Saturday, September 15, 2012

शिवराय विरुद्ध ब्राम्हण


सध्या महाराष्ट्रात एखाद्या जातिच्या लोकांना आरोपीच्या पिंजर्‍या मध्ये उभे करुन स्वत:ला मोठे शाहणे म्हणुन फुशारक्या मारण्याची पद्धत चालू झाली आहे आणि स्वत:ला दुसर्‍यापेक्षा शाहणे आणि विद्वान सिद्ध करायचे असेल तर समोरच्याचे विद्वत्त कमी आहे किंवा समोरचा आरोपाने बरबटलेला आहे असे दाखवले की काम संपते, त्याची विद्वत्ता सिद्ध होते, साधारण अशा भ्रमामध्ये काहि मंडळी आहेत आनि या भ्रमातुनच त्यांनी अज ब्राम्हण समाजाला शिवरायांच्या विरुद्ध उभे केले आहे. एकिकडे सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करुन मुसलमानांना जवळ करायचे आणि दुसरीकडे जातीच्या आधारावर ब्राम्हणांना शिवरायांचे ’खरे’ शत्रू म्हणुन लोकांसमोर उभे करायचे. एकिकडे शिवरायांनी आपल्या स्वराज्यात कोणत्याही धर्माचा अथवा धार्मीक स्थळाचा अपमान केला नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे शिवरायांनी कृश्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला म्हणुन मंदिरे पाडायची आणि वेदांवर घाण करण्याची भाशा करायची हा स्वत:ला विद्रोही म्हणवणार्‍या लोकांचा दुटप्पीपणा आमच्याच लोकांच्या लक्षात येत नाही हे आमचेच दुर्दैव म्हणायचे.

शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण होते : या वाक्याचे भांडवल करुन संपुर्ण ब्राम्हण समाजाला टार्गेट करुन ब्राम्हण हे शिवरायांच्या विरुद्ध होते असे दाखवले जाते परंतु असा प्रतिवाद करणार्‍याला शिवरायांचा राज्याभिशेक करणारी व्यक्तीही एक ब्राम्हणच होती हे का दिसत नाही मला कळत नाही. (गागाभट्टांवरील आक्षेपांचे खंडन मी मागे या लेखामध्ये  केलेलेच आहे) . शिवराज्याभिशेकाला विरोध करणारे जर ब्राम्हण होते तर शिवरायांनी नेमलेले जे अष्टप्रधान मंडळ होते त्यात बहुतांशी ब्राम्हण होते हे विरोध करणारे का विसरतात ? सभासद बखरी मध्ये शिवरायांच्या राज्याभिशेकाला पन्नास हजार ब्राम्हण उपस्थित होते असा उल्लेख आहे त्याच्याकडे का डोळेझाक केली जाते ?? शिवरायांच्या राज्याभिशेकाला ज्यांनी विरोध केला ते मुर्ख होते म्हणुन का ते ज्या जातिमध्ये होते त्याच जातीच्या बहुतांशी लोकांनी शिवरायांच्या राज्याभिशेकाला मान्यता नव्हे स्वत: अभिशेक केला इतकेच नाही तर बहुसंखेने राज्याभिशेकाला उपस्थित राहुन अनुमती दर्शवली त्याचे काय ??

जेम्स लेन च्या मार्फत ब्राम्हणांनी शिवरायांची बदनामी केली :- याप्रकरणी प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉग वरुन (श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून घेतलेला लेख देत आहे तो वाचुन वाचकांनी स्वत:च आपले मत ठरवावे ...
छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर

गेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे?
१.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
२.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.
३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे ?लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.
६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.
७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.
८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......

