Sunday, March 28, 2010

: येशू ख्रिस्त आणि भारत :

येशू ख्रिस्ताचा जन्म फिलीस्तीनमधील नाझरेथ या शहरात झाला. येशू ख्रिस्त हा अब्राहमच्या वंशातील असे बायबल सांगते. या काळात फिलीस्तीनवर रोमन स‌म्राट सीझरची सार्वभौम स‌त्ता होती आणि तेथे हेरोद राजा रोमन स‌म्राटाचा मांडलिक म्हणून राज्य करीत होता. येशू लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचा असल्याचे उल्लेख शुभवार्तेत येतात. जॉन द बाप्टिस्ट हा त्याचा मावसभाऊ. त्याच्याकडूनच येशूने पुढे दीक्षा घेतली. त्यानंतर येशू तडक पहाडात गेला. चाळीस दिवस तेथे त्याने तप केले. त्यातून तावून-सुलाखून निघून तो खाली उतरला आणि मग कौफरनाम या ग्यालीली प्रांतातील शहरात आला. तेथे त्याने आपले पहिले प्रवचन दिले. त्यावेळी तो 26-27 वर्षांचा होता. येशूचा जन्म कुमारी माता मेरीच्या पोटी देवाच्या कृपेने झाला. येशू हा देवाचा अंश आहे . अशी माहीती बायबलात येते.
यासाठी आपण प्रथम बायबल म्हणजे काय हे पहावे लागेल. बायबल या शब्दाचे मूळ ग्रीक बिब्लियन (biblion) असे आहे. त्याचा अर्थ ग्रंथ. बायबलचे दोन भाग आहेत. एक जुना टेस्टामेन्ट आणि दुसरा नवा टेस्टामेन्ट. टेस्टामेन्ट म्हणजे साक्षपुरावा. जुना टेस्टामेन्ट हा ज्यूंचा धर्मग्रंथ आहे. त्यात त्यांचे धर्मशास्त्र, प्रेषित आणि ग्रंथ यांची माहिती आहे. नव्या टेस्टामेन्टमध्ये येशूचे चरित्र आहे. त्याचे 27 भाग आहेत. पहिल्या चार भागांना इंग्रजीत गॉस्पेल (शुभवार्ता) म्हणतात. त्यात येशूचे जीवन सांगितले आहे. हे चार भाग असे - म्याथ्यूची शुभवार्ता, मार्कची शुभवार्ता, ल्यूकची शुभवार्ता आणि जॉनची शुभवार्ता. यातील म्याथ्यू हा येशूच्या प्रत्यक्ष संबंधात आला होता असे म्हणतात. मात्र इतिहासकारांच्या मते म्याथ्यूची शुभवार्ता ख्रिस्तानंतर 70च्या पुढे लिहिली गेली असावी, असे म्हणतात. एकंदर हे चारही शुभवार्ताकार भक्त-संत येशूच्या नंतर 60 ते 100 वर्षांच्या काळात झालेले आहेत. त्यांनी येशूचे शिष्य वा अनुशिष्य यांच्या तोंडून ऎकलेल्या कथा आपापल्या शुभवार्तेत सांगितल्या. हा स‌र्व भाग मुळात ग्रीकमध्ये आहे. आजचे इंग्रजी बायबल हे इंग्लंडच्या पहिल्या जेम्स राजाने इ. स. 1611 मध्ये करून घेतलेले भाषांतर आहे. तेच अधिकृत म्हणून प्रचलित आहे.
तर या शुभवार्तांमध्ये येशूचे बालपण ते मृत्यू व त्याचे पुन्हा जिवंत होणे वगैरे हकिकती येतात. असे असले, तरी रशियन संशोधक निकोलाय नातोविच यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत येशू कोठे होता याचा खुलासा काही होत नाही. एवढेच नव्हे तर मृत्युनंतर तिस-या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला. पण त्यानंतर काय? त्यानंतर त्याचे काय झाले? तो कोठे गेला? या प्रश्नांची उत्तरेही सापडत नाहीत. नातोविच यांनी इ. स. 1890मध्ये ’ द अननोन लाईफ ऑफ जीजस ख्राईस्ट’ हे पुस्तक लिहिले. निकोलाय नातोविच हे रशीयन ज्यु असुन त्यांचा जन्म क्रिमिया या शहरामध्ये सन १८५८ मध्ये झाला. नातोविज हे पत्रकार होते व नंतर त्यांनी लेखक म्हणुन आपले नाव कमवले. यांच्या ’द अननोन लाईफ ऑफ जीजस ख्राईस्ट हे पुस्तक प्रकाशीत होताच पोपने त्यावर तत्काळ बंदी घातली. तर या पुस्तकानुसार "तिस-या शतकापर्यंतच्या ऎतिहासिक नोंदींमध्ये येशूचा उल्लेखच येत नाही. येशूला सुळावर दिल्यानंतर सुमारे 80 वर्षांनंतर रोमन इतिहासकारांनी आपल्या बखरींत ख्रिश्चन सेक्टचा उल्लेख केलेला आहे. पण त्यात जीजस ख्राईस्ट या व्यक्तीचा नामोल्लेख नाही. इ. स. 98 मध्ये जोसेफ फ्लेव्हियस या ज्यू इतिहासकाराने 'ज्युईश अँटिक्विटीज' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात तत्कालिन ज्ञात इतिहास शक्य त्या विस्ताराने दिला आहे. नीरो या रोमन स‌म्राटाच्या कारकीर्दीचे वर्णन त्यात आहे. जॉन द बाप्टिस्ट, हेरोद (अँटिपस) आणि (रोमच्या बादशहाचा प्रतिनिधी पाँटिअस) पायलेट यांचे वर्णन आहे. तत्कालिन स‌माजजीवनाचेही वर्णन आहे. पण त्यात जीजस किंवा इसाचे नाव येत नाही.
बायबल व तत्सम तत्कालीन व उत्तरकालीन लेखांमध्ये येशूच्या जन्मपनापासून ते बारा वर्षापर्यंतच्या जिवनकार्याचा उल्लेख आहे. येशूने आपले प्रथम प्रवचन दिले तेव्हा तो २६-२७ वर्षाचा होता. मग येशू १२-१३ ते २५-२६ वर्षांमध्ये कोठे होता ? या वर्षात त्याने काय केले ? या वर्षांच उल्लेख बायबल अथवा तत्कालीन पुस्तकांमध्ये का येत नाही ? नातोविच विचारतात, या अनुल्लेखामागचे रहस्य काय? वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत इसा कोठे होता? या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ते 1867मध्ये काश्मीरमध्ये आले. तेथून ते लेहला गेले व हेमिस या बुद्धमठात असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्या हस्तलिखितांमध्ये काय लिहिलेले होते?
