Friday, January 15, 2010

विद्रोही संघटना व वास्तव

सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. "आरोप" हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन ’संडासविर’ आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचाच विषय आहे.
या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी संघटनांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही ’बड्या’ नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे ’बडे’ नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या ’बड्या’ नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.
हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखि प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी पतिकूल परिस्थितित सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात ’बामसेफ’ हीम संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला ’मराठा महासंघ’ या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या ’शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म’ या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. "अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्‍या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्‍या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी ’आदिवासी हिंदु नाहीत’ अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने ’मराठा जोडो’ यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले."
या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या ’हिंदुजागृती’ या पुस्तकात म्हणतात , ".....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा ’समाजाचे संघटन’ या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्‍यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय."
याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्‍या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, "ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते." तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, "शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ "

7 comments:

  1. आम्ही अशा प्रकारचे लेख बरेच बघितले आहेत जे ब्राह्मणांचे बचाव करतात आणि त्यांना आम्ही प्रतिक्रिया ही तशीच देतो जशी आम्ही इथे देत आहोत.मग आपल्याला वाईट वाटेल किंवा राग येईल मला त्याची काळजी नही कारण "सत्य कटू असते" आणि "खरी महिती अद्न्यान नष्ट करते" या तत्वावर लिहितो.
    #१ {संस्कृतीवर, शिवचरित्रावर, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत} हे सर्व ब्राह्मण करत असतात बहुजनांच्या महापुरुषांचा अपमान.
    #२{सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन ’संडासविर’ आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता}यांच्या विषयी मला काही जानुन घ्यायचं नाहिये कारण टिळक आणि सावरकर यांनी शिवरायांचे कर्त्रुत्व नाकारले होते.आणि झाशीच्या राणि पेक्षा राणी ताराराणी श्रेष्ट आसे आम्ही मानतो
    #३ { देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात} जवढे ब्राह्मण लढले , प्राण दिले ते देशासाठी नव्हे पेशवाईसाठी,, झाशीची राणी तर आयुश्यभर पेशवाईसाठीच लढली.
    #४ {हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात} कारण मुस्लिम - हिंदु दंगली मागे ब्राह्मनांचा हात आहे हे आम्हाला माहित आहे मग क उगाच मरा,,, एक तरी ब्राह्मण मरतो का दंगलीमध्ये ?
    #५{बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत} यामुळेच सगळे मागे आहेत त्यांना हिंदु - हिंदु मध्ये अडखुन ठेवायचं आणि आपण प्रगती करायची .

    सर्वात महत्वाचे : यावर तर आपली प्रतिक्रिया पाहिजेच......
    {श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, "शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ "}
    उत्तर :
    सुनिल चिंचोलकर (ब्राह्मण) नावच्या महाहरामी रामदास्याने आपल्या "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" या चोपड्यात प्रुष्ट क्र.५३ वर शाहजी राजे पण लग्नाला हजर नव्हते असा मुद्दा समोर केला आहे, आणि जर रामदास राज्याभिषेक ला हजर नव्हता म्हणुन तो गुरु नव्हता असं सांगत असाल तर आम्ही शाहजी शिवाजी च्या लग्नाला नव्हता म्हणजे तो शिवाजीचा वडिल नव्हता असं सांगू. एवढी विक्रुत आणि हलकट व्रुत्ती आजही भटांमध्ये शिल्लक आहे. मग अशा ब्राह्मणांना का बदडु नये ?

    ReplyDelete
    Replies
    1. @मराठी कट्टा व्यवस्थापक

      वाईट वाटते की तुमच्यासारखे मराठे म्हणवुन घेणारे सुद्धा आता असे बोलू लागले आहेत ...

      >>हे सर्व ब्राह्मण करत असतात बहुजनांच्या महापुरुषांचा अपमान.<<
      जो कोणी महापुरुशांवर चिखल उडवेल तो तो वाईटच असे माझे मत आहे. मग तो कोणीही असो याचा मला फरक पडत नाही. एखाद्या महापुरुषाबद्दल आपण स्वत:ची पात्रता तपासावी असेच मी म्हणेन. सावतकरांना संडासवीर म्हणनार्‍यांनी किती जनतेसाठी हाल भोगले ? स्वत: किती दिवे लावले हे ही तपासने म्हत्वाचे आहे. शेवटी म्हटलेच आहे ना ? स्वत: वरुन दुसर्‍यास ओळखीत जावे. केवळ दुसर्‍याला आरोपीच्या पिंजर्‍यात कोंबले म्हणजे झाले असे काही लोकांना वाटू लागले आहे आणि यामध्ये ते स्वत:आचेच कर्तुत्व विसरत आहे. आधी स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करा आणि मग दुसर्‍यावर चिखलफेक करावी.

      >>यांच्या विषयी मला काही जानुन घ्यायचं नाहिये कारण टिळक आणि सावरकर यांनी शिवरायांचे कर्त्रुत्व नाकारले होते.आणि झाशीच्या राणि पेक्षा राणी ताराराणी श्रेष्ट आसे आम्ही मानतो<<

      हे म्हणजे सावरकरांचे खादे पुस्तक आर्धे-आधुरे वाचण्याचा परीणाम आहे , बाकी काही नाही . सावरकरांनी शिवरायांचे कर्तुत्व नाकरले याला काही ठोस कारण दिले असते तर त्याचे खंडण करायला सोपे गेले असते मला परंतु आपण फक्त टपली मारता आणि निघुन जाता , काय घंटा खंडण करणार ? शेवटी झोपलेल्याला जागे करता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही


      >>कारण मुस्लिम - हिंदु दंगली मागे ब्राह्मनांचा हात आहे हे आम्हाला माहित आहे मग क उगाच मरा,,, एक तरी ब्राह्मण मरतो का दंगलीमध्ये ?<<

      उलट मी जर तुम्हाला असे विचारले की एक तरी "मुसलमान" मरतो का दंगलीमध्ये ????? काय उत्तर देणार तुम्ही ??

