Thursday, October 4, 2012

श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण

(श्री सुनिल चिंचोळकर यांच्या श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण या पुस्तकाचा सारांश )

जनमानसात संत ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ-तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत पंचक घर करून बसले आहेत। ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेव आणि तुकोबारायांच्या अभांगाच्या गाथा या पाच ग्रंथाना मराठी भाषेचे पाच वेद म्हणून ओळखले जातेय. पाचही ग्रंथात आढळणारी फार मोठे वैचारिक साम्य व एकवाक्यता आहे. त्यातील काही उदा.
१) जग मिथ्या आहे 
२) प्रपंच दु:खमय आहे
३) मन वासनात्मक आहे
४) शरीर मर्त्य आहे
५) वासनेमुळे मनुष्या पुन:पुन्हा जन्माला येतो
६) मोक्ष म्हणजे निर्वासन होऊन पुनर्जन्माच्या चक्रातुन स्वता:ची सुटका करून घेणे
७) त्यासाठी दिर्घकाळ साधना करावी लागेल
८) मनापासून भक्ति केल्यास भगवंताची प्राप्ती होऊन माणूस एकाच जन्मात मुक्त होऊ शकतो
९) मनाने साधना केल्यास भटकंती होऊ शकेल म्हणून सदगुरूची आवश्यकता आहे
१०) मनुष्य मूळता: ब्रम्हस्वरुप आहे 
११) ब्रम्ह अनादी आणि अनंत आहे
१२) एकदम ब्रम्हाची धारणा करता येत नसल्यास ईश्वर ही संकल्पना स्वीकारावी
१३) ईश्वर सगुण आहे आणि ब्रम्हाप्रमाणे निर्गुण देखील आहे
१४) एकच परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात वास करून आहे
१५) कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती एकाच परमात्म्याला प्राप्त होते
१६) विविध साधना पद्धतीमधे भेद किंवा अंतरविरोध नसून ती माणसांच्या स्वभावानुसार केलेली सोय आहे
१७) कर्म, भक्ति ज्ञान आणि योग यापैकी कोणत्याही एका मार्गाने माणूस साधना करून मुक्त होऊ शकतो
१८) मुक्त होण्यासाठी आसक्ती, ममत्व वासना या गोष्टींचा त्याग करावा लागतो
१९) मोक्षासाठी विहित कर्म सोडण्याची गरज नाही.
२०) प्रत्येकाने वर्णव्यवस्थेनुसार आपापले कर्म करावे.
राजवाडेंनी लावून दिलेले भांडण- : १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत या ५ संतांचे वारकरी आणि धारकरी किंवा प्रवृत्तीवादी आणि निवृत्तीवादी असे वर्गीकरण कुणीही केलेले नाही। परंतु इतिहासाचार्य राजवाडेनी एक लेख लिहीला व समर्थ रामदास हेच खरे संत आहेत तर 'ज्ञानेश्वर ते तुकाराम' हे वारकरी संत केवळ टाळकुटे होते असा विचार मांडला, वास्तविक पाहाता राजवाडे यांचा हा लेख अतिशय बेजबाबदारपणाचा होता। पण त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रचंड वैचारिक वादळ निर्माण झाले व साहित्यिक क्षेत्रातील वातावरण अंत्यंत दुषित झाले. वारकरी आणि धारकरी असे दोन गट पडले .वारकर्यांनी समर्थाना मग सकल संत गातेतून वगळले. नंतर मग हे दोन गट कसे भिन्न आहेत याचे विपुल लेखन घडले परिणामी त्या दोन गटातील दरी वाढतच गेली. त्याने एवढे विकृत स्वरुप घेतले की समर्थांची ओवी जर उचारली गेली की काही वारकरी मंडळी टाळ खाली ठेवून कीर्तन बंद पाडीत. स्वता: समर्थनी आपल्या संप्रदायला धारकरी असे म्हंटले नाही. रामदास-तुकाराम भेट ही झालेली. एवढेच नव्हे तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात समर्थ रामदासनी स्थापन केलेला मारुती आज ही उभा असून त्याच्या दगडी भिंतीवर "शरण शरण हनुमंता तुज आलो रामदूता" हा तुकाराम महाराजांचा अभंग कोरला आहे. जर त्यावेळी वारकरीमधे समर्थाना मनाचे स्थान नसले असते तर मग तिथे हनुमान मंदिर त्याना बंधाता आले असते का? रामदास व तुकाराम या संतानी एकमेकांचे प्रशंसा करणारे अभंग लिहिले आहेत। समर्थ रामदासानी इतर ही वारकरी संतांचे गुणगान गायले आहे त्यात अगदी आरत्यांचाही समावेश आहे.