जयसिंग जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण  :-  बर्‍याचवेळी मिर्झा राजा जयसींगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी  जयसिंग यांच्या यशासाठी आणि पर्यायाने शिवरायांच्या विरोधात यज्ञ वगैरे केले म्हणुन ब्राम्हणांना वेठीस धरले जाते. यज्ञ , पुजापाठ ,हवन  वगैरे पौरोहित्य करणे त्या काळी ब्राम्हणांच्या उपजिविकेचे साधन होते. त्या वेळी ब्राम्हणांनि जे यज्ञ वगैरे केले ते जयसिंगाच्या सांगण्यावरुन . म्हणजे ब्राम्हण हे फक्त पौरोहित्य करत होते आणि अधिपत्य जयसिंग करत होता. का करत होता आणि कशासाठी करत होता याच्याशी काय देणे घेणे ? जयसिंगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी पैरोहित्य केले यावरुन जर ब्राम्हणांना वेठिस धराचे असे असेल तर. जयसिंगासाठी ज्यांनी ज्यांनी तलवारी वगैरे बनवल्या अशा सर्व लोहारांना, त्याचे केस कापुन सेवा करणार्‍या सर्व नाव्ह्यांना, त्याचे कपडे बनवणार्‍या सर्व शिंपी जातीच्या लोकांना अशाप्रकारे स्वत:ची उपजिविका चालवण्यासाठी जयसिंगाच्या हाताखाली जे जे मराठे आणि इतर जातिचे लोक काम करत होते अशा सर्वांना दोश द्यावा लागेल. ब्राम्हणांना यज्ञ केला म्हणुन दोष लावनारे होतील का तयार ??

जरा इकडे ही लक्श द्या  :- केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात होते म्हणुन सर्वच ब्राम्हण समाजाला टार्गेट केले जाते . असे असेल तर शिवरायांना काय केवळ काही ब्राम्हणांनी विरोध केला ??शिवाजी महाराजानी जे स्वराज्य उभारले त्याला उभ्या महाराष्ट्रातून पाठिंबा होता अशी एकच बाजू नेहमी फोकस केली जाते. अन हल्ली ब्रिगेडवाले ब्राह्मणांचा शिवाजीना विरोध होता हे ठासून सांगताना काही नावं जाणीवपुर्वक घेत नाही. सध्या खालील नावं वाचा विरोधक कोण होते ते जाणून घ्या. (खालील यादी संजय सोनावणी यांच्या ब्लॉग वरुन घेतलेली आहे).
१ जावळीचे मोरे
२ यशवंतराव वाड्वे
३ मुधोळचे घोरपडे
४ सिधोजी पवार
५ मंबाजी भोसले
६ मालोजी पवार
७ तुळोजी पवार
८ मनाजीराजे घाट्गे
९ बाळाजी हैबतराव
१० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
११ माने ( विजापूर)
१२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
१३ नाईकराजे पांढरे
१४ खंडोजी खोपडे ( मावळ)
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
१६ शंकराजी मोहिते
१७ नाईकजी खराटे
१८ कल्याणजी यादव
१९ सरदार सर्जेराव घाटगे
२० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
२१ पालवणीचे जसवंतराव
२२ सावंतवाडीचे राजे भोसले
२३ गोंदाजी पासलकर
२४ केदारजी देशमूख खोपडे
२५ सुरजी गायकवाड
२६ दिनकरराव काकडे
२७ संभाजीराव पवार
२८ कमळोजीराव कोकटे
२९ त्रंबकराव खंडागळे
३० कमळोजीराव गाडे
३१ अंताजीराव खंडागळे
३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
३६ माहूरचे उदाराम भोसले
३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
३८ रुस्तूमरावराजे जाधवराव....

