Sunday, March 21, 2010

बुद्धावतार

-----------
भगवान विष्णूंचे प्रमुख दहा आणि एकूण चोविस अवतार आहेत असे माणले जाते. या अवतारांमध्ये भगवान बुद्ध यांना थोडे बाजुला केले तर गोष्टीमध्ये साम्य आढळते आणि ती म्हणजे प्रत्येक अवतार भगवाण विष्णूनी धर्माच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाशासाठी घेतलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत: अभ्युतानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ! आणि यापुढे भगवान विष्णूंचा होणारा कल्की अवतारही धर्माच्या रक्षणासाठीच असणार आहे.
भगवान बुद्धांना विष्णूंचे अवतार माणले जाते. पण विष्णूचा एक ’अवतार’ म्हणुन भगवान बुद्धांचा जन्म काही पटत नाही कारण विष्णुच्या ईतर अवतारांप्रमाणे बुद्धांनी ना वैदीक धर्माचे रक्षण केले आहे , ना दुर्जनांचा विणाश केला आहे उलट भगवान बुद्धांनी वैदीक धर्म, वैदीक चालीरिती, वेद व पुराण यांच्यावर टिका केली आहे, भगवान बुद्धांना वैदिक धर्म पटत नाही म्हणून त्यांनी वैदिक धर्माशी फरकत घेतली, पण तरी सुद्धा भगवान बुद्धांना आज आपण भगवान विष्णूंचा एक अवतार माणतो . हिन्दु पुराणां नुसार भगवान बुद्ध हे विष्णूचे आवतार होते, किवा भगवान विष्णू पुढे बुद्धदेवांच्या रुपात प्रगट होइल. आसे वर्णन जवळ पास सर्वच पुराणात आलेले आहे. काही वेळ मान्य केले की भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार अहेत तर मग जर बुद्ध हे विष्णूंचेच अवतार आहेत तर मग विष्णूच्या या अवताराचे अवतारकार्य असे विरोधी कसे , विष्णूंच्या अवतारांची कार्ये ही लोकांना वेदमार्ग दाखवणे, धर्माचरण करण्याच प्रवृत्त करणे, धर्मावर आलेली संकटे दूर करणे व अधर्मी व पाखंडी लोकांचा विनाश करणे साधारण अशा प्रकारची राहीलेली आहेत मग बुद्धावतारात हा विरोधाभास का ? भगवान विष्णू आपल्या बुद्धावतारामध्ये का लोकांना वेदमर्गापासून दूर व्हा असे सांगतात ? यज्ञ व अहुती यांसरख्या वैदीक क्रियांना बुद्ध का पशुहिंसा मानतात व आपल्या अनुयायांना या पशुहिंसेपासुन दूर रहा व अहिंसेचे पालन करा असा उपदेश देतात ? एकंदरी शेवटी शेवटी आपल्याला असे वाटायला लागते ज्याअर्थी बुद्धदेवांचे आचरण विरोधी आहे त्या अर्थी की भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार असुच शकत नाहीत ! पण थोडे थांबा ! या प्रश्नांची उत्तरे आहेत !
भगवान बुद्धदेवांचे एक अवतार म्हणुन आचरण ईतके विरोधी कसे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर आपल्याला शेवटी आज ’टाकावू’ उपाधी प्राप्त पुराणांकाडेच जावे लागते. विष्णूपुराण !
विष्णूपुराण च्या तृतीय अंशामधील सतराव्या अध्यायामध्ये एक कथा येते ती त्यामध्ये देव व असुर यांच्यातील एका युद्धाचा उल्लेख येतो तो असा .
देवासुरंभूद्युध्दं दिव्यमब्दशतं पुरा !
तस्मिन्पराजीता देवा दैत्यैर्हादपुरोगमै !!
अर्थात पुर्वकाळामध्ये देव आणि दैत्य यांच्यात एक घणघोर असे युद्ध झाले त्यामध्ये ’ह्याद’ प्रभुतीवाल्या दैत्याद्वारा देव पराजीत झाले. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूची अर्चना केली. याठीकाणी असे ही म्हटले आहे की या युद्धामध्ये दैत्य विजयी झाले कारण त्यांनी ब्रम्हदेवांची आज्ञा उल्लंघून त्रिलोकातील देवांच्या अशीकारातील यज्ञभागांचे अपहरण केले आणि अशाप्रकरच्या यज्ञादी कर्मकांडामुळे दैत्य अधीक शक्तीशाली झाले . या युद्धामध्ये दैत्यांचे रक्षण त्यांच्या साधनेने केले होते स्वधर्मरूपी कवच त्यांच्या भोवती तयार झालेले होते आणि आता सुद्धा ते यज्ञभाग त्यांच्याच ताब्यात होते. या यज्ञाभागांचा उपयोग करुन दैत्य दिवसेंदिवस अधीक शक्तीशाली होतील अशी भिती देवांना वाटू लागली .
त्रैलोक्ययज्ञभागश्च दैत्यर्हादपुरोगमै !
ह्रता नो ब्रम्हणोsप्यज्ञामुल्लंय परमेश्वर ॥
यद्यप्यशेषभूतस्य वयं ते च तवांशजा: ।
तथाप्यविद्याभेदेन भिन्नं पश्यामहे जगत ॥
याच्या पुढे ही देवता श्री विष्णूला विनवताना म्हणतात , हे परमेश्वर ! ह्याद प्रभूतीवाल्या दैत्यांनी ब्रम्हदेवांची आज्ञा मोडून आमचे व त्रिलोकांच्या यज्ञभागांचे अपहरण केले आहे. जसे की आमी आणि दैत्य सर्वस्वी आपलेच वंशज आहोत, अविद्यावश आम्ही सर्वांना एकमेकांना भिन्नभिन्न मानतो. आमचे शत्रू दैत्यगण वर्णधर्माचे पालन करनारे वेदमार्गावलंबी आणि तपोनिष्ठ बनले आहेत. अशा परिस्थित आम्ही त्यांचा नि:पात नाही करु शकत. आता हे परमेश्वर ! ज्यामध्ये आम्ही त्या दानवांचा नि:पात करु शकू असा कोनतातरी उपाय सांगा ! आम्ही आपल्याला शरण आहोत !
स्ववर्णधर्माभिरता वेदमार्गनुसारिण: ।
न शक्यास्तेरयो हन्तुमस्माभिस्तपसाव्रुता: ॥
या देवतांच्या याचनेनंतर झाले असे की ..
इत्युक्तो भगवांस्तेभ्यो मायामोहं शरीरत: ।
समुत्पाद्य ददौ विष्णु: प्राह चेदं सुरोत्तमान ॥
मायामोहोयमखिलांदैत्यांस्तान्मोहयिष्य़ति ।
ततो वध्या भविष्यन्ति वेदमार्गबहिष्कृता : ॥
स्थितौ स्थितस्य मे वध्या यावंत: परिपंथिन: ।
ब्रम्हणो ह्याधिकारस्य देवदैत्यादिका: सुरा : ॥
तदूच्छत: न भी: कार्या मायामोहोयमग्न्त: ।
गच्छन्नद्योपकाराय भवतां भविता सुरा : ॥
