Wednesday, December 16, 2009

स्वतंत्र तेलंगण ... बेळगाव.. समस्या (?)

नुकतेच टिआरएस (तेलंगण राष्ट्र समिती)चे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांच्या उपोषणाला घाबरून भारताचे प्रधानमंत्री मनमोहण सिंह(की मांजर ?) आणि चिदंबरम यांनी नमते घेतल्याची बातमी सध्या गाजत आहे. आणि याच घटनेचा मुहूर्त सधून मायावती यांनी बुंदेलखंड आणि हरित प्रदेश वेगळे राज्य करण्याची मागणी केली, यापाठोपाठच आपण मागे राहतोय अशी जाणिव होताच गोरखा मुक्ति मोर्चाच्या सदस्यांनी गोरखलॅंडच्या मिर्मितिसाठी अमरण उपोषण सुरू केले ...त्यचबरोबर या पर्श्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाची मगणी सुद्धा होऊ लागली आहे... उद्धव ठाकरे यांनी आता बेळगाव सुद्धा महाराष्ट्राला देवून टाकावे अशी मागणी करु लागले आहेत..
अरे... जसे या देशाची वाटणी करायला सगळे टपले आहेत की काय असे वाटायला लागले आहे.. एखादा भाग स्वतंत्र (म्हणजे नेमके काय हे अजुन मला समजू शकले नाही.... स्वतंत्र म्हणजे कोणाच्या बंधनातून मुक्त ? कोणाच्या अत्याच्यारातून मुक्त ??) करण्यासाठी थोड्या-थोडक्या दिवसांच्या आमरण उपोषणाचे नाटक करायचे .... वर्तमनपत्रे गाजवायची आणि प्रसिद्धीच्या झोकात यायचे ! आणि त्यातुनच आपला भाग स्वतंत्र झालाच तर पूढे या भागातील जणता आपल्याला ’आमचा स्वातंत्रदाता’ म्हणून सदैव पूजा करील तो भाग वेगळाच. आपल्या पदांचे राजिनामे द्यायचे, एकाद्या भागात थोडी जाळपोळ करायची आणखिन काही काही करायचे आणि आपले आंदोलन किती "तिव्र" आहे हे दाखवुन द्यायचे.....! एखादे नाटक रंगवावे असे हे सारे चालते... !
पण या देशांतर्गत वादात या चंद्रशेखर, मायावती वगैरे "विशिष्ठ प्रांत"नेत्यांना आपली विचारपातळी आणखिन थोडीशी उच्च पातळीवर आनुन देशाच्या समस्या सोडवण्याची बुद्धी होत नाही हे विशेष. आमचा हा..हा भाग स्वतंत्र हवा तो..तो भाग स्वतंत्र हवा अशा हकाट्या मारणा‍र्‍या या नेत्यांना अवैध्य बांग्लादेशी घुसखोरीविरुद्ध बोलावेसे वाटत नाही, बांग्लादेश, तिबेट, ब्रम्हदेश, पाकव्याप्त कश्मिर, चिनव्याप्त भारतभूमी ही भारतात यावी हा साधा विचारही अद्याप कोणाला सुचला नसेल. भारताचा भाग नसलेले प्रदेश जाऊ द्या सध्या भारतखंड तोडण्याची आंदोलने मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.... बिहार मध्ये झारखंड आंदोलन, तसेच कोल्हन आंदोलन, पंजाब मध्ये खलिस्तान आंदोलन, त्रिपूरा मध्ये ट्राईव्हल नॅशनल वॉलेंटिअर्स फोर्स, मिझोरम मध्ये मिझोरम नॅशनल फ्रंट, आसाम मध्ये स्वामी स्टूडंट युनियन व बोडो लॅंड आंदोलन, नागालॅंड मध्ये नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅंड, मध्य भारतामध्ये ख्रिश्चनिस्तान, मद्रास मध्ये द्रविडीस्तान इत्यादी राष्ट्रद्रोही मगण्या चालू आहेत.. लदाख , तिबेट आणि अरुनाचलप्रदेश हा चिनचाच भूभाग असल्याचा दावा चीन करते...व तो अमेरिकेचा आजचा बराक ओबामा का बराक ओसामा भडवा चीन मध्ये जावून अक्कल पाजळताना म्हणतो की तिबेट हा चीनचाच भाग आहे..!(बरोबर आहे... याचा बाप जाताना सोडून गेला होता) तर संपूर्ण कश्मिरवर पाकिस्तान आपला दावा करते........ याच्याबद्दल कोणी चंद्रशेखर राव . मायावती अथवा उद्ध्वव का नाही आवाज उठवीत ?? का नाही कोण आमरण उपोषनाला बसत ??? याची उत्तरे आपल्यालाच शोधावी लागणार आहेत नाहीतर आपण स्वतंत्र ’अ’ भाग व ’ब’ भाग च्या भानगडीत अडकून पडू व तिकडे आपला देशत पुन्हा परक्यांच्या दाराखाली गहाण पडायची वेळ येईल......!

No comments:

Post a Comment