Monday, December 3, 2012

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे
=======================================
"On one hand we have the vast Vedic literature without any Archaeological evidence to support it, while on the other hand we have almost 2500 Archaeological sites associated with the Indus-Saraswati civilization without any literature associated with it. "
- Professor David Frawley

* साधारण
पणे सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० पर्यंत सांगीतला जातो, व साधारण ई,स.पू २००० ते १६०० मध्ये पर्यावरणामध्ये प्रतिकुल बदल होत होत सिंधु-सरस्वती घाटीची सभ्यता नष्ट झाली असे मानले जाते.

* सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० असा मानला तर ऋग्वेदाचा काळ १६०० च्या पुढे निश्च्ति केला जातो, कारण ना ऋग्वेदा मध्ये सिंधु परिस्थितिचा संदर्भ येतो आणि ना सिंधु काळामध्ये काही वैदीका प्रमाण मिळतात.

* ऋग्वेदाची रचना सरस्वती नदी अस्तित्वात असताना झाली आहे हे स्पष्टच आहे , आणि सरस्वती नदीच्या खालच्या भागातील पाणी इ.स.पू २००० पासुन आटू लागले याचाच अर्थ ऋग्वेदाची रचना ई.स.पू २००० पुर्व झाली असली पाहीजे हे स्पष्ट होते.

* पण काही विद्वान ऋग्वेदाचा काळ इ.स.पू १६०० च्या पुढे असावा असे मानत नाहीत , ऋग्वेद काळ बरेचजण ई.स.पू ४००० ते १०००० इतका मागे नेतात. [ काही जन भुगर्भशास्त्राचे प्रमाण देवून ऋग्वेदाचे काही श्लोक हे २५०००० वर्षापुर्वीचे असावेत असे मत मांडतात हे इथे प्राकर्शाने मांडावे वाटते ]

* ऋग्वेदाचा काळ हा सिंधु / हडप्पा संस्कृती नंतरचा असे मानन्यात अडचण ही आहे की जेथे वातावरणातील आणि पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे हडपा संस्कृतीतील सिंधु-सरस्वती वासीयांना स्थलांतरीत होण्यात भाग पाडले ( काळ साधारन ई.स.पू १७०० - १६०० ) त्याच काळानंतर म्हणजे पर्यावरण प्रतिकुल असतानाच त्याच ठिकाणी ( सिंधु-सरस्वतीचे खोरे ) वैदीकांनी आपले वस्थिस्थान वसवले हे पटत नाही व त्यानंतर रामायण महाभारतादी घडले असे जर मान्य केले तर पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत, पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .

* आणि असे जर असेल तर रामायण महाभारतादी काव्हे ही फक्त मिथक आहेत असे मानावेल लागेल , परंतु त्यातही एक अडचण आहे ती अशी की वैदीक ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* अलिकडे पश्चिम आशियातील कोरीव लेखात काही व्यक्तीनामे आढळून आली आहेत त्यांपैकी दोन नाव्रे "सोमसेन" व दुसरे "अरीसेन". ही नावे ज्या लेखात सापडली त्याचा काळ आहे ई.पू. २३०० , त्यावेळी सिंधू संस्कृती पुर्णपणे सुबत्तेच्या शिखरावर पोहोचली होती. ही दोन्ही नावे इंडॊ-आर्यन असुन पुर्णपणे भारतीय आहेत. याबद्दल विद्वानांत दुमत नाही. म्हणजे हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती, तसेच सिंधु संस्कृती जर अनार्य द्रविडींची असे मानले, तर हे इंडॊ-आर्यन शब्द इ.स.पू २३०० मध्ये भारतातुन येणे कसे शक्य आहे ?

* आणि जर हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती असे जर मानले तर हडप्पा कालीन संस्कृतीच्या उत्खननांमधुन वैदीक संस्कृती शी साम्य असलेले काहीच प्रमाण मिळालेले नाही . म्हणजे जरी दोन्ही संस्कृती समकालीन आहे असे मान्य केले तर कोणत्याही उत्खननामध्ये वैदीक कालीन पुरावे आजपर्यंत का सापडलेले नाहीत ?