अर्थात भगवाण विष्णूनी देवतांचे म्हणने शांतपने ऐकून घेतले व नंतर आपाल्या शरीरामधून "मायामोह" नावाच्या अंशाला उत्पन्न केले आणि भगवान पुढे देवतांना म्हणाले , "हे मायामोह त्या संपूर्ण दैत्यांना मोहीत करेल, व त्यांना वेदमार्गापासून प्रवृत्त करेल तेव्हा त्यांच्याकडून वेदमार्गाचे उल्लंघण झाल्याने त्यांचा नि:पात करणे तुम्हाला जड जाणार नाही. ! हे देवगण हो , जो कोणी देवता अथवा दैत्य ब्रम्हाजींच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतो तो तो सृष्टीच्या रक्षणामध्ये माझा ’वध्य’ असतो. आता हे देवगणहो तुम्ही निश्चिंत व्हा हे मायामोह यापुढे तुमचा हित करतील. " पुढे भगवान विष्णूच्या अंशापासुन उत्पन्न झालेले भगवान मायामोह आसुरांकडे गेले.
सारे आसुर नर्मदेच्या तटावर तपोअस्येमध्ये तल्लिन होते. तेव्हा त्या ’मयुरपिच्छधारी’ ,’दिगंबर’ आणि ’मुंडितकेश’ अशा मायामोह अतिशय मधूर वाणीमध्ये आसुरांना म्हणाले,
हे दैत्यपतयो ब्रुत यदर्थ तपस्ये तप: ।
ऐहिकं वाथ पारत्र्यं तपस: फलमिच्छथ ॥
अर्थात : हे दैत्यगणहो ! तुम्ही कोणत्या उद्देशाने हे तप करत आहात ? आपल्याला कोणत्या लौकीक फळाची इच्छा आहे की पारलौकिक ?
यावर दैत्यगण म्हणाले हे महामते ! आम्ही पारलौकीक फळासाठी हे तप करत आहोत. तुमचे यासंबंधी काय मत आहे ?
मायामोह म्हणाले.
कुरुध्वं मम वाक्यानि यदी मुक्तिमभीप्सथ ।
अहर्ध्वमेनं धर्म च मुक्तिद्वारमसंवृतम ॥
धर्मो विमुक्तेरर्होयं नैतस्मादपरो वर: ।
अत्रैव संस्थिता: स्वर्ग विमुक्तिं वा गमिष्यथ : ॥
अहर्वध्वं धर्ममेतं च सर्वे यूयां महाबला: ॥
अर्थात : जर तुम्हाला मुक्तीची इच्छा असेल तर मी जे सांगतो ते करा . तुम्ही लोक मुक्तिसाठी खुल्या दरवाज्यास्वरुप या धर्माचे आचरण करा . याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. याचे अनुष्ठान केल्याने तुम्हालोकांना स्वर्गाची प्राप्ती होईल अथवा मुक्ती मिळू शकेल. तुम्ही लोक महाबलवान आहात , तुम्ही या (मी सांगत असलेल्या) धर्माचा आदर करा . ’ अशाप्रकारे नाना प्रकारे युक्त्या वापरुन्ब भगवान मायामोह यांनी दैत्यांना वैदिक मार्गापासुन भ्रष्ट केले, "हे धर्मयुक्त आहे व हे धर्मविरुद्ध आहे, हे मुक्तिकारक आहे व हे हे मुक्ती देवू शकत नाही, हे अत्यांतीक परमार्थीक आहे व हे पारमार्थीक नाही . हे हे कर्तव्य आहे व हे हे अ कर्तव्य आहे. या दिगंबरांचा धर्म आहे आणि हा सांबरांचा धर्म आहे ईत्यादी’ ! अशाप्रकारे अनेक प्रकारच्या युक्त्या लढवून भगवान मायामोह यांनी वेदमार्गाचे अनाधीकारी असलेले आसुरांना वेदमार्गापासून दूर नेले. मायामोह दैत्यांना म्हणाले की या माझ्या महाधर्माला ’अहर्त’ अर्थात याचा आदर करा. व यायोगे या धर्माचा अवलंब केल्याने तुम्ही ’आहर्त’ हनवाल !
मायामोहांनी आसुरांना वेदधर्मापासून विमुख केले व ते आसुर मोहग्रस्त झाले. अशाचप्रकारे मायामोहांचे नव्या धर्माचे तत्वज्ञान आसुरांमध्ये फैलावत गेले एका आसुरा्कडून दुसर्‍या आसुराकडे दुसर्‍याने तिसर्‍याला तिसर्‍याने चौथ्याला अशाप्रकारे थोड्याच दिवसात दैत्यगणांनी वेदधर्माच्या त्याग केला.
यानंतर मायामोह यांनी रक्तवस्त्र (भगवी वस्त्रे) धारण करुन अन्यान्य आसुरांकडे जाऊन आपल्य मृदू, अल्प आणि मधूर शब्दांमध्ये समजावले, ’ हे असुर हो ! उम्हाला जर मुक्ती अथवा स्वर्गाची इच्छा आहे तर तुम्ही अशाप्रकारे पशुहिंसा (यज्ञ) कशासाठी करता ? पशुहिंसा ईत्यादी दुष्टकर्मांचा त्याग प्राप्त करुन बोध प्राप्त करा, (तदलं पशुघातादिदुष्टधमैनिर्बोधत ॥) हे सारे जग विज्ञानमय आहे असे समजा , माझ्या वाक्यांवर विश्वास ठेवा. या विषयी बुद्धीवाद्यांचे असे मत आहे की हे सारे जग अनाधार आहे, भ्रमजन्य पदार्थांच्या प्रितिवर स्थिर आहे. तसेच रोगादी दोषांने दुशीत आहे (थोडक्यात जग हे दु:खमय आहे). या संसारसंकटामध्ये जीव भटकतो ! अशाप्रकारे "बुध्यात (जाणा), बुध्यध्वं (समजून घ्या), बुध्यात (आणि पुन्हा जाणा)" ( एवं बुध्यात बुध्यध्वं बुध्तैवमितिरयन ) ईत्यादी शब्दातून बुद्धधर्माचा निर्देश करुन मायामोह यांनी दैत्यांचा स्वधर्म दूर केला. मायामोह यांनी असे अनेक प्रकारे बुद्धीवाद केला आणि वेदाचे अनाधिकारी असलेल्या असुरांना निजधर्मापासून दूर नेले. आणि मायामोह यांनी केलेला बुद्धीवाद एकाकडून दुसर्‍याकडे व दुसर्‍या कडून तिसर्‍याकडे अशाप्रकारे पसरत राहीला. अशाप्रकारे आता आसुर वेदमार्गापासुन दुर तर गेले तसे ते वेदमार्गाची निंदा सुद्धा करु लागले. ते म्हणू लागले , "नैतद्युक्तिसहं वाक्यं हिंसा धर्माय चेष्यते" म्हणजे हिंसेमध्ये(यज्ञादी कर्मकांड) पण का धर्म असतो ? अहिंसा हाच खरा धर्म ! अग्निमध्ये हवन टाकल्याने पन का कधी फलप्राप्ती होते का ? जर यज्ञामध्ये बळी दिले गेलेले पशू स्वर्गात जात असतील तर यजमान आपल्या पित्याला का नाही यज्ञात बळी देत ? जर दुसर्‍या एखाद्या पुरुषने भोजन करण्याने एकाद्या मृत व्यक्तीची तृप्ती होत असेल तर प्रवासा वेळी काद्यपदार्थ सोबत घेवून जाण्याची काय गरज आहे ? घरतील व्यक्ती परस्पर यात्रेला गेलेल्या व्यक्तींचे श्राध्य घातले तर नाही का चालणार ? अशाप्रकारे श्राद्धादी कर्मे ही निव्वळ अंधश्रद्धा असुन त्यांची निंदाच केली पाहीजे , " जनश्रध्येयमित्येतद्वगम्य ततोत्र व: । उपेक्षा श्रेयसे वाक्यां रोचते यन्मयेरितम ॥".
अशाप्रकारे मायामोह यांनी दैत्यांना वेदमार्गापासुन विचलीत केले . आता त्यांना या वेदमार्गामध्ये अजिबात रस राहीला नाही. आता देवतांनी दैत्यांना परास्त्र करण्याची कूप तयारी केली. आणि थोड्याच कालावधीनंतर देव व दानवांत पुन्हा युद्ध सुरु झाले. आणि या युद्धामध्ये देवता विजयी होऊन दैत्य परास्त्र झाले. कारण यावेळी दैत्यांकडे पूर्विप्रामाणे स्वधर्मरुपी कवच नव्हता. (स्वधर्मकवचं तेषामभूद्यत्प्रथमं द्विज । तेन रक्षाभवत्पूर्व नेशुनर्ष्टे च तत्र ते ॥)