आता शिवरायांच्या मुस्लीम विरोधकांची यादी बघू.
१. वाईचा सुभेदार अमीन
२. फतेह खान
३. फतेह खानाचा पठाण सरदार मुसेखान
४. शाहिस्तेखान ( त्याच्या लाखांच्या सेनेत किती मुस्लीम होते ते कोणीच सांगू शकत नाही.)
५. अफझल खान
६. सय्यद बंडा
७. अफझल खानाचा मुलगा फाजल खान
८. अफझल खानाचे सरदार
मुसेखान ( २रा)
याकूत
हसन
अन्कुशखान
रनदुल्ला खान
अंबरखान
९. सिद्धी जोहर
१०. सिद्धी मसूद
११. दिलेर खान
१२. सर्जा खान
१३. बहलोल खान
१४. रोहुल्ला खान
१५. जंजी-याचे सिद्धी
१६. सुरतेच्या छाप्याच्या वेळी शिवरायांवर वकिलाच्या वेशातून वर करणारा मुस्लिमच होता.
१७. याशिवाय औरंगजेब व त्याचा वजीर, दोन्ही आदिलशाह आणि त्यांचे वजीर, बडी बेगम.
या शिवाय संभाजी महाराजांना पकडून विदुषकाचा वेश घालून त्यांची धिनढ काढली तेव्हा त्यांच्यावर दगड मारणारी मुस्लीम प्रजा धरली तर हि संख्या आणखी वाढेल.

आता काही ब्राम्हणांची नावे पुढे करुन आकांडतांडव करणारे काय बोलणार आहेत  ?  केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात गेले म्हणुन ब्राम्हणांना टार्गेट केले जात असेल तर शिवराज्याभिषेक करणारे, दिलेरखानाशी दिलेरीने लढुन प्राण त्यागणारे, शंभुराजांना स्वराज्यात सुखरुप आणणारे, भीषण मृत्युतही त्यांची साथ न सोडणारे, राजांच्या सुखरुप सुटकेसाठी छातीचा कोट करुन खिँड लढवणारे, राजांना दरोडेखोर म्हणणाऱ्‍यांना इतिहासाचे संशोधन करुन त्यांचे जीवन चरित्र सर्वाँसमोर आणणारे सर्वजण ब्राह्मणच. त्यांचे काय करायचे? चांगले वाईट लोक सर्व जाती धर्मा मधे आहेत, पण ही गोष्ट समजण्या इतकी अक्कल ज्या लोकांत नाही त्यांना अत्न्यानी बालक समजून दुर्लक्ष करावे, कारण पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था या लोकांची आहे.


19 comments:

  1. लेख छान आहे सुरज जी
    इथ एक मुद्दा महत्वाचा मांडला आहे आपण ..
    प्रत्येक जातीत भल्या बु-या प्रवृत्ती असतातच ...उडदामाजी काळे गोरे
    पण एखादी पूर्ण जातच वाईट ठरवण केव्हाही निषेधार्यच.
    छत्रपतींच्या राज्याभिषेकाला काही ब्राम्हणांनी नक्कीच विरोध केला ...पण त्यांचा राज्याभिषेक विधी करणारे गागाभट्ट देखील ब्राह्मणच होते हे हि महत्वाच आहे.
    माझ देखील हेच मत आहे कि एखादा कृष्णाजी हरामखोर असला किंवा काही ऐतिहासिक ब्राह्मण धर्ममार्तंड नालायक होते यावरून सर्वच ब्राह्मण समाजाचे मूल्यमापन करणे योग्य नाही ....जसे कि मराठा गद्दार लोकांची यादी वर दिली आहे त्यांच्यावरून मराठा जातीची परीक्षा करणे योग्य नाही.
    ..
    आता इथ प्रश्न आहे कि ज्या काही वाईट प्रवृत्ती इतिहासात आहेत त्या प्रांजळपणे मान्य करणे ...भले ते मराठे असोत वा ब्राह्मण व इतर ...
    ..
    आमच ते चांगल का चांगल तेच आमच ??

    ReplyDelete
    Replies
    1. अहो कृष्णाजी हा अफजलखानाचा पगारदार नोकर(वकील)होता मग महाराज अफजलखानाला इजा करताना नोकराने इमानी दाखवून मालकाच्या शत्रूवर वार केला तर त्या नोकराचे काय चुकले? तो तर त्याचा धर्मच होता नाही का?