* आर्यांनी आपला इतिहास खुप मोठ्या प्रमाणावर लिहुन ठेवला आहे रामायण , महाभारता सारखी महाकाव्ये ही केवळ काव्ये नसुन सत्य इतिहास असावा हे जवळ जवळ सर्वमान्य आहे . महाभारताचा काळ काढला असता तो ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० इतका मागे जातो. हे केवळ रामायण - महाभारताचे , त्याचप्रमाणे वैदीक साहित्यानुसार असे कित्तेक राजे आणि महाराचे होऊन गेले , परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की अनेक पुरातत्विय उत्खननामध्ये अवशेश म्हणुन असे काही सापडलेले नाही पण ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* इ.स.पू. १५,००० ते १०,००० च्या मध्ये भयंकर प्रलय आला होता , व त्यात भारताचा बराच भाग समुद्राखाली गेला असे संशोधक मानतात. भागवत पुराणामध्ये अयोध्या नगरी समुद्राने नष्ट केल्याचे वर्णन आहे व त्यानंतर कलियुगाची सुरवात झाली असे सांगीतले आहे. याचा अर्थ द्वापारयुगाचा शेवट इ.स.पू. १०,००० च्या आसपास झाला असे मानायचे का , आणि या अति अति प्राचीन काळामुळेच त्यांचे अवशेष आज आपल्याला सापडत नाही आणि त्या आधीही भारतामध्ये प्रगत अशी संस्कृती नांदत होती असे म्हणु शकतो असे असु शकेल ? आणि असेच जर मानायचे ठरवले तर दोन मोठ्या अडचणी आहेत , एक म्हणजे इ.स.पू. १०,००० च्या आधी महाभारत घडले हे मानावे लागते पण बरेच विद्वान महाभारताचा काळ ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० च्या मध्ये मानतात व दुसरी अडचण अशी की ई पू १०००० च्या आधी एक संस्कृती नांदत होती , १०००० च्या आसपास महाप्रलय आला त्यामध्ये बर्‍यापैकी सगळे नष्ट झाले त्यानंतर तब्बल सात ते आठ हजार वर्षानंतर सिंधु/ हडपा संस्कृती भारतात उदयास आली जिचे अवषेश आज मिळतात. या मधल्या सात आठ हजाराच्या कालखंडामध्ये काही अर्य वैदीकांनी आपली संस्कृती सांभाळली असे मानायचे का ? आणि असे जर मानले तर ते लोक सिंधु काळात कुठे होते ? 

24 comments:

  1. Nilesh Potdar सिंधू संकृती हि आर्य संकृतीशी बरीच मिळती जुळती असल्याचे अनेक उदाहरण आहेत. अनेक ठिकाणी यज्ञवेदी सारखी बांधकामे सापडली आहेत .
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सिंधू संस्कृती चा मुख्य उपास्य देव म्हणजे पशुपतीनाथ हे महादेव आहेत..अर्थात यावर अजून बरेच संशोधन गरजेचे आहे.
    माझ्या कडे एक पुस्तक आहे लेखकाचे नाव विसरलो आहे त्यात सिधू आणि आर्य संकृती एक असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत.
    तसेच यु ट्यूब वर आणि इंटरनेट वर द्वारका आणि त्यासाम्बाधित अनेक विडीओ उपलब्ध आहेत ज्यात द्वारका तसेच अनेक इतर ठिकाणच्या शहरांचे पुरावे आहेत. त्यआत काही व्हिदिओ खरच माहितीपूर्ण आहेत आणि त्यांच्या मते सरस्वती नदी गुप्त होण्या पासून तर द्वारका आणि तत्सम तटीय शहरे आणि भूभाग समुद्रात हळू बुडत गेले .त्यापूर्वी मात्र तिथे भूमी होती त्यात त्यांनी सिंधू तसेच सरस्वती नाधीच्या खोर्यांमध्ये सिंधू संकृती चे ठिकाणे ट्रेस केली आहेत . आणि गुजरात ते तामिळनाडू पर्यंत अश्या शरांचा शोध घेतला आहे जी समुद्राच्या पाण्याखाली गेली आहेत.त्यातही असेच निष्कर्ष निघाले आहेत कि सिंधू संकृतीच्याही आधी ८००० ते १०००० वर्ष पूर्वी हे भूभाग समुद्राच्या बाहेर होते आणि तिथे शहरे / वस्ती आणि मानवीय बांधकामे होती . काही ठराविक कालावधी नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून ती शहरे आणि भूभाग समुद्राच्या खाली गेला .त्यात रामसेतू हि अश्याच प्रकारचा भूभाग दाखवला गेला आहे आणि त्या भूभागाच्या बेसमेंट वर सेतू बांधल्याचा निष्कर्ष निघाला.
    अजून काही प्रश्नांची उत्तरे सापडल्यास सिंदू संस्कृती आणि आर्य यावर प्रकाश टाकता येईल जसे कि
    १. ऋग्वेदात सरस्वती नदी बरोबर सिंधू आणि इतर नद्यांचा उल्लेख आहे का ??
    २. जर उल्लेख असेल तर तो नेमका कोणत्या अर्थाने आणि कसा आहे हे बघणे पण महत्वाचे आहे .
    या साठी इतिहास बरोबरच ऋग्वेद सुद्धा संशोधक दुर्ष्टीने अभ्यासावा लागणार आहे.
    या संबंधी अजून माहिती मिळवण्याची खूप ओढ लागली आहे. काही पुस्तके अथवा स्त्रोत उपलब्ध झाल्यास आवर्जून कळवावे .