इस्त्रायलमध्ये जन्माला आलेला इसा हा यशोदा पुत्र कृष्ण या हिंदू अवतारमालिकेतील नवा अवतार असून, तो बुद्धानंतरचा युरोपातील अवलोकितेश्वर म्हणून ओळखला जाईल, अशी भाकिते त्या जुन्या पोथ्यांमध्ये होती!! नंतर 19व्या शतकात लेव्ही डाऊलिंग यांचे the Aqurion Gospal नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी नातोविच यांच्या 'संशोधना'स पुष्टीच दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बारा ते एकोणिस वर्षांपर्यंत येशू हिंदुस्थानात होता! या पुस्तकात डाऊलिंग यांनी म्हटले आहे, की "ओरिसाच्या एका राजपुत्राने एका देवळात बारा वर्षांच्या मुलास पाहिले. तो बुद्धिवान आहे असे दिसले व त्यास घरी आणून शिक्षण दिले. जगन्नाथाच्या भव्य देवालयात त्याला विद्यार्थी म्हणून स्वीकृत करण्यात आले. वेदांचा व मनूच्या धर्मशास्त्राचा प्राथमिक अभ्यास करण्याची संधी त्याला येथे मिळाली. येथे गुरुजनांशी वाद करताना त्याने बुद्धिवाद केल्यामुळे त्याला ब्राह्मणवर्गाचा रोषही पत्करावा लागला."
येशूचा हिंदु धर्माशी पर्यायाने भारताशी असलेला संबंध:
याठीकाणि एका पत्रातील संदर्भाचा उल्लेख करणे महत्वाचे आहे हे पत्र ख्रिस्ताचा समकालीन असलेला पब्लिअस सेंटुअल - जुडिया जो रोमन अधिकारी पंनियस पिलेट याच्यामागुन अधिकारपदावर असलेल्या मनुष्याने केले आहे . या पत्रामध्ये पब्लिअस येशूचे वर्णन करताना म्हणतो, ".......त्याची (येशूची) दाढी डोक्यांच्या केसाप्रमाणेच असुन थोडीशी लाल आणि विभागलेली आहे." (ख्रिस्ताची दाढी ठेवण्याची पद्धत हिंदूंप्रमाणे होती यवरुन कळते). यापुढे पब्लिअस म्हणतो की, "...याने (येशूने) कधी अध्ययन केल्याचे कोणास ठाऊक नाही, पण तो सर्व शास्त्रांत प्रविण आहे".
डॉ. नातोवाच यांनी पंचेचाळीस वर्षे संशोधन करुन ’ख्रिस्त हा ईशान पंथाचा साधू होता व भारत वर्षात सतत सतरा वर्षे निवस करुन अनेक तिर्थस्थाने पर्यटन करत विद्याध्यायन केले.’ असे ठरवले. येशू आपल्या बारा ते तीस वर्षापर्यम्त भारतात ज्ञानसंपादनासाठी आला असावा असा पुष्कळजनांचा समज होता. पण या गोष्टीला भक्कम पुरावा मिळत नाही आइ ती ऊणिव डॉ. नोतोविच यांनी पंचविस वर्षे परिष्रम करुन भरुन काढली. त्यांनी हिंदुस्थानचा प्रवास केला. या प्रवासात ते तिबेट मधील ’हिमस’ येथील बुद्धमंदीरात गेले. तेथील बौद्ध धर्मगुरुंनी पुस्तकांच्या पेटीतुन एक फार पुरातन कालीन पोथी काढून ती त्यांना दाखवली. नोतोवाचाम्नी त्या पोथीची छायाचीत्रे घेतली. आणि स्वदेशी परत आल्यावर त्या छायाचित्रांची nigative करुन तीन तीन छायाचित्रे छापली. अशाप्रकारे त्या दुर्मीळ ग्रंथाच्या तीन प्रती केल्या. त्या ग्रंथात ख्रिस्ताने हिंदुस्थानात सतरा वर्षे घालवली याचा वृत्तांत असुन त्यात त्याने रचलेल्या एका लहानशा पुस्तकाचाही उल्लेख आहे.
याचप्रमाणे आता येशूच्या वेशभुषेकडे थोडी नजर टाकू. जर्मन चित्रकार परंपरेतील लुईनी, बोलिनी, व्हेल्याक्यास आणि ईतर चित्रकारांनी खांबाशी उभे असताना नी सुळावर दिल्याचे वेळी जी ख्रिस्ताची चित्रे रेखाटली आहेत, ती सर्व-दक्षिण हिंदु ज्याप्रमाणे सकच्छ धोतर नेसतात, त्याप्रमाणे धोतर नेसलेली काढलेली आहेत. याचबरोबर फ्लारेन्स च्या उफिजी गॅलरी मध्ये एका पेरिगिनो नावाच्या चित्रकाराच्या परंपरेतील एका बाजुला चित्रकाराने एका चित्रात आणि मोंझाच्या कॅथेड्रल मधील अंपुलित काढलेल्या चित्रांत ख्रिस्ताने यज्ञोपवित धारण केल्याचे चितारले आहे. बाराव्या शतकात ईटालीयन खोदकाम करणार्‍या बेनेडेटो अन्टेलामी याने पार्मामध्ये काढलेल्या चित्रांमध्ये मेरीला साडीचा वेश आणि गळ्यांत हिंदु पद्धतीचा अलंकार असलेला काढलेला आहे.
क्रांतिरत्न श्री बाबाराव सावरकर यांनी आपल्या ’ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’ या पुस्तकात येशू ख्रिस्त हा हिंदुच होता या विचाराचे जोरदार समर्थन केले आहे.
