-----------
भगवान विष्णूंचे प्रमुख दहा आणि एकूण चोविस अवतार आहेत असे माणले जाते. या अवतारांमध्ये भगवान बुद्ध यांना थोडे बाजुला केले तर गोष्टीमध्ये साम्य आढळते आणि ती म्हणजे प्रत्येक अवतार भगवाण विष्णूनी धर्माच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाशासाठी घेतलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत: अभ्युतानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ! आणि यापुढे भगवान विष्णूंचा होणारा कल्की अवतारही धर्माच्या रक्षणासाठीच असणार आहे.
भगवान बुद्धांना विष्णूंचे अवतार माणले जाते. पण विष्णूचा एक ’अवतार’ म्हणुन भगवान बुद्धांचा जन्म काही पटत नाही कारण विष्णुच्या ईतर अवतारांप्रमाणे बुद्धांनी ना वैदीक धर्माचे रक्षण केले आहे , ना दुर्जनांचा विणाश केला आहे उलट भगवान बुद्धांनी वैदीक धर्म, वैदीक चालीरिती, वेद व पुराण यांच्यावर टिका केली आहे, भगवान बुद्धांना वैदिक धर्म पटत नाही म्हणून त्यांनी वैदिक धर्माशी फरकत घेतली, पण तरी सुद्धा भगवान बुद्धांना आज आपण भगवान विष्णूंचा एक अवतार माणतो . हिन्दु पुराणां नुसार भगवान बुद्ध हे विष्णूचे आवतार होते, किवा भगवान विष्णू पुढे बुद्धदेवांच्या रुपात प्रगट होइल. आसे वर्णन जवळ पास सर्वच पुराणात आलेले आहे. काही वेळ मान्य केले की भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार अहेत तर मग जर बुद्ध हे विष्णूंचेच अवतार आहेत तर मग विष्णूच्या या अवताराचे अवतारकार्य असे विरोधी कसे , विष्णूंच्या अवतारांची कार्ये ही लोकांना वेदमार्ग दाखवणे, धर्माचरण करण्याच प्रवृत्त करणे, धर्मावर आलेली संकटे दूर करणे व अधर्मी व पाखंडी लोकांचा विनाश करणे साधारण अशा प्रकारची राहीलेली आहेत मग बुद्धावतारात हा विरोधाभास का ? भगवान विष्णू आपल्या बुद्धावतारामध्ये का लोकांना वेदमर्गापासून दूर व्हा असे सांगतात ? यज्ञ व अहुती यांसरख्या वैदीक क्रियांना बुद्ध का पशुहिंसा मानतात व आपल्या अनुयायांना या पशुहिंसेपासुन दूर रहा व अहिंसेचे पालन करा असा उपदेश देतात ? एकंदरी शेवटी शेवटी आपल्याला असे वाटायला लागते ज्याअर्थी बुद्धदेवांचे आचरण विरोधी आहे त्या अर्थी की भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार असुच शकत नाहीत ! पण थोडे थांबा ! या प्रश्नांची उत्तरे आहेत !
भगवान बुद्धदेवांचे एक अवतार म्हणुन आचरण ईतके विरोधी कसे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर आपल्याला शेवटी आज ’टाकावू’ उपाधी प्राप्त पुराणांकाडेच जावे लागते. विष्णूपुराण !
विष्णूपुराण च्या तृतीय अंशामधील सतराव्या अध्यायामध्ये एक कथा येते ती त्यामध्ये देव व असुर यांच्यातील एका युद्धाचा उल्लेख येतो तो असा .
देवासुरंभूद्युध्दं दिव्यमब्दशतं पुरा !
तस्मिन्पराजीता देवा दैत्यैर्हादपुरोगमै !!