    ReplyDelete
  2. Rahul Dugal : माझ्या मते तरी जमिनीवर किंवा उत्खनन करून मिळणारे पुरावे एका मर्यादेपर्यंतच माहिती देऊ शकतात ज्यात गोंधळच जास्ती वाढतो. त्यापेक्षा आजकाल archaeo -astronomy नावाचे नवीन शास्त्र उदयाला येत आहे ते सर्वात जास्त विश्वासार्ह आहे..ज्यामध्ये प्रत्येक ग्रंथातले खगोल शास्त्रीय संदर्भ आढळतात ते वापरून त्याचा काल निश्चित करता येतो. त्यानुसार ऋग्वेदकाल २५००० वर्षांपूर्वीचा येतो.. तर रामायण ७-९००० आणि महाभारत ५-७००० वर्षांपूर्वी झाले हे सांगता येते.. रामायण आणि महाभारताच्या तर इंग्रजी तारखा देखील काढता येतात.. कारण त्यात प्रत्येक घटनेची तपशीलवार नोंद ठेवलेली मिळते. आर्यांचे आक्रमण वगरे भंपक कल्पना आहेत ज्याला भक्कम शास्त्रीय आधार नाही. सिंधू संस्कृती देखील त्यामानाने अलीकडची आहे.. कि जी खरतर वेगळी संस्कृती नसून जुन्याच संस्कृतीचे शेवटचे पान म्हणता येईल..

    ReplyDelete
  3. Rahul Dugal ग्रीक इतिहासकार मेगास्थेनीस इस पूर्व ३०० दरम्यान भारतात आला होता. त्याने लिहिलेल्या 'इंडिका' ह्या ग्रंथात कृष्ण आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यादरम्यान १३८ राजे झाले असा लिहिलंय. म्हणजे महाभारतकाल चंद्रगुप्ताच्या साधारण ४-५००० वर्ष आधी येतो. ह्याचा अर्थ महाभारतापासून चान्द्रगुप्तापर्यंत एक continuous इतिहास तेवा माहित होता. मग असा असताना मधूनच हि सिंधू संस्कृती आणि आर्यांचा आक्रमण कुठून आला? ह्या थिअरी गेल्या १५० वर्षात पसरवल्या गेल्या आहेत.. पाश्च्यात्य आणि भारतीय विद्वान सुधा मेगास्थेनेस च्या ग्रंथाकडे जाणून बुजून डोळेझाक का करतात?

    ReplyDelete
  4. Rahul Dugal आर्यांच्या आक्रमणामुळे द्रविडींची संस्कृती नश्ट झाली हा मुद्दा आता जुणा झाला आहे, याल ना काही आधार आहे , ना पुरावा. त्यामुळे या विषयातील विद्वानही आर्यांच्या आक्रमणाचे पुर्वग्रह ठेवुन संशोधन करण्याचे टाळत आहेत. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे वदिक संस्कृती जर हडप्पा च्या समकालीन असेल तर, १) सिंधु आणि ऋग्वेद काळ समान मानला तर हडप्पा कालीन संस्कृतीच्या उत्खननांमधुन वैदीक संस्कृती शी साम्य असलेले काहीच प्रमाण मिळालेले नाही . म्हणजे जरी दोन्ही संस्कृती समकालीन आहे असे मान्य केले तर कोणत्याही उत्खननामध्ये वैदीक कालीन पुरावे आजपर्यंत का सापडलेले नाहीत ? तसेच घोडा हा प्राणी वैदीकांना माहीत होता , असे जर असेल तर तो हडप्पन लोकांना माहीत असण्यास काहीच अडचण नव्हती , तोच प्रकार लोहाचा वैदीक लोकांमद्ये लोहाचा वापर होत होता, पण हडप्पन लोकांनी लोहाचा वापर केल्याचे आढळत नाही. आणि दुसर मुद्दा म्हणजे जर दोन्ही संस्कृतिंचा काळ एक होता तर त्यांचे परस्परांमध्ये काहीतरी देवाण-घेवाण झाली असली पाहीजे व त्याचा उल्लेख हडप्पन उत्खननामध्ये किंवा ऋग्वेदामध्ये यायला काहीच अडचण नव्हती.
    आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत (निदान माझ्या माहीती प्रमाणे तरी) , पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .
    [माझा या विषयात जास्त अभ्यास नाही , कृपया मार्गदर्शन करावे ]