      >>यामुळेच सगळे मागे आहेत त्यांना हिंदु - हिंदु मध्ये अडखुन ठेवायचं आणि आपण प्रगती करायची <<
      आतापर्यंत तुम्ही मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , बामसेफ च्या नावानी काय दिवे लावलेत ? किती संसार सुधारलेत , किती तरुनांना नोकर्‍या लावल्यात ?? पुन्हा तेच ..
      स्वत:वरुन दुसर्‍यास ओळखीत जावे

      >> आक्षेप आणि खंडन" या चोपड्यात प्रुष्ट क्र.५३ वर शाहजी राजे पण लग्नाला हजर नव्हते असा मुद्दा समोर केला आहे, आणि जर रामदास राज्याभिषेक ला हजर नव्हता म्हणुन तो गुरु नव्हता असं सांगत असाल तर आम्ही शाहजी शिवाजी च्या लग्नाला नव्हता म्हणजे तो शिवाजीचा वडिल नव्हता असं सांगू. एवढी विक्रुत आणि हलकट व्रुत्ती आजही भटांमध्ये शिल्लक आहे. मग अशा ब्राह्मणांना का बदडु नये ?<<

      अर्धवट लिखाण वर तुम्ही लिहिलेले वाक्य खरे नाही बरोबर वाक्य पुढीलप्रमाणे आहे...

      आणि जर रामदास राज्याभिषेक ला हजर नव्हता म्हणुन तो गुरु नव्हता असं सांगत असाल तर आम्ही शाहजी शिवाजी च्या लग्नाला नव्हता म्हणजे तो शिवाजीचा वडिल नव्हते असे या लोकांना म्हणायचे आहे काय ??

      Delete
  2. {वाईट वाटते की तुमच्यासारखे मराठे म्हणवुन घेणारे सुद्धा आता असे बोलू लागले आहेत ...}
    म्हणवुन घेणारे नाही, आहेच मराठा, हा पण वैचारीक मराठा हं,नाहीतर ब्राह्मणांनी सांगायचे आणी आम्ही माना डोलवायच्या असा नव्हे. तुम्हा ब्राह्मणांमध्ये एक गोष्ट कोमन आहे ति म्हनजे कॊणी ब्रह्मणांच्या विरुद्ध बोलले (जरी ते खरे असले तरी) की लगेच बोंब सुरु १०-१२ रु. ची पुस्तके वाचू नका, संभाजी ब्रिगेड च्या नादी लागू नका म्हणजे मराठा अडाणीच आहे.
    {अर्धवट लिखाण वर तुम्ही लिहिलेले वाक्य खरे नाही बरोबर वाक्य पुढीलप्रमाणे आहे...
    आणि जर रामदास राज्याभिषेक ला हजर नव्हता म्हणुन तो गुरु नव्हता असं सांगत असाल तर आम्ही शाहजी शिवाजी च्या लग्नाला नव्हता म्हणजे तो शिवाजीचा वडिल नव्हते असे या लोकांना म्हणायचे आहे काय ??}
    हे जरी खरं (?)असलं तरी पण ब्राह्मणांची विक्रुती दिसतेच की यातून, आपल्याला नाही वाटत ?

    {आतापर्यंत तुम्ही मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , बामसेफ च्या नावानी काय दिवे लावलेत ? किती संसार सुधारलेत , किती तरुनांना नोकर्‍या लावल्यात ?? पुन्हा तेच ..
    स्वत:वरुन दुसर्‍यास ओळखीत जावे}
    त्या संघटनेशी आमचा काही संबंध नाही , असता तर ब्लोग वर शिव्या देण्याव्यतिरिक्त काहीही दिसले नसते हे ध्यानात ठेवा.
    खरं तेच बोलणार मग ते ब्राह्मणांच्या विरुद्ध असले तरी , कुणाला भित नाही आम्ही.
    माझा नविन लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या : ब्राह्मणवाद संपुर्ण भारताची समस्या
    http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post_26.html

    ReplyDelete
    Replies
    1. [हे जरी खरं (?)असलं तरी पण ब्राह्मणांची विक्रुती दिसतेच की यातून, आपल्याला नाही वाटत ?]

      म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही वर टाकलेले वाक्य हे चुकिचे आणि मुळ वाक्य तोडुन त्यामध्ये काही बाही मनाचे घालुन तुम्ही टाकले आहे ????

      Delete
  3. Sawarkaranne kartutva nakarale as mhanata tar mag maharajanchya murtiche pujan karun..tyanna apal daiwat manun preranesathi shivaji maharajanvar aarati ka lihali asati n ajunahi tumhala adnyat asel tar tyatil ek ek shabd oradun sangato te tyanche maharajanvar asanar prem..evadhi sundar shabd ekhadyala daiwat manalyashivay yet nahit n tilkanni tar shivjayanti hindustanachya kanakoparyat nyanach kam kel..khara pahat he kel te kel sangun tond vitavun ghenyach kam ahe parantu jevha khari garaj hindushakti ekatra ananyachi ali ahe tevha jatiyawad te hi apalyach dharmachya jativar kiti yogya ahe??

    ReplyDelete
  4. पुरोगामी दहशतवादाचा सर्वनाश हिंदुच करतील !

    ReplyDelete
  5. एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ति समुहा विषयी द्वैष पसरवणारे संसर्गजन्य मनोरोगी आहेत.
    आशा माझ्या बांधवांना लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा 💐
    Get well soon 💐 bro.

    ReplyDelete