अशाप्रकारे भगवान मायमोह यांची कथा विष्णूपूराण मध्ये आलेली आहे. आणि हे भगवान मायामोह हेच भगवान बुद्ध आहेत हे कळायला आता आपल्याला वेळ लागणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की दैत्यांना वेदयज्ञपठनाचा अधिकार नव्हता तर दैत्य वेदयज्ञपठनातून मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग चुकिचा करत होते . याच अध्यायात पुढे म्हटले आहे की
नित्यानां कर्मणां विप्र तस्य हानिरहर्निशम ।
अकुर्वन्विहितं कर्म शक्त: पतति तद्दिने ॥
अर्थात सामर्थ्य असुनसुद्धा जो चांगले कर्म करत नाही तो त्या दिवसापासुनच पतित ठरतो.
आत याठीकाणी उभाराहनार प्रश्न म्हणजे भगवान मायामोह हेच भगवान बुद्ध कशावरुन ? तर भगवान मायामोह व भगवान बुद्धांच्या शिकवणूकीमध्ये एकवाक्यता आहे . जग हे दु:खमय आहे असा दोघांच्याही शिकवणुकीचा सार आहे . शिवाय या अध्यायात उल्लेख आलेला आहेच की , "एवं बुध्यात बुध्यध्वं बुध्तैवमितिरयन " ! अर्थात जाणा समजून घ्या आणि पुन्हा जाणा असा बुद्ध धर्म होय . तसेच भगवान मायामोह यांनी आपल्या अनुयायांना केलेला उपदेस व वैदीक धर्माच्या विरोधत केलेला बुद्धीवाद आजसुद्धा वैदिक हिंदु धर्माच्या विरोधात पावरण्यात येत आहे. याच्याहीपुढे याच अवताराचा उल्लेख श्रिमद्भागवत्महापुरामामध्ये आलेला आहे. श्रिमद्भागवत्महापुराण प्रथम स्कंद तिसर्‍या अध्यायामध्ये भगवान विष्णूच्या अवतारांचे वर्णन आले आहे यामध्ये बुद्धावताराविषयी आलेला उल्लीख असा, "...याच्यानंतर कलियुग आल्यानंतर मगधदेश(बिहार) मध्ये देवतांचे द्वेशी दैत्यांना मोहीत करण्यासाठी अजनच्या पुत्ररुपामध्ये आपला (भगवान विष्णूंचा) अवतार होईल." तसेच श्रिमद्भागवत मध्ये बुद्धावताराचा उल्लेख एकादश संदामध्ये चौथ्या अध्यायामध्ये आले आहे ते असे , "पुढे कलियुगात भगवान विष्णू बुध्दाच्या रुपात अवतरित होतील व यज्ञाच्या अनाधिकार्‍यांना यज्ञ करताना पाहुन अनेक प्रकारे तर्क-वितर्क लढवून त्यांना मोहीत करतील" , आणि काहीसा असाच उल्लेख गरुड पुराण मध्ये अलेला आहे तो असा, "..एकविसाव्या अवताअरामध्ये कलियुगाच्य संधीकाळाच्या शेवटी देवद्रोह्यांना मोहित करण्यासठी किकट देशामध्ये जिनपुत्र ’बुद्ध’ या नावाने अवतरीत होतील." आता दुसरा प्रश्न उपस्थित होतो की जर मायामोह यांची कथा मानायची झाल्यास सर्व बौद्ध म्हणजे मायामोहांचे अनुयायी हे कथेत सांगीतल्याप्रमाणे असुर, दैत्य व वेदअनाधीकारी ठरतात . पण याठीकाणि आसुर ही कथा जशास तशी घेण्याचे कारण नाही असुर याचा अर्थ अनाधीकारी व दुष्ट प्रवृत्तीचे लोक असाही आहे व श्रिमद्भागवत महापुराणांतील संदर्भामधुन सुद्धा असेच स्पष्ट होते, याठीकाणी विष्णूपुराण व श्रिमद्भाग्वत महापुराणांमध्ये भगवान मायामोह तथा भगवान बुद्धांनी "वेद-यज्ञाचे अनाधीकारी " असणार्‍यांना वेद-यज्ञापासुन दुर नेले आहे ना की कोणत्या एका विषीष्ठ जात अथवा जमातीला. त्यामुळे जे कोणी दुष्ट प्रवृत्तीवाले लोक होते त्यांना भगाअन मायामोह यांनी मोहीत करुन वैदीक धर्मापासुन दुर नेले आता याचा अर्थ असा नव्हे की जरी पुढे या दुष्ट प्रव्रुत्तीच्या लोकांमध्ये एखादा सत्पुरुष जन्माला आला तर त्याला वेदाध्ययनाचा अधिकार मिलनार नाही. भगवान मायमोहांनी दैत्यांना वेदाध्यनापासुन दुर नेले याचे कारण म्हणजे ते या अध्ययनातुन मिळनार्‍या सामर्थ्याचा वापर सत्कार्यासाठी न करता वाईट कामासाठी करत होते म्हणून . पुढे जरी या लोकांच्या पोटी एखादा सत्पुरुष जन्मास आला तरी त्याला वेदाध्ययनाचा अधिकार असणारच आहे. प्रल्हाद हा एका असुराचा मुलगा असुनही भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यामुळे बौद्ध हे असुर आहेत असे समजण्याचे कारण नाही. आणि आज काही त्यावेळची परिस्थिती राहीलेली नाही . परंतु दुर्दैवाने आजसुद्धा बौद्ध लोक वैदीक धर्मावर टीकाच करत आहेत. वैदिक हिंदु धर्मावर टीका करणे हेच ते आपले जिवितकार्य समजतात. परंतू त्यांनी आज वास्तव समजून घेण्याची गरज आहे. आणि वैदिक हिंदू धर्मातील हिंदुंनी सुद्धा . भगवान बुद्ध सुद्धा ईतर अवतारांप्रमाणेच एक अवतार होते त्यांनी फक्त आपल्या धर्मातील त्या वेळच्या अनाधीकारी लोकांना दूर केले एवढेच आणि याचा अर्थ असा नव्हे की आजच्या बौद्ध लोकांनी सुद्धा दुरच रहावे. भगवान मायामोह पर्यायाने भगवान बुद्ध याच धर्मातील एका महान देवतेचे अंश आहेत. ज्या धर्मात भगवान बुद्धांना अवतार मानले जाते. आणि ईतर देवतांप्रमाणे बुद्धांना मानाचे स्थान आहे.
वरिल विवेचनावरुन समजते की भगवान बुद्ध हे भगवान विष्णूंचे अंशावतार आहेत. तसेच जातक कथां मधे स्वतः तथागत बुद्ध स्वथः चे २४ पुनर्जन्म झाले आसे मान्य करतात आणि त्या जन्मांमधे प्रत्येक जन्मातुन त्यांने काय चंगले घेतले ते सांगितलेले आहे. पण याठीकाणी उपस्थित राहनारा एक प्रश्न म्हणजे जर हिंदु लोक भगवान बुद्धांना आपलादेव मानत आहेत तर त्याची पूजा अर्चावगैरे का करत नाहीत ? तसे पाहीले तर ब्रम्हा हा एक हिंदु देवता असा आहे की ज्याची पूजा वगैरे होत नाही तसेच त्याचे मंदिरही केवळ एकाच ठीकाणी आहे. याचा अर्थ आसा घ्यायचा का की ब्रम्हा हा हिंदुंचा देवच नव्हे. वैदिक धर्ममध्ये भगवान बुद्धाची पुजा होत नाही हे म्हणने चुकिचे आहे . वराह पुराण मध्ये सत्तेचाळीसाव्या अध्यायामध्ये "बुद्ध-द्वादशी"चे वर्णन आले आहे. भगवान बुद्धरुपी श्रीहरीचे चरण, कटीभाग, उदर, छाती, हात, कंठ, शिर अशाप्रकरे क्रमश: अर्चना सांगितलेली आहे, याचबरोबर कलशस्थापना वगैरे अर्चना सांगितलेली आहे.