      Delete
    2. @Suhas Bhuse
      चांगले आणि वाईट लोल हे सर्वच धर्मात व जातीत असतात येवढे साधे लॉजीक या विद्रोही म्हणवणार्‍या लोकांच्या लक्षात येत नाही याचे कारण कदाचीत त्यांच्याकडे विचार करण्याची कुवत नसवी हेच असावे असे वाटते

      @Anonymous
      बरोबर आहे कृष्णाजी भास्कर हा काही शिवरायांचा सरदार अथवा पगारी नोकर नव्हता , तो अफजलखानाचा नोकर होता त्याने जे केले ते त्याचे काम होते , म्हणजे असे नाही की कृष्णाजी चे मी समर्थन करतोय.

      Delete
  2. Good One Suraj - a suggestion - split this big article into few smaller ones and republish. There are several important points in this article.

    ReplyDelete
  3. वरील मराठ्यांची यदी आपल्याला कोठून सापडली कोणास ठाऊक इतिहासकारांनाही नेऊन द्या त्यांनाही उपयोग पडेल ....
    ठीक आहे एक वेळ धरून चालुया की मराठे पण होते शिवरायांच्या विरोधात पण ते वैर शिवरायांबरोबरच संपले..पण ब्राह्मणांनी तर शिवरायांना त्रास दिलाच पण त्यांच्या संशजांनापण सोडले नाही..टिळक तर उभ्या आयुश्यात शाहू महाराजांच्या विरोधात राहिले आणि जेंव्हा आरक्षण सुर केलं तेंव्हा टिळक हेच पुढे होते विरोध करायला.
    (आता आपण मला ब्राह्मनद्वेषी किंवा ब्रिगेडी नक्कीच म्हणाल ही फ़ॅशन झाली अहे.)
    एक सल्ला (विनंती म्हणा हवंतर) की धर्माचं रक्षण करणं हे क्षत्रियांचं (म्हणजे आमचं)कामच आहे त्यामूले तुम्ही ब्राह्मणांची बाजू घेता हे मला मान्य आहे पण एक नेहमी लक्षात ठेवा की दुसर्याच्या जातीधर्माचा आदर राखावा पण स्वत:च्या जाती-धर्माचा अपमान सहन करून नव्हे. जे वाईट ब्रह्मण आहेत त्यांना तर शिक्षा झाली पाहिजे ?कशी होईल लगेच तुमच्यासारखे धावून येतात.मराठ्यांची आई-बहीन काढली तरी आपल्याला राग येत नाही पण ब्राह्मणाला भट म्हंटले की लगेच राग येतो.हे शिवप्रेम ?

    ReplyDelete
    Replies
    1. @|| धाकलं पाटील ||
      पहिलि गोष्ट म्हणजे || धाकलं पाटील || या नावाने तुमचं असलेलं अकाउंट हे फेक आहे तुमचे आडणव हे पाटील असेल अस वाटत नाही पाटील या आडणावाखाली नेहमीप्रमाणे नक्कीच कोणीतरी वेगळा असला पाहीजे .

      >>वरील मराठ्यांची यदी आपल्याला कोठून सापडली कोणास ठाऊक<<
      इतिहासाचा अभ्यास असता तर हे वाक्य सुचलं नसतं .

      >>पण ब्राह्मणांनी तर शिवरायांना त्रास दिलाच पण त्यांच्या संशजांनापण सोडले नाही<<
      मग मराठ्यांनी आणि मुसलमानांनी शिवरायांना त्रास दिला त्याचे काय करायचे ? केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात गेले म्हणुन ब्राम्हणांना टार्गेट केले जात असेल तर शिवराज्याभिषेक करणारे, दिलेरखानाशी दिलेरीने लढुन प्राण त्यागणारे, शंभुराजांना स्वराज्यात सुखरुप आणणारे, भीषण मृत्युतही त्यांची साथ न सोडणारे, राजांच्या सुखरुप सुटकेसाठी छातीचा कोट करुन खिँड लढवणारे, राजांना दरोडेखोर म्हणणाऱ्‍यांना इतिहासाचे संशोधन करुन त्यांचे जीवन चरित्र सर्वाँसमोर आणणारे सर्वजण ब्राह्मणच. त्यांचे काय करायचे? आजही अनेक मुसलमानी वस्त्यांमधुन शिवरायांची जयंती साजरी केली जाऊ देत नाही तेव्हा त्या मुसलमानांचे त्याचे काय करायचे ? तसेच तुमचे आवडते फुल्यांनीही शिवारायांना लूटारू , दरेडेखोर, अक्षरशुन्य म्हटले आहे त्याचे काय ?? याबद्द्ल बोला . आता फुले तर ब्राम्हण नव्हते ना ? मग शिवरायांच्या पश्चात केवळ ब्राम्हणांनी शिवरायांना त्रास दिला असे आपल्या म्हणन्याला काय आधार ??

