Saturday, September 15, 2012

शिवराय विरुद्ध ब्राम्हण


सध्या महाराष्ट्रात एखाद्या जातिच्या लोकांना आरोपीच्या पिंजर्‍या मध्ये उभे करुन स्वत:ला मोठे शाहणे म्हणुन फुशारक्या मारण्याची पद्धत चालू झाली आहे आणि स्वत:ला दुसर्‍यापेक्षा शाहणे आणि विद्वान सिद्ध करायचे असेल तर समोरच्याचे विद्वत्त कमी आहे किंवा समोरचा आरोपाने बरबटलेला आहे असे दाखवले की काम संपते, त्याची विद्वत्ता सिद्ध होते, साधारण अशा भ्रमामध्ये काहि मंडळी आहेत आनि या भ्रमातुनच त्यांनी अज ब्राम्हण समाजाला शिवरायांच्या विरुद्ध उभे केले आहे. एकिकडे सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करुन मुसलमानांना जवळ करायचे आणि दुसरीकडे जातीच्या आधारावर ब्राम्हणांना शिवरायांचे ’खरे’ शत्रू म्हणुन लोकांसमोर उभे करायचे. एकिकडे शिवरायांनी आपल्या स्वराज्यात कोणत्याही धर्माचा अथवा धार्मीक स्थळाचा अपमान केला नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे शिवरायांनी कृश्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला म्हणुन मंदिरे पाडायची आणि वेदांवर घाण करण्याची भाशा करायची हा स्वत:ला विद्रोही म्हणवणार्‍या लोकांचा दुटप्पीपणा आमच्याच लोकांच्या लक्षात येत नाही हे आमचेच दुर्दैव म्हणायचे.

शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण होते : या वाक्याचे भांडवल करुन संपुर्ण ब्राम्हण समाजाला टार्गेट करुन ब्राम्हण हे शिवरायांच्या विरुद्ध होते असे दाखवले जाते परंतु असा प्रतिवाद करणार्‍याला शिवरायांचा राज्याभिशेक करणारी व्यक्तीही एक ब्राम्हणच होती हे का दिसत नाही मला कळत नाही. (गागाभट्टांवरील आक्षेपांचे खंडन मी मागे या लेखामध्ये  केलेलेच आहे) . शिवराज्याभिशेकाला विरोध करणारे जर ब्राम्हण होते तर शिवरायांनी नेमलेले जे अष्टप्रधान मंडळ होते त्यात बहुतांशी ब्राम्हण होते हे विरोध करणारे का विसरतात ? सभासद बखरी मध्ये शिवरायांच्या राज्याभिशेकाला पन्नास हजार ब्राम्हण उपस्थित होते असा उल्लेख आहे त्याच्याकडे का डोळेझाक केली जाते ?? शिवरायांच्या राज्याभिशेकाला ज्यांनी विरोध केला ते मुर्ख होते म्हणुन का ते ज्या जातिमध्ये होते त्याच जातीच्या बहुतांशी लोकांनी शिवरायांच्या राज्याभिशेकाला मान्यता नव्हे स्वत: अभिशेक केला इतकेच नाही तर बहुसंखेने राज्याभिशेकाला उपस्थित राहुन अनुमती दर्शवली त्याचे काय ??

जेम्स लेन च्या मार्फत ब्राम्हणांनी शिवरायांची बदनामी केली :- याप्रकरणी प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉग वरुन (श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून घेतलेला लेख देत आहे तो वाचुन वाचकांनी स्वत:च आपले मत ठरवावे ...
छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर

गेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे?
१.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
२.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.
३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे ?लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.
६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.
७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.
८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......

जयसिंग जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण  :-  बर्‍याचवेळी मिर्झा राजा जयसींगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी  जयसिंग यांच्या यशासाठी आणि पर्यायाने शिवरायांच्या विरोधात यज्ञ वगैरे केले म्हणुन ब्राम्हणांना वेठीस धरले जाते. यज्ञ , पुजापाठ ,हवन  वगैरे पौरोहित्य करणे त्या काळी ब्राम्हणांच्या उपजिविकेचे साधन होते. त्या वेळी ब्राम्हणांनि जे यज्ञ वगैरे केले ते जयसिंगाच्या सांगण्यावरुन . म्हणजे ब्राम्हण हे फक्त पौरोहित्य करत होते आणि अधिपत्य जयसिंग करत होता. का करत होता आणि कशासाठी करत होता याच्याशी काय देणे घेणे ? जयसिंगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी पैरोहित्य केले यावरुन जर ब्राम्हणांना वेठिस धराचे असे असेल तर. जयसिंगासाठी ज्यांनी ज्यांनी तलवारी वगैरे बनवल्या अशा सर्व लोहारांना, त्याचे केस कापुन सेवा करणार्‍या सर्व नाव्ह्यांना, त्याचे कपडे बनवणार्‍या सर्व शिंपी जातीच्या लोकांना अशाप्रकारे स्वत:ची उपजिविका चालवण्यासाठी जयसिंगाच्या हाताखाली जे जे मराठे आणि इतर जातिचे लोक काम करत होते अशा सर्वांना दोश द्यावा लागेल. ब्राम्हणांना यज्ञ केला म्हणुन दोष लावनारे होतील का तयार ??