    ReplyDelete
  5. Rahul Dugal Suraj महाजन: अहो मला पण ह्या विषयातली फार खोलात माहिती नाही.. पण काही गोष्टी मुळात जरा विचित्र वाटतात म्हणून मी बोलतोय..आधी आपण 'वैदिक संस्कृती' ह्या नावामध्ये काय काय समाविष्ट करतोय ते सांगा..म्हणजे जर त्यात वेदांपासून महाभारतापर्यंत सगळा काही येत असेल तर त्याचे अवशेष मिळणं हि फारच अवघड गोष्ट आहे (आता द्वारका मात्र मिळाली आहे). हडप्पा संस्कृती हि ख्रिस्तपूर्व २६००-१९०० दरम्यान होती असा म्हणतात आणि महाभारत साधारण इस पूर्व ५००० च्या दरम्यान धरून चाललो तर जी सिंधू संस्कृती आहे ती महाभारतात सिंध देश (जयद्रथाचा) होता त्याचेच पुढच्या काळातले अवशेष असू शकतात.. कारण हडप्पा हि कुठलीतरी वेगळी संस्कृती नसून अतिप्राचीन वैदिक संस्कृतीपासून हडप्पा पर्यंत continuity आहे अश्या प्रकारचे अनेक पुरावे मिळत आहेत.. आणि त्यामुळेच त्याचे अवशेष आहेत पण त्याच्या आधीच्या काळातले अवशेष मिळत नाहीयेत असा असू शकेल.. वैदिक संस्कृती भारतात नांदली आणि भारतातूनच जगभर पसरली हे देखील आता हळूहळू मान्य होऊ लागला आहे.. कारण आपली मंदिरा आता जगभरात मिळतायत..

    ReplyDelete
  6. या विषयासंबंधी संजय सोनावनी सरांची कमेंट पोस्ट करत आहे :-

    Sanjay Sonawani घोडा वैदिक लोकांना माहित होता, सिंधु लोकांना नाही हा तर्क आता बाद झाला आहे. खुद्द महाराष्ट्रात १५-१६००० वर्षांपुर्वीचे घोड्याचे अवशेष मिळालेले आहेत. वैदिक लोक हे प्रामुख्याने पशुपालक असल्याने घोड्याचा वापर अनिवार्य होता तर सिंधुजन हे प्रामुख्याने कृषिवल होते, त्यामुळे बैलाचा वापर अनिवार्य होता. लोह हा शब्द वेदांत येत नसून तो "अयस" असा आहे. त्याचा अर्थ लोह असा लावण्याचा प्रघात होता, पण अयस म्हणजे तांबे असे आता स्पष्ट झाले आहे. लोहाचा उपयोग वैदिक लोक "मुंड’ लोकांकडुन शिकले म्हणुन लोहाची नंतरची संस्कृत नांवे मुंडवाचक (उदा. मुंडलोहम) आहेत. वैदिक लोकांचे अवशेष मिळाले नाहीत कारण वैदिक लोक नगररचना करुन रहात नसत तर झोपड्यांत रहात. त्यांचे अवशेष एवढ्या प्रदिर्घ काळानंतर मिळणे शक्य नाही. दोन सम्स्क्रुतींतील देवानघेवाणीचे असंख्य लिखित उल्लेख ऋग्वेदात येतात. उदा. बुबु नामक पणी व्यापा-याकडुन वैदिकांनी घेतलेले दान....त्यांच्यातील युद्धे...(महत्वाचे दाशराज्ञ युद्ध) संघर्ष इ.