      >>ठीक आहे एक वेळ धरून चालुया की मराठे पण होते शिवरायांच्या विरोधात पण ते वैर शिवरायांबरोबरच संपले<<
      संपले कुठे ? फुले कोण आहेत ? आताचे खेडेकर कोण आहे ? आणि ते संपले म्हणुन त्या शिवद्रोही मराठ्यांना तुम्ही माफ करणार आहात ???

      >>टिळक तर उभ्या आयुश्यात शाहू महाराजांच्या विरोधात राहिले आणि जेंव्हा आरक्षण सुर केलं तेंव्हा टिळक हेच पुढे होते विरोध करायला.<<

      विषय टिळक आणि शाहू वाद हा नाहीये. दोघांमध्ये कितीही राजकीय वैर असले तरी वैयक्तीक ते दोघे चांगले स्नेही होते, टिळकांनी आपला गितारहस्य हा ग्रंथ लिहुन झाल्यावर प्रथम शाहू महाराजांना वाचायला दिला होता व जेव्हा टिळग गेले तेव्हा शाहु महाराजा "ऐसा लढवैया पुन्हा होणे नाही म्हणुन अर्ध्या ताटावरुन उठले होते" हे तुम्ही लोक जाणिअपुर्वक विसरता यामागचे कारण कळेल का ?

      >>(आता आपण मला ब्राह्मनद्वेषी किंवा ब्रिगेडी नक्कीच म्हणाल ही फ़ॅशन झाली अहे.)<<
      ते तुमच्या लिखानातुनच दिसत आहे वेगळे म्हणन्याची गरजच काय ??

      >>एक सल्ला (विनंती म्हणा हवंतर) की धर्माचं रक्षण करणं हे क्षत्रियांचं (म्हणजे आमचं)कामच आहे <<
      नेमक्या कोणत्या धर्माचं रक्षण तुम्ही करणार आहात ?? बौद्ध ? हिंदु की शिवधर्म ?? याचेही स्पष्ठीकरण द्या . आणि याठीकाणि तुम्हीस्वत:ला क्षत्रिय म्हणवता , म्हणजे चातुर्वर्ण तुम्हाला मान्य आहे असा अर्थ घेवू का आम्ही ??

      >> जे वाईट ब्रह्मण आहेत त्यांना तर शिक्षा झाली पाहिजे ?<<
      १००% सहमत !

      >>कशी होईल लगेच तुमच्यासारखे धावून येतात.<<
      जे वाईट आहे ते वाईटच आणि जे चांगले आहे ते चांगले, या मताचा मी आहे
      काही वाईट आहेत म्हणुन जे चांगले आहेत तेही वाईटच असे तुम्ही मानता त्याला तुम्हीच जबाबदार आहात.

      >>मराठ्यांची आई-बहीन काढली तरी आपल्याला राग येत नाही<<
      कोण काढते मराठ्यांची आई बहीण ?? येथे काय शिव्यांच फड नाही चाललेला.

      >>पण ब्राह्मणाला भट म्हंटले की लगेच राग येतो.हे शिवप्रेम ?<<
      ब्राम्हण हा भट आसतो , भट ही एक पदवी आहे त्यात राग येण्याचे कारण नाही परम्तु तुम्ही ब्राम्हणांना ’भट" असे कोनत्या उद्देशातुन म्हणता हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे.