20 comments:

  1. to understand bhaggvan Buddha one must learn vipassana technique... free of cost...
    it will help to eradicate false beliefs and realization of truth.

    related link: www.vridhamma.org

    ReplyDelete
  2. kharach tumi lok great aahat... changle te aaple... he tumchi sanskruti.... aare ithe yavadi budhi chalvanya peksha hindu dhrma madhe nakki kay vait aahe aani budha ne ka tumchya vaidaik dharmala virod kela yavar toda aabhyas kara budhane thobadi marli tumchya ved puranchya.... tari sudha laz naslyasarkhe bolta budha avtar.... sheeeeeeee... suraj (sir????)...

    ReplyDelete
  3. अभ्यास ?? तो मि विपश्यना शिबिरात जाऊन कधीच चालू केला आहे. खरा विषय हा आहे की स्वत:ला बौद्ध म्हनुन मिरवणार्‍या किती बौधांना खरेच भगवान बुद्धांच्या शिकवनुकीचे ज्ञान आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. suraj tuza blog vachala.. aani vachun khup vait vatale... tuza sarvat majeshir lekh mahnje yeshu baddal... kontya tari orisa madhlya rajanye yeshu la mandirat pahile aani tyla vedache shikshan dile... hhahahahaha... aare ajun sudha tya jaganath mandira madhe hindu shivya konala pravesh dila jat nahi.. aani tu bolato tithe shikshan ghetale... ani jya kalat yeshu india madhe aala hota to kalat ya deshamadhe nalanda vidhyapith astitwat aale hote... aaik vel yeshu tithe shikla asta ase bolale aste tari far milte julte vatale aste... bare zale tu vipshnacha karu laglas kamit kami tuze tode vichar tari badaltil... pan vipshanasathi matra 100% manus mahnun kar... manje tula barobar uttare miltil.. nahi tar aamche ch changle amche ch changle manalas tar udya tu vipashna sudha vait manshil.. tuza mitra... after all we are human... manuski dharma sambhala... :)

      Delete
    2. jra hnit bolayla shika aadhi....ani baudhha dharmacha abhys kra...

      Delete
    3. Mister Suraj
      Plz खरं काय आहे हे तुझ्या धर्मा ला सोडून विचार कर सत्य काय ते लवकर कळेल तुला.
      अत्त दीप भव म्हणजे स्वतःच तू स्वयम दीप हो.
      काय लिहल गेलं आहे काय सांगितलं आहे हे दूर सारून स्वतः थोडा विचार कर.

      Delete
  4. खूपच छान माहिती दिली आहे आणि ती सुद्धा पुराव्यासोबत... खूप वाईट वाटते जेव्हा आपलेच लोक हिंदू धर्मावर संशय घेतात...

    ReplyDelete
    Replies
    1. hindu dharm nusta....havetlya vafe sarkha dharm aahe....tyala kute payach nhi.....mag aslya dharmavr kon vishwas thevnar

      Delete
  5. कुठे बुद्ध आणि कुठे तुमचे अवतार बुद्धाने कुठे सांगितले कि मी २४ अवतार घेतले हे सारे ब्राह्मणी षडयंत्र आहे आणि बुद्धाला विष्णूचा अवतार मानले तर बाकीच्या देवाना तुम्हाला बाहेर हाकलावे लागेल कारण बुद्ध ,म्हटता ईश्वर आत्मा या साऱ्या व्यर्थ कल्पना आहे त्यांनी कुठेच देव लोकांना स्थान दिले नाही

    ReplyDelete
  6. अ } भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानवादी आहे