समर्थ रामदास कृत आरती व स्तवन : 
प्रती संत ज्ञानेश्वर- 
कलियुगी त्रसूनी गेले सज्जन भवऊष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृषणे
तोशविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेने निरसुनी गेले अज्ञान 
जयदेव जयदेव जय ज्ञान देवा मंगल आरती करतो दे तव पद ठेवा
दासांचा सारथी म्हणवुनी मी तुजला बाहता दिंडायाला न पावसि का मजला
नुल्लन्घिशी या माते अज्ञविपीन माजला दास म्हणे मम जीव हा तघोंगो बुजला 
प्रती श्री सकल संत - 
निवृत्ती सोपं ज्ञानेश्वर मुक्ताबाई चांगदेव दोघे सुरदास रामदास पाहो 
विमळानाद सुखानंद मिराबाई सद्भव 
धना सेना कबीर प्रमानंद मेहॉ 
पंपदास सज्जन कृष्ण चरचारी 
तुलसी नारा नामा विठा वसुरी 
जासवन्त गांगल पाठक मुदग ल नरहरी 
खेचर जोगा नागा आष्टा बॅहिरो दिंगरी 
अलखीदास झाल्हण मनदास रेणुका नंदन 
कांपर कूर्मडास आणता गोरा धुंदी जनार्दन 
केशवडास चंगा परसोवा नायक पदामण्कको 
सुदामा सवता अच्युत एको जनार्दन्
प्रती तुकाराम- 
धन्य धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दिप लागे धन्य निसपरुहता एकविध निष्ठा 
श्रुतीभाव स्पष्टा दाखविसी संतोषाले चित्त होताची दर्शन 
कॅलो आली खून अवताराची घाटाल्से धडा नामाचा पै गाधा 
प्रेमे केला वेडा पांडुरंग नववीधा भक्ति रढविली जगि तारु कलियुगी दास म्हणे
संत तुकाराम महाराज कृत समर्थ स्तवन - 
का स्ताविशी माते दुर्बळ पतिता नामितो समर्था पाय तुझे ब्रम्हाज्ञ ब्राम्हण वैराग्य पुतळा 
रामभजनी लीला अनुपम्य त्रेतायुगी स्वामिसेवा केली भारी श्री रामावतारी महरुद्रा हे आम्हा कळले स्वामींच्या प्रतापे 
वाडलो पायपे समर्थांच्या असावी ते कृपा समचरणी दृष्टी वितेवरी गोमती वृत्ती राहो भक्तासे दिन स्वामिंची करुण 
विट्ठ्ल किर्तना प्रेमा रहो तुम्हा संताणलागी मगतासे एक तुका म्हणे सुख संतापायी
दोन संत एकमेकांचे द्वेष करीत नाहीत मात्र अनुयायी भांडत असतात दोन साहेब कार्यालयात गप्पा मारीत असतातपण त्यांची कुत्री मात्र एकमेकांवर भूंकत असतात। तस हा प्रकार झाला।
मागे एकदा प पु बाबा महाराज सातारकर म्हणाले होते की -
"मदास की ज्ञानेश्वर ते तुकाराम हा वाद साहित्यिकांमधला आहे. तो सांप्रदायिकांवर लादु नका. कोणत्याही सांप्रदायिक वारकर्‍याने समर्थन नावे ठेवली नाही किंवा समर्थंच्या गडावरील मंडळीनी ज्ञानदेवाना नावे ठेवली नाहीत. जे नावे ठेवणारे आहेत त्याना परमार्थ कळालाच नाही. त्यांचा विचार करण्याचे कारण नाही. तेंव्हा समर्थ व वारकरी सांप्रदायात द्वैत नाहीच."