      Delete
    2. {पहिलि गोष्ट म्हणजे || धाकलं पाटील || या नावाने तुमचं असलेलं अकाउंट हे फेक आहे तुमचे आडणव हे पाटील असेल अस वाटत नाही पाटील या आडणावाखाली नेहमीप्रमाणे नक्कीच कोणीतरी वेगळा असला पाहीजे . }
      मला हीच अपेक्षा होती ही तर आज कल ची फ़ॅशन झाली आहे तरी पण माझ्या फ़ेसबुक प्रोफ़ाईल वर माहीती आहेच सगळी खात्री करू शकता
      {इतिहासाचा अभ्यास असता तर हे वाक्य सुचलं नसतं .}
      बापरे एवढा अभ्यास करावा लागेल ? मी एम.सी.ए करता करता करता इतिहासाची पदवी घेतोय..

      { हे तुम्ही लोक जाणिअपुर्वक विसरता यामागचे कारण कळेल का ?}
      मला समजत नाही वैयक्तीक नाते चांगले असताना मतभेद होतातच कसे ?

      {ते तुमच्या लिखानातुनच दिसत आहे वेगळे म्हणन्याची गरजच काय ??}
      असे असेल तर मग तुम्ही मराठाद्वेषी आणि शिवद्रोही.का ते वेगळे सांगायचे कारण नाही.

      {नेमक्या कोणत्या धर्माचं रक्षण तुम्ही करणार आहात ?? बौद्ध ? हिंदु की शिवधर्म ?? }
      खरं तर मी कोणताच धर्म मानत नाही.पण ब्राह्मण स्वत:ला ब्राह्मण माणतात मग आम्ही क्षत्रिय माणायला काही हरकत नाही असं मला वाटतं

      {संपले कुठे ? फुले कोण आहेत ? आताचे खेडेकर कोण आहे ? आणि ते संपले म्हणुन त्या शिवद्रोही मराठ्यांना तुम्ही माफ करणार आहात ???}
      शिवद्रोही ? ???? दादू कोंडदेव यांचा पुतळा लावून बदनामी करणारे शिवद्रोही की पुतळा काढून इतिहास वाचविणारे ? जेम्स लेनचे समर्थन करणारे शिवद्रोही की जेम्स लेन चा निषेद् करणारे शिवद्रोही ? मग आपण ही शिवद्रोही च हे विसरू नका

      {चांगले आहेत तेही वाईटच असे तुम्ही मानता त्याला तुम्हीच जबाबदार आहात. }
      असे तुम्ही मानता ....
      {जे वाईट आहे ते वाईटच आणि जे चांगले आहे ते चांगले, या मताचा मी आहे}
      तुमचं खरं मत >> जे चांगले आहे ते चांगले आणि विक्रुत पण चांगलेच

      {कोण काढते मराठ्यांची आई बहीण ?? येथे काय शिव्यांच फड नाही चाललेला.}
      बाबा पुरंदरेचे कादंबरी वाचा ....खरा शिवप्रेमी असाल तर वाचा नाहीतर वाचून पण काहीच फ़रक पडणार नाही.

      Delete
    3. सुरज, उगाच तोंडाची वाफ दवडू नका. काही गरज नाही अश्या प्रतिक्रियांवर उत्तर देण्याची. अजून थोडा reply दिलात तर हे लोक सभ्य भाषेच्या बुरख्यातून लगेच बाहेर येऊन शिव्या द्यायला लागतील. "धाकलं पाटील" इतिहासाची पदवी घेत असतील तर त्यातून त्यांना इतिहास समजेल आणि त्याचे विकृतीकरण लगेच छापखान्यात चालू होईल.
      "मला समजत नाही वैयक्तीक नाते चांगले असताना मतभेद होतातच कसे ?"
      काय प्रश्न आहे?? :D
      "जेम्स लेनचे समर्थन करणारे शिवद्रोही की जेम्स लेन चा निषेद् करणारे शिवद्रोही"
      काकांना हे पण माहित नाही कि जेम्स लेनचा निषेध सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरेंनी केला.
      "पण एक नेहमी लक्षात ठेवा की दुसर्याच्या जातीधर्माचा आदर राखावा पण स्वत:च्या जाती-धर्माचा अपमान सहन करून नव्हे."
      कोण म्हणत आहेत बघा.... :D :D