अर्थात पुर्वकाळामध्ये देव आणि दैत्य यांच्यात एक घणघोर असे युद्ध झाले त्यामध्ये ’ह्याद’ प्रभुतीवाल्या दैत्याद्वारा देव पराजीत झाले. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूची अर्चना केली. याठीकाणी असे ही म्हटले आहे की या युद्धामध्ये दैत्य विजयी झाले कारण त्यांनी ब्रम्हदेवांची आज्ञा उल्लंघून त्रिलोकातील देवांच्या अशीकारातील यज्ञभागांचे अपहरण केले आणि अशाप्रकरच्या यज्ञादी कर्मकांडामुळे दैत्य अधीक शक्तीशाली झाले . या युद्धामध्ये दैत्यांचे रक्षण त्यांच्या साधनेने केले होते स्वधर्मरूपी कवच त्यांच्या भोवती तयार झालेले होते आणि आता सुद्धा ते यज्ञभाग त्यांच्याच ताब्यात होते. या यज्ञाभागांचा उपयोग करुन दैत्य दिवसेंदिवस अधीक शक्तीशाली होतील अशी भिती देवांना वाटू लागली .
त्रैलोक्ययज्ञभागश्च दैत्यर्हादपुरोगमै !
ह्रता नो ब्रम्हणोsप्यज्ञामुल्लंय परमेश्वर ॥
यद्यप्यशेषभूतस्य वयं ते च तवांशजा: ।
तथाप्यविद्याभेदेन भिन्नं पश्यामहे जगत ॥
याच्या पुढे ही देवता श्री विष्णूला विनवताना म्हणतात , हे परमेश्वर ! ह्याद प्रभूतीवाल्या दैत्यांनी ब्रम्हदेवांची आज्ञा मोडून आमचे व त्रिलोकांच्या यज्ञभागांचे अपहरण केले आहे. जसे की आमी आणि दैत्य सर्वस्वी आपलेच वंशज आहोत, अविद्यावश आम्ही सर्वांना एकमेकांना भिन्नभिन्न मानतो. आमचे शत्रू दैत्यगण वर्णधर्माचे पालन करनारे वेदमार्गावलंबी आणि तपोनिष्ठ बनले आहेत. अशा परिस्थित आम्ही त्यांचा नि:पात नाही करु शकत. आता हे परमेश्वर ! ज्यामध्ये आम्ही त्या दानवांचा नि:पात करु शकू असा कोनतातरी उपाय सांगा ! आम्ही आपल्याला शरण आहोत !
स्ववर्णधर्माभिरता वेदमार्गनुसारिण: ।
न शक्यास्तेरयो हन्तुमस्माभिस्तपसाव्रुता: ॥
या देवतांच्या याचनेनंतर झाले असे की ..
इत्युक्तो भगवांस्तेभ्यो मायामोहं शरीरत: ।
समुत्पाद्य ददौ विष्णु: प्राह चेदं सुरोत्तमान ॥
मायामोहोयमखिलांदैत्यांस्तान्मोहयिष्य़ति ।
ततो वध्या भविष्यन्ति वेदमार्गबहिष्कृता : ॥
स्थितौ स्थितस्य मे वध्या यावंत: परिपंथिन: ।
ब्रम्हणो ह्याधिकारस्य देवदैत्यादिका: सुरा : ॥
तदूच्छत: न भी: कार्या मायामोहोयमग्न्त: ।
गच्छन्नद्योपकाराय भवतां भविता सुरा : ॥
अर्थात भगवाण विष्णूनी देवतांचे म्हणने शांतपने ऐकून घेतले व नंतर आपाल्या शरीरामधून "मायामोह" नावाच्या अंशाला उत्पन्न केले आणि भगवान पुढे देवतांना म्हणाले , "हे मायामोह त्या संपूर्ण दैत्यांना मोहीत करेल, व त्यांना वेदमार्गापासून प्रवृत्त करेल तेव्हा त्यांच्याकडून वेदमार्गाचे उल्लंघण झाल्याने त्यांचा नि:पात करणे तुम्हाला जड जाणार नाही. ! हे देवगण हो , जो कोणी देवता अथवा दैत्य ब्रम्हाजींच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतो तो तो सृष्टीच्या रक्षणामध्ये माझा ’वध्य’ असतो. आता हे देवगणहो तुम्ही निश्चिंत व्हा हे मायामोह यापुढे तुमचा हित करतील. " पुढे भगवान विष्णूच्या अंशापासुन उत्पन्न झालेले भगवान मायामोह आसुरांकडे गेले.