जरा इकडे ही लक्श द्या  :- केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात होते म्हणुन सर्वच ब्राम्हण समाजाला टार्गेट केले जाते . असे असेल तर शिवरायांना काय केवळ काही ब्राम्हणांनी विरोध केला ??शिवाजी महाराजानी जे स्वराज्य उभारले त्याला उभ्या महाराष्ट्रातून पाठिंबा होता अशी एकच बाजू नेहमी फोकस केली जाते. अन हल्ली ब्रिगेडवाले ब्राह्मणांचा शिवाजीना विरोध होता हे ठासून सांगताना काही नावं जाणीवपुर्वक घेत नाही. सध्या खालील नावं वाचा विरोधक कोण होते ते जाणून घ्या. (खालील यादी संजय सोनावणी यांच्या ब्लॉग वरुन घेतलेली आहे).
१ जावळीचे मोरे
२ यशवंतराव वाड्वे
३ मुधोळचे घोरपडे
४ सिधोजी पवार
५ मंबाजी भोसले
६ मालोजी पवार
७ तुळोजी पवार
८ मनाजीराजे घाट्गे
९ बाळाजी हैबतराव
१० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
११ माने ( विजापूर)
१२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
१३ नाईकराजे पांढरे
१४ खंडोजी खोपडे ( मावळ)
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
१६ शंकराजी मोहिते
१७ नाईकजी खराटे
१८ कल्याणजी यादव
१९ सरदार सर्जेराव घाटगे
२० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
२१ पालवणीचे जसवंतराव
२२ सावंतवाडीचे राजे भोसले
२३ गोंदाजी पासलकर
२४ केदारजी देशमूख खोपडे
२५ सुरजी गायकवाड
२६ दिनकरराव काकडे
२७ संभाजीराव पवार
२८ कमळोजीराव कोकटे
२९ त्रंबकराव खंडागळे
३० कमळोजीराव गाडे
३१ अंताजीराव खंडागळे
३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
३६ माहूरचे उदाराम भोसले
३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
३८ रुस्तूमरावराजे जाधवराव....

आता शिवरायांच्या मुस्लीम विरोधकांची यादी बघू.
१. वाईचा सुभेदार अमीन
२. फतेह खान
३. फतेह खानाचा पठाण सरदार मुसेखान
४. शाहिस्तेखान ( त्याच्या लाखांच्या सेनेत किती मुस्लीम होते ते कोणीच सांगू शकत नाही.)
५. अफझल खान
६. सय्यद बंडा
७. अफझल खानाचा मुलगा फाजल खान
८. अफझल खानाचे सरदार
मुसेखान ( २रा)
याकूत
हसन
अन्कुशखान
रनदुल्ला खान
अंबरखान
९. सिद्धी जोहर
१०. सिद्धी मसूद
११. दिलेर खान
१२. सर्जा खान
१३. बहलोल खान
१४. रोहुल्ला खान
१५. जंजी-याचे सिद्धी
१६. सुरतेच्या छाप्याच्या वेळी शिवरायांवर वकिलाच्या वेशातून वर करणारा मुस्लिमच होता.
१७. याशिवाय औरंगजेब व त्याचा वजीर, दोन्ही आदिलशाह आणि त्यांचे वजीर, बडी बेगम.
या शिवाय संभाजी महाराजांना पकडून विदुषकाचा वेश घालून त्यांची धिनढ काढली तेव्हा त्यांच्यावर दगड मारणारी मुस्लीम प्रजा धरली तर हि संख्या आणखी वाढेल.

आता काही ब्राम्हणांची नावे पुढे करुन आकांडतांडव करणारे काय बोलणार आहेत  ?  केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात गेले म्हणुन ब्राम्हणांना टार्गेट केले जात असेल तर शिवराज्याभिषेक करणारे, दिलेरखानाशी दिलेरीने लढुन प्राण त्यागणारे, शंभुराजांना स्वराज्यात सुखरुप आणणारे, भीषण मृत्युतही त्यांची साथ न सोडणारे, राजांच्या सुखरुप सुटकेसाठी छातीचा कोट करुन खिँड लढवणारे, राजांना दरोडेखोर म्हणणाऱ्‍यांना इतिहासाचे संशोधन करुन त्यांचे जीवन चरित्र सर्वाँसमोर आणणारे सर्वजण ब्राह्मणच. त्यांचे काय करायचे? चांगले वाईट लोक सर्व जाती धर्मा मधे आहेत, पण ही गोष्ट समजण्या इतकी अक्कल ज्या लोकांत नाही त्यांना अत्न्यानी बालक समजून दुर्लक्ष करावे, कारण पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था या लोकांची आहे.