Thursday, August 2, 2012

गागाभट्ट : आक्षेप व खंडण

गागाभट्टांनी राजेना छळले

एखाद्याला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करायचे असे ठरवलेच असेल व ज्यावेळी तसे ठरवण्यार्‍याकडील तात्विक मुद्दे संपतात आणि ती खोटी ठरवली जातात अशावेळी त्याचा ताळतंत्र सुटुन कोणत्या थराला जाऊन काय आरोप करेल याचे भान आरोपी ठरवणार्‍याला राहत नाही . आणि हेच काही लोक विसरतात आणि दुर्दैवाने काही अविचारी (विचार करण्याची क्षमता नसलेले किंवा समोरील मुद्दा विचार न करता अभ्यास न करता जशाच्या तसा स्विकारणारे) लोक त्यांचे अनुकरण करतात. त्याहुनही आपले दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात असे लोक म्हणजे असे अविचारी लोक काही जास्तच प्रमाणात आहेत.

आज आपण असेच एक ताळतंत्र सुटुन केलेल्या आरोपांमधीलच एक आरोपाबद्दल चर्चा करणार आहोत. तो आरोप म्हणजे गागाभट्टांनी राजांना छळले , म्हणुन . मुद्दा नंबर एक _ गागाभट्ट हे वाईट आणि दोन _ पर्यायाने पुर्ण ब्राम्हण समाज वाईट. बरं जर असे समिकरण्च बनवले असेल की जर एखाद्याने राजांना छळले , तर त्याला दोश द्यायचाच त्याचबरोबर तो व्यक्ती ज्या समाजतील असेल त्या समाजालाही दोश द्यायचा तर मग असा समाजच उरत नाही की ज्यानी राजांना छळले नाही त्याचे काय ??

बरे याठिकाणी आपल्या हे लक्षात येते की "गगाभट्टांनी राजांना छळले" असेल तर कोणीही येवुन राजेंना छळावे इतके राजे दुधखुळे होते का ? एक एक मावळा , सरदार, साथिदार अगदी पारखुन घेणारे शिवराय गगाभट्टांनी त्यांना छळावेइतके खुळे होते का ? गगाभट्टांनी राजांना छळले या आरोपकर्त्यांच्या आरोपामधुन राजेंबद्दल जनतेमध्ये काय संदेश जातो. एखाद्या अवख्याने जर असे काही ऐकले तर त्याचे राजेंबद्दल काय धारंणा होईल ? याचा विचार हे लोक करत असतील का किंवा इतका साधा विचार करण्यची क्षमता या लोकांकडे नसेल का हा प्रश्न पडतो.

आता थोडे मुळ मुद्द्याकडे वळू हे लोक शिवरायांचा गागाभट्टांनी राज्याभिशेक केल्यावर शिवरायांनी गागाभट्टांना जे काही द्रव्य दिले त्यावरुन गागाभट्टांनी शिवरायांना छळले किंव लुटले असे हे लोक म्हणतात. असे असेल तर काय शिवरायांनकडे केवळ इतकेच द्रव्य होते की जे केवळ एका ब्राम्हणाला दिलेल्या दक्षीनेने संपुन जावे ? तत्कालीन साहीत्य अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येते की गागाभट्टांनी शिवरायांचा सन्मानपुर्वक राज्याभिषेक केला व त्याच्या बदल्यात शिवरायांनी सभासद बखरी नुसार "एक करोड बेचाळीस लक्ष होन " इतकी दक्षीणा दिली आणि अर्थात एक करोड बेचाळीस लक्ष होन जर द्याल तर मी तुमचा राज्यभिषेक केला अशी अट गागाभटांनी शिवरायांना घातलेली कोठेही आढळणार नाही किंवा तशी शोधने ही मुर्खपणाचे ठरेल. शिवरायांनी गागाभटांना वरील दक्षीणा स्वेच्छेने दिलेली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जी गागाभट्टांनी शिवरायांकडून अपरिमित द्रव्य घेतले आणि त्यांचा राज्याभिशेक केला हे सांगताना जाणिवपूर्वक आपल्यापासुन लपवली किंवा इतकी कमी महत्व देवुन सांगीतली जाते की त्याचे महत्व आपल्याला वाटत नाही . आणि ति म्हणजे की शिवरायांनी फक्त्त गागाभटांनाच काय ते द्रव्य दिले किंवा दक्षीणा दिलि असे नाही तर या विशयी बखरकारांच्या नुसार. पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी इत्यादिंना चार महिने पुरेल इतके मिश्ठान्न दिले. अष्ट प्रधान मंडळातील प्रत्येकास एक लक्ष होण तसेच एक हत्ती , घोडा, वस्त्रे, अलंकार वगैरे देण्यात आले. आता हे गागाभट्टांवर आरोप करणारे अतिशहाणे असे म्हणतील का की त्या अतिथी,तपोनिधी ,सत्पुरुष, संन्यासी व अष्टप्रधान मंडळ या सर्वांनी मिळून शिवरायांना छळले म्हणुन ?

