत नाहीत) , वेदांचेही अध्ययन सुटले आहे, ब्राम्हणांचा आदरसत्कार बंद झाला आहे. सत्रे आणि यज्ञक्रिया यांना फाटा मिळाला आहे, दाने आणि व्रते संपुष्टात आली आहेत.  सज्जनांस दु:ख होत आहे; धर्मनिर्बंध मोडले आहेत. म्लेंच्छ धर्म वृद्धी पावत आहे. गाईंची हत्या घडत आहे.साधुंचा नाश होत आहे. क्षत्रीय लयास चालले आहेत. अशाप्रकारे यवनांपासुन  मोठे भय निर्माण  झाले आहे " (अ.५ श्लोक  ४० ते ४३ ) कविंद्रनि आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये वरील गार्‍हाने पृथ्वि विष्णूकडे मांडते आहे अशाप्रकारे मांडले आहे, या पृथ्विच्या गार्‍हाण्यावर भगवान विष्णूचे उत्तर  रंगवताना कविंद्र म्हणतात..

"मी पृथ्विवर धर्माची शाश्वत मर्यादा स्थापण , यवनांचा उच्छेद, देवांचे रक्षण करिन , यज्ञादी क्रिया पुन्हा सुरु करीन , गाई व ब्राम्हण यांचे पालन करिन ."  (अ.५ श्लोक  ५५ ते ५७ )  
आणि याठिकाणि परत एकदा आठवण करुन देतो शिवभारत हा एक असा ग्रंथ आहे की ज्याचे प्रूफ रिडिंग स्वत: शिवरायांनी केले आहे. 
अशाप्रकारे शिवभारतामध्ये ठिकठिकाणी आपल्याला शिवरायांना "गोब्राम्हण प्रतिपाल", गाई ब्राम्हण यांचा प्रतिपाळ करणारा , म्लेंच्छांचा नायनाट करणारा अशा उपाध्या लावल्या आहेत. वरिल दोन तिन श्लोक केवळ  उदाहरणादाखल आहेत म द्यायचेच झाले तर संपुर्ण शिवभारत एक पुरावा म्हणुन देता येईल.

६) आता आपण शिवरायांचे पुत्र संभाजी महाराजांकडे वळू.. संभाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्शी "बुधभुषण" नावाचा संस्कृत ग्रंथ रचला, यामध्ये संभाजी महाराजांना गोब्राम्हणप्रतिपालक या उपाधिविषयी काय वाटते हे श्लोक क्र. ५५४ स्पष्ट होते ते पुढीलप्रमाणे
सुराणां भुसुराणां च सुरभीणां च पालनाम ।
युगे युगे च ये धर्मास्तेषु धर्मेषु ये द्विजा ॥ (बुधभुषण ४७३)
अर्थ :- देवांना, सर्व विद्वानांना तसेच श्रमण ब्राम्हणांना व गाईंना अभय द्यावे, पालन करावे, युगायुगामध्ये जे धर्म झालेले आहेत त्यामध्ये (त्या धर्मामध्ये ) हे द्विज होते.  

पुढे गाय आणि ब्राम्हण यांचे महत्व सांगताना स्वत: संभाजी महाराज बुधभुषण ५१७ मध्ये म्हणतात...

संभाव्यं गोषु संपन्नं संभाव्यं ब्राम्हणे तप: ।
अर्थ :- गाइंच्या मुळे संपन्नता लाभू शकते, ब्राम्हणांच्यामुळे तपसाधना होऊ शकते.


याच्याही पुढे कोणता क्षत्रीय श्रेष्ठ हे सांगताना बुधभुषण ५५४ मध्ये म्हणतात...
अधीत्व वेदान्परिसंस्तीर्य चाग्निनिष्ट्रा यज्ञै: पालयित्वा प्रजाश्च ।
गोब्राम्हणार्थे शस्त्रपूतान्तरात्मा हत: संग्रामे क्षत्रीय: स्वर्गएति ॥
अर्थ :  वेदांना वाचून, अग्निदेवतेस यज्ञ करुन इच्छा धरुन प्रजेचे गोब्राम्हणासह निट पालनपोषण करुन , अंतरात्मा शस्त्राने पालन करुन, संग्रामामध्ये मारला गेलेला क्षत्रीय स्वर्गात जातो.