आता थोडे येशूचा म्रुत्यु व पुनरागमनाविषयी अभ्यास करु. एकंदर येशू हा देवपुत्र असल्याने मृत्युनंतर तो पुन्हा जिवंत झाला व त्याने आपल्या काही अनुयायांना दर्शन सुद्धा दिले. काहिंशी तो बोलला. येहूच्या मृत्यु बद्दल तसेच त्याच्या पुनरुत्थानाबद्दल बायबल मध्ये साधारण पुढीलप्रमाणे उल्लेख येतो. ’ येशूला सुळावर देण्यात आले . त्यानंतर संध्यालाळच्या सुमारास योसेफ नावाचा मनुष्याने येशूचे शरीर मागीतले. योसेफ ते शरिर घेवून तागाच्या स्वच्छ वस्त्राने लपेटले. ते त्यांनी खडकांमध्ये खोदलेल्या नव्या कबरेमध्ये ठेवले. एक मोठी धोंड घेवून ती कबरेच्या दाराला लावली. काही दिवसानंतर मेरि ही कबर पहावयाला आली. तेव्हा मोठा धरनिकंप झाला. कारण प्रभुच्या दुताने स्वर्गातुन उतरुन येवून ती धोंड एकिकडे लोटली. आणि त्यावर तो बसला. तो मेरिला म्हणाला "वधस्थंभावर खिळलेला येशू याचा शोध तुम्ही करिता हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ते स्थळ पहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यांतून उठला आहे. तो तुमच्यापुर्वी गलिलात जात आहे. तेथे तुम्ही त्याला पहाल." साधारण अशाप्रकारचे वर्णन बायबल मध्ये येते पुढे येशू स्वर्गात जातो असे बायबल सांगले. मेरीला अशाप्रकारे देवदुताचा दृष्टांत झाल्यानंतर मेरी येशूच्या सर्व शिष्यांना येशू हा मेलेल्यातून उठला आहे असे सांगते. व ही बातमी वार्‍यासारकी आजुबाजुच्या परिसरात पसरते , येशू हा देवदूत असल्यामुळे तो मृत असुनसुद्धा पुन्हा जिवंत झाला. असे सर्वांना वाटू लागले. प्रस्तुत बायबल मधील शुभवर्तमाने ही येशुच्या मृत्युनंतर ६० ते ७० वर्षानंतर लिहिलि गेली असल्यामुळे येशूच्या पुनरुत्थानाविषयी अधीक संशोधन न करता शुभवर्तमानकारांनी येशूच्या श्रद्धेपोटी लिहिलेली आहेत. त्यामुळॆ येशूचे पुनरागमन व स्वर्गारोहन याविषयी अतिशयोक्ती असण्याची शक्यता अशु शकते.
येशूच्या मृत्युनंतर तो पुन्हा उठला व शिष्यांपुढे पुन्हा प्रगट झाला, आपल्या मृत्युपश्चात त्याने प्रदर्शन केले, आणि पुन्हा अंतर्हीत झाला असे ख्रिस्ती लोक माणतात. त्याला सुळी दिल्यानंतर त्याविषयीच्या अनेक प्रकारच्या विलक्षण आणि चमत्कारीक वावड्या उठल्या होत्या. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये राहणार्‍या मित्राला अलेक्झांड्रियामधिल मित्राने पत्र लिहून ख्रिस्ताच्या पुनर्प्रकटनाविषयी पसरलेल्या बातम्यांसंबंधी लिहून खरोखर वस्तुस्थिती कशी होती हे विचारले आणि अलेक्झांड्रियामधिल मित्राला पॅलेस्टाईनमधील मित्राने स्वत: पाहीलेली आणि ठाऊक असलेली विश्वसनिय माहीती लिहून धाडली. ती फार महत्वाची आहे. ते पत्र बरेच दिवस पडून होते. पण ते फार महत्वाचे असल्यामुळे अलेक्झांड्रियाचे पुस्तकालयांत जपुन ठेवण्यात आले होते. पुढे ते पत्र अबिसिनियाचे व्यापारी कंपनितील प्राचिण इतिहासाची विषेश गोडी असलेल्या एका फ्रेंच वांमयसेवकाच्या हाती गेले. नी तेथे त्याने त्या पत्राचे इंग्लिश भाषांतर करुन १९७३ साली अमेरिकेत पहिल्यांदा प्रकाशीत केले. या पुस्तकाची प्रसिद्धी होताच ख्रिस्ती जगांत फार मोठी खळबळ उडाली. प्रचलित ख्रिस्तियन स्वरुपाला फार मोठा धक्का बसण्यासारखा असल्यामुळे त्या पुस्तकाच्या प्रति जप्त केल्या आणि त्या पुस्तकाचा बिमोड करण्याचे श्रेय मिळवण्याचा प्रयन्त झाला. पण एक प्रत यातुन श्री मेसनच्या सभासदाने वाचली, ती पुन्हा छापवली गेली. पुन्हा त्या प्रती जप्त करण्यात आल्या आतुनही काही प्रती वाचल्या आणि तिसर्‍यांदा याची प्रसिद्धी झाली. आता ती प्रत वाचकांच्या हाती पडण्याचे संदर्भात ख्रिस्ती मागिलप्रमाणे सतत कसंगती करु शकले नाहीत . त्यातील विषेश महत्वाचा आणि आपल्या विषयांशी संबंध असलेला भाग पुढे आलेला आहे, तो भाग काय आहे हे आता पाहू.
हे जे पत्र लिहिले आहे ते ख्रिस्ताच्या प्रतिस्पर्ध्याचे अथवा त्याच्या विशयी सहानुभुती नसलेल्याचे असले तर त्या पत्राचे महत्व बरेच कमी झाले असते. पण ज्यांनी ख्रिस्ताच्या पुन्ह:प्रकटीकरणावीशयी यथातथ्य माहीती पाठवली तो गृहस्त ख्रिस्ताचा एकाप्रकारे सहभागी सहवासी होता. आणि म्हणुन ती माहीती विशेष विश्वसनिय व ती सिद्ध झालेल्या ख्रिस्ताच्या चरित्राशी हुबेहूब जुळणारी असल्यामुळॆ ती सरळ वस्तुस्थिती सिद्ध करणारी ठरते. हे पत्र लिहिणारा मनुष्य हा त्यावेळी ईजिप्त, अरबस्थान, ग्रीस नी त्याच्या आसपासच्या प्रदेशांत प्रभावी ठरलेला, शांतताप्रिय, सात्विक वृत्तसंपन्न, सदाचारी नी अध्यात्मनिष्ठ जो एक संघ आहे त्या संघातील एक घटक होता. या पंथाचे नाव ’ईशान’ होय. आपल्या या पत्रामध्ये तो म्हणतो , "..