आणखी एक येथे सांगायचा मुद्दा म्हणजे की गागाभट्टांनीच शिवरायांना राजाभिशेक करवुन घ्यावा असे सुचवलेले तत्कालीन लिखानामध्ये सापडते . हे सत्य लपवुन गागाभट्टांनी राजेंना छळले असे म्हणनार्‍यांना काय म्हणावे ?

ज्या गागाभट्टांच्या नावाने हे अविचारी लोक बोटे मोडतात त्या गागाभट्टांचबद्दल तत्कालीन बखरकारांनी "वेदमूर्ती राजर्षी " तसेच "भट गोसावी , थोर पंडीत, चार वेद सहा शास्त्रे, योगसंपन्न, ज्योतिषी, मांत्रीक , सर्व विद्येने निपुण, कलियुगाचा ब्रम्हदेव , पंडीत" असे गौरवोद्कार काढले आहेत.

याच्यापलीकडे आणखी काही लिहायचे आणि वाचणार्‍यांनी समजायचे बाकी राहीले असेल असे वाटत नाही. हा सुर्य आणि हा जयद्रत.

13 comments:

  1. gagabhattani shivaji maharajana challe ase mhanne mhanje murkha panache awwal lakshan mhanawayas have . ya peksha jast kahi nako

    ReplyDelete
  2. नशीब गागा भट्ट यांचा पुतळा नाही ... नाहीतर बिग्रेड वाल्याना काम पुतळा संशोधनाचे मिळाले असते ...

    ReplyDelete
  3. mag gagabhattanne aaplya paayachya angthyane tila ka laavla maharajanna...??

    ReplyDelete
  4. आणखी एक गोष्ठ, गागाभट यांचा राजांशी राज्याभिषेकापुर्वीपासूनच संबंध होता. कायस्थ आणि इतर ब्राम्हण यांच्यातील वाद गागाभटांनी सोडवावा अशी महाराजांनी गागाभटना विनंती केल्याचे पत्र आहे.

    ReplyDelete
  5. @IndianFirst
    कोणत्य मुर्खाने सांगीतले तुला ??

    ReplyDelete
  6. धन्यवाद .. खरच खूप छान लेख आहेत !! खूप बरे वाटले वाचून कि कोणीतरी चांगले लेख लिहित आहे :)

    ReplyDelete
  7. विचार परखड आहेत आणि अश्या प्रत्त्युत्तराची गरज आहे.असे ज्वलंत प्रत्त्युत्तर जर ब्राह्मणांनी ह्या मराठ्यांना दिले नाहीतर उद्याच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत. पण एक सूचना आहे कि काही ठिकाणी मराठी लेखनात खूपच चुका आहेत व त्यामुळे अर्थ बोधही होत नाही.एखादा professional माणूस शोध मराठी typing साठी .

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा एक गोष्ट मी याठीकाणी क्लिअर करु इच्छीतो, ती म्हणजे मी ब्राम्हण नाही . आणि एक जात म्हणुन मी कधीच लिखाण करत नाही . मि सर्वात आधी स्वत:ला एक हिंदु समजतो,. बाकी रिप्लाय आणि सजेशन बद्दल धन्यवाद :)

      Delete
  8. brabhananich Rajyabishekala aadkati karnyacha praytna kela

    ReplyDelete
    Replies
    1. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणार्‍यांमध्ये काही मराठे राजे ही होते, त्याचे काय ?

      Delete
  9. Bhadyanno Maharajana wirodh karnare Marathe hote ardhe.Agadi tyancha sakkha bhau Wyankoji pan.Te naika disat tumhala n jyani madat keli Te Dadoji,Gagabhatt,Ramdas swami yanchyawar bolta.Akkal gahan takaliy ka?

    ReplyDelete
  10. Marathe rajkaran sodun kontya field madhe pudha aahet re? Layaki aahe ka Bramhanana bolaichi.Fakt Rajkaran khelaichya laykiche tumi ektar scientist zalai ka Bhosale ,More navacha.Maharajanchya navavar hawa karnya peksha Kartutwa dakhwa hijadyanno.Jo manus lifetime jatibhedala virodh karat ala tyachya navakhali jaticha rajkaran khelta laj watat naika?

    ReplyDelete