Thursday, October 25, 2012

विद्रोहाचा अंत इथे .

          आज या देशा मध्ये, विषेशत: महाराष्ट्र आणि पंजाब जेथे देशातील लढवय्या समाज जो मराठा आणि शिख या नावानी वास करतो अशा ठिकाणी वेगवेगळ्या नावानी फुटीरतेची बिजे रोवण्याचा प्रयत्न चालू आहे. येथला ब्राम्हणद्वेशाचा मुद्दा ही त्याच बिजांचा परिणाम आहे. आज महाराष्ट्रात विद्रोही म्हणत असलेल्याप्रमाणे नेमका किती प्रमाणात ब्राम्हण्यवाद चालु आहे आणि त्यामध्ये सध्याच्या ब्राम्हणांचा किती वाटा आहे याची जाणि जाणि तथाकथीत विद्रोह्यांना असल्यामुळेच कदाचीत हे विद्रोही क्षणो -क्षणी आपल्या अनुयायांची माथि भडकवायला नेहमी विकृत इतिहासाकडे जातात. इतिहासात यांनी असे केले , इतिहासात त्यांनी तसे केले म्हणुन आज आम्हि सराकट ब्राम्हण समाजाची कत्तल करण्याची भाषा करत आहोत, हे किति बरोबर आहे याचा विचार त्यांचे अनुयायी म्हणवणारे तथाकथीत सत्यशोधक, विद्रोही ( न जाणो आनखी काही विषेषणे आहे त्यांचा उल्लेख न करणेच योग्य) हे लोक का करत नाहीत मला कळत नाही. यांच्या या ब्राम्हणद्वेशाला सुशिक्षीत समाज भिक घालत नाही. तसेच सध्या यांच्या यांच्यातच मतभेद चालू आहेत या केवळ "हिंदु" विरोधासाठी एकवटलेल्या विभिन्न विचारसणीच्या टोळ्यांमध्ये आपल्या विचारसरणीला धरुन वादविवाद (याच्याही पुढे जाऊन थेट आरोप आणि शिव्याशापही) होतात हे वेगळे सांगायची गरज नाही. विद्रोही चळवळीतील अनेक मान्यवरांना काही विद्रोही लोकांचा अति-ब्राम्हणद्वेश अजिबात मान्य नाही , तर या अतिउत्साही ब्राम्हणद्वेश करणार्‍यांना काही प्रौढ मान्यवरांचे प्रौढ विचार पचनि पडत नाहीत.  ज्या बाबासाहेबांनी हिंदु देवदेवता व संतांना रामराम ठोकुन बौद्ध स्विकारला होता , त्याच बाबासाहेबांचे नाव घेवुन हेच विद्रोही त्याच बाबासाहेबांना त्याच हिंदु साधु संतांच्या पंक्तीत बसवुन त्यांच्यासोबत बाबासाहेबांचाही जयघोष करताना दिसतात ही गोष्ट बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायांच्या पचनी पडत नाही , तर विद्रोह्यांना या लोकांचा बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायीवाद हा अति-आंबेडकरवादी वाटतो. हे विद्रोही बौद्ध धम्म आणि भगवान बुद्धांना आपले मानतात तर दुसरीकडे बौद्ध धर्म न स्विकारता स्वत:चाच असा वेगळा धर्म काढून बुद्धांच्या अनुयायांना आपल्या या नव्या धर्मात येणयासाठी आवाहन करतात आणि ही गोष्ट बौद्ध अभ्यासकांच्या पचनी पडत नाही तेव्हा ते सरळ सरळ विद्रोह्यांना व त्यांच्या अनुयायांना बौद्ध धर्मातच यायचा सल्ला देतात. पण हा सल्ला विद्रोह्यांना पेलवत नाही. इतकेच काय तर हिंदु संकृतीवर बेंबीच्या देठापासुन ताशेरे ओढणारे अनेक विद्रोही नेते हे स्वत: घरी सत्यनारायणाची पुजा घालतात, घारामध्ये हिंदु पद्धतीचे सण-उत्सव साजते करतात , आणि याच्याही पलिकडे ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद म्हणुन राण उठवणार्‍यांना बायको कशी ब्राम्हण चालते हे मला आजतागायत पडलेले कोडे आहे. एकिकडे हिंदु धर्माने स्त्रियांना उंबरठ्यापलीकडे जाऊ दिले नाही म्हणुन हिंदु धर्माला शिव्या शाप द्यायच्या त्याच स्त्रियांची आजची परिस्थिति काय आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आजपर्यंत या लोकांनी काय प्रयत्न केले याची माहीती मला आजपर्यंत एकाही विद्रोह्यांनी दिलि नाहि, कदाचीत स्त्रिला हजार सालापुर्वी ज्यांनी कोंडून ठेवले त्यांच्या नावाने बोंबा मारल्या की आजच्या स्त्रियांच्या समस्या सुटतील असा यांचा समज असावा बहुतेक. याच्याही पलिकडे जाऊन हे हिंदु धर्माला शिव्या देत देत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचे गोडवेही गाऊ लागले आहेत, आणि ते ही चक्क बाबासाहेबांचे नाव घेवुन . ज्या बाबासाहेबांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकातुन ओरडून ओरडून सांगीतले की "मुसलमानांचे बंधुत्व हे सर्व मनुष्यांकरिता नसुन ते फक्त मुस्लिमांपुरते मर्यादीत आहे. जे मुस्लिम संघाच्या बाहेर आहेत त्यांच्याकरीता घृणा व शत्रुता याच्याविना काही नाही" किती विरोधाभास हा ? आंबेडकरांची इतर पुस्तके स्वत:च्या रसभरीत अनुवादासहीत प्रकाशित करुन मोफत वाटणारे त्यांच आंबेडकरांनी लिहिलेले थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तका बद्दल ब्र ही काढत नाही याचे कारण काय बरे असावे ? शेवटी केवळ हिंदु द्वेश या एका समिकरणातुन एकत्र आलेले हे अभद्र एकत्रिकरण आता स्वत:मधेच असलेल्या अंतर्गत वादातुन नष्ट होईल यात शंका वाटत नाही.