    १ जगातील फक्त बौध्द धम्म वगळता बाकी सारे धर्म अंधश्रद्धेवर आधारित आहेत एकमेव भगवान बुद्धानेच आपल्या स्वयंसिद्ध ज्ञानाच्या बळावर जगाला अंध श्रद्धेतून काढणारा असा विज्ञानवादी बौद्ध धम्म सांगितला तथागतांचा जन्म इतर धर्माच्या धर्मसंस्थापकाप्रमाणे जनतेला अंध श्रद्धेत बुडवून ठेवण्यासाठी नव्हताच तर तो जनतेला सत्याचा प्रकाश दाखवण्यासाठी होता तो त्यांनी पूर्णपणे सत्यात उतरवला म्हणूनच इतिहासतज्ञांनी ऐतहासिक युग भगवान बुद्धाच्या जन्मापासून मानले आहे भगवान बुद्धाच्या जन्माअगोदरचा काळ हा ऐतिहासिक युगात मनाला जात नाही २ भगवान बुद्धाने आपल्या धम्म उपदेशाच्या माध्यमातून जगाला ब्रह्मांडाची उत्पत्ती ते प्राणी उत्पत्ती पर्यंत संपूर्ण उपदेश निसर्गनियमांशी जुळणारे सांगितले सिद्धार्थाने सम्यक संबोधि प्राप्त करण्यासाठी एका पिंपळाचे झाड पाहून त्याखाली त्यांनी संबोधि प्राप्त करण्याचे योजिले कारण पिंपळ हा २४ तास प्राणवायू सोडत असतो यावरून बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टीकोन दिसून येतो ३ ज्यावेळी बुद्धाना सम्यक संबोधि प्राप्त झाली तेव्हा त्यांना ब्रह्मांडाची प्राण्याची उत्पत्ती कशी झाली असाव याचा बोध झाला त्यावर त्यांनी चिंतन करून प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताला जन्मास घातले ४ भगवान बुद्धांनी सांगतलेल्या तत्वज्ञानात प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत हे मुख्य आणि एकमेव सूत्र आहे महापरीनिब्बान सुत्त {दिघनिकाय २२} महाहत्थिपदोपद {मज्जिम निकाय १९-२}या सूत्रात सांगितला आहे प्रतीत्य समुत्पाद हे सूत्र भगवंतांच्या प्रवचनात विविध गोष्टींचे स्पष्टीकरण करते भगवन बुद्धांनी हा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत मांडला नसता तर आज जगाला सृष्टीची निर्मिती कशी झाली हे समजले नसते भगवंत म्हणतात ज्याला हा सिद्धांत समजला त्याला माझा धम्म समाजाला आणि ज्याला हा सिद्धांत समाजाला नाही त्याला माझा धम्म समजणार नाही ५ प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान बौद्ध धम्माच्या अभिधम्म पिटकामधील पट्ठाण ग्रंथात अतिशय सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले आहे हा ग्रंथ संक्षिप्त करूनही आज सहा हजार पुष्टांचा आहे यात हेतू निर्मितीचे २४ प्रत्यत सांगितले गेलेत कोणत्याही हेतूपासून उत्पत्तीच्या प्रक्रियेला सुरुवात होते जर हेतू पासून उत्पन्न धम्माची {कार्याची } उत्पत्ती आणि निरोधला समजने निर्वाणाला समजणे आणि बौद्ध धम्माच्या मुल सिद्धांताला समजणे त्याची व्याख्या समजून घेण्यासाठी या ग्रंथाचे अध्यायन अत्यावश्यक होवून बसते ब्रह्मांडाच्या निर्मितीचा सूत्रबद्ध वैज्ञानिक लेखाजोखा म्हणजे हा ग्रंथ आहे ६ पट्ठाण नामक प्रकरणाचा जो उपदेश भगवंतानी दिला आहे तो परिपूर्ण अशी देशना आहे पट्ठाण हि महत्वपूर्ण बुद्ध तत्त्वज्ञानाची खरी कसोटी आहे

    ReplyDelete
  7. याच्या अभ्यासाने नित्य नित्यवाद आणि नित्य पदार्थांचे विद्वान या नित्यवादाचि साथ सोडतात भगवन बुद्धाच्या धम्मात आत्मा ईश्वर किंवा परमात्म्यासाठी कोणतेही अन कुठलेही स्थान राखून ठेवलेले नाही तरीही बुद्ध पुनर्जन्म सांगतात ते कोणाचा कुशल कर्माचा हा जन्म काही मनुष्याच्या दुसर्या जन्मात होतो असे नाही मनुष्याच्या त्याच जन्मात होत असतो भगवन बुद्धाच्या या ग्रंथाचा अभ्यास करून जगाला सापेक्षवाद सिद्धांत सांगणारे वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतात आधुनिक विज्ञान युगाला धर्माची गरज उरणार नाही पण जगात जर कोणता धर्म टिकणार असेल तर तो बौद्ध धम्म आहे कारण एकमेव हाच धम्म आहे जो विज्ञानाच्या कसोटींवर पूर्णपणे उतरतो

    भगवान तथागताने मानसिक आणि भौतिक जगात जरी कोणत्याही निर्माण कर्त्याला पाहिल नाही पण पहिला कोणत्याही ऋतूधरी वरुणस पहिले नाही पण स्वतः ऋतूच्या नियमाना अवश्य पाहिले १० प्रतीत्य समुत्पाद हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा एकमेव सिद्धांत आहेहा कोरा मनगढंत दार्शनिक सिद्धांत नाही ह सम्यक सम्बुद्धाची प्रत्यक्ष अनुभूती आहे हा कोरा दार्शनिक सिद्धांत असता तर तथागताला उपदेश करायची काहीच गरज नव्हती पण तथागत करुणेचे महासागर आहेत म्हणून त्यांना इतर दार्शानिकांच्या समकोटीचे बनण्याची गरज नव्हती ११ भगवान बुद्धाच्या रूपाने मानवतेला आधार मिळालेला आहे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताच्या रूपाने तथागताच्या करुणेचा ज्ञानमय परिणाम जगाला दिसून आला सत्व जग दुःखाच्या चक्रात चक्रिभुत झालेले तथागताने पहिले संपूर्ण जगात शोक रडणे दुःख आणि उदासीन जरा आणि मरण त्यांनी आपल्या बुद्ध नेत्राने पहिले या सर्व दुःखाचे मुल कारण आहे जन्म जन्माचे कारण भव भवाचे कारण उपादान उपादानाचे कारण तृष्णा तृष्णेचे कारण वेदना वेदनेचे कारण स्पर्श स्पर्शाचे कारण सळायतन सलायतनचे कारण नामरूप नामरूपाचे कारण विज्ञान विज्ञानाचे कारण संस्कार संस्काराचे कारण अविद्या आहे १२ अविद्या आणि तृष्णेच्या संचालित भवचक्रात सापडलेल्या प्राण्यांना आरंभाची जाणीव होत नाही पण हे निश्चित आहे कि आवागमनाच्या चक्राला अविद्याच गतिमान करते पण संस्काराचा निरोध केला तर मत्र्न संस्काराचा निरोध होईलच संस्काराचा निरोध केला तर विज्ञानाचा निरोध होईल विज्ञानाच्या निरोध केला तर नामरूपाचा निरोध होईल नामरूपाच्या निरोधने सलायतनचा निरोध होईल सलायतनाच्या निरोधने स्पर्शाचा निरोध होईल स्पर्शाच्या निरोधने वेदनेचा निरोध होईल वेदनेच्या निरोधने तृष्णेचा निरोध होईल तृष्णेच्या निरोधने उपादानाचा निरोध होईल उपादानाच्या निरोधने भवाचा निरोध होईल भवाच्या निरोधने जातीचा निरोध होईल जातीचा निरोध झाला तर म्हातारपण मृत्यू शोक रडणे दुःख मानसिक कष्ट आणि दुःख समूहाचाच निरोध होईल हे तथागतांचे प्रतीत्य समुत्पाद उद्गार आहेत दुःखाचे आवागमन आणि अत्संगमता सहेतुपुर्वक दाखविण्यासाठीच तथागताने करुणापुर्वक उपदेश दिला १३ अभिधम्मात लोभ द्वेष मोह आणि त्याच्या विरुद्ध अलोभ अद्वेश आणि अमोह ह्या पदार्थाचे मुल कारण हेतू म्हणतात ह्यातून पहिले तन हे कर्मविपाकाच्या दृष्टीने अकुशल आहेत आणि दुसरे तीन हे कर्मविपाकाच्या दृष्टीने कुशल आहेत ह्या ज्या काही कुशल आणि अकुशल अवस्था मानसिक किंवा भौतीक जगात असतात त्यांचे मुल आधार किंवा अकुशल धम्मच आहेत त्यांचे मुल आधार किंवा हेतूची उपस्तिथि किंवा अनुपस्थिती निर्भर करते १४ एकंदर मानवी जीवनाच्या उगमाचा विचार केला तर अविद्या किंवा अज्ञान आणि यापासून उदभावणारी तृष्णा हीच दुःखाची मुल करणे आहेत अविद्याचा नाश करण्यासाठी भगवानने अष्टांग मार्गाचा उपदेश केलेला आहे तो म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी हाच तो अष्टांग मार्ग आहे