ख्रिस्ताला सुळी दिल्यानंतर त्याचे प्रेत मागायला जोसेफ एका तिकोडेमस नावाच्या वैद्याबरोबर गेला. ख्रिस्त हा खरोखरिच मेला आहे काय हे बघण्यासाठी ख्रिस्ताच्या त्या लटकत्या देहाला तेथील शिपायाने भाला मारुन पहीला. त्या घावांतुन थोडे पाणि आणि रक्त बाहेर आहे. . भाल्याचा घाव होताच जिवंत मणुष्याच्या देहाकडून त्या घावामुळे होणारा थरकाप व त्वचासंकोचन अदिक रुपाने जी प्रतिक्रिया होते ती न झाल्यामुळे ख्रिस्त मेला आहे असे समजुन ते प्रेत त्या अधिकार्‍याने त्या दोघांच्या स्वाधीन केले. तिकोडेमस या वैद्याला या वैद्याला ख्रिस्ताच्या अंगातुन रक्त येते हे पाहून त्याच्या अंगात अद्याप जीव आहे याची निश्चीती पटली. त्याने ख्रिस्त ज्या एका पंथाचा सदस्य होता त्या पंथाच्या मुख्याकडे ही गोष्ट कळवली. ईशान पंथात योगाचा अभ्यास करणार्‍या नि तत्संबंधी क्रियाप्रतिक्रिया करणार्‍या अनेक व्यक्ती होत्या. त्यांच्यातील महंतांनी लागलिच परमपुज्य विभूतिंचा जिव वाचवण्याची उत्कृष्ट संधी आपणास मिळत आहे ही गोष्ट लक्षात घेवून त्याला वाचवण्याची सिद्धता चालवली. त्यांना अनेक वनस्पतिंची माहीती होती. ख्रिस्ताच्या या असन्मरण स्थितीत अवश्य लागणार्‍या वणास्पती आणून प्रेतसंस्कार करण्याचा बाह्य विधिविधनांचा बाह्य देखावा करीत त्या वनस्पतीचे लेप त्याचे अंगाला आणि घाव झालेल्या भागाला लावले. ख्रिस्ताला समाधी देण्यासाठी म्हणुन जी समाधी बांधायची त्याखाली मोठी विवराची जागा निर्माण केली, त्या समाधीत ते प्रेत श्वासोश्वासाला वायु मिळेल अशी व्यवस्था करुन नेऊन ठेवले. ही समाधी जोसेफने आपल्या बागेत पूर्वीच खणून ठेवून त्याचा संबंध एका चोर वाटेने बाहेर दूर नेऊन ठेवला होता. ख्रिस्ताचे प्रेत आत ठेवल्यावर त्याला सावध करण्याचा प्रयत्न चालू झाला. नी नंतर ते विवर बाहेरुन बंद करुन ठेवून ते निघून गेले. पुष्कळ प्रयत्न नी वेळानंतर ख्रिस्ताचा श्वासोश्वास चालू झाला. हळूहळू तो सावध झाला. आणि एका रात्री तो जिवनदात ईशानपंथी साधू आणि ख्रिस्ट हे दोघे लपत-छपत सुरक्षीत स्थळी निघुन गेले. पुढे ख्रिस्ताने आपल्या काही प्रमुख शिष्यांना दर्शन दिले. समाधी महुन ख्रिस्त निघुन गेला आणि त्याने आपल्या शिष्यगणांना दर्शन दिले अशा वंदतां उठल्या होत्या त्यामुळे अधिकारीवर्गानी त्याला शोधून काढण्याचे प्रयत्न चालवले. " साधारण अशाप्रकारचा वृत्तांत या पत्रामध्ये येतो. यापुढे हा पत्रलेखक आपल्या पत्रात म्हणतो, "...ख्रिस्तच्या सुळानंतर त्याच्या आम्ही शिष्यांनी सात वेळा त्यच्यासाठी प्रसाद ग्रहण केला. आमची त्याच्यावर फार भक्ती होती. त्याच्यात परमेश्वरी वैभव प्रकट झालेले होते. तथापि जेजे घडले ते मी डोळ्यांनी पाहीले आहे. नी आता ख्रिस्ट पुर्णपणे संकटांच्या क्लेशांतून सुटल्यामुळे इतके दिवस अश्यक्य असलेले गौप्य तुला लिहिणे शक्य झाले आहे. मी जे लिहितो आहे तसेच माझ्या बुद्धीला पटलेले असुन ते पुर्णपणे सत्य असल्याचे माझे अंत:करणात पूर्णता: ठसलेले आहे. "
ख्रिस्ताला सुळी दिल्यानंतर भूकंप वगैरे सॄष्टी कोप झाला असे म्हणतात प्रस्तु पत्रलेखक ही या गोष्टीला दुजोरा देतो. पत्रलेखक म्हणतो ",..... आणि या धरणी कंपाच्या आपत्तीच्या भयाने बहुतेक लोक तेथून निघुन गेले. ही संशी साधून ख्रिस्ताचा स्नेही जोसेफ नी तिकोडेमस हे त्या सुळाकडे गेले. ख्रिस्ताची मान खाली पडली होती. तरी ईतक्या थोड्या अवधीत ख्रिस्ताचा प्राण गेला असेल से त्यांना वाटेना. म्हणुन त्वरेने ते दोघेजन अगदी सुळापाशी गेले. तो तेथे जान उपस्थीत आहे असे त्यांना दिसले. ईतर कोणी नाही हे पाहून त्यांनी ख्रिस्ताच्या देहाची तपासणी केली. तिकोडेमस आनंदाने जोसेफ ला म्हणाला, " माझ्या जिवनमरणाच्या स्थितीचे ज्ञानानुसारे आपण अद्याप आपल्या प्रिय ख्रिस्ताला वाचवू शकू." जोसेफ ला याचा अर्थ कळाला नाही. म्हणुन त्याने अद्याप जोसेफ ला गप्प रहण्यास बजावले. ख्रिस्ट अद्याप जिवंत आहे ही गोष्ट बाहेर फुटू नये म्हणुन त्याने असे केले. ’कसे ही करुन याची हडे मोडण्यापुर्वी याचा देह अद्याप आपण हस्तगत केला पाहीजे’. असे तो म्हणाला. नी जोसेफ ला पिलेकडे जाउन त्याचा मृतदेह त्याच्या अंतविधिसंस्कारार्थ आम्हाला मिळावा म्हणुन विनंती करण्यास सांगीतले. जान नी तो पत्रलेखक (या सर्व गोष्टी होत असताना तो पत्रलेखक तेथेच होता.) हे दोघे त्या देहाची हाडे त्या शिपायांकडुन मोडली जाऊ नये म्हणुन तेथेच थांबले. सुळी दिलेल्याचे अंगांत शस्त्र उपसुन तो जिवंत आहे का ? हे बघावयाचे आणि मेला असे वाटल्यास त्याची हाडे काही स्थळी मोडून मग त्याचे ते भग्न प्रेत अंत्यसंस्कारार्थ द्यावयाचे अशी प्रथा तेथे होती. असे प्राण गेलेले प्रेत खांबाव्र तसेच लटकत ठेवले जात नसे. अर्थात ख्रिस्ताचे प्रेत तत्काल खाली ओढले जाणार होतेच. ख्रिस्ताची हाडे शिपायाकडून मोडली जाऊन मग ते भग्न प्रेत अंत्यसंस्कारार्थदिले जावे म्हणुन