Monday, December 3, 2012

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे
=======================================
"On one hand we have the vast Vedic literature without any Archaeological evidence to support it, while on the other hand we have almost 2500 Archaeological sites associated with the Indus-Saraswati civilization without any literature associated with it. "
- Professor David Frawley

* साधारण
पणे सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० पर्यंत सांगीतला जातो, व साधारण ई,स.पू २००० ते १६०० मध्ये पर्यावरणामध्ये प्रतिकुल बदल होत होत सिंधु-सरस्वती घाटीची सभ्यता नष्ट झाली असे मानले जाते.

* सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० असा मानला तर ऋग्वेदाचा काळ १६०० च्या पुढे निश्च्ति केला जातो, कारण ना ऋग्वेदा मध्ये सिंधु परिस्थितिचा संदर्भ येतो आणि ना सिंधु काळामध्ये काही वैदीका प्रमाण मिळतात.

* ऋग्वेदाची रचना सरस्वती नदी अस्तित्वात असताना झाली आहे हे स्पष्टच आहे , आणि सरस्वती नदीच्या खालच्या भागातील पाणी इ.स.पू २००० पासुन आटू लागले याचाच अर्थ ऋग्वेदाची रचना ई.स.पू २००० पुर्व झाली असली पाहीजे हे स्पष्ट होते.

* पण काही विद्वान ऋग्वेदाचा काळ इ.स.पू १६०० च्या पुढे असावा असे मानत नाहीत , ऋग्वेद काळ बरेचजण ई.स.पू ४००० ते १०००० इतका मागे नेतात. [ काही जन भुगर्भशास्त्राचे प्रमाण देवून ऋग्वेदाचे काही श्लोक हे २५०००० वर्षापुर्वीचे असावेत असे मत मांडतात हे इथे प्राकर्शाने मांडावे वाटते ]

* ऋग्वेदाचा काळ हा सिंधु / हडप्पा संस्कृती नंतरचा असे मानन्यात अडचण ही आहे की जेथे वातावरणातील आणि पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे हडपा संस्कृतीतील सिंधु-सरस्वती वासीयांना स्थलांतरीत होण्यात भाग पाडले ( काळ साधारन ई.स.पू १७०० - १६०० ) त्याच काळानंतर म्हणजे पर्यावरण प्रतिकुल असतानाच त्याच ठिकाणी ( सिंधु-सरस्वतीचे खोरे ) वैदीकांनी आपले वस्थिस्थान वसवले हे पटत नाही व त्यानंतर रामायण महाभारतादी घडले असे जर मान्य केले तर पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत, पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .

* आणि असे जर असेल तर रामायण महाभारतादी काव्हे ही फक्त मिथक आहेत असे मानावेल लागेल , परंतु त्यातही एक अडचण आहे ती अशी की वैदीक ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* अलिकडे पश्चिम आशियातील कोरीव लेखात काही व्यक्तीनामे आढळून आली आहेत त्यांपैकी दोन नाव्रे "सोमसेन" व दुसरे "अरीसेन". ही नावे ज्या लेखात सापडली त्याचा काळ आहे ई.पू. २३०० , त्यावेळी सिंधू संस्कृती पुर्णपणे सुबत्तेच्या शिखरावर पोहोचली होती. ही दोन्ही नावे इंडॊ-आर्यन असुन पुर्णपणे भारतीय आहेत. याबद्दल विद्वानांत दुमत नाही. म्हणजे हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती, तसेच सिंधु संस्कृती जर अनार्य द्रविडींची असे मानले, तर हे इंडॊ-आर्यन शब्द इ.स.पू २३०० मध्ये भारतातुन येणे कसे शक्य आहे ?

* आणि जर हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती असे जर मानले तर हडप्पा कालीन संस्कृतीच्या उत्खननांमधुन वैदीक संस्कृती शी साम्य असलेले काहीच प्रमाण मिळालेले नाही . म्हणजे जरी दोन्ही संस्कृती समकालीन आहे असे मान्य केले तर कोणत्याही उत्खननामध्ये वैदीक कालीन पुरावे आजपर्यंत का सापडलेले नाहीत ?

* आर्यांनी आपला इतिहास खुप मोठ्या प्रमाणावर लिहुन ठेवला आहे रामायण , महाभारता सारखी महाकाव्ये ही केवळ काव्ये नसुन सत्य इतिहास असावा हे जवळ जवळ सर्वमान्य आहे . महाभारताचा काळ काढला असता तो ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० इतका मागे जातो. हे केवळ रामायण - महाभारताचे , त्याचप्रमाणे वैदीक साहित्यानुसार असे कित्तेक राजे आणि महाराचे होऊन गेले , परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की अनेक पुरातत्विय उत्खननामध्ये अवशेश म्हणुन असे काही सापडलेले नाही पण ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* इ.स.पू. १५,००० ते १०,००० च्या मध्ये भयंकर प्रलय आला होता , व त्यात भारताचा बराच भाग समुद्राखाली गेला असे संशोधक मानतात. भागवत पुराणामध्ये अयोध्या नगरी समुद्राने नष्ट केल्याचे वर्णन आहे व त्यानंतर कलियुगाची सुरवात झाली असे सांगीतले आहे. याचा अर्थ द्वापारयुगाचा शेवट इ.स.पू. १०,००० च्या आसपास झाला असे मानायचे का , आणि या अति अति प्राचीन काळामुळेच त्यांचे अवशेष आज आपल्याला सापडत नाही आणि त्या आधीही भारतामध्ये प्रगत अशी संस्कृती नांदत होती असे म्हणु शकतो असे असु शकेल ? आणि असेच जर मानायचे ठरवले तर दोन मोठ्या अडचणी आहेत , एक म्हणजे इ.स.पू. १०,००० च्या आधी महाभारत घडले हे मानावे लागते पण बरेच विद्वान महाभारताचा काळ ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० च्या मध्ये मानतात व दुसरी अडचण अशी की ई पू १०००० च्या आधी एक संस्कृती नांदत होती , १०००० च्या आसपास महाप्रलय आला त्यामध्ये बर्‍यापैकी सगळे नष्ट झाले त्यानंतर तब्बल सात ते आठ हजार वर्षानंतर सिंधु/ हडपा संस्कृती भारतात उदयास आली जिचे अवषेश आज मिळतात. या मधल्या सात आठ हजाराच्या कालखंडामध्ये काही अर्य वैदीकांनी आपली संस्कृती सांभाळली असे मानायचे का ? आणि असे जर मानले तर ते लोक सिंधु काळात कुठे होते ?