समाज सुधारकांनी वाढवलेले द्वैत-
महारष्ट्रात वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय आहे संख्येच्या दृष्टीने ही मोठा आहे। या संप्रदायाचे वैशिष्ठ्य म्हणजे सर्व जतीमधे वारकरी संत होऊन गेले सेना न्हावी, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार, नरहरी सोनार, जलोजी आणि तुकोजी पांचाळ हे सुतार, चोखामेळा हरिजन, तुकाराम वाणी तर ज्ञानेश्वर-एकनाथ हे ब्राम्हण. सर्व जातीतील संत असल्यामुळे हा संप्रदाय खेड्या पाड्यात व बहुजन समाजामधे सर्वदूर पोहोचला पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे शक्तीपीठ आणि भक्तीपीठ बनले। अगोदर सांगितलेल्या कारणांमुळे काही वारकरी मंडळीनी समर्थाना न स्वीकारल्याने महारष्ट्रातील संख्येने मोठे असलेल्या भक्तांकडून समर्थ दूर गेले। वारकरी संप्रदायात बहुजन समाज जास्त असल्यामुळे बहुजन समाज आणि समर्थ यांच्यात एक दुरी निर्माण झाली.त्याच वेळी सामाजीक क्षितिजावर तथाकथित समाजसुधारकांचा उदय झाला आणि ही परिस्थिती आणखीच बिघडली. त्यानी संताना अकारण वेठीस धरले; जातीव्यवस्थेचे निर्मूलन करत असताना ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी दुही निर्माण केली आणि त्याचवेळी राज्य करीत असलेले ब्रिटीश मंडळीनी या वादाला खतपाणी घातले.काहीनी तर अगदी मोगल राज्यकर्त्यानी हिंदुंवर केलेल्या अत्याचाराचेही समर्थन केले. इस्लामी राजवटीला विरोध करणारे - छ्त्रपती। शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामीपैकी शिवरायांच्या वाटेला जाणे परवडण्यासारखे नव्हते म्हणून मग राहीले ते समर्थ ते ब्राम्हण।म्हणजे त्यांच्यावर टीका म्हणजे बहुजन समाजास खुश करणे.आणि बनवून टाकले समर्थाना ब्राम्हणांचे पुढारी.
स्वामी विवेकानंद म्हणतात- 
"धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही. कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही. किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना असून त्यांचा धर्माशी काहीएक संबंध नाही. तेंव्हा या बद्दल ऊटसूट धर्माला वेठीस धरण्याचे काही कारण नाही।" धार्मिक क्षेत्रात सर्वच संतानी सामाजिक समता प्रस्थापित केली आहे. " हिंदू धर्ममधे ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत . " चातॄवर्ण्य मय सृष्ट्यं गुणकरम् विभागश: "याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.आणि भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;
ब्राम्हण- ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।
गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण, व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र् . स्वामी विवेकानंद म्हणतात, "मला अश्या प्रकारची समाजव्यवस्था हवी आहे जिथे शंकराचार्यांचा मेंदु असेल, महंमदाची समता असेल,बुद्दाची करुणा असेल आणि कॄष्णाचे चातुर्य असेल।" संतानी भक्तिच्या क्षेत्रात समता आणण्याचा प्रयत्न केला; समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यानी कधीही बंड पुकारले नाही। हा संतांचा दोष नसुन सामाजिक मानसिकतेचा आहे.स्वामी विवेकानंद केवढे मोठे क्रांतिकारक संत पण ते दक्षिणेश्वराच्या काली मातेच्या मंदिरातील देवीला बोकड बळी देण्याची प्रथा बंद करु शकले नाही किंवा भगिनी निवेदिता यांना ते काली मातेच्या मंदिरात दर्शनाला नेऊ शकले नाही तुकाराम महाराज हे वेद व शास्त्र यांचे कडवे अभिमानी होते। ते म्हणतात-" वेदा निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥ १३४५॥ " . प्रत्येक संताला कोणत्या ना कोणत्या जातिच्या माणसांनी त्रास दिला आहे पण संतानी कधी त्याला जातीयतेचा रंग दिला नाही. शिकागो धर्म परिषदेवरुन आल्यावर विवेकानंदाना जगन्नाथपुरीच्या पुजार्याने मंदिर प्रवेश नाकारल्यावर जर त्यांनी लोकाना भडकावुन दिले असते तर आपण विचार ही करु शकत नाही. ते आपल्या गुरुबंधुला लिहिलेल्या पत्रात म्हणतात - "मी जगाकडुन खुप सन्मान स्विकारले आहे आता निंदा देखिल सहन केले पाहिजे" । पंतप्रधाना असतानाच ईंदिरा गांधी याना देखील मंदिर प्रवेश नाकरला गेल्यावर जर त्यानी मनात आणले असते तर त्या पुजार्याला कामावरुन काढुन टाकले असते. पण केवळ सुसंस्कॄतपणा म्हणुन त्यांनी त्या पुजार्याला सोडुन दिले.