पिलेजवळ मागणि केली होती. जोसेफ आणि तिकोडेमस आपापल्या कामगिरिवर गेले नाहीत तोच तेथे असलेल्या अधिकार्‍याकडे पिलेटकडून ते प्रेत खांबावरुन काढून अंतसंस्कारार्थ देण्याची आज्ञा येवून पोहोचली होती. ही आज्ञा येताच मी (पत्रलेखक) गोंधळलो, यास्थितित त्याचा देह फार काळजीपूर्वक आणि नी हळूवार हताने सुळावरुन काढला नाही तर त्याला वाचवणे कठीण जाईल आणि तेही हडांना काहीही आघात न होऊ देता काढावयाचे काम साधले पाहीजे. या विचाराने मला काळजी वाटू लागली. तो आज्ञावहक पिलेतकडून येताच मी (पत्रलेखक) त्याचेजवळ गेलो. तो पिलेटची आज्ञा घेवून निघण्यावेळीच जोसेफ तिथे जाऊन तेथे पोचला असे वाटून त्याला विचारले, "पिलेटने तुला पाठवले काय ?" , "नव्हे; त्याच्या कार्यवाहकाकडून आलो आहे. कारण असल्या साध्या कामांत पिलेट लक्ष घालत नाही. ही साधी कामे कार्यवाहकाकडून होतात." असे तो म्हणाला. तेथे असलेल्या अधिकार्‍यांनी मी चिंतायुक्त आहे असे पाहून माझ्याकडे पाहीले नी मी या गोष्टीचा लाभ घेवून त्याला मित्रत्वाच्या शब्दात म्हणालो, "हे पहा, ही सुळी गेलेली व्यक्ती असामान्य पुरुष आहे हे तुम्ही पाहीलेच आहे (धरणीकंपाचा संदर्भ देवून), तेव्हा त्याच्या देहाचे हाल करु नका, कारण पिलेटकडे एक श्रिमंत मणुष्य द्रव्याचे विनिमयांत प्रेत अभंग रहावे व त्याचा अंत्यसंस्कार योग्यप्रकारे व्हावे म्हणुन गेला आहे." ख्रिस्ताच्या मृत्युनंतर झालेल्या धरणिकंपामुळे ख्रिस्त निरपराधी असला पाहीजे असे त्या अधिकार्‍याला वाटूं लागले. नि म्हणुन त्याने माझे म्हणने शांतपणे ऐकून घेतले. शिवाय ख्रिस्ताची हाडे मोडावयास गेले तेव्हा हा अधीकारी ख्रिस्ताच्या देहाकडे येताच शिपायांना म्हणाल, "याची हाडे तोडू नका हा निश्चितच मेला आहे", . ख्रिस्त खरोखरीच मेला आहे हे पाहण्यासाठी एका शिपायाने आपला भाला ख्रिस्ताच्या शरिरांत खुपसला. देहाची हलचाल झालेली दिसुन आली नाही. पण ख्रिस्ताच्या घावांतून रक्त आणि पाणि बाहेर आले हे पाहून जनाला आश्चर्य वाटले आणि माझी आशा दुनावली. मृतदेहाच्या घावातुन रक्त बहेर येत नाही. गोठलेले रक्त गोळे वा बुंद बाहेर दिसण्यावाचुंन दुसरे काही दिसत नाही. हे जनाला माहीत होते. जोसेफ नी तिकोडेमस लवकर येवून पोहोचावेत म्हणुन मी फार उत्सुक झालो. एवढ्यात ते दोघे तेथे आले. तिकोडेमसने ख्रिस्ताच्या शरिरातुन पाणि आणि रक्त वाहत आहे हे पाहून आशा वाटू लागली. त्याने जोसेफ ला एका बाजूला घेतले नी तो म्हणाला "मित्रांनो ! आनंदाची गोष्ट आहे. ख्रिस्ट मृत झालेला नाही, त्याचा शक्तीपात झाला असल्यामुळे तो प्रेतासरका झाला आहे. चला कामाला लागुया !" जोसेफ पिलेट कडे गेला आणि त्याचवेळी मी आपल्या आश्रमात जाऊन काही वणस्पती आणल्या. आम्ही सुळाकडे गेलो. जिवणीकरणशास्त्रांच्या नियमानुसार ज्या दोराने ते प्रेत बांधले होते, ते दोर हळूवारपणे सोडले, हातात ठोकलेले खिळे काढले, आणि ख्रिस्ताच्या देहाला फार जपून भूमिवर निजवला. एका विषेशप्रकारच्या कपड्यावर निरनिराळी औशधे व दाहशामक वनस्पतिंचा वाटलेला ओला लेप आमच्या पंथातील विशेष माहीतीप्रमाणे लावला. नंतर हे लेप लावलेले कापड ख्रिस्ताच्या अंगाला लपेटले. अंत्यसंस्काराची सर्व विधिविधाने होईपावेतो प्रेतांत बिघाड होऊ नये म्हणुन हे सर्व आहे हे सर्वांना भासविले. मृतवत नि:संज्ञाता आलेल्या प्रेतासमान देहांत पुन्हा संज्ञा नी जाणिव ऊत्पन्न व्हावी म्हणून करावयाचे हे ऊपचार आमच्या य पंथाच्या वैद्यकीय पद्धतीत ठाऊक होते. तिकोडेमस नी जोसेफ हे त्याच्या देहाकडे झुकून त्याच्या डॊळ्यांतून अश्रुपात होत असलेल्या स्थितित ख्रिस्ताच्या नाकपुड्यांत आपला श्वास तोंडाने जोराने सोडीत, व कानसुले हळूहळू पण दाब देत चोळीत. जोसेफला फारशी आशा वाटेना पण तिकोडेमसने प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास संगीतले. दाहशामक व आराम देणारी अभ्यंजने खिळ्याचे घाव झालेल्या त्याच्या हाताला तिकोडेमसने लावली. त्याच्या कुशीत जो भाल्याचा घाव झाला होता तो मात्र त्याने बंद केला नाही. कारण त्यामुळे रक्तप्रवाह चालुं होऊन श्वासोच्छ्वासाला आरंभ आरंभ होण्यास त्या प्रवाहामुळे साह्य मिळेल असे त्याला वाटले. ईतके प्राथमीक ऊपचार झाल्यावर ख्रिस्तासाठी असलेल्या समाधीमध्ये ते ख्रिस्ताचे मृतमान झालेले शरीर नेवून ठेवले. त्या समाधीत २-३ जणांना सहज समावेष होईल अशाप्रकारे ती सिद्ध केली होती. काही शक्तीदायी वणस्पती आणि ईतर पदार्थ यांचा धूर तेथे त्यांनी केला. आंतील धूर बाहेर न जाता समाधीभर कोंडला जाऊन त्या स्थळी उष्ण