    ReplyDelete
  8. २} सम्यक दृष्टीमुळे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत समजतो

    १ सम्यक दृष्टीने अविद्यच अज्ञांचा नाश होतो भगवंताच्या आर्य अष्टांगिक मार्गातील सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी होय अविद्येचा नाश हाच सम्यक दृष्टीचा मुल हेतू आहे हि मिथ्या दृष्टीने अगदी उलट असते दुःखाचे अतित्व आणि दुःख निरोधाचा मार्ग हि उदात्त तत्वे न समजने म्हणजे अविद्या होय स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टी प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहेत सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती अन सम्यक समाधी हा अष्टांग मार्ग उपयोगाचा आहे २ प्रतीत्य समुत्पाद हा ब्रह्मांड उत्पत्तीचा सिद्धांत पूर्णपणे समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी किती आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात येईल सम्यक दृष्टी प्राप्त करण्यासाठी मिथ्या दृष्टीचा नाश करणे आवश्यक आहे मिथ्या दृष्टीचा नाश करण्यासाठी मिथ्या गोष्टीच्या त्याग करणे आवश्यक आहे

    ३} दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवणे म्हणजे मिथ्या दृष्टी

    १ एखादी आकस्मित आणि आश्चर्यकारक गोष्ट घडली कि मिथ्या दृष्टी असलेली व्यक्ती त्या गोष्टीचा सबंध ईश्वरीय चमत्काराशि जोडतो यावर भगवान बुद्धाने म्हटले आहे कि प्रत्येक घटनेला कारण असते एवढेच नव्हे मटार प्रत्येक कारण हेदेखील प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे २ मनुष्य हा काळ प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव आणि अनिर्वाय आवश्यकता यांच्या हातातील बाहुले आहे काय ३ जर मनुष्य स्वतंत्र नाही तर मानवच्या अतित्वचे प्रयोजन काय तो जर दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय ४ मनुष्य जर आपल्या बुद्धीचा उपयोग स्वतंत्रपणे करीत करीत असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे ज्या घटनेचा दैवी चमत्कृत उगम असणे शक्य नाही असा विचार तो करील { ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे तर दैव नशीब भाग्य कुठले } ५ कदाचित हे संभवनीय आहे कि घटनेचे वास्तविक वास्तविक कारण सापडत नसेल परंतु माणूस बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते कारण त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही ६ दैवी चमत्कृती च्या खंडन करण्यामुळे माणूस बुद्धिवादी बनतो तो सत्याचा शोध लावण्यासाठी कटिबद्ध होतो ७ माणसाच्या शोध करण्याच्या प्रवृत्तीने आड भ्रामक समजुती येतात त्याचे उगमस्थान नष्ट केले पाहिजे तर दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवणार नाही ८ यालाच भगवान बुद्धाचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धी वादापेक्षा वेगळा नाही दैवी चमत्कृती वर विश्वास हा सम्यक दृष्टीला निब्बाण प्राप्त करण्याचा मार्गातील अडथळा आहे

    ReplyDelete
  9. ३} ईश्वरावर विश्वास म्हणजे मिथ्या दृष्टी होय

    १ ब्राह्मणी धर्मात जग हे ईश्वराने निर्माण केल्याचे म्हटले आहे याच काल्पनिक ईश्वराला प्रजापती महाब्रह्मा इत्यादी काल्पनिक नावे दिलेली आहेत २ हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला ब्राह्मणी धर्म ग्रंथात उत्तर नाही ३ जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्या तथाकथित ईश्वराचे वर्णन सर्व शक्तिमान सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात ४ भगवान बुद्धाने ईश्वराच्या अस्तित्वाचा अजिबात स्वीकार केलेला नाही त्याचे कारण असे अ } ईश्वराला कोणी पहिले नाही लोक फक्त ईश्वराबद्दल बोलतात ईश्वर अज्ञात असून अदृश्य आहे असे ते मानतात कारण त्यांना प्रवचनामधुन अन कथांमधून ते सांगण्यात आले आहे

    ब } कोणी हि असे सिद्ध करू शकलात नाहीत कि ईश्वराने हे जग निर्माण केले आहे आणि हे जग रचले आहे हे जग रचले नसून विकास पावले आहे

    क } भगवान बुद्ध म्हणतात कि ईश्वराधीन धर्म कल्पनेवर आधारित आहे म्हणून ते धर्म काहीच उपयोगाचे नाहीत यामुळे भ्रामक समजुती निर्माण होतात

    ड } भगवान बुद्धाने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे कारण ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत सत्यावर आधारलेला नाही

    इ } हा विचार भगवान बुद्धाने वशिष्ट आणि भारतद्वाज या दोन ब्राह्मणा बरोबर झालेल्या संभाषण मधून मांडलेला आहे

    ई } भगवान बुद्ध वशिष्ट ला म्हणाले वासेष्ट या तीन हि वेद जाणणाऱ्या ब्राह्मनापैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात दर्शन घेतले आहे काय त्यावर वशिष्ट हि नाही म्हणून उत्तर देतात

    तथागत बुद्धांनी काही महत्वाच्या प्रश्न उपस्थित केलबुद्ध वाशिष्टाला विचारतात कि प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो कि मी ब्रह्म आहे विजेता आहे सर्व जाणणारा आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचयता आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे हयात आहे आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी पिता आहे माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत याचा अर्थ असा कि जे प्राणी आज आहेत आणि भविष्यात अजे प्राणी होणार आहेत त्यांचा पिता ब्रह्म आहे का आणि तुझे म्हणणे असे आहे का कि पूज्य विजेता अपरभुत जे आहेत यांचा जनक ज्याच्यामुळे सार्याची उत्पत्ती झाले आहे असा जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तन शील आहे तो अनंतकाळ टिकणारा आहे तर मग त्या ब्रह्माने निर्माण केलेलं आम्ही इहलोकी येवून अस्थायी अनित्य आणि परिवर्तनशील अल्पजीवी मरणधर्मी कसे झालो ?

    तथागत म्हणतात कि जर ईश्वर शिवस्वरूप आहे तर माणसे खुनी चोर व्यभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास करणारी लोभी द्वेषी विकृत अश का होतात यांचे कारणही ईश्वराच असलापाहिजे शिवस्वरूप ईश्वर आपल्या लेकरांना दुर्गुणी का होवू देतो जर कुणी महान सृष्टीकर्ता असेल आणि न्यायी दयाळू असेल तर मग जगात इतका अन्याय का फैलावतो ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवतालचे किळसवाणे दृश्ये दृष्टीस नाही का पडत ब्रह्म आपली रचना का सुधारत नाही जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याणकारी काम करण्यासाठी का सरसावत नाही त्याने निर्माण केलेली पृथ्वी आज दुःखात क आहे तो सर्वाना सुख का देत नाही अफरातफरी चोरी अज्ञान का फैलावतो सत्यावर असत्य का मात करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात मश्यपते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा तुमचा ब्रह्मा अन्यायी ठरतो भगवान बुद्ध धार्मिक क्रया करण्याच्या विरोधी होते ते याच्याविरोधात असल्याचे कारण म्हणजे क्रियाकलाप भरमक समजुतीचे भांडारच असते भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व संम दिठ्ठी हिच्या त्या शत्रू आहेत