रामदास जातीयवादी ??
-समर्थ म्हणतात- "मराठा तितुका मेळवावा" म्हणजे त्याना मराठा समाजबद्दल अभिमान असावा , "भेटो कोणी नर । धेड, महार वा चांभार । जाणावे अंतर । या नाव भजन ॥" म्हणजे त्याना बहुजन समाजाबद्दल ही बराच कळवळा होता. ब्राम्हणाबद्दल, ब्राम्हणांच्या सोवळ्याबद्दल बोलताना ते म्हणतात - "सोवळे कोणते रे । ब्राम्हणा ओवळे कोणते रे ॥" म्हणजे ते पक्के ब्राम्हणद्वेष्टे होते हे सिद्ध होते. पण आजकालचे स्वयंघोषित पुढारी त्याना मात्र ब्राम्हणांचे पुढारी का ठरवू पहात आहेत कोण जाणे ? ज्या प्रमाणे वकिल लोक आपल्या प्रतिस्पर्धिचे कुठले तरी वाक्य आणुन त्याचा मनमानी अर्थ लावुन त्याला नाही नाही ते आरोप चिटकवतात तसे हे कावळ्याची नजर असलेल्या पण साहित्यिकाची आव आणणारया लेखकांनी समर्थांवर आरोप करुन स्वत:ची घाण त्यांच्यावर टाकायचा प्रयत्न केला आहे. काविळ झालेल्याला जसे सगळिकडे पिवळे दिसत असते तसे त्या लोकांना सतत समर्थ द्वेषच दिसतो॥ शेवटी - "तो काक पक्षी । क्षते परिक्षी । क्षतेच लक्षी" हेच खरे.
समर्थांचे शिष्यगण
यात इतर बहुजन वर्गही जास्त होता - धोंडिबा धनगर, दत्ता न्हावी, बाजी गोसावी, वली महंमद, फाजलखान ई.वली महंमद तर मराठवाड्यातील मठांचा प्रमुख होता. महात्मा गांधी जेंव्हा नेतृत्व करित होते तेंव्हा सर्व प्रांताचे पुढारी हे ब्राम्हण होते पण म्हणुन कांही ते ब्राम्हणांचे पुढारी होवु शकत नाहीत. परवाच वारलेले श्री। नानासाहेब धर्माधिकारी यांचे १ कोटी शिष्य गण आहेत. त्यानी आयुष्यभर दासबोधाचे निरुपण केले. तसेच त्यानी शेकडो निरुपणकार बनवले त्यात अगदि भांडी घासणार्‍या स्त्र्यियांपासुन ते भाजी विकणार्‍या मायेपर्यंत लोक आहेत. मुठभर शिष्यांचे काम बगुन जर समर्थाना दोष देणार असाल तर मग आज महापुरुष म्हणवुन घेतले जाणार्यांचे काय्? त्यांच्या शिष्याने केलेली कु-कर्मे त्यांच्यावर कसे थोपवता येते?
एक घटना -
राज्याभिषेक समयी शिवरायांना २०० हिंदुंचे शुद्धीकरण करायचे होते पण तत्कालीन समाजातील सनातनवाद्यांमुळे ते शक्य झाले नाही पण वैयक्तिक जीवनात त्यानी नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर यांना परत हिंदू धर्मात आणले. जर कोणी उद्या उठुन असे म्हणाला की २०० लोकाना शिवरायांनी दिलेल शब्द फिरवला तर ते मुर्खपणाचे ठरेल. छ.शाहुनी मराठा समाजतील शंकराचार्यांचे पीठ ही बनवले व भिक्षुक निर्माण करण्याचा ही प्रयत्न् केला पण खुद्द् मराठा समाजानेच ते नाकारले.. ( पण आज तेच मराठे आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत काय दुर्दैवविलास आहे पहा.)