19 comments:

  1. सध्याची परिस्थिती बघता हे खरे होईल असे वाटते पण तोपर्यंत हिंदू धर्माची अतोनात हानी झालेली असेल

    ReplyDelete
  2. सर्वच बामण जातीयवादी नाहीत. पण सद्य स्थितीत बरेचसे जातीयवादी आहेत. ईतर जातीँच्या महापुरुषांच्या नावाने कल्पित गोष्टी रचुन त्यांना बदनाम करणारे भट भिक्षुकीचे धंदे त्यांनी बंद करावेत. म्हणजे आपोआप सर्व आलबेल होईल.

    ReplyDelete
  3. हा एक तिढा आहे. वैदिक हिंदु वजा करुन जे उरतात ते खरे हिंदू होत. वैदिकांचा धर्म वेगळा...त्यांचे हिंदुंचे वैदिकिकरण करण्याचे प्रयत्न हाणुन पाडायचे असतील तर शुद्ध शैव हिंदु धर्माला, जो सिंधु काळापासून चालत आला आहे, सर्वच बहुजन जो पाळतात त्याचीच पाठराखन करत त्यावरील वैदिक कलमे काढुन टाकली पाहिजेत. वेदांशी आमचा काडीएवढाही संबंध नाही म्हणुन तर ते वाचायला ऐकायला बंदी होती...छुपा वैदिकवाद हा कट्टर इस्लामियांएवढाच विघातक आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे

    ReplyDelete
  4. हे ज्वलंत सत्य आहे की पूर्वीच्या काळी बहुजनांना वेद श्रवण वाचनावर बंदी होती.
    परंतु पुढील काळात स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाचे भाषांतर करुन ते सर्वश्रुत केले.
    त्यांच्यावर अठरा वेळा विषप्रयोग जातीयवाद्यांकडुन झाला.
    परंतु तो त्यांनी हाणुन पाडला.
    वेदात जे काही सांगितल ते चांगलच आहे. परंतु ते किती पचनी हे ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे.
    असो साधा, सरळ, सोपा कर्मसिँध्दात हा हिँदु धर्माचा पाया आहे. आणि यामुळेच हिँदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे.

    ReplyDelete
  5. We have nothing to do with Veda's....whether good or bad. It doesn't belong to our religion. One can study it for academic purpose and will find folly of it.

    ReplyDelete
  6. no he was not study for academic purpose.
    he study for propagation of true meaning of vedas in society.
    so his motive mere social welfare.

    ReplyDelete
  7. You pls read translatyion of Veda's and find whether anything is useful/meaningful for the society...I am sure you will find nothing...not even philosophy. Veda's are a compilation of prayers to various God's ...nothing else.

    ReplyDelete
  8. Ok.
    first of all give me sources, references what you read about it .
    i think it contains some sacremental ceremony or enchanting mantras whichever help to achieve god or salvation.