    ReplyDelete
  7. Sanjay Sonawani :- पहिल;ई बाब म्हणजे आर्य नांवाचा वंश कधीही अस्तित्वात नव्हता व नाही. दुसरे बाब म्हणजे सिंधु संस्क्रुतीच्याच मध्यकालात वैदिक धर्माची स्थापना सुदासकुळात झाली. सिंधु संस्कृतीतीलच काही लोकांनी yaa स्वतंत्र धर्माची स्थापना केली होती...नगरांत राहणारे सिंधु संस्क्रुतीचे लोक त्यांचे स्वाभाविकच शत्रु बनले व तसा संघर्ष ऋग्वेदात ठायी ठायी सापडतो. ऋग्वेदाचा आता अधिक्रुत कालखंड इसपु २५०० ते १७५० मानला जातो तर सिंधु सम्स्क्रुतीचा काल इसपु ४००० ते १७५० असाच मानला जातो. पर्यावरणीय बदलामुळे नव्हे तर भुगर्भीय हालचालींमुळे जशी वैदिक वसतीस्थाने संपली तशीच सिंधु नगरे (संस्क्रुती नव्हे) नष्ट झाली. सरस्वती नष्ट व्हायला मोटःया क्षमतेचे भुकंप कारणीभुत झाले आहेत व तशी अवस्था सिंधु संस्क्रुतीवर तत्पुर्वी किमान तीन वेळा येवुन गेलेली आहे.

    18 hours ago · Edited · Unlike · 1

    ReplyDelete
  8. Rahul Dugal त्यामुळेच मी म्हटला तसा आपण जितके अवशेषांवरून निष्कर्ष काढायला जाऊ तसा गोंधळ वाढत जाईल कारण रोज नवीन नवीन एकमेकांच्या विरोधातले अवशेष मिळत राहणार आणि त्यानुसार त्याचे निश्कार्शाही वेगळे येणार त्यापेक्षा थेट त्या ग्रंथान्माध्ले खगोलशास्त्रीय संदर्भ वापरून त्याचा काल शोधायचा प्रयत्न केला तर सगळे दुवे बरोबर एका रेषेत मिळतायत..

    ReplyDelete
  9. Rahul Dugal त्यासाठी तुम्हाला प वि वर्तकांचा रामायण आणि महाभारतावरचा पुस्तक मिळाला तर नक्की वाचा त्यात त्यांनी ऋग्वेदापासून बळी राजा , रामायण महाभारत आणि पुराणे ह्यांचे अचूक कालखंड काढले आहेत.. ती पुस्तक तुम्हाला नेत वर देखील मिळतील..

    ReplyDelete
  10. सजय सोनावणींच्या म्हणन्याप्रमाणे सिंधु संस्क्रुतीच्याच मध्यकालात वैदिक धर्माची स्थापना सुदासकुळात झाली. सिंधु संस्कृतीतीलच काही लोकांनी yaa स्वतंत्र धर्माची स्थापना केली होती असे जर मानले तर काही प्रश्न उभे राहतात ते पुढीलप्रमाणे :- जे काही वैदिक राजे महाराजे व त्यांच्या राज्यव्यवस्था निर्माण झाल्या होत्या त्यांचे अवषेश शक्यतो सापडत नाहीत. जर वैदीक काळ हा उत्तर सिंधु काळानंतर वैदिक धर्माची स्थापना झाली असेल व इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली असेल (उदा. रामायण/ महाभारत इत्यादी ), तर त्यांचे अवषेश कोठेतरी सापडायलाच हवेत. जर वैदीक संस्कृतीहुन प्राचीन अशा सिंधु संस्कृतीचे अवषेश सापडू शकतात तर वैदीक संस्कृतीचे का नाही ? हा एक प्रश्न निर्माण होतो.

    याचा अर्थ सिंधू संस्कृतीच्याही आधी वैदीक सभ्यता अस्तित्वात असायला हरकत नाही असा आपण घेवू शकतो.

    ReplyDelete
  11. Rahul Dugal: नक्कीच.. एकतर सिंधू संस्कृती म्हणजे काहीतरी वेगळा आहे असा मला तरी नाही वाटत.. आणि वैदिक संस्कृती हि इतकी अर्वाचीन असूच शकत नाही.. ती नक्कीच कैक हजार वर्ष जुनी आहे