वातावरण उत्पन्न व्हावे म्हणुन त्यांनी समाधीद्वारावर गदड ठेवला. मध्यंतरीच्या काळामध्ये पिलेटवरील अधीकर्‍याला संशय आला. आणि ख्रिस्तचे खरे प्रगट साह्यकर्ते कोण आहेत आणि यच्या मागचे रहस्य काय आहे हे जाणन्याकरीता वरिष्ठ अधिकारी साईयाकसने काही हेर तिकडे सुळाकडे आणि जोसेफ च्या घराकडे पाठवले. या काळात समाधीवर पहारा ठेवण्यासाठी एका ईशानपंथी अनुयायी प्रहारी नेमलेला होता. एके वेळी ख्रिस्ताच्या समाधीत जाण्यासाठी ईशान पंथाच्या चौथ्या श्रेणीतील एका प्रमुखाने जवलच्या पर्वतशिखरावरुन खाली उतरावयास प्रारंभ केला. पायघोळ असे पांढरी कफनी घातलेती ती मध्यमुर्ती त्या अंधूक प्रकाशातून सावकाशपणे खाली ऊतरत होती. हे पहताच त्या अधिकार्‍यांनी पाठवलेले शस्त्रधारी हेर गर्भगळीत झाले. हा देवपुरुष खाली आला. ख्रिस्ताचे समाधीचे तोंडावर बसवलेला दगडावर इशानपंथी जॊ प्रहारी बसला होता तो महापुरुष येताच दूर झाला. नी समाधीच्या विवरावरील तो दगड त्या महापुरुषाच्या आज्ञेने दुर करण्यात आले. हे पाहताच त्या हेराच्या पोटात पाय शिरले. त्याने तेथून पळ काढला. आणि एका देवपुरुषाने आम्हाला तेथून हुसकावून लावले असे तो लोकांना सांगू लागला.
ती समाधी परकीयांच्या भयाने मुक्त झाली. तो महापुरुष अद्याप आत शिरला नव्हता. पुन्हा एक भूकंपाचा धक्का बसला नी समाधीमधील दिवा मालवला जाऊन बाहेर झालेल्या प्रभातीच्या प्रकाशाचा प्रवेश त्या समाधीत झाला. औषधविलेपण झालेला तो ख्रिस्तदेह त्या समाधित ठेवून वर दगड बसवित समाधीद्वार बंद केल्यास आतापावेतो तीस तास होऊन गेले होते. त्या समाधीत काही थोडासा शब्द झालासे वाटून काय झाला हे पाहण्यासाठी तो तरूण महापुरुष त्या समाधीत उतरला. भूमितून ज्वाला निघण्यापुर्वी म्हणजे ज्वालामुखीचा स्फोट होण्यापुर्वी जसा वास सुटतो तसा वास आला. समाधीत जाऊन बघतो तर त्याला अत्यानंद व्हावा असे दृष्य त्याने पाहीले. त्या नि:सज्ञ व निर्जिव ख्रिस्ताचे ओठ हालत असुन श्वासोस्वास मंदगतीने होत आहे. तरुण धावत जाऊन ख्रिस्ताला साह्य करण्यास तत्परतेने सिद्ध झाला. ख्रिस्ताच्या कंठातून मंद गतीने ध्वनी निघत आहे.तोंडावरची प्रेतकळा जाऊन जिवनज्योती शरिरात आल्याचे तिज त्याचे मुद्रेवर खेळू लागले आहे.
मी (पत्रलेखक) आणि जोसेफ आता कसे नी काय करावे विचारण्यासाठी श्रेष्टींच्या आश्रमात आलो होतो त्याचवेळी वरील घटना समाधीस्थळी घडली. जोसेफने ख्रिस्ताला आलिंगण दिले . आणि त्याच्या मृतवत मुर्च्छेमुळे मृत्यु आला असे अधिकार्‍यांना कसे वातले, त्यामुळे त्याचे जिवन वाचवने कसे शक्य झाले, त्याला वाचवण्यासाठी काय काय उपाय योजावे लागले इत्यादी सारे वृतांत सांगीतले. ख्रिस्टाला आश्चर्य वाटले. काही काळ गेल्यानंतर जोसेफ म्हणाला यापुढे आपल्याला येथे राहणे सुरक्षीत नाही, कदाचीत शत्रूला सुगावा लागला असेल, व सर्व काही बिघडेल. तेव्हा त्याला लागलीच जवळच ईशानपंथियाच्या एका घरात आणन्यात आले. परमेश्वराने मला जिवदान दिले आहे व मी जे काही लोकांना उपदेशले त्याला मी पात्र असल्याचे सिद्ध व्हावे असा परमेश्वराचा हेतू असावा से ख्रिस्टाला वाटत होते. या दरम्यान समाधी स्वच्छ करावयास दोघेजण गेले होते ते परत येताच त्यांनी समाधीजवळ काय काय झाले ते सर्व सांगीतले ते थोडक्यात पुढीलप्रमाणॆ - पुश्कळ लोक समाधीस्थानाच्या उपवनाभोवती गोळा झालेले आहेत, त्यात एक स्त्री येरुशलेम हून आली होती, समाधीवरील दगड गदबडून बाहेर दूर जाऊन पडलेला तीने पाहीला तशि ती घाबरली, काही स्त्रीया समाधीजवळ गेल्या समाधी उघडी आहे असे वाटून त्या आंत शिरल्या. तेथे प्रेत न दिसता एक व्यक्ती उभी आहे असे एकीला दिसले नि तिने ईतरांना ते दृष्य दाखवले. तेव्हा त्या ईशानपंथीय व्हक्तीसह दुसराही मणुष्य त्यांना दिसला. (हे दोघे समाधी साफ करायला गेलेले ईशानपंथी होते.) तेव्हा सर्वांना ते देवदूत वाटले सर्वांनी त्यांना साष्टांग दंदवत घातले. त्या ईशानपंथियांनी जमलेल्यांना "ख्रिस्त हा पुन्हा अवतरीत झाला आहे, तो तुम्हाला येथे दिसणार नाही, तुम्ही गॅलिलिकडे चला" असा उपदेश केला. हे सर्व जोसेफने जुळवले होते. ईकडे आपल्या अप्तांना आपण जिवंत आहोत हे कळवण्यासाठी ख्रिस्ट अगदी उताविळ झाला होता. काही दिवसांतच तो वेशांतर करुन बाहेर पडला. ईकडे समाधीत काम करण्यास गेलेल दोघेजण आपले अपुरे काम टाकलेले पुरे करण्यासाठी समाधीकडे गेले. तेथे त्यांना ती पहीली स्त्री दिसली. याचवेळी अचानकपणे वेशांतर केलेला ख्रिस्त तिच्यापुढे येवून उभा राहीला. ती स्त्री मेरी होती.मेरी आणि ख्रिस्त यांच्यामध्ये संभाश्ण चालू असताना मेरी ख्रिस्ताच्या जवळ येताच ख्रिस्ट तीला म्हणाला,"मला स्पर्ष करु नको, मी जिवंत आहे तरी पण लवकरच स्वर्गिच्या परमेश्वरी इच्छेप्रमाणे नि देह अत्यंत नि:सत्व नि शक्तिहिन असल्यामुळे मला मरनाला कवटाळावे लागेल."