तुकाराम महाराजांचा खुन होतो ब्राम्हणाकडुन, ते झाकण्यासाठी ते वैकूंठ ला गेले अस अपप्रचार ब्राम्हण करतात असा ही आरोप होतो... तुकाराम महाराजांचा खुन होतो व तेही केवळ १२ मैल दुर असलेल्या पुणे इथे राहणार्या शिवरायाना देखिल कळत नाही जिथे शिवरायांचा साम्राज्य आहे . अशाप्रकारे हे केवळ तुकारामांचाच नव्हे तर छ।शिवरायांचा देखिल अपमान करीत आहेत. अफजलखानचा वकील हा ब्राम्हण होता म्हणुन त्याचा राजकारण करणारे हे मुद्दाम लपवतात की अफजलखानच्या सैन्यात कित्येक मराठी सरदारच नव्हे तर शिवरायांचे नातेवाईक ही होते. एवढेच काय छ्.शंभुराजे औरंगजेब शी लढत असताना शिवरायांचे सहा जावई संभाजी राजांविरुद्द् लढत होते. एका शिखांने इंदिरा गांधींची हत्या केली तर ते विसरले जाते पण एक ब्राम्हणाने म।गांधींची हत्या केली हे मात्र ६० वर्षे झाली तरी विसरले जात नाही। मतांसाठी शिखांची माफी मागितल जात पण ब्राम्हणाना झोडपल जात।
शिव-समर्थ पत्रे -
दोन्ही महापुरुषांनी एकमेकास लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.
१) १६४९ ला समर्थांनी शिवरायांस लेहिलेल पत्र
2) १५ ओक्टोबर १६७८ ला शिवरायानी समर्थास लिहिलेल पत्र ( चाफळ ची सनद )
३) १६८१ शिवरायांच्या अकाली निधनानंतर संभाजीना लिहिलेल पत्र
४) १३ जानेवारी १६८२ ला संभाजी राजाना केलेला उपदेश.
इतकेच काय शहाजी राजे व समर्थांचा भेटीचा कागद आजही तंजावर येथिल मराठी ग्रंथालयात 'भोसले रुमाल' या बाडात उपलब्ध आहे.
शिव-समर्थ भेट -
पहिली भेट चाफळ पासुन २ मैल अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे झाली. ( सन १६४९ ,१२ एप्रिल) दुसरी भेट शिवथर घळ इथे १६७६ साली. शिवरायांच्या चरित्रात तुकाराम महाराजांचा जास्त उल्लेख येत नाही याचे कारण तुकाराम महाराज जेंव्हा वैकुंठला गेले त्यावेळी शिवराय हे केवळ १९ वर्षाचे होते. या उलट समर्थ हे महाराजांच्या निर्वाणानंतर दोन वर्षानी समाधिस्त झाले त्यामुळे संपुर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले. बाबा महाराज सातारकर म्हणतात की - "तुकाराम व समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते हे कोणीही नाकारु शकत नाहीत"
शिवराज्याभिषेक व समर्थांची अनुपस्थिती-
अनेकदा शत्रु गंमत पाहण्यासाठी व फोडझोड करण्यासाठी उपस्थित असतात. राज्याभिषेकाला इंग्रज अधिकारी देखिल आले होते ते काय फार प्रेमाने नव्हे. तो राजनितीचा एक भाग असतो. म्हणुन मग काय समर्थ व शिवराय यांची भेटच् झाली नाही असे म्हणणे कितपत बरोबर हे तुम्हीच ठरवा. प्रभु रामचंद्राच्या जडणघडणित विश्वमित्रांचे स्थान अबाधित आहे पण राम-राज्याभिषेकावेळी ते कुठे उपस्थित होते? मग असे म्हणणार का त्यांची भेटच झाली नाही?