    ReplyDelete
  12. Rahul Dugal : वैदिक संस्कृती किती जुनी असू शकते याची एक झलक.. महाभारतातल्या वन पर्वामध्ये एक उल्लेख आला आहे.. अभिजित तारा (म्हणजेच 'star Vega') गगनातुन निखळला त्याची कथा व्यासांनी गोष्टीरूपात सांगितली आहे.. त्याप्रमाणे त्यांनी असाही दिलंय कि अभिजित तारा निखलण्याची सुरुवात झाली तेवा दक्षिणायन (म्हणजेच summer solstice) कृत्तिका नक्षत्रावर चालू होत असे.. त्यानंतर काही हजार वर्षात अभिजित तारा निखळत गेला आणि तो pole star (ध्रुव) बनला.. आता व्यासांनी दिलेल्या माहितीनुसार calculate केला तर कृत्तिका नक्षत्र दक्षिणायनात असण्याचा काल येतो २०,००० bc आणि जच्या विज्ञानानेही लावलेल्या शोधाप्रमाणे अभिजित १२००० bc मध्ये pole star होता. म्हणजे मधले काही हजार वर्ष हि प्रक्रिया चालू होती.. आता हि गोष्ट व्यासांनी महाभारतात लिहून ठेवली आहे याचा अर्थ ह्या संपूर्ण प्रक्रियेच्या नोंदी त्यांच्या आधी कोणीतरी करून ठेवल्या होत्या.. म्हणजे तुम्ही कल्पना करा कि वैदिक संस्कृती किती काळापासून अस्तित्वात होती आणि कितीतरी प्रगत होती ज्यांनी एक तारा आकाशात सरकत गेला त्याच्या काही हजार वर्ष्यांच्या नोंदी ठेवल्या.

    ReplyDelete
  13. Rahul Dugal : ह्या आणि अश्या अनेक अजून कथा आहेत कि ज्यामुळे वैदिक संस्कृती अतिप्राचीन काळापासून होती हे सिद्ध होते..

    ReplyDelete
  14. Priesh Pethe : 'आर्य ' ह्या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत ,बुद्धिमान,पराक्रमी असा आहे .अश्या गुणांनी युक्त माणसे वैदिक काळापासून भारत भूमीवर राहत होती .व ह्या लोकांनीच ही वैदिक संस्कृतीचा अक्ख्या जगात प्रसार केला .
    आर्य संस्कृती ही बाहेरून आपल्या देशात आली असे निष्कर्ष इंग्रजांनी काढले व इंग्रजांनी त्याचा पद्धतशीरपणे प्रसार केला इतका की अजूनही बर्याच लोकांना आर्य म्हणजे आपण बाहेरून आले आहोत असेच वाटते .
    मुळात आर्य हा शब्द वंशवाचक नसून ,साम्बोधानात्मक उपयोगात आणला जाणारा होता.जसे इंग्रजीत sir हे विशेषण वापरतो तसेच 'आर्य ' हा शब्द वापरला जात असे.
    व वैदिक काळी अशी सुसंस्कृत ,बुद्धिमान ,पराक्रमी माणसे होती ,त्या ऋषीमुनींना ,राजांना ,गुरुंना आर्य म्हणत असत .
    उत्खननातून मिळालेल्या अवशेषावरून निष्कर्ष काढणे हे थोडे गोंधळात टाकणारे असू शकतात .
    त्यापेक्षा ग्रहांच्या भ्रमणावरून निष्कर्ष अचूक असू शकतात.
    जसे महर्षी व्यास ह्यांनी महाभारत कधी घडले आहे ह्याचा संदर्भ देताना ग्रहांच्या स्थितीचा उल्लेख केला आहे .
    ह्याचा आधार घेऊन डॉक्टर प .वि. वर्तक ह्यांनी महाभारत युद्ध कधी घडले गेले ह्याची तारीख काढली आहे.व ती १६ ऑक्टोबर ५५६१ इ .स पूर्व अशी आहे व ती अचूक वाटते.

    ReplyDelete
  15. Prasad Raut : वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी वनवासातील १३ व्या वर्षी खरदूषण यांचे युद्ध झाले. तो अमावस्येचा दिवस होता व त्या दिवशी सूर्यग्रहण होते. हे आकडे कॉम्प्युटरमध्ये टाकले, तेव्हा ७ ऑक्टोबर इ.स. पूर्व ५०७७ मध्ये ही स्थिती असल्याचे आढळले. अन्य ग्रहांची जी स्थिती रामायणात आढळते त्यावरून रावणाचा वध ४ डिसेंबर ५०७६ इ.स. पूर्व मध्ये झाला व श्रीरामांनी आपल्या वनवासाची १४ वर्ष २ जानेवारी ५०७५ इ.स. पूर्व पूर्ण केली व ते अयोध्येला पार्ट आले, तेव्हा त्यांचे वय ३९ वर्षांचे होते.