ईकडे नगरांत त्या रात्री त्या पाळलेल्या प्रहारी व हेरांनी आपला भित्रेपणा झाकण्यासाठी खुपच भयंकर गोष्टी पसरवल्या, देवदूत आलेहोते, भयंकर दृष्ये दिसली, देवदुतांनी त्यांना हुसकावुन दिले, ईत्यादी गोष्टी तिखटमिठ लावून त्यांनी सांगीतल्या. " अशाप्रकारे सदर पत्रलेखकाने येशूच्या मृत्यु व त्याचे पुनरागमनाविषयी सविस्तर वास्तवाचे वर्नन केले आहे.
हे झाले पुनरागमनाविषयी. आता येशूच्या भारतात पुनरागमनाविषयी थोडा दृष्टीक्षेप टाकू. येशू आपल्या पुनरागमानंतर हिमालयामध्ये पर्यायाने भारतात आला असा काही विद्वानांचे मत आहे. नामनाथावली नामक एक पारंपारीक ग्रंथ आहे. त्यामध्ये येशूख्रिस्ताला सुलावर दिल्यामुळे मरणांकीत वेदना होत तो मृत्युसंकटात सापडल्याचे जाणून हिमालयावर योगमग्न असलेल्या चेयननाथांनि पॅलेस्टाईनकडे प्रयाण केले. असा त्यामध्ये संक्षेपाणे उल्लेख आहे. त्यामध्ये समाधीमध्ये त्यांच्या त्याचे देहावर उपचार करुन ख्रिस्ताला शुद्धीवर आअणल्याचे सांगुन त्याला ते पुढे ईकडे (भारतामध्ये) घेवून आले एवढेच सांगितले आहे. डॉ. महम्मद अली आपल्या कुराणातील कविता क्र, ६४५ मरिल टिपेत "ख्रिस्त हा सुळावर मारला गेला नाही, तो जिवंत रहीला." तसेच पुढे कुराणाच्या १७२३ वरील टिपेमध्ये अनेक प्रमाणे देवून ख्रिस्त हा कश्मिरमध्येच शेवटी आला नी तेथेच त्याला मृत्यु आला असे प्रतिपादन केले आहे. त्यांनी दिलेले पुरावे पुढीलप्रमाणे.- १) समुद्रसपाटीपासुन खूप उंच असलेल्या , सुपिक स्थलोस्थली जलाशय असलेल्या प्रदेशी ख्रिस्त गेला आहे असे वर्णन आहे, वास्तविक हे वर्णन कश्मिरचे आहे. २) पॅलेस्टाईनमधुन नाहीशा झालेल्या दहा जातींचा ठावटीकाना कश्मिरात लागतो.
आता आपण वळणार आहोत भविष्यपुराणाकडे, येशू आपल्या मुनरागमानानंतर भारतामध्ये हिमलयात आला याची पुष्टी भविष्यपुराणामध्ये सुद्धा आहे. भविष्यपुराण, प्रतिससर्ग (तृतिय खंड) राजा शालिवाहन आणि ईशपुत्र अर्थात येशू ख्रिस्ट यांची भेट वर्णिली आहे ती पुढीलप्रमाणे - "एकावेळिची गोष्ट आहे, तो शकाधीश शालिवाहन हिमशिखरावर गेला होता, त्याने हून देशातिल मध्य स्थित एका पर्वतावर एका सुंदर पुरुषाला पाहीले.त्याचे शरीर गोरे होते. व त्याने श्वेत वस्त्रे धारण केलेली होती. त्या व्यक्तीला पाहून राजा शालीवाहन म्हणाला, ’आपण कोण आहात ? ’ यावर तो पुरुष म्हणाला , ’मी ईशपुत्र आहे आणि मी एका कुमारीच्या पोटी जन्मलो आहे मी म्लेंच्छ धर्माचा प्रचारक आहे’. राजाने विचारले , ’ आपला धर्म कोनता आहे ?’ तेव्हा ईशपुत्राने उत्तर दिले , ’ महाराज ! सयाचा विणाश झाल्यानंतर म्लेंच्छ प्रदेशामध्ये मी एक मसीहा बनुन आलो होतो आणि इशामसिच्या आधारे मी त्या लोकांमध्ये मसिहत्व मिळवले. मी म्लेंच्छंमध्ये ज्या धर्माची स्थापणा केलेली आहे ती ऐका- सर्वात आधी माणसिक आणि दैहीक मळाला बाहेर काढून पुर्णत: निर्मल करावे लागेल. त्यानंतर ईष्ट देवतेचा जप करणे , न्यायाने चालणे, आणि मणाला एकाग्र करुन सुर्यमंडलामध्ये स्थीत अशा परमेश्वराची पूजा केली पाहीजे. कारण इश्वर हा सुर्यासमान आहे. परमात्मा हा अविचल आणि सुर्य हा सुद्धा अविचल आहे. हे भूपाला ! असे करण्याने ते देवत्वामध्ये विलिन होतील. पण माझ्य हृदयामध्ये नित्य विषुद्ध कल्यानकारी ईश-मुर्ती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणुनच माझे नाव ईशामसीह प्रतिष्ठीत झाले आहे. येवढे ऐकल्यानंतर राजा शाक्लीवाहनने त्या म्लेंच्छ पूजकाला प्रणाम केला आणि निघून आला.’"
येशू हा कश्मीरमाध्ये आला होता याचा आणखि एक ह्महत्वाचा पुरावा म्हणजे त्याची समाधी. श्रीनगर मधील खातयार नामक मार्गामध्ये एक समाधी आहे. तिला नबिसाहेबांची (पैगंबर म्हणजेच ईश्वर प्रेशीत) समाधी असे म्हणतात. , ईसासाहेबांची समाधी, युसफनबी (पैगंबर) ची समाधी असे म्हणतात. मुसलमान महंमदानंतर कोणीच पैगंबर झाला नाही असे मुसलमान माणतात. महमदापुर्वी निकटचा असा ख्रिस्टच पैगंबर होता. तेव्हा नबीची समाधी म्हणजे ख्रिस्ताची समाधी असली पाहीजे. याव्यतिरिक्त तीला ईसाची समाधी असे म्हणतात. या समाधीसंबंधि आपल्याला Tomb of jesus.com या संकेतस्थळावर अधीक माहीती मिळेल. या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले ख्रिस्ताच्या समाधीचे फोटो येथे देत आहोत.