सांप्रदायिक चरित्रकारांच्या चुका -
राजा पेक्षा प्रजा अधिक राजनिष्ट म्हंटल्या प्रमाणे समर्थांनी कधिही स्वत:कडे स्वराज्य स्थापनेचे श्रेय घेतले नाही. पण काही शिष्यानी हे तत्त्व न पाळुन समर्थाना श्रेय तर शिवरायाना केवळ आज्ञाधारक बनवुन टाकले. हिंदवी स्वराज्य़ स्थापनेची प्रेरणा मातोश्री जिजाबाईंची तर सर्व मेहनत शिवरायांची होती यात काही वादच नाही. एकाद्या आमदाराचे किंवा एकाद्या खासदाराचे निर्णय हे जसे पुर्ण पक्षाचे होवु शकत नाही किंवाएकाद्या स्वय़ंसेवकाचे निर्णय जसे संपुर्ण संघाचे निर्णय होत नाही तसेच एका शिष्याचे चुक ही संपुर्ण संप्रदायची होवु शकत नाही. राजकारणात खर्‍या राजकारणाचे कागदपत्र उपलब्ध नसतात. जे उपलब्ध असतात ते राजकारण नसतात तर ते प्रशासनाचे भाग असतात. "राजकारण बहुत करावे । परंतु कळोचि न द्यावे ।"
अफजल खानाच्या आगमनाची गुप्त सुचना देणारे पत्र-
विवेके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणून
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोचिं नये॥१
चालो नये असन्मार्गी
सत्यता बाणल्या अंगी
रघुवीरकृपा ते प्रसंगी
दासामहात्म्य वाढवी॥२
रजनीनाथ आणि दिनकर
नित्यनेमे करिती संचार
घालिताती येरझार।लाविले भ्रमण जगदीशे॥३
आदिमाया मूळ भवानी।
हेचि जगाची स्वामिनी।

येकांती विवंचना करोनी । इष्ट योजना करावी॥४॥ 
विजापुरचा सरदार निघाला आहे.

असा स्पष्ट संदेश त्यात मुद्रीत झालेला दिसतो. खान निघाल्याची खबर देणार पत्र
डेमिंग या इंग्रज इतिहासकाराचे एक प्रसिद्द वाक्य आहे - " Shivaji and Ramdas were two bodies but one soul"
अन्य कांही आक्षेपांचे खंडन -
१) लग्न मंडपातुन पळुन गेल्या मुळे एका स्त्री वर अन्याय
- त्या स्त्रिचे त्याच लग्न मंडपात दुसर्या मुलाशी लग्न लावुन देण्यात आले। त्यामुळे त्या स्त्री वर अन्याय झाला असे म्हणालात तर ते कसे खरे मानायचे? २) तुकारामानी "भिक्षापात्र अवलंबविणे । जळो जिणे लाजिरवाणे" असे म्हणाले व समर्थ संप्रदाय हा भिक्षेवर अवलंबुन आहे त्यामुळे ते ( तुकाराम ) समर्थविरोधी होते
- पण स्वता: तुकाराम महाराजच काय आज देखील वारकरी मंडळी पंढरपुर ला वारीला जात असताना भिक्षेचा आश्रय घेत असतात ३) समर्थानी जे लिखाण केले ते कारकुनी होते 
- समर्थ हे साहित्यिक होते असे प्रशस्तीपत्रक कुणा लुंग्यासुंग्या कडुन घेण्याची काहिही गरज नाहीये। नराधमांचे विद्रोही साहित्य संमेलन- नावालाच विद्रोही पण काम मात्र हे संत व देशद्रोही करत आहेत। समर्थ रामदासच नव्हे तर संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्यावरही हे विद्रोही घसरले। स्वामी विवेकानंद म्हणतात - " द्वेषावर आधारेत कार्य जास्त दिवस टिकत नाही।"
आता गाडी इतरांवरही -
इतके दिवस रामदासांवर बोंबलत असलेली मंडळी आता हळुह्ळु ज्ञानदेवांवर घसरत आहेत। जाहीर सभेंमधुन ते सांगत आहेत की, - ग्यानबा-तुकाराम म्हणण्या ऐवजी नामदेव-तुकाराम म्हणा 
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
तर- झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे
- तर लोकमान्य टिळकांना या लोकांनी ' भटमान्य' असे म्हंटले आहे
इतिहासाच्या अभ्यासाला जातियवादाचे ग्रहण - 