    ReplyDelete
  16. Sanjay Sonawani : तुमच्या तर्कात फार मोठा दोष आहे. पहिल;ई बाब म्हणजे आर्य नांवाचा वंश कधीही अस्तित्वात नव्हता व नाही. दुसरे बाब म्हणजे सिंधु संस्क्रुतीच्याच मध्यकालात वैदिक धर्माची स्थापना सुदासकुळात झाली. सिंधु संस्कृतीतीलच काही लोकांनी yaa स्वतंत्र धर्माची स्थापना केली होती...नगरांत राहणारे सिंधु संस्क्रुतीचे लोक त्यांचे स्वाभाविकच शत्रु बनले व तसा संघर्ष ऋग्वेदात ठायी ठायी सापडतो. ऋग्वेदाचा आता अधिक्रुत कालखंड इसपु २५०० ते १७५० मानला जातो तर सिंधु सम्स्क्रुतीचा काल इसपु ४००० ते १७५० असाच मानला जातो. पर्यावरणीय बदलामुळे नव्हे तर भुगर्भीय हालचालींमुळे जशी वैदिक वसतीस्थाने संपली तशीच सिंधु नगरे (संस्क्रुती नव्हे) नष्ट झाली. सरस्वती नष्ट व्हायला मोटःया क्षमतेचे भुकंप कारणीभुत झाले आहेत व तशी अवस्था सिंधु संस्क्रुतीवर तत्पुर्वी किमान तीन वेळा येवुन गेलेली आहे.

    ReplyDelete
  17. Sanjay Sonawani सर, माझ्या तर्कात दोष असु शकतो कारण माझा या विशयी जास्त अभ्यास नाही. "आर्य " हा शब्द मी याठीकाणी वैदीक या अर्थाने घेतला आहे. तुम्ही म्हटले त्याप्रमाणे सिंधु काळ व वैदीक / ऋग्वेदकाळ एक असु शकते . पण जर असे मानले तर दोन प्रश्न पडतात , १) म्हणजे जर सिंधु आणि ऋग्वेद काळ समान मानला तर हडप्पा कालीन संस्कृतीच्या उत्खननांमधुन वैदीक संस्कृती शी साम्य असलेले काहीच प्रमाण मिळालेले नाही . म्हणजे जरी दोन्ही संस्कृती समकालीन आहे असे मान्य केले तर कोणत्याही उत्खननामध्ये वैदीक कालीन पुरावे आजपर्यंत का सापडलेले नाहीत ? तसेच घोडा हा प्राणी वैदीकांना माहीत होता , असे जर असेल तर तो हडप्पन लोकांना माहीत असण्यास काहीच अडचण नव्हती , तोच प्रकार लोहाचा वैदीक लोकांमद्ये लोहाचा वापर होत होता, पण हडप्पन लोकांनी लोहाचा वापर केल्याचे आढळत नाही. आणि दुसर मुद्दा म्हणजे जर दोन्ही संस्कृतिंचा काळ एक होता तर त्यांचे परस्परांमध्ये काहीतरी देवाण-घेवाण झाली असली पाहीजे व त्याचा उल्लेख हडप्पन उत्खननामध्ये किंवा ऋग्वेदामध्ये यायला काहीच अडचण नव्हती.
    आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत (निदान माझ्या माहीती प्रमाणे तरी) , पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .
    [माझा या विषयात जास्त अभ्यास नाही , कृपया मार्गदर्शन करावे ]

    ReplyDelete
  18. घोडा वैदिक लोकांना माहित होता, सिंधु लोकांना नाही हा तर्क आता बाद झाला आहे. खुद्द महाराष्ट्रात १५-१६००० वर्षांपुर्वीचे घोड्याचे अवशेष मिळालेले आहेत. वैदिक लोक हे प्रामुख्याने पशुपालक असल्याने घोड्याचा वापर अनिवार्य होता तर सिंधुजन हे प्रामुख्याने कृषिवल होते, त्यामुळे बैलाचा वापर अनिवार्य होता. लोह हा शब्द वेदांत येत नसून तो "अयस" असा आहे. त्याचा अर्थ लोह असा लावण्याचा प्रघात होता, पण अयस म्हणजे तांबे असे आता स्पष्ट झाले आहे. लोहाचा उपयोग वैदिक लोक "मुंड’ लोकांकडुन शिकले म्हणुन लोहाची नंतरची संस्कृत नांवे मुंडवाचक (उदा. मुंडलोहम) आहेत. वैदिक लोकांचे अवशेष मिळाले नाहीत कारण वैदिक लोक नगररचना करुन रहात नसत तर झोपड्यांत रहात. त्यांचे अवशेष एवढ्या प्रदिर्घ काळानंतर मिळणे शक्य नाही. दोन सम्स्क्रुतींतील देवानघेवाणीचे असंख्य लिखित उल्लेख ऋग्वेदात येतात. उदा. बुबु नामक पणी व्यापा-याकडुन वैदिकांनी घेतलेले दान....त्यांच्यातील युद्धे...(महत्वाचे दाशराज्ञ युद्ध) संघर्ष इ.