सारे आसुर नर्मदेच्या तटावर तपोअस्येमध्ये तल्लिन होते. तेव्हा त्या ’मयुरपिच्छधारी’ ,’दिगंबर’ आणि ’मुंडितकेश’ अशा मायामोह अतिशय मधूर वाणीमध्ये आसुरांना म्हणाले,
हे दैत्यपतयो ब्रुत यदर्थ तपस्ये तप: ।
ऐहिकं वाथ पारत्र्यं तपस: फलमिच्छथ ॥
अर्थात : हे दैत्यगणहो ! तुम्ही कोणत्या उद्देशाने हे तप करत आहात ? आपल्याला कोणत्या लौकीक फळाची इच्छा आहे की पारलौकिक ?
यावर दैत्यगण म्हणाले हे महामते ! आम्ही पारलौकीक फळासाठी हे तप करत आहोत. तुमचे यासंबंधी काय मत आहे ?
मायामोह म्हणाले.
कुरुध्वं मम वाक्यानि यदी मुक्तिमभीप्सथ ।
अहर्ध्वमेनं धर्म च मुक्तिद्वारमसंवृतम ॥
धर्मो विमुक्तेरर्होयं नैतस्मादपरो वर: ।
अत्रैव संस्थिता: स्वर्ग विमुक्तिं वा गमिष्यथ : ॥
अहर्वध्वं धर्ममेतं च सर्वे यूयां महाबला: ॥
अर्थात : जर तुम्हाला मुक्तीची इच्छा असेल तर मी जे सांगतो ते करा . तुम्ही लोक मुक्तिसाठी खुल्या दरवाज्यास्वरुप या धर्माचे आचरण करा . याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. याचे अनुष्ठान केल्याने तुम्हालोकांना स्वर्गाची प्राप्ती होईल अथवा मुक्ती मिळू शकेल. तुम्ही लोक महाबलवान आहात , तुम्ही या (मी सांगत असलेल्या) धर्माचा आदर करा . ’ अशाप्रकारे नाना प्रकारे युक्त्या वापरुन्ब भगवान मायामोह यांनी दैत्यांना वैदिक मार्गापासुन भ्रष्ट केले, "हे धर्मयुक्त आहे व हे धर्मविरुद्ध आहे, हे मुक्तिकारक आहे व हे हे मुक्ती देवू शकत नाही, हे अत्यांतीक परमार्थीक आहे व हे पारमार्थीक नाही . हे हे कर्तव्य आहे व हे हे अ कर्तव्य आहे. या दिगंबरांचा धर्म आहे आणि हा सांबरांचा धर्म आहे ईत्यादी’ ! अशाप्रकारे अनेक प्रकारच्या युक्त्या लढवून भगवान मायामोह यांनी वेदमार्गाचे अनाधीकारी असलेले आसुरांना वेदमार्गापासून दूर नेले. मायामोह दैत्यांना म्हणाले की या माझ्या महाधर्माला ’अहर्त’ अर्थात याचा आदर करा. व यायोगे या धर्माचा अवलंब केल्याने तुम्ही ’आहर्त’ हनवाल !
मायामोहांनी आसुरांना वेदधर्मापासून विमुख केले व ते आसुर मोहग्रस्त झाले. अशाचप्रकारे मायामोहांचे नव्या धर्माचे तत्वज्ञान आसुरांमध्ये फैलावत गेले एका आसुरा्कडून दुसर्या आसुराकडे दुसर्याने तिसर्याला तिसर्याने चौथ्याला अशाप्रकारे थोड्याच दिवसात दैत्यगणांनी वेदधर्माच्या त्याग केला.