आजचे हे तथाकथित इतिहासकार फक्त जातिवरुनच इतिहासाचे एकांगी लिखाण करित आहेत। त्यातुन मुर्ख सरकार असले कि झाले वाट लागणारच या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे या वादातुनच मग दादोजी कोंडदेव पुरस्कार वाद तर कधी सरस्वतीपुजन वरुन वाद होतात ।
समर्थांच्या चारित्र्याची चर्चा - 
नागपुरच्या माकडाने मर्कटश्री मा म देशमुख समर्थांसारख्या महापुरुषाच्या चारित्र्यावर शितोंडे उडवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 'अध्यात्मात वस्त्र् देणे' हा वाक्य प्रचार आहे हे या मुर्खाना कधी कळणार? सुफी संप्रदायात देखिल स्त्रियांचे वस्त्र अंगावर परिधान करुन देहबुध्दि संपल्याचे दाखविण्याचे एक संकेत आहे. या मुर्ख विद्रोहीनी गिरिधर स्वामींची मुळ ओळी न देता एका ओळिचा आपल्याला हवे तसे अर्थे घेवुन दळभद्री आरोप समर्थांवर करावे या सारखा विनोद शोधुनही सापडणार नाही. शेवटी काय मनी वसे ( विद्रोहींच्या ) ते स्वप्नी ( मुखी) दिसे एकाद्या ग्रंथातील शेकडो प्रतिकुल संदर्भ सोडायचे व एकाद्या प्रसंगाचा मनमानी अर्थे लावयचा व वर इतिहास संशोधकाचा आव आणयचा हे म्हणजे - शेळीने वाघाची कातडी पांघरुन स्वता:ला वाघ म्हणून घेण्यासारखे आहे. न र फाटक यांचे एक वाक्य घेवुन वाद माजविणारे त्यांनी समर्थांचा शेकडो वेळा केलेले कौतुक मात्र लपवायचे असे का? शेवटी काय या मुर्खांकडुन समर्थांसाठी प्रशस्तिपत्रक घेणे म्हणजे एकाद्या वारंगनेकडुन प्रतिव्रतेने प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होइल किंवा गटारीकडुन गंगा पवित्र असल्याचा प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होय.
शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडे दुष्काळ.
डॉ.हेडगेवार सरसंघसंचालक असताना संघाच्या शाखेंवर प्रार्थना संपली म्हणजे "राष्ट्रगुरु स्वामी रामदास की जय" असे म्हणण्याची पद्दत होती शेवटी समर्थांचा शिवरायांवर केलेला काव्य देत आहे. जे फ़क्त मराठी मनात च नव्हे तर सर्व शिवभक्ताना प्रिय आहे -
" निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥
अखंड स्थितिचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ "
" शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा साक्षेप ॥
शिवरायांचा आठवावा प्रताप । भुमंडळी 
त्याहुन करावे विशेष । तरिच म्हणावे पुरुष
या उपरी आता विशेष । काय सांगावे? ॥ "
मला वाटते वरील माहिती वाचल्यावर एकादा अभ्यासु माणुस नक्किच विचार करेल व खरे-खोटे काय ते जाणून घेईल.
-सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’ या पुस्तकाचा संक्षेप)

5 comments:

  1. खूप चांगली माहिती आहे आणि तुम्ही चालवलेला प्रपंच सुधा कौतुकास प्राप्त आहे, आमचा पाठींबा सदैव राहील अशा गोष्टीसाठी.

    ReplyDelete
  2. Very good one Suraj - keep it up. sant purush ani maha purush hyachyat jativarun bhed karane atishay chukiche ahe. lekh share kelyabaddal dhanyawaad.

    ReplyDelete
  3. समर्थ म्हणतात- "मराठा तितुका मेळवावा" म्हणजे त्याना मराठा समाजबद्दल अभिमान असावा , "भेटो कोणी नर । धेड, महार वा चांभार । जाणावे अंतर । या नाव भजन ॥" म्हणजे त्याना बहुजन समाजाबद्दल ही बराच कळवळा होता. ब्राम्हणाबद्दल, ब्राम्हणांच्या सोवळ्याबद्दल बोलताना ते म्हणतात - "सोवळे कोणते रे । ब्राम्हणा ओवळे कोणते रे ॥" म्हणजे ते पक्के ब्राम्हणद्वेष्टे होते हे सिद्ध होते.