1)

5 comments:

  1. सर्वांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची
    वेळ आला आली आहे.......!

    अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. येशू हा भारतीय होता. तसेच त्याचा मृत्यूही भारतातच झाला. हे तुम्ही येथे सिद्ध केले आहे. येशू हा इशानपंथीय होता, म्हणजेच ख्रिस्ती धर्म हिन्दू धर्माचाच एक पंथ ठरतो. हेसुद्धा आपण सिद्ध केले आहे. याचाच अर्थ ख्रिस्ती लोक हिन्दू धर्मीयच आहेत. ख्रिस्त्यांना आपण इशानपंथीय म्हणू शकता.

    यापुढे ख्रिस्ती मिशन-यांना आपण सर्वांनी सहकार्य करायला हवे, असे मला वाटते. ख्रिस्ती धर्म उर्फ इशानपंथाचा संपूर्ण जगात अनुयायी वर्ग आहे. आपण भारतालाही इशानपंथी करू या.

    आपण सर्वांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची वेळ आला आली आहे, असे मला वाटते.

    आमेन.

    ReplyDelete
    Replies
    1. Bharat Joshi (BhartKumar), आपण गांभीर्याने लिहिले आहे की उपरोधाने? गांभीर्याने लिहिले आहे असे धरून चालतो.

      >> यापुढे ख्रिस्ती मिशन-यांना आपण सर्वांनी सहकार्य करायला हवे, असे मला वाटते. ख्रिस्ती
      >> धर्म उर्फ इशानपंथाचा संपूर्ण जगात अनुयायी वर्ग आहे. आपण भारतालाही इशानपंथी करू या.

      काय गरज आहे भारताला ईशानपंथीय करण्यची? भारतात प्रत्येकाला स्वत:चा पंथ आचरण्याची मुभा आहे. ईशानपंथ हिदू धर्माचा एक भाग आहे म्हणून पोपच्या मागे जायचं, हे काही कळत नाही मला.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
    2. आपण रामपाल जी महाराजांची दीक्षा घ्या, त्यांच्या वेबसाईटवरील पुस्तकं वाचा, आणि ह्या विश्वातून तुम्ही आपोआप मुक्त व्हाल.

      Delete
  2. तू खूप कष्टाने लिहिलेला लेख कोणी वाचलाच नाही, त्यामुळे तुझ्या मनाला किती दुख: होत असेल हि मी समजू शकतो.
    अगदीच कोणी प्रतिक्रिया देइन म्हणून मी दिली, आता खुश ना !

    ReplyDelete
  3. 'न' व 'ण' च्या वापरासंदर्भात खूपच गोंधळ आहे. नेमके बहुतेक उलट वापरलेले आहेत. ते बरेच खटकतात. बाकी लेखउत्तम आहे. पुढील लेखात सुधारणा झाल्यास उत्तमच.
    विदर्भात मोठा न =ण व लहान न = 'न' म्हणतात.

    ReplyDelete