    ReplyDelete
  19. Sanjay Sonawani सर, माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद , यातले बरेचसे मुद्दे मला माहीत नव्हते.

    ReplyDelete
  20. याबद्दल श्री. म. के. ढवळीकर सरांच्या पुस्तकात एका पुरातत्व संशोधकाचे म्हणणे मांडले आहे की, सिंधु आणी वैदिक संस्कृती भिन्न नाहीत. वेद रचनारे ऋषीमुनी हे जंगलात पर्णकुटी बांधुन राहत असल्याने वेदांत शहरांचे उल्लेख नाहीत.

    ReplyDelete
  21. Sanjay Sonawani सर आपण म्हणता त्या प्र्माने (सिंधु संस्क्रुतीच्याच मध्यकालात वैदिक धर्माची स्थापना सुदासकुळात झाली. सिंधु संस्कृतीतीलच काही लोकांनी yaa स्वतंत्र धर्माची स्थापना केली होती.) मानले तर काही प्रश्न निर्माण होतात ते पुढीलप्रमाणे (Prasad Raut >>वेद रचनारे ऋषीमुनी हे जंगलात पर्णकुटी बांधुन राहत असल्याने वेदांत शहरांचे उल्लेख नाहीत.<< )

    मी वैदीक राजव्व्यवस्थेबद्दल बोलतो आहे. जे काही वैदिक राजे महाराजे व त्यांच्या राज्यव्यवस्था निर्माण झाल्या होत्या त्यांचे अवषेश शक्यतो सापडत नाहीत. जर वैदीक काळ हा उत्तर सिंधु काळानंतर वैदिक धर्माची स्थापना झाली असेल व इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली असेल (उदा. रामायण/ महाभारत इत्यादी ), तर त्यांचे अवषेश कोठेतरी सापडायलाच हवेत. जर वैदीक संस्कृतीहुन प्राचीन अशा सिंधु संस्कृतीचे अवषेश सापडू शकतात तर वैदीक संस्कृतीचे का नाही ? हा एक प्रश्न निर्माण होतो.

    ReplyDelete
  22. सिंधु लीपी वाचण्यात पुरातत्व संशोधकांना यश आले की बरेच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

    ReplyDelete
  23. वैदिक संस्कृतीबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. यज्ञ सम्स्कृती फारकाळ भारतात टिकाव धरू शकली नाही. रामायण-महाभारत ही काल्पनिक काव्ये आहेत कि सत्य याबाबत विवाद आहेत...ती खरी धरली तरी त्यांचा काळ नक्की करता येत नाही. सध्या उपलब्ध असलेल्या रामायण-महाभारताच्या आवृत्त्या या सन दुस-या शतकानंतरच्या आहेत. दुसरे असे कि द्वारकेचे अवशेष सापडलेत तसेच क्रुक्षेत्रातील उत्खननातही पुरातन अवशेश मिळालेले आहेत. वैदिक असे अवशेष अत्यंत दुर्मिळ व तेही शृंग काळातील, म्हणजे अर्वाचीन आहेत. वैदिक संस्कृतीचा प्रभाव हिंदू धर्मावर जवळपास नाही त्यामुळे त्यांचे अवशेष स्वतंत्र असे मिळणेही शक्य नाही.

    ReplyDelete
  24. संजय सोनवनी सर जर आपण वैदीक आणि हींदू हे वेगवेगळे असे म्हणत असाल आणि आजकाल तर आपण वैदीक हे बाहेरून आले अस म्हणता तर मग महाभारत आणि रामायण यासारखे संस्कृत काव्ये तुम्ही हींदू धर्मात कशी जोडता?ती काव्ये वैदीक होतील ना?त्याच जोडीला महाभारतत उल्लेख आलेली द्वारकेसारखी शहरे जर अतिप्राचीन काळी अस्तित्वात असल्याचे अवशेष मिळत असतील तर मग वैदीक संस्कृती ही फारच प्राचीन होती हे सिद्ध होत नाही का?

    ReplyDelete