Saturday, December 26, 2009

३१ डिसेंबर..! की एका दिवसाचे धर्मांतर ?

नव्या ख्रिस्ती वर्षाचे स्वागत हा पाश्चात्यांचा उत्सव आता हिंदुंनाही आपला वाटू लागला आहे. त्यामुळे ते हा दिवस (कि रात्र) उत्साहात साजरा करु लागले आहेत. या दिवशी नाच-गाणे, खाणे-पिणे, मौजमजा, असे चंगळवादी कार्यक्रम अगदी खेड्यांतही मोठ्या प्रमाणात केले जातात. शिर्डी देवस्थानाने तर ख्रिस्ताब्द २००६ ला निरोप देण्यासाठी मध्यतात्री आरती केली होती व भक्तांसाठी नृत्य-गायणा चा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदुंची भावी पिढी पश्च्यात्यांप्रमाणे भोगवादी व संस्कृतीहिन बनू नये, असे अनेक हिंदुंना वाटते. म्हणूनच ३१ डिसेंबरला होणारे संस्कृतीचे हनन रोखण्यासाठी हिंदुंनी प्रयत्न केले पाहिजेत.
३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपडवा हाच हिंदुंसाठी नववर्षारंभ !
१ जानेवारीला नववर्षारंभ का ?? याला काहीही कारण नाही. त्यातून कोणताही अध्यात्मीक अथवा सामाजिक लाभ होत नाही. उलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस(गुढीपाडवा) वर्षारंभ साजरा करण्यामागे नैसर्गीक व अध्यात्मिक पार्श्वभुमी आहे.
नैसर्गिकदृष्ट्या : ३१ डिसेंबरच्या काळात निसर्ग, हवामाण व ग्रहांची स्थिती यांमध्ये कोणताही बदल होत नाही. याऊलट पाडव्याला निसर्गात बदल जाणवू लागतात. ग्रहांची स्थिती बदलते. समशितोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते.
अध्यात्मिकदृष्ट्या : गुढीपाडव्याला निर्मिती संबंधीत प्रजापती लहरी पृथ्विवर सर्वात जास्त प्रमाणात येतात. गुढीचे पूजन केल्यास त्या लहरिंचा लाभ पूजकास व कुटुंबियांस होतो.
ईतर :
प्रजापती ब्रम्हा द्वारा सृष्टीची निर्मिती
धर्मराज युधिष्ठीराजे सिंहासनारोहण
सिख गुरू अंगददेवांचा जन्मदिवस
नवरात्रीला सुरवात
महर्षी दयानंद द्वारा अर समाजाची स्थापना
वरुनावतार भगवान झूलेलाल यांचा जन्मदिवस
भारतातील प्रचलीत सर्व संवत्सरांचा प्रथम दिवस
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा राज्याभिषेक
संघप्रणेते डॉ.केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्मदिवस
उज्जयिनिचे सम्राट विक्रमादित्य ने विदेशी शकांवर पूर्ण विजय मिळवून नविन विक्रम संवत सुरु केले
हिंदुंनो...! एका दिवसाचे धर्मांतर तुम्हाला मान्य आहे का ?
--------
३१ डिसेंबरची रात्र म्हणजे हिंदुंच्या पाश्चात्य संस्कृतीच्या अतिरेकाचा व भोगवादाचा कळस ! म्हणुनच या रात्री मद्यप्राशन, मांसाहार व नृत्यगायण असे नितिमत्तेला गालबोट लागणारे भोगवादी प्रकार सर्रास घडतात. एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती नविन धर्मातील प्रथा आणि उत्सव साजरा करते. त्याचप्रमाणे आपण हिंदू धर्मीय पाश्च्यात्यांचे ३१ डिसेंबर वा ख्रिसमस यांसारखे वैष्विक शक्तिंशी व या देशातील मातिशी काडीचा संबंध नसलेले उत्सव साजरे करत असू, तर ते आपले एक दिवसाचे धर्मांतर होईल.
३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र धांगडधिंगा व आतषबाजी, तर १ जानेवारीला सर्वत्र दारूच्या फोडलेल्या बाटल्यांचा खच व फटाक्यांचे कागद यामुळे सारे वातवरण भयाण होते. प्रत्येक सण आणि उत्सव यांच्या वेळी ईश्वरी अधिष्ठान ठेवून त्यागी व संयमी जीवन जगण्याचा संदेश देणार्‍या हिंदुंना असा हिडीस व आसुरी भोगवाद शोभत नाही. म्हणुनच पाश्चात्यांचे सर्वच क्षेत्रांत होणारे अंधानुकरण आपल्याला ताळायचे आहे. याची सुरवात पुढील कृतींनी करुया !
* ३१ डिसेंबरच्या रात्री वा १ जानेवारीला कोणाही हिंदूला नववर्षाच्या शुभेच्छा देवू नका
* एखादा हिंदू १ जानेवारीच्या दिवशी नववर्षाच्या शुभेच्छा देत असल्यास त्याचे प्रबोधन करुन ’गुढीपाडवा हा आपणा हिंदुंचा नववर्षारंभ आहे’, हे त्याला समजवून सांगा.
*गुढीपाढव्याच्या दिवशी अधिकाधीक हिंदू बांधवांना शुभेच्छापत्रे पाठवा, तसेच दुरध्वनी करुन व भ्रमणध्वनी यांवरील लघुसंदेशद्वारे नववर्षाच्या शुभेच्छा द्या

No comments:

Post a Comment