    ReplyDelete
  9. Sanjay Sir,How to differentiate between Vedics and your so called true Hindus?

    ReplyDelete
  10. Those beleive in Vedic socisl system...i.e. varnashram, those propogate Veda's being supreme and divine litarature, those follow 16 sanskar's as discribed in Vedic litarature and trust in yadnya sanstha are Vedic an. Non-vedic...all those who were declared non-vedics from time immemorial...those who worship non-vedic God's such as Shiva-shakti and their pantheon are true Hindu's. Pls bear this in mind...Veda's do not allow idol worship, doesnt trust in atma moksha or even in rebirth.

    ReplyDelete
  11. In that case, Varnashram is followed by even the non vedics.In fact people take pride for belonging to a brahman warna or a kshatriya warna and both of them are idolators.Exclusively, pure vedics are people of the Arya Samaj only who have literally dissolved the varna system.Then how can we differentiate them on the basis of social system?

    ReplyDelete
  12. Varna system is originated by vedic's. Others followed it blindly because of some historical interpolations and religious supremacy. Most of the brahmin's too are non-vedic's if looked at their religious rituals and idols they worship.

    ReplyDelete
  13. True......But how should we differentiate them today if everything has got mixed up?

    ReplyDelete
  14. Let's make it easy. Some believe in Vedikism out of ignorance even if the facts are otherwise.
    The people those have Kuldaivat...(Vediks dont have...have you ever heard someone's Kuldaivat is Indra, varuna, Mitra? I know there are hardly would be any...then how they can be vaidik?

    ReplyDelete
  15. Sir, This means the so called Vaidik religion has amalgamated into the local religion and has attained the form of present day Hinduism.Independent Vaidik Religion has ceased to exist barring Arya Samaj which is also in a modified form.Why is it then that we are differentiating within ourselves and creating a rift just because of age old ideas which long stand forfeited?The worst part of us Indians is we never take the entire thing as a study and give rise to movements like mulniwasiwaad so on and so forth....

    ReplyDelete
  16. We as a Hindu are one...but some people like to propagate ideas of Vedikism and its supremacy. This kills main ethos of real Hinduism....this is why objection.

    ReplyDelete
  17. 'We as a Hindu are one ' makes the point.......People trying to prove their supremacy have already sabotaged the image of Hinduism.....These people should definitely be treated the other way......

    ReplyDelete
  18. Mulnivasi vad is a stupidity of some people, a kind of another dicatatorship. They too are enemy of true Hinduism.

    ReplyDelete
  19. आपल्या देशात एवढ्याच समस्या आहेत काय ?? एक लिहतो दुसरा त्यास प्रती उत्तर देतो. इतिहास हा क्लिष्ठ आहेच पण त्याला अधिक गुंतागुंतीचे कशाला करायाचे ?? जात, धर्म, त्याधारित असणाऱ्या संस्था संघटना, अतिरेकी भाष्य करणारी माणसे हे सार खूपच गुंतागुंतीचे आहे; यातून आपण कुठेच पोहचत नाही केवळ मुद्दे वाढत जातात. मला असे म्हणायचे आहे कि आपण "माणूस " आहे हे सगळ्यांसाठी का पुरेसे होत नाही. "आपण सगळे एक" म्हणून भारतीय समाज कधीच जगणार नाही का ? "हा बाहेरून आला याला हाकला", "या महापुरुषाला या जातीतील माणसाने मदत केली व याने विरोध केला" या सगळ्या गोष्ठी उकरण्यात काय अर्थ ?? जे कोणी एवढा सगळा सखोल विचार करत नसतील, वाचत नसतील ते निरपराध उगीच कुठल्या तरी Ideology मध्ये भरकटले जातील ना. मला वाटत आपण या सगळ्यातून बाहेर आल पाहिजे लवकर . लोकसंख्येचा प्रश्न, वाढती बेरोजगारी, शिक्षणाचे व्यावसायीकरण, बालकांचे प्रश्न , कुपोशनाचे बळी, झोपडपट्ट्याचा प्रश्न हे आणि असे बरेच मुद्दे आहेत ज्याच्या वर काम होण्याची नितांत गरज आहे ......अर्थात ते विविध लोक, संस्था या माध्यमातून सुरूच आहेत पण असे मुद्दे अधिक महत्वाचे आहेत असे मला वाटते. आपल लिखाण चांगलच असत वाद मुळात नाहीच. धन्यवाद !

    ReplyDelete