    लेखक सुनिल चिंचोळकर व सुरज महाजन यांस . संत प्रभृतींना जातीत अडकवू नये म्हणताना आपण खुद्द रामदास स्वामिना "पक्के ब्राम्हणद्वेष्टे" म्हणता हे आश्चर्यकारक आहे. शिवाय "मराठा" या शब्दाला जातीवाचक वळण दिले आहे ते आक्षेपार्ह आहे. सुनील साहेब शिरगाव मठपती भीमस्वामीकृत मठलीला आणि श्रीसमर्थशिष्य तंजावर मठपती शाहपुरकर यांचे "रामदास आणि रामदासी : श्री समर्थांची २ जुनी चरित्रे" याची संपूर्ण प्रस्तावना आवश्य वाचावी.
    त्यांनी लिहिले आहे महाराष्ट्रात जे ३ नवीन संप्रदाय आहेत ते या प्रमाणे
    १) प्राचीन विद्या आणि यांचे ज्ञान करून देणारा पहिला संप्रदाय
    २) झालेले ज्ञान कृतीत उतरवणारा दुसरा संप्रदाय
    ३) ती कृती का आणि कोणासाठी करावयाची हे शिकविणारा तिसरा संप्रदाय
    त्यांना स्वरूपावरून नावे ठेवायची तर जिज्ञासू, चिकीर्षु आणि ऐतिहासिक संप्रदाय अशी ठेवावी लागतील. तिन्ही संप्रदाय एकाच ठिकाणी एकवटल्याशिवाय त्यास "मराठा" नाव धारण करता यावयाचे नाही. मराठा म्हणजे जो स्वधर्म आणि स्वदेश यांना ओळखतो व त्यांची एकनिष्ठ सेवा करतो तो (पान ६). महाराष्ट्रीयांचा-मराठ्यांचा धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म (पान ८).
    तसेच स्वामिनी गैर वागणाऱ्या कित्येक लोकांना चुका दाखवून दिल्या. त्यात सर्व जातीतील माणसे होती. ह्या एका ओवी वरून हा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. मराठा ही जात म्हणून नव्हे तर सर्व महाराष्ट्रीय (मराठी - फक्त मराठा नव्हे) लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र धर्म वाचवावा अशी स्वामींची इच्छा होती म्हणून "मराठा तितुका मेळवावा" हा संदेश त्यांनी दिला. कृपया याची नोंद घ्यावी.

    ReplyDelete
  4. नरदेही विशेष ब्राह्मण। त्याहिवरी संध्यास्नान। सद्वासना भगवद्भजन। घडे पुर्वपुण्ये।(श्री दासबोध दशक२ समास४)लिहीणारे रामदास स्वामी ब्राह्मणद्वेष्टे होते हा आरोप निश्चित चुकीचा आहे. आणि मुळात संत असलेल्या या महापुरुषाचा असा उल्लेख करणं कितपत योग्य आहे? "राजवाडे यांचा हा लेख अतिशय बेजबाबदारपणाचा होता" या तुमच्या वाक्याचं समर्थन जरूर करा ते योग्यच आहे.पण त्यांनी बेजबाबदार पणा केला म्हणून तुम्ही अस लिहावं? सुनील साहेब तुमचा हा लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे यात तिळमात्र शंका नाही परंतु पुन्हा ब्राह्मणद्वेषाला चुकीच्या मार्गाने खतपाणी घालायचे का? रामदास स्वामींवर असे आरोप? असो तुमच्या लेखातील इतर सर्व मुद्दे अतिशय योग्य आणि पुरावे असलेले असे आहेत. तेव्हा आपल्या या कामासाठी मी आपले आभार मानतो. माझ्या मुद्द्याचा विचार होईल ही अपेक्षा.

    ReplyDelete
  5. समर्थ रामदास हे ब्राम्हनांचा द्वेष करणारे नसावे; कदाचित धर्माच्या नावाखाली कुकर्मे करणाऱ्या तत्कालीन ब्राम्हण लोकातील काही लोकांच्या विरोधात त्यांचे लिखाण असावे ; जसे कि प्रत्येक जाती धर्मात काही चांगले तर काही वाईट लोक असतात, वाईट लोकांबद्दल आपण बोलतो तसे लिहतो ही, याचा अर्थ संपूर्ण समुदायाचा आपण द्वेष करतो असा तर होत नाही ना. बाकी मुद्दे पटतात. खरतर जातीवरून एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची कर्तबगारी नाकारणे चुकीचे आहे.

    ReplyDelete