      असो... तसेही तुम्हाला दिलेल्या reply वरून ते आता मुद्द्यापासून ढळत आहेत हे दिसतेच आहे. आणि आता २ पोष्ट पासून आवरून ठेवलेल्या शिव्याही त्यांना त्रास देत असणार. ;)

      Delete
    4. खरच पाटील बरोबर बोललात आपण महाराज्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये महाराज्यांवर विष प्रयोग केला गेला संभाजी महाराज्यांची कैद ही स्वराज्याच्या हद्दीत झाली तरीही स्वराज्यातील एकही मावळ्याला माहीत नाही की आपला राजा कैद झालाय. एखादा राजा कैद होतोय आणि स्वराज्यातील एक ही व्यक्तीला ह्याची माहिती होत नाही ह्या पेक्षा मोठं दुर्दैव काय असेल एखाद्या राज्याचं. एकंदरीतच कुठेतरी छत्रपती काळ संपवून पेशवाही आणण्याची सुरवात ही महाराज्यांच्या विषप्रयोगा पासून आणि संभाजी महाराज्यांच्या अटके पासूनच सुरु झाली होती . आणि महाराज्यानी घडवलेल्या स्वराज्याची वाट ही पेशवाही ने लावली 🙏

      Delete
  4. धन्यवाद, सुरज जी, छान होता लेख. तसेच धाकले पाटील यांना दिलेले उत्तर हि अभ्यासू आणि कडक होते. खरच धन्यवाद!

    ReplyDelete
  5. आंतरजालावरील मित्र मैत्रिनींनो येथुन पुढे आपल्या ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढवा कारण खर्या संस्क्रुतीचा अभ्यास घेऊन सनातनी सप्ताहिक येत आहे आपल्या डोक्यामध्ये सांस्क्रुतीक दहशद माजवायला.तर तयार रहा आणि आपल्या मित्रांना पण सांगा सनातनी साप्ताहिक वर सदस्य होण्यासाठी.होता होईल तेवढा प्रसार करा आपल्या हक्कच्या व्यासपिठाचा.
    जय परशूराम । जय द्रोणाचार्य
    सनातन साप्ताहिक
    http://sanatansaaptahik.blogspot.in/

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या कार्यास आमच्यात्र्फे शुभेच्छा.

      Delete
    2. 😂😂परशुराम तोच ना ज्याने आपल्या आई ची हत्या केली 🤔

      Delete
  6. द्विजाची कैफियत

    हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
    कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
    हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
    कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
    हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
    कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
    हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
    कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
    हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
    कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
    हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
    कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
    हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
    कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
    हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
    कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
    हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
    कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
    हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
    कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
    नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
    शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
    हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
    कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
    आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
    रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
    ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
    जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
    जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
    पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
    आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
    शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
    आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
    भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
    त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
    म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
    काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
    मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
    धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
    त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
    वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
    यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
    धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
    ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
    स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
    समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
    सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
    अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
    जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
    मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
    आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
    शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
    जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
    द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
    द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
    वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
    पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
    शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
    हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
    सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
    गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
    हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
    उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
    यश खेचून आणायचे आहे
    होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
    द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे

    - कवी योगेश

    ReplyDelete
  7. "मला समजत नाही वैयक्तीक नाते चांगले असताना मतभेद होतातच कसे ?"
    याचे आजच्या काळातील उदाहरण म्हणजे मा. बाळासाहेब ठाकरे व मा. शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध
    आशा आहे उत्तर समजले असेल धाकले पाटील

    ReplyDelete
  8. महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. पुरोगामी दहशतवादाचे समुळ
    उच्चाटन झाले पाहिजे !

    ReplyDelete
  9. महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. पुरोगामी दहशतवादाचे समुळ
    उच्चाटन झाले पाहिजे !

    ReplyDelete