यानंतर मायामोह यांनी रक्तवस्त्र (भगवी वस्त्रे) धारण करुन अन्यान्य आसुरांकडे जाऊन आपल्य मृदू, अल्प आणि मधूर शब्दांमध्ये समजावले, ’ हे असुर हो ! उम्हाला जर मुक्ती अथवा स्वर्गाची इच्छा आहे तर तुम्ही अशाप्रकारे पशुहिंसा (यज्ञ) कशासाठी करता ? पशुहिंसा ईत्यादी दुष्टकर्मांचा त्याग प्राप्त करुन बोध प्राप्त करा, (तदलं पशुघातादिदुष्टधमैनिर्बोधत ॥) हे सारे जग विज्ञानमय आहे असे समजा , माझ्या वाक्यांवर विश्वास ठेवा. या विषयी बुद्धीवाद्यांचे असे मत आहे की हे सारे जग अनाधार आहे, भ्रमजन्य पदार्थांच्या प्रितिवर स्थिर आहे. तसेच रोगादी दोषांने दुशीत आहे (थोडक्यात जग हे दु:खमय आहे). या संसारसंकटामध्ये जीव भटकतो ! अशाप्रकारे "बुध्यात (जाणा), बुध्यध्वं (समजून घ्या), बुध्यात (आणि पुन्हा जाणा)" ( एवं बुध्यात बुध्यध्वं बुध्तैवमितिरयन ) ईत्यादी शब्दातून बुद्धधर्माचा निर्देश करुन मायामोह यांनी दैत्यांचा स्वधर्म दूर केला. मायामोह यांनी असे अनेक प्रकारे बुद्धीवाद केला आणि वेदाचे अनाधिकारी असलेल्या असुरांना निजधर्मापासून दूर नेले. आणि मायामोह यांनी केलेला बुद्धीवाद एकाकडून दुसर्याकडे व दुसर्या कडून तिसर्याकडे अशाप्रकारे पसरत राहीला. अशाप्रकारे आता आसुर वेदमार्गापासुन दुर तर गेले तसे ते वेदमार्गाची निंदा सुद्धा करु लागले. ते म्हणू लागले , "नैतद्युक्तिसहं वाक्यं हिंसा धर्माय चेष्यते" म्हणजे हिंसेमध्ये(यज्ञादी कर्मकांड) पण का धर्म असतो ? अहिंसा हाच खरा धर्म ! अग्निमध्ये हवन टाकल्याने पन का कधी फलप्राप्ती होते का ? जर यज्ञामध्ये बळी दिले गेलेले पशू स्वर्गात जात असतील तर यजमान आपल्या पित्याला का नाही यज्ञात बळी देत ? जर दुसर्या एखाद्या पुरुषने भोजन करण्याने एकाद्या मृत व्यक्तीची तृप्ती होत असेल तर प्रवासा वेळी काद्यपदार्थ सोबत घेवून जाण्याची काय गरज आहे ? घरतील व्यक्ती परस्पर यात्रेला गेलेल्या व्यक्तींचे श्राध्य घातले तर नाही का चालणार ? अशाप्रकारे श्राद्धादी कर्मे ही निव्वळ अंधश्रद्धा असुन त्यांची निंदाच केली पाहीजे , " जनश्रध्येयमित्येतद्वगम्य ततोत्र व: । उपेक्षा श्रेयसे वाक्यां रोचते यन्मयेरितम ॥".
अशाप्रकारे मायामोह यांनी दैत्यांना वेदमार्गापासुन विचलीत केले . आता त्यांना या वेदमार्गामध्ये अजिबात रस राहीला नाही. आता देवतांनी दैत्यांना परास्त्र करण्याची कूप तयारी केली. आणि थोड्याच कालावधीनंतर देव व दानवांत पुन्हा युद्ध सुरु झाले. आणि या युद्धामध्ये देवता विजयी होऊन दैत्य परास्त्र झाले. कारण यावेळी दैत्यांकडे पूर्विप्रामाणे स्वधर्मरुपी कवच नव्हता. (स्वधर्मकवचं तेषामभूद्यत्प्रथमं द्विज । तेन रक्षाभवत्पूर्व नेशुनर्ष्टे च तत्र ते ॥)
अशाप्रकारे भगवान मायमोह यांची कथा विष्णूपूराण मध्ये आलेली आहे. आणि हे भगवान मायामोह हेच भगवान बुद्ध आहेत हे कळायला आता आपल्याला वेळ लागणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की दैत्यांना वेदयज्ञपठनाचा अधिकार नव्हता तर दैत्य वेदयज्ञपठनातून मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग चुकिचा करत होते . याच अध्यायात पुढे म्हटले आहे की
नित्यानां कर्मणां विप्र तस्य हानिरहर्निशम ।
अकुर्वन्विहितं कर्म शक्त: पतति तद्दिने ॥
अर्थात सामर्थ्य असुनसुद्धा जो चांगले कर्म करत नाही तो त्या दिवसापासुनच पतित ठरतो.