    ReplyDelete
  10. ४ } ईश्वरावर विश्वास ठेवणे हि भयानक गोष्ट आहे

    १ ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांच्या उत्पादक आहे पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेमधून पुरोहितपद निर्माण होते कारण पुरोहित हा असा दृष्ट बुद्धी आहे कि तो सर्व प्रकारच्या खुल्या समजुती निर्माण करतो आणि त्यामुळे सम्यक दृष्टी चा विकास होणे अशक्य होते २ भगवान बुद्धाजवल ईश्वराच्या अस्तित्वाला मारक असा विचार होता तो निःसंदेह देवावरील विश्वासाने खंडन करणारा आहे हा विचार प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे ३ ह्या महत्वाच्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने हि सृष्टी बनवली किंवा नाही हाही मुख्य प्रश्न नाही खरा प्रश्न आहे निर्मात्याने सृष्टी निर्माण केली कशी ४ महत्वाचा प्रश्न असा कि सृष्टी ईश्वराने भवपासून निर्माण केली कि अभव पासून केली ५ काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवता येत नाही ६ तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काही नाही मधून निर्माण केले असे म्हटले तर ज्या काहीतरी मधून जे नवे निर्माण केले ते निर्मितीपुर्वीच अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काही तरी चा निर्माता म्हणता येत नाही ७ जर ईश्वराने काही वस्तू निर्माण केले असेल तर ईश्वर निर्माता अथवा आदिकारण म्हणता येणार नाही {जशे ब्रह्मा अस्तित्वात येण्याच्या पूर्वी तो संपूर्ण पाण्याने भरलेल्या ब्रह्मांडातील अंड्यात होता आणि एक हजार वर्षाने इतर देवता बरोबर अंडे फोडून बाहेर आला असा वैदिक ब्राह्मण धर्माचा सिद्धांत आहे पण ब्रह्मांड भरून पाणी आणि त्यातील अंडे या गोष्टी अगोदरच अस्तित्वात होत्या म्हणून ब्रह्मा सृष्टी निर्मितीचे कारण अशुच शकत नाही } ८ ईश्वर हा संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे ती मिथ्यादृष्टी आहे हा विश्वास केवळ असल्याचा विश्वास ठरतो

    ReplyDelete
  11. ५} आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे

    १ भगवान बुद्धाने म्हटले आहे कि आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनेवर आधारलेला धर्म आहे २ आत्म्याला कोणीही पहिले नाही किंवा त्याच्याशी कुणी संभाषण केले नाही आत्मा हि गोष्टी अज्ञात आणि अदृश्य आहे ३ जी गोष्ट वास्तव आहे ती आत्मा नसून मन आहे मन हे आत्म्यापासून वेगळे आहे तथागत म्हणतात कि आत्म्यावर विश्वास ठेवणे काहीच उपयोगाचे नाही म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्या उपयोगाचा नाही ४ असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो ५ भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत नाहीत आत्म्या सबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद म्हणतात ६ आत्म्याच्या बाबतीत भगवन बुद्धाचे असे मत होते कि देवाच्या अस्तित्वावरील विश्वास सम्यक दृष्टीला जेवढा बाधक आहे तेवढाच आत्म्यावरील विश्वास बाधक आहे ७ देवाच्या अस्तित्वावरील विश्वास ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतीनं कारणीभूत होतो तथागतांच्या मते आत्म्याचा अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या वरील विश्वासापेक्षा भयंकर आहे कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो भ्रामक होतो भ्रामक समजुतीचे पेव फुटतात एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत सत्ता गाजवण्याचा अधिकारच बहाल करतो ८ आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धाने अगदी खास अशी खंडन कारक विचारसरणी मांडली आहे भगवान बुधाने आत्म्याला वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांता विरुद्ध आपला नामरूप सिद्धांत मांडला ९ नामरूप हि प्राण्याच्या सामुहिक संज्ञा आहे १० भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी काही भौतिक तत्वे आणि मानसिक तत्वे यांच्या मिश्रणाचा परिणाम आहे या भौतिक तत्वांना स्कंध म्हणतात ११ रुपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी जल वायू आणि तेज या चार तत्वांचा परिणाम आहे हे स्कंध रूप अथवा शरीराचे घटक आहेत १२ रूपस्कंधा शिवाय नामस्कंध हि एक गोष्ट आहे तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत या नामस्कंधाला विज्ञान किंवा चेतना असे म्हणतात या नामस्कंधात तीन मानसिक तत्वे आहेत ती म्हणजे वेदना { सहा इंद्रियांच्या त्यांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती } संज्ञा आणि संस्कार चेतना या तीन नामस्कंधात समाविष्ट केले जाते आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल कि विज्ञान हाच मानसिक क्रियांचा मुल स्त्रोत आहे विज्ञान कोणत्याही प्राण्यांचा केंद्रबिंदू आहे

    १३ पृथ्वी जल तेज आणि वायू या चार तत्वांच्या मिश्रणातून विज्ञान उत्पन्न होते या सिद्धांतावर आक्षेप घेणाऱ्या तथागत बुद्धाने स्पष्टपणे उत्तर दले आहे कि जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नामकाया हि राहत असते

    १४ यावर आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देत येईल जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र हि असतेच हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण झाले हे कोणालाही माहित नाही परंतु ते नेहमी विद्युत क्षेत्राबरोबर असते

    १५ शरीर आणि विज्ञान यांच्यात याच प्रकारचा सबंध आहे असे म्हणता येते

    १६ जेव्हा विज्ञानाचा { चित्त आणि चेतना } उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो म्हणून विज्ञान हे मानव जीवनातील मुख्य वस्तू आहे

    १७ यावरून स्पष्ट होते कि प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो

    ReplyDelete
  12. १८ भगवान बुद्ध आत्मा मानणार्यांना असा प्रश्न करायचे कि आत्म्याने करावयाचे कोणते कार्य आहे ? आत्म्याची म्हणून जी कार्ये मानली जातात ती सर्व विज्ञानाद्वारे च होत असतात

    १९ आत्मा मानणाऱ्या च्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे कि पुरुषाच्या शुक्राणू आणि स्त्रीचे अंडानु यांच्या संयोगाने स्त्रीच्या गर्भाशयात शरीर निर्माण होते आणि नंतर बाहेरून गर्भाशयात आत्मा प्रवेश करतो हा अत्मावाद्यांचा सिद्धांत बुद्धी संगत तर्क संगत आणि विज्ञान संगत आहे का ? भगवान बुद्धाने हा सिद्धांत अमान्य केला आहे

    २० भगवान बुद्ध म्हणतात कि नुसत्या स्त्री पुरुषाच्या मिलनाने शरीर निर्माण होत नाही तर त्याबरोबर तिसरी घटना घडते त्याला च्युतिचित्त { deceased conciousness } असे म्हटले जाते

    २१ मृत्युच्या वेळी शरीर जे चित्त सोडते तेच च्युती चित्त होय आणि हे सूक्ष्म कानाच्या रुपात असते आणि हे चित्त शरीर संपादन करण्यासाठी तरंगाच्या रुपात फिरत असते जे खालीवर फिरत असते त्यालाच विज्ञान असे म्हणतात आणि हे च्युतिचित्त कोणत्याही प्राण्याचे असू शकते त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होवू हे चित्त आहे तर त्यालाच आत्मा कशावरून म्हणत नसेल तर त्यांसाठी आत्मा हि विधान फक्त मानव प्राण्यासाठी आहे कोणत्याही प्राण्यासाठी नाही

