Sunday, November 11, 2012

महाभारतातील वर्णवाद : एकलव्य ??

सध्या वैदिक पुराण, ग्रंथामधील कथा व घटनांना ओढून ताणून जातियवाद लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे , अशा लोकांच्या अपप्रचाराच्या गळाला लागलेली असा एक घटन म्हणजे "एकलव्य". वैदीक काळातही अश्पृष्यता होती हे ठासुन सांगताना मेकॉलेचे आजचे तथाकथीत हस्तक हे एकलव्याचे उदाहरण देतात व द्रोणाचार्यांनी एकलव्याला तो हिन कुळातील असल्यामुळे त्याला धनुर्विद्येचे शिक्षण घेता येणार नाही असे म्हटले. असा मुळ घडनेला (काही प्रमाणात  मुळ कथा तोडून ) युक्तिवाद करतात. सर्वात पहिलि गोष्ट म्हणजे आजचे मेकॉलेचे हस्तक इंग्रजांप्रमाणे रामायण , महाभारत वगैरे मिथक मानत आहेत, म्हणजे महाभारत घडलेच नाही असे यांचे मत आहे , असे असताना हे लोक द्रोणाचार्यांचे - एकलव्याचे उदाहरण देतात हे विषेश आहे.
    तर वेदकाळात कोणत्याही प्रकार चा "जातीयवाद" अस्तित्वात नव्हता हे आता समाजासमोर आलेले आहे, होता तो वर्णवाद, त्याकाळी माणसाला वर्ण बदलता येत होता कारण वर्ण हा त्याच्या व्यवसायावर आधारीत होता जातीवर नाही [ उदा. विश्वामित्र हा क्षत्रिय होता तरी तो पुरोहीताचा व्यवसाय करीत असे ]. आणि जात ही जन्मावर आधारीत असल्यामुळे ती बदलता येत नाही. एकलव्य हा हिन कुळातील होता असा उल्लेख आहे त्याला "द्रोणाच्यार्याकडूनच" धनुर्विद्येचे शिक्षण घ्यायचे होते , परंतु याठीकाणी एक गोष्ट बहुतेकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे द्रोणाचार्य यांना  त्यावेळी राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी नेमले होते व इतर लोकांसाठी कृपाचार्य विद्या देत, महाराथी कर्ण हे त्याचे उदाहरण. कर्ण त्या वेळी सुतपुत्र म्हणुन प्रसुत होता , त्याचीही द्रोणाच्यार्यांकडून आपणास धनुर्विद्येचे शिक्षण मिळावे असा कायस होता परंतु द्रोणाचार्य हे राजपुत्रांसाठी नेमलेले होते, त्यामुळे कर्णाला नाईलाजाने कृपाचार्यांकडे शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे महाभारत काळात क्षत्रीय सोडून इतरांना शिक्षण / विद्या  घेण्याचा अधीकार नव्हता हा मुद्धा मोडीत निघतो. आता राहीला प्रश्न द्रोणाचार्यांनी एकलव्याला दिलेले उत्तर , ते म्हणतात "तु हिन कुळातील असल्यामुळे तुला माझ्याकडून विद्या घेता येणार नाही" . निट लक्ष दिले तर याठीकाणी एकलव्याला द्रोणाचार्यांकडून विद्या न मिळण्याचे कारण म्हणजे ...’तो हिन कुळातिल होता’ म्हणुन नव्हे , तर ’द्रोणाचार्यांना तेथील राजांनी तो अधीकार दिला नव्हता म्हणुन’ असे आहे . द्रोणाचार्य त्या त्यावेळी फक्त राजांच्या राजपुत्रांना विद्या देत होते आणि इतरांसाठी कृपाचार्यांची नेमणुक केली होती, द्रोणाचार्यांचा एकलव्य तसेच कर्णाप्रती नाईलाज होता म्हणुन त्यांना शिक्षा नाकारली, ना की त्यांचे कुळ हिन होते म्हणुन. कर्णाने निराश न होता कृपाचार्यांकडे विद्या ग्रहण करण्याच सुरवात केली परंतु एकलव्याने मात्र द्रोणाचार्यांनाच आपला गुरु मानले असल्यामुळे त्याने इतर कोणाकडून शिक्षा न घेता त्यांचा पुतळा तयार करुन स्वाभ्यासाने धनुर्विद्देचे सर्वोच्च शिखर गाठले, तोच प्रकार कर्णाचा कृपाचार्यांच्या हाताखाली शिक्षण घेवुनही त्याने अर्जुनाची बरोबरी गाठली. या हिन कुळाहीत समजले जाणारे असे दोन महान येद्धे [कर्ण हा क्षत्रीय होता हे नंतर समजले परंतु तो सुतपुत्र होता आणि त्याचप्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये झाले होते हे आपल्याला विसरुन चालणार नाही] यांचा आदर्श समोर घेवुन स्वत:ची आणि स्वत:च्या समाजाची प्रगती कशी होईल हे न पाहता काहीतरी कारणे काढून आपापसांत भांडणे लावली जात आहेत, काय म्हणावे अशांना.

1 comment:

  1. Suraj mahajan ya lekhat aapan mhanata ki varn vyavastha hoti pan ti karmavarun hoti

    pan aapan he suddha mhanata ki karn sutputra hota nd ekalavya ha hin kulatala hota

    mhanje mahabhartat tyana janmavarun hin mhanale karmavarun nahi.

    tyanche karm shatriyasarkhe hote ki

    ReplyDelete