आत याठीकाणी उभाराहनार प्रश्न म्हणजे भगवान मायामोह हेच भगवान बुद्ध कशावरुन ? तर भगवान मायामोह व भगवान बुद्धांच्या शिकवणूकीमध्ये एकवाक्यता आहे . जग हे दु:खमय आहे असा दोघांच्याही शिकवणुकीचा सार आहे . शिवाय या अध्यायात उल्लेख आलेला आहेच की , "एवं बुध्यात बुध्यध्वं बुध्तैवमितिरयन " ! अर्थात जाणा समजून घ्या आणि पुन्हा जाणा असा बुद्ध धर्म होय . तसेच भगवान मायामोह यांनी आपल्या अनुयायांना केलेला उपदेस व वैदीक धर्माच्या विरोधत केलेला बुद्धीवाद आजसुद्धा वैदिक हिंदु धर्माच्या विरोधात पावरण्यात येत आहे. याच्याहीपुढे याच अवताराचा उल्लेख श्रिमद्भागवत्महापुरामामध्ये आलेला आहे. श्रिमद्भागवत्महापुराण प्रथम स्कंद तिसर्या अध्यायामध्ये भगवान विष्णूच्या अवतारांचे वर्णन आले आहे यामध्ये बुद्धावताराविषयी आलेला उल्लीख असा, "...याच्यानंतर कलियुग आल्यानंतर मगधदेश(बिहार) मध्ये देवतांचे द्वेशी दैत्यांना मोहीत करण्यासाठी अजनच्या पुत्ररुपामध्ये आपला (भगवान विष्णूंचा) अवतार होईल." तसेच श्रिमद्भागवत मध्ये बुद्धावताराचा उल्लेख एकादश संदामध्ये चौथ्या अध्यायामध्ये आले आहे ते असे , "पुढे कलियुगात भगवान विष्णू बुध्दाच्या रुपात अवतरित होतील व यज्ञाच्या अनाधिकार्यांना यज्ञ करताना पाहुन अनेक प्रकारे तर्क-वितर्क लढवून त्यांना मोहीत करतील" , आणि काहीसा असाच उल्लेख गरुड पुराण मध्ये अलेला आहे तो असा, "..एकविसाव्या अवताअरामध्ये कलियुगाच्य संधीकाळाच्या शेवटी देवद्रोह्यांना मोहित करण्यासठी किकट देशामध्ये जिनपुत्र ’बुद्ध’ या नावाने अवतरीत होतील." आता दुसरा प्रश्न उपस्थित होतो की जर मायामोह यांची कथा मानायची झाल्यास सर्व बौद्ध म्हणजे मायामोहांचे अनुयायी हे कथेत सांगीतल्याप्रमाणे असुर, दैत्य व वेदअनाधीकारी ठरतात . पण याठीकाणि आसुर ही कथा जशास तशी घेण्याचे कारण नाही असुर याचा अर्थ अनाधीकारी व दुष्ट प्रवृत्तीचे लोक असाही आहे व श्रिमद्भागवत महापुराणांतील संदर्भामधुन सुद्धा असेच स्पष्ट होते, याठीकाणी विष्णूपुराण व श्रिमद्भाग्वत महापुराणांमध्ये भगवान मायामोह तथा भगवान बुद्धांनी "वेद-यज्ञाचे अनाधीकारी " असणार्यांना वेद-यज्ञापासुन दुर नेले आहे ना की कोणत्या एका विषीष्ठ जात अथवा जमातीला. त्यामुळे जे कोणी दुष्ट प्रवृत्तीवाले लोक होते त्यांना भगाअन मायामोह यांनी मोहीत करुन वैदीक धर्मापासुन दुर नेले आता याचा अर्थ असा नव्हे