    २२ भगवान बुद्ध म्हणतात कि च्युतिचित्त हे ;देखील तृष्णा युक्त असते शुक्राणू अंडानु आणि च्युतिचित्त कार्यरत होते या तृष्णे मुले च्युतीचीत्ताचा शुक्राणू आणि अंडानु यांच्याबरोबर संयोग होतो म्हणजे शरीराची निर्मिती होते त्याच वेळी त्या शरीरात चेतना निर्माण होते आणि या गोष्टी एकाच वेळी घडून येतात आणि त्यावेळी या च्युतीचीत्ताचा अंत होतो या सार्या प्रक्रियेला निषेचन {fertilization }म्हणतात

    २३ याला बीजाचे उदाहरण देत येत माती आणि पाणी यांच्या सहयोगाने बीज अंकुरले जाते त्याचे रोपटे बनते पण बीज मारून जाते म्हणजेच बीज पाणी आणि माती या तिन्हीच्या संयोगानेच निषेचन बनतो जसे अंकुराला जन्म देवून बीज मारून जाते त्याच प्रमाणे शुक्राणू आणि अंडाणु आणि च्युतिचित्त यांच्या एकत्र येण्याने जीव निर्माण होतो आणि बीजाप्रमाणे नंतर च्युतिचित्त मरून जाते च्युतिचित्तचे कामही बीजाप्रमाणे संपून जाते

    जीवन विज्ञानाचे वरील विश्लेषण अडीच हजार वर्षापूर्वी करून सांगणारे भगवन बुद्ध वैज्ञानिक विचारांचे आद्य जनक आणि जगातील पहिला वैज्ञानिक या नामाभिधानास सूर्याप्रमाणे शोभून दिसतात

    २४ ब्रह्मांड निर्मिती आणि जीव निर्मितीचेच ज्ञान भगवान बुद्धाच्या प्रतीत्य समुत्पाद या जगप्रसिद्ध सिद्धांतात काठोकाठ भरलेले आहे प्रतीत्य म्हणजे कारण असल्यामुळेच समुत्पाद म्हणजे कार्य उत्पन्न होते म्हणजेच कारणामुळेच कार्य ब घडून येते यालाच कार्यकारणभाव असेही म्हणतात कारण आणि कार्याची अशीच शृंखला असते उर्जा आणि सोबत असलेली चेतना हे मुल कारण असल्यामुळेच ब्रह्मांड आणि जीवसृष्टी अस्तित्वात आली भगवान बुद्ध उर्जेला अनंत आणि चेतनेला जाणीव असे म्हणतात उर्जा अमर असलेले अविनाशी तत्व आहे ऊर्जेपासून जशी ब्रह्मांडाची उत्पत्ती होवून त्याचा विकासझाला आहे तसेच ब्रह्मांडामधील प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती झाली सृष्टीत कारणाशिवाय काहीच घडू शकत नाही निर्माण होणार्या प्रत्येक कार्याला कारण प्रत्यय किंवा हेतू असतोच हेतू जर नष्ट झाला तर उत्पत्ती हि नष्ट होताना वाटते पण जगात [पूर्णपणे काहीच नष्ट होत नाही तर एवढेच म्हणता येते कि ते अनित्य आणि परिवर्तनशील आहे कोणत्याही उत्पत्तीत कोणत्याही तथाकथित ईश्वराचा सहभाग दाखविणे एक कल्पना आहे ऋग्वेद ईश्वराचे अस्तित्व नाकारतो हे घ्यावे

    २५ प्रतीत्य समुत्पाद म्हणजे प्रत्येक उत्पत्तीचा सिद्धांत होय अभिधम्म पिटकाच्या पट्ठाण या अजूनही सहा हजार पृष्ठे पृष्ठे ग्रंथात भगवान बुद्धाचा सूक्ष्म आणि सविस्तरपणे सांगितलेला समुत्पाद सिद्धांत हा बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानिक म्हणून गौरविन्यास परिपूर्ण आहे

    ReplyDelete
  13. इथे देवांचे अस्तित्व नाही ठेवत बुद्ध मग ते अवतार कसे काय झाले राव

    ReplyDelete
  14. हिन्दू धर्माचे गळके गाडगे वाचवन्याचा हलका प्रयत्न

    ReplyDelete
  15. बौध्द ग्रंथकार बुध्दावतारासंदर्भात काय म्हणतात ते पाहु.जसे येशुने स्वताला Son of god असे म्हणवुन घेतले तसे बुध्दाने कुठेही आपण विष्णुचा अवतार आहोत हे म्हणवुन घेतलेले नाही.गौतमाने ध्यानसाधना व पवित्र आचरणाने दिवद्ण्यान मिळवले व देवांपेक्षा श्रेष्ठ स्थान निर्माण केले.भक्तीशतक नावाच्या बौध्द ग्रंथात एक श्लोक आढळतो तो असा,
    "ब्रम्हाविद्याभिभूतो दूरधिगममहामाययालिंगीतोसौ|
    विष्णुरागातिरेकान्निज वपुषि धृता पार्वती शंकरेण|
    विता विमयो विद्यायो जगति स भगवान वितरागी मुनिद्र|
    क: सेव्यो बुध्दीमति भवर्दत खलु हि मे भरातरस्तेषु मुक्ते||"
    याचा अर्थ खुप सुंदर आहे तो असा,"ब्रम्हदेव अविद्येने ग्रासलेले,विष्णु महामायेच्या अलिंगणामुळे मूढ(मुर्ख)झालेले,शंकर आसक्तीने पार्वतीला आपल्या शरीरावर धारण करुन बसलेले,पण महामुनी बुध्द हे अविद्या,माया,आसक्तीपासुन दूर आहेत तेव्हा मुक्तीलाभ करुन घेणाऱ्यांनी कोणाला शरण जावे हे तुम्हीच सांगा.
    कश्मीरी कवी क्षेमेंद्र आपल्या 'अवदान-कल्पकता' या ग्रंथात लिहीतो की,'सगळ्या जगाला प्रकाश देण्यासाठी सुर्य जन्म घेतो,परम अमृताचा वर्षाव करण्यासाठी चंद्र तसेच संपुर्ण प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी बुध्दासारखे महात्मे जन्म घेतात.'
    तसेच तो दुसऱ्या एका श्लोकात म्हणतो की,"इंद्र,वरुण,वायुप्रभुती देव व महामुनी कामवासनेत बुडुन जातात तिथे कामवासनेला तुच्छ मानणारा बुध्द हा श्रेष्ठ ठरतो".
    असेच उल्लेख अश्वघोषरचित बुध्दचरीत,लंकावतारसुत्र,महावंश व महावग्ग या ग्रंथात आढळतात.
    गौतमबुध्द हे अलौकीक,सदवर्तनी,पवित्र मनाचा जगाच्या कल्याणासाठी अवतिर्ण झाले होते.त्यांच्या आचरणाची छाप ब्राम्हण ग्रंथकारांवर इतकी पडली होती की त्यांनी बुध्दांना विष्णुचा अवतारात गणले.

    ReplyDelete
  16. bauddha dharm ha kontya deva kalpin dharm nhi....vatel te bolu nye.....

    ReplyDelete