सध्या जाणिवपुर्वक पसरवला जाणारा समज की "गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द जातवाचक आहे " या आक्षेपाचे उत्तर त्या स्शब्दातच आहे असे म्हणता येईल.  "गोब्राम्हण" मध्ये ब्राम्हणाच्याही आधी गाय आहे , आणि गाय हा पशु आहे तो कधी ब्राम्हण अशु शकत नाही. वरील सर्व पुराव्यामध्ये गोब्राम्हण हा शब्द कोठे ही जातवाचक किंवा केवळ एका जातीला उद्देशुन म्हटले गेलेले नाही आणि तसे होऊही शकत नाही . अनेकांनी शिवरायांना गोब्राम्हणप्रतिपालक अशी उपाधी लावून शिवरायांचा गौरव केला आहे. आणि या उपाधीला शिवरायांचीही हरकत नव्हती हे आपल्याला शिवभारताच्या उदाहरणावरुन लक्षात येते, मग जी उपाधी शिवरायांना अमान्य नव्हती ती उपाधी शिवरायांपासुन बाजुला करणारे तुम्ही आम्ही अर्धवट पुस्तके वाचलेले पुपटसुंभ कोण ? आपल्याल काय अधीकार ?
  शिवरायांच्या गोब्राम्हणप्रतिपालक या उपाधीचा तिरस्कार शिवरायांचेच नाव घेणारे करत आहे, जो शब्द संभाजी महाराजांना मान्य होता , त्याच संभाजी महाराजांच्या नावाने ब्रिगेड काढणार्‍यांनी तो नाकारला . का ? कारण "त्यांना" हा शब्द / हि उपाधी जातिवाजक वाटते , पण ही उपाधी नाकारणारे आपण कोण ? हा प्रश्न त्यांना पडला नसेल का ? सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे गोब्राम्हणप्रतिपालक हे बिरुद जर कोणाला जातिवाच वाटत असेल तर तो त्या व्यक्तीचा प्रॉब्लम आहे, अशांनी स्वत:चा अभ्यास   वाढवण्याची गरज आहे , कमी अभ्यासामुळे व भडकाऊ विस रुपयांच्या पुस्तकामुळे आपण शिवरायांचे कर्तुत्वच एकप्रकारे नाकारत आहोत हे यांच्या लक्षात येत नाही. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हे बिरुद नाकारणारे लोक "क्षत्रियकुलावतंस" या बिरुदाचा मात्र स्विकार करतान दिसतात परंतु क्षत्रियकुलावतंस हे बिरुद त्यांना वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे आहे असे वाटत नाही याचे नवल वाटते कारण क्षत्रियकुलावतंस याचा अर्थ क्षत्रीय कुळास शोभेसे वर्तन करणारा असा होतो. आता गोब्राम्हणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवरायच अशा लोकांना बुद्धी देवोत .
जय गोब्राम्हणप्रतिपालक आर्यसम्राट शिवराय.

- सुरज महाजन 
संदर्भ . आज्ञापत्र,  शिवभारत, शिवराजभुषण, शिवबावनी, सभासद बखर, बुधभुषण

[टिप: सदर आर्टीकल "साप्ताहीक भगवा बाणा " मध्ये प्रकाशीत झालेला आहे ]

12 comments:

  1. mitrano brahman va maratha vaad ghalanya peksha hindu dharm balkat kara.......

    ReplyDelete
  2. ब्रम्ह जानाती इति ब्राम्हण् आणि गायीचे अर्थशास्त्रीय् व् पर्यावरणीय् वेगळे महत्वही आहे

    ReplyDelete
  3. bramhan aani marathyanmadhe vaad nahich aahe. aadhi pan navhta aata pan nahiye. kaahi fukte jyanna kaam dhandhe nahit te aapla vikrut doka laavun galiccha prabodhan kartaat aani nantar garal oktaat

    ReplyDelete
  4. ब्राह्मण व मराठा हा वाद पूर्णत: राजकीय हेतूने घडविला जातो... आपल्या देशात जेव्हा मोठे मोठे भ्रष्टाचार होतात तेव्हाच या व अशा जातीय दंगली घडवून आणल्या जातात.. राजकीय लोक अशा वेळी एखाद्या जातीचे प्रतिनिधी म्हणवल्या जाणार्या लोकांमध्ये हवा भरतात आणि ते मुर्ख लोक केवळ आपल्याला कोणाचातरी support आहे हे पाहून काहीही बरळत सुटतात... वास्तविक अशा जातीयवादी नेत्यांचे मत हे वयक्तिक असून त्यांच्या जातीतील बहुसंख्यांना ते पटणारे नसतेच पण आपण गप्प बसतो म्हणून त्यांचे फावते.. प्रत्यक्षात प्रत्येकाचे असे अनेक जिवलग मित्र आहेत हि जे ब्राह्मण, मराठा माली वगैरे सर्व जातींचे आहेत आणि सत्य हे आहे कि जोपर्यंत तुम्ही त्यांना जात विचारात नाही तोपर्यंत तुम्हीदेखील त्यांच्याबरोबर खुश असता आणि ते तुमच्याबरोबर खुश असतात... म्हणून अशा लोकांना दाखवून द्या कि तुम्ही त्यांना भिक घालत नाही...

    ReplyDelete
  5. अप्रतीम ! अतिशय अभ्यासपूर्ण नि सडेतोड असा लेख ! सुंदर !

    ReplyDelete
  6. छान लेखन केले आहे. तेही पुराव्यानिशी!

    ReplyDelete
  7. छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छान आहे

    ReplyDelete
  8. आपल्या परम ज्ञानाची खरच भारताला खूप गरज आहे. कृपया, आपण विष्णूचे दहावे अवतार तथागत गौतम बुद्धांचा धम्म अनुसरून भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस न्यावा.

    ReplyDelete