की जरी पुढे या दुष्ट प्रव्रुत्तीच्या लोकांमध्ये एखादा सत्पुरुष जन्माला आला तर त्याला वेदाध्ययनाचा अधिकार मिलनार नाही. भगवान मायमोहांनी दैत्यांना वेदाध्यनापासुन दुर नेले याचे कारण म्हणजे ते या अध्ययनातुन मिळनार्या सामर्थ्याचा वापर सत्कार्यासाठी न करता वाईट कामासाठी करत होते म्हणून . पुढे जरी या लोकांच्या पोटी एखादा सत्पुरुष जन्मास आला तरी त्याला वेदाध्ययनाचा अधिकार असणारच आहे. प्रल्हाद हा एका असुराचा मुलगा असुनही भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यामुळे बौद्ध हे असुर आहेत असे समजण्याचे कारण नाही. आणि आज काही त्यावेळची परिस्थिती राहीलेली नाही . परंतु दुर्दैवाने आजसुद्धा बौद्ध लोक वैदीक धर्मावर टीकाच करत आहेत. वैदिक हिंदु धर्मावर टीका करणे हेच ते आपले जिवितकार्य समजतात. परंतू त्यांनी आज वास्तव समजून घेण्याची गरज आहे. आणि वैदिक हिंदू धर्मातील हिंदुंनी सुद्धा . भगवान बुद्ध सुद्धा ईतर अवतारांप्रमाणेच एक अवतार होते त्यांनी फक्त आपल्या धर्मातील त्या वेळच्या अनाधीकारी लोकांना दूर केले एवढेच आणि याचा अर्थ असा नव्हे की आजच्या बौद्ध लोकांनी सुद्धा दुरच रहावे. भगवान मायामोह पर्यायाने भगवान बुद्ध याच धर्मातील एका महान देवतेचे अंश आहेत. ज्या धर्मात भगवान बुद्धांना अवतार मानले जाते. आणि ईतर देवतांप्रमाणे बुद्धांना मानाचे स्थान आहे.
वरिल विवेचनावरुन समजते की भगवान बुद्ध हे भगवान विष्णूंचे अंशावतार आहेत. तसेच जातक कथां मधे स्वतः तथागत बुद्ध स्वथः चे २४ पुनर्जन्म झाले आसे मान्य करतात आणि त्या जन्मांमधे प्रत्येक जन्मातुन त्यांने काय चंगले घेतले ते सांगितलेले आहे. पण याठीकाणी उपस्थित राहनारा एक प्रश्न म्हणजे जर हिंदु लोक भगवान बुद्धांना आपलादेव मानत आहेत तर त्याची पूजा अर्चावगैरे का करत नाहीत ? तसे पाहीले तर ब्रम्हा हा एक हिंदु देवता असा आहे की ज्याची पूजा वगैरे होत नाही तसेच त्याचे मंदिरही केवळ एकाच ठीकाणी आहे. याचा अर्थ आसा घ्यायचा का की ब्रम्हा हा हिंदुंचा देवच नव्हे. वैदिक धर्ममध्ये भगवान बुद्धाची पुजा होत नाही हे म्हणने चुकिचे आहे . वराह पुराण मध्ये सत्तेचाळीसाव्या अध्यायामध्ये "बुद्ध-द्वादशी"चे वर्णन आले आहे. भगवान बुद्धरुपी श्रीहरीचे चरण, कटीभाग, उदर, छाती, हात, कंठ, शिर अशाप्रकरे क्रमश: अर्चना सांगितलेली आहे, याचबरोबर कलशस्थापना वगैरे अर्